कोंढाजी फर्जंद - भाग १ MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

कोंढाजी फर्जंद - भाग १

कोंढाजी फर्जंद

सिद्दी खैरत खानने किल्ले जंजिराच्या अभेद्य तटावरून...किनाऱ्यावर अगदी तुच्छपणे नजर टाकली..मोठ्या डौलाने फडकणारा भगवा त्याच्या नजरेला पडत होता आणि आसपास जंजिऱ्यावर चढाईसाठी तयार असणारे मावळे...समोरच्या धावपळीवरून त्याला स्पष्ट जाणवत होते..कोणीतरी मोठा मराठा सरदार जंजिरा गिळायला पुन्हा आला होता..पण कोणीही असो त्याला काही फरक पडत नव्हता...अजिंक्य आणि अभेद्य असा जंजिरा किनाऱ्यावरून पहिले तरी किल्ले जंजिराचे महाद्वार अजिबात नजरेत पडत नव्हते...आणि त्याचा जोडीला होता हा खळाळणारा तुफान दर्या.. आणि कलालबांगडी, लांडाकासम आणि चावरी या तोफा..

पण मराठे म्हणावें तसे अजुन लढा देत नव्हते...किल्यावर असलेल्या तोफांच्या माऱ्याबाहेर मराठांच्या तळ पडला होता...गलबत, होड्या पार पद्‌मदुर्गाच्या आडोशाला होत्या...त्यामुळे आतापासून दारू गोळा फुक्कट घालवण्यात काही अर्थ नव्हता..सर्व काही शांत शांत होते..का येणाऱ्या वादळापूर्वीची शांतता होती ?? इकडे किनाऱ्यावर शंभू राजे आणि कोंढाजी बाबा शामियान्यात गूढ सल्लामसलत करत होते...आलेले जेवणाचे थाळे परत पाठवले गेले होते कोणालाही आत येण्यास मनाई होती काही करून ‘किल्ले मेहरुब ऊर्फ किल्ले जंजिरा’ स्वराज्यात आणायचाच होता.. उशिरा संध्याकाळी कोंडाजी बाबा राजांना मुजरा करून निघाले..

तेवढ्यात शंभू राजांनी त्यानां हाक मारली..." कोंढाजी बाबा काही करून येवढा स्वराज्याच्या काळजात रुतणारा किल्ले जंजिरा या भगव्या झेंड्याखाली घेऊन या ...आपल्या आबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करा..तुम्ही बोलाल ते तुमच्या पायावर वाहू " हे ऐकून कोंढाजी बाबा गडगडाटी हसले " काय राज आमची फिरकी घेता व्हयं..थोरल्या मालकांनी आज इतपातूर आणून ठेवलंय..कोण कुठंस आम्ही आज त्यांच्यामुळं आम्हाला येवढा मन मिळतुया अजून काय हवंय "
त्यांच्या ह्या उत्तरावर खुश होत शंभू राजांनी त्यांची गळाभेट घेतली...पुन्हा एकदा मुजरा करून कोंढाजी आपल्या तंबूकडे निघाले..त्यांना पाठमोरे जाताना पाहून शंभू राजांना मनोमन वाटले..मोहीम योग्य माणसाच्या हाती सोपवली आहे..

त्यांच्या पाठमोऱ्या आकृतिकडे पाहता पाहता शंभू राजे मनाने कधीच भुतकाळात गेले होते..आबासाहेबांनी आणि हरहुन्नरी मावळयांनी तुंगभद्रेपासून उत्तरेस अहिवंतापर्यंत अनेक गड स्वराज्याच्या झेंड्याखाली एकत्र आणले होते..पण पन्हाळगड काही केल्या हाताशी लागत नव्हता..शिवाय राजांनी हि सल आपल्या सहकाऱ्यांना बोलून दाखविली...तेव्हा कोंढाजी पुढे झाले होते..आणि पन्हाळगड काबीज करण्यासाठी फक्त ३०० मावळे हाती घेतले.पन्हाळगडाच्या
पायथ्याजवळच्या जंगलात किर्रर्र काळोखात शिवाची भूत गेले ५ दिवस दबा धरून बसले होते...सोबतीला रानवेडा पाऊस..राजांच्या हेरांनी नेहमीप्रमाणे आपली कामगिरी चोख बजावली होती..गडावर एकूण दोन हजार ते तीन हजार गनीम होता...पण काही ठिकाणी कड्यालगत निगराणी आळसावलेली होती..

किर्रर्र काळोखी रात्र होती..डोळयात बोट गेले तर दिसणार नाही..अश्या काळोखात पन्हाळगडाच्या कड्याला चिकटत मावळ्यांनी वर चढायला सुरुवात केली..मोजुन ६० मावळे गड चढत होते...बाकीचे मावळे खाली थांबुन वरून इशारतीची वाट पाहत होते...काळोखात मावळे हळुहळू वर आले..पूर्ण गडावर मोक्याच्या ठिकाणी मावळे पोहचले आणि एकच गलका उडाला..." हरहर महादेव"...अचानक हे मराठे आले कुठून एकच गलका उडाला..६० मावळयांनी एक एक गनीम टिपून कापायला सुरुवात केली पन्हाळा गडाचा किल्लेदार बाबूखान व कोंडाजी फर्जंद यांच्यात तुंबळ युध्द झाले...आणि अचानक पन्हाळगडाच्या जंगलातून कर्णे,तुतारी वजी लागल्या..ते ऐकून गनिमांचे उरले सुरले अवसान गळाले..अखेर पन्हाळगडावर स्वराज्याचा भगवा फडकला...

समुद्रावरून येणाऱ्या गार वाऱ्याने कधी झोप लागली ते कळलेच नाही..सकाळ सकाळ छावणीत उडालेल्या गडबडीने शंभू राजांना जाग आली. छावणीत सगळेच गोंधळाचं वातावरण होते..कानावर येणारी खबर मेंदू सुन्न करणारी होती. आपले कोंढाजी बाबा आणि त्यांचे विश्वासु १० ते १२ मावळे रात्री गस्तीसाठी म्हणून जे किनाऱ्याच्या दिशेनं गेले होते ते परतलेच नव्हते..आणि मराठयांच्या २ होड्या जंजिऱ्याच्या तटाजवळ दिसून येत होत्या आणि त्यावरही पांढरे निशाण फडकत होते...याचा अर्थ काय कोंढाजी बाबा फितूर झाले?? आंपल्या स्वराज्याला फितूर झाले...कालचे त्यांचे बोलणे आणि आताचे त्यांचे वागणे..असे काय घडले एकाएकी सर्व काही द्यायला तयार होतो आपण.. ??

क्रमश :