"श्यामची आई" ही कथा पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली आहे. ही कथा एका युवकाच्या जीवनातील संघर्ष आणि त्याच्या लहान भावाच्या कपड्यांच्या गरजांवर केंद्रित आहे. कथेत नायक शाळेतील शिक्षणासाठी दापोलीस जातो, जिथे पावसाळा सुरू होतो आणि त्याच्याशी संबंधित निसर्गाची सुंदरता वर्णन केली जाते. त्याच्या लहान भावाला नवीन सदरा हवे असल्यामुळे, आई त्याला समजावते की त्याच्या मोठ्या भावांचे भविष्य उज्वल आहे आणि लवकरच त्याला नवीन कपडे मिळतील. कथा काळात कपड्यांची गरज कमी असण्याबद्दल विचार करते आणि नायक आपल्या भावाला नवीन कपडे मिळवण्यासाठी पैसांची चिंता करतो. त्याचे वडील कोर्ट-कचेरीच्या कामामुळे दापोलीस येतात, परंतु कुटुंबावर आर्थिक अडचणी आहेत. कथेत दारिद्र्य, कष्ट, आणि कुटुंबासाठीच्या प्रेमाचा विचार केला आहे. नायकाचा ध्यास त्याच्या भावासाठी नवीन कपडे मिळवण्याचा आहे, जे त्याच्या आईच्या प्रेमाची आणि त्याच्या कुटुंबातील एकतेची प्रतीक आहे.
श्यामची आई - 30
Sane Guruji
द्वारा
मराठी फिक्शन कथा
2.4k Downloads
11k Views
वर्णन
मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली. पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे! नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो, तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. गंधवती पृथ्वी या वचनाची त्या वेळेस आठवण येते. फुलाफळात जो रस व जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो तो पृथ्वीच्याच पोटातला. घरून दापोलीस येताना या वेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्या वेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णा-दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको धरू हट्ट. मित्रांनो! माझ्या लहानपणी कपड्याचे बंड फार माजले नव्हते. आम्हांला कोट माहीतच नव्हता. कित्येक दिवस सदराही वर्षा दोन वर्षांनी नवीन मिळावयाचा. थंडीच्या दिवसांत धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे.
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा