कथा "सत्वशील राजा" एका उदार राजा बद्दल आहे, जो आपल्या प्रजेसाठी सदैव उपलब्ध राहतो आणि कधीही नकार देत नाही. राजा एक दिवस गच्चीत बसून विचार करतो की, त्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नाही, फक्त प्रजेच्या पैशातून मिळवलेले आहे. तो विचार करताना झोपतो आणि सकाळी याचकगृहात जातो. तिथे भगवान शंकर आंधळ्या अतिथीच्या रूपात उभे राहतात. राजा सर्वांना देणग्या देतो, पण आंधळा मागण्यास धीर करत नाही. राजा त्याला प्रोत्साहित करतो, आणि ह्या गोष्टीतून राजा आपल्या सत्वाची परीक्षा घेतात.
मुलांसाठी फुले - १
Sane Guruji
द्वारा
मराठी सामाजिक कथा
7.9k Downloads
14k Views
वर्णन
फार जुनी गोष्ट आहे. त्या वेळेस आपल्या देशात एक राजा होता. उदार म्हणून त्याची सर्वत्र ख्याती होती. तो राजा कोणाला कधीही नाही म्हणत नसे. कोणाचीही इच्छा अपूर्ण ठेवीत नसे. त्याच्या तोंडातून नकार कधीच बाहेर पडला नाही. एके दिवशी राजा एकटाच गच्चीत बसला होता. आकाशात तारे चमकत होते. बागेतील रातराणीच्या वेलीचा वास येत होता. वारा हळूहळू वाहत होता. राजा विचार करीत होता. तो मनाशी म्हणाला, मी उदार म्हणून प्रसिद्ध आहे परंतु वास्तविक माझे असे मी काय देतो? प्रजेपासून मला पैसा मिळतो. त्या पैशांतूनच मी देणग्या देतो व उदार म्हणून मिरवतो. माझ्या स्वतःच्या मालकीचे मी काय दिले आहे? राजाच्या मालकीचे काय आहे? हे राजवाडे प्रजेच्या पैशातूनच बांधले. हे जडजवाहीर प्रजेच्या करातूनच विकत घेतले. ह्या माझ्या देहाशिवाय माझे असे काहीच नाही. माझी सारी मालमत्ता म्हणजे हा साडेतीन हातांचा देह. हा देह जर कुणी मागितला व मी दिला, तर मात्र मी खरा उदार ठरेन, खरा सत्वशील ठरेन.
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा