Sane Guruji लिखित कादंबरी मुलांसाठी फुले | मराठी सर्वोत्तम कादंबरी वाचा आणि पीडीएफ डाउनलोड करा होम कादंबरी मराठी कादंबरी मुलांसाठी फुले - कादंबरी कादंबरी मुलांसाठी फुले - कादंबरी Sane Guruji द्वारा मराठी सामाजिक कथा (23) 4.4k 6.2k 31 फार जुनी गोष्ट आहे. त्या वेळेस आपल्या देशात एक राजा होता. उदार म्हणून त्याची सर्वत्र ख्याती होती. तो राजा कोणाला कधीही नाही म्हणत नसे. कोणाचीही इच्छा अपूर्ण ठेवीत नसे. त्याच्या तोंडातून नकार कधीच बाहेर पडला नाही. एके दिवशी राजा एकटाच ...अजून वाचाबसला होता. आकाशात तारे चमकत होते. बागेतील रातराणीच्या वेलीचा वास येत होता. वारा हळूहळू वाहत होता. राजा विचार करीत होता. तो मनाशी म्हणाला, मी उदार म्हणून प्रसिद्ध आहे परंतु वास्तविक माझे असे मी काय देतो? प्रजेपासून मला पैसा मिळतो. त्या पैशांतूनच मी देणग्या देतो व उदार म्हणून मिरवतो. माझ्या स्वतःच्या मालकीचे मी काय दिले आहे? राजाच्या मालकीचे काय आहे? हे राजवाडे प्रजेच्या पैशातूनच बांधले. हे जडजवाहीर प्रजेच्या करातूनच विकत घेतले. ह्या माझ्या देहाशिवाय माझे असे काहीच नाही. माझी सारी मालमत्ता म्हणजे हा साडेतीन हातांचा देह. हा देह जर कुणी मागितला व मी दिला, तर मात्र मी खरा उदार ठरेन, खरा सत्वशील ठरेन. पूर्ण कथा वाचा ऐका मोबाईल वर डाऊनलोड करा पूर्ण कादंबरी मुलांसाठी फुले - १ 2.1k 2.1k फार जुनी गोष्ट आहे. त्या वेळेस आपल्या देशात एक राजा होता. उदार म्हणून त्याची सर्वत्र ख्याती होती. तो राजा कोणाला कधीही नाही म्हणत नसे. कोणाचीही इच्छा अपूर्ण ठेवीत नसे. त्याच्या तोंडातून नकार कधीच बाहेर पडला नाही. एके दिवशी राजा एकटाच ...अजून वाचाबसला होता. आकाशात तारे चमकत होते. बागेतील रातराणीच्या वेलीचा वास येत होता. वारा हळूहळू वाहत होता. राजा विचार करीत होता. तो मनाशी म्हणाला, मी उदार म्हणून प्रसिद्ध आहे परंतु वास्तविक माझे असे मी काय देतो? प्रजेपासून मला पैसा मिळतो. त्या पैशांतूनच मी देणग्या देतो व उदार म्हणून मिरवतो. माझ्या स्वतःच्या मालकीचे मी काय दिले आहे? राजाच्या मालकीचे काय आहे? हे राजवाडे प्रजेच्या पैशातूनच बांधले. हे जडजवाहीर प्रजेच्या करातूनच विकत घेतले. ह्या माझ्या देहाशिवाय माझे असे काहीच नाही. माझी सारी मालमत्ता म्हणजे हा साडेतीन हातांचा देह. हा देह जर कुणी मागितला व मी दिला, तर मात्र मी खरा उदार ठरेन, खरा सत्वशील ठरेन. ऐका आता वाचा मुलांसाठी फुले- २ 939 1.3k मोरु म्हणून एक विद्यार्थी होता. आईबाबांपासून दूर एका शहरात तो विद्येसाठी राहत होता. त्याने एक खोली घेतली होती. तो फारसा श्रीमंत नव्हता, म्हणून तो हातानेच स्वयंपाक करी. त्याच्या खोलीत बिजलीची बत्ती नव्हती. साधा देशी कंदीलच होता. त्याच्या खोलीत तेलचूल ...अजून वाचानव्हती साधी मातीचीच चूल होती. त्याच्या खोलीत फरशी नव्हती साधी जमीनच होती. मोरुची खोली लहानशीच होती. मोरु व्यवस्थित नव्हता. त्याला कामाचा अक्षयी कंटाळा. चूल कधी सारवायचा नाही. जमीन सारी उखळली हेती. कंदिलाची काच काळी झाली होती. अंगातील कपडे मळले होते, निजावयाची सतरंजी, तिच्यात खंडीभर मळ साचला होता. तरी मोरु तसाच राहत होता. अगदीच ओंगळ व ऐदी. ऐका आता वाचा मुलांसाठी फुले- ३ 557 997 ती एक गरीब विधवा होती. मोलाने काम करी व चार कच्च्याबच्च्यांचे पालनपोषण करी. एका लहानशा झोपडीत ती राहत असे. ती सदैव समाधानी असे. सकाळपासून सायंकाळपर्यंत एका क्षणाचाही विसावा तिला मिळत नसे. त्या दिवशी कोणता तरी सण आला होता. घरोघर आनंद ...अजून वाचाप्रत्येकाच्या घरी आज कोणते ना कोणते तरी पक्वान्न करण्यात येत होते. रामाच्या घरी त्याच्या बापाने श्रीखंडासाठी चक्का आणला होता. मधुकरला बासुंदी आवडे म्हणून त्याच्या आईने कढईत दूध आटत ठेवले होते. गोविंदाच्या घरी पुरणपोळी होती. परंतु आमच्या त्या गरीब मोलकरणीच्या झोपडीत काय करण्यात येणार होते? ऐका आता वाचा मुलांसाठी फुले- ४ 448 914 एका कापडाच्या व्यापाऱ्याने आपल्या दुकानात एक नवीन मुलगा नोकरीस ठेवला. त्या मुलाचा बाप गरीब होता. बापाने मुलाला शाळेतील शिक्षण दिले नव्हते. परंतु घरगुती शिक्षण त्याने दिले होते. प्रामाणिकपणाने वागावे, कोणाला फसवू नये. कोणाला हसू नये. कष्टाने मिळेल ते खावे. चोरी-चहाडी ...अजून वाचाश्रीमंत होण्यापेक्षा खरेपणाने वागून गरिबीत राहावे लागले तरी आनंदाने राहावे, असे त्याचा बाप त्याला शिकवीत असे. निरनिराळ्या बोधपर गोष्टी सांगून मुलाला चांगले वळण त्याने लावलेले होते. मुलगा चुणचुणीत होता चपळ होता परंतु त्याहीपेक्षा खरेपणाने वागणारा, गोड बोलणारा व प्रामाणिक होता. दुकानात तो सर्वांना आवडे. गिऱ्हाईक त्याच्याकडे जास्त यावयाचे दुसऱ्या नोकराकडे कमी जावयाचे. बोलायला गोड, दिसायला गोड, मनाने गोड, हृदयाने गोड, अशी मुले म्हणजे देवाघरची फुले. ऐका आता वाचा मुलांसाठी फुले- ५ 406 926 एका राजाचे दोन मोठे मुलगे आपापल्या नशिबाची परीक्षा पाहण्यासाठी राजधानी सोडून दूर जगात मुशाफिरीला गेले. वाटेत ते नाना प्रकारच्या फंदात सापडले. वेडेवाकडे वागू लागले. घरी येण्याचे भान त्यांना राहिले नाही. त्यांचा तिसरा एक भाऊ घरी होता. तो अगदी बुटबैंगण ...अजून वाचाहा बटुवामन आपल्या दोघा भावांचा शोध करण्यासाठी बाहेर पडला. हिंडता हिंडता त्याची व त्या दोघा भावांची गाठ पडली. त्याला पाहून ते पोट धरधरून हसू लागले. ते थट्टेने म्हणाले, अरे वेड्या, तू कशाला जगाच्या यात्रेला निघालास? तुझं पाऊल मुंगीचं. आमची दहा पावले व तुझी शंभर बरोबर. तरीपण त्यांच्याबरोबर तोही निघाला. तिघे प्रवास करू लागले. ऐका आता वाचा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Sane Guruji फॉलो करा