"छोट्या जगूचा 'रिपोर्ट'" हे राम गणेश गडकरी यांचे एक नाटक आहे. या कथेत धाकटा जगू नाटक मंडळीत काम करतो आणि एकदा लग्नसमारंभ पाहून त्याने मित्रांना त्याचा 'रिपोर्ट' दिला. लग्नाचा कार्यक्रम एक लहान, मातीच्या स्टेजवर झाला, ज्यामध्ये जंगलाचे दृश्य दाखवण्यात आले होते. स्टेजच्या आजूबाजूला प्रेक्षक बसले होते, पण काही 'कुलीन' स्त्रिया उभ्या राहून नाटक पाहत होत्या. वेश्यांसाठी जागा नव्हती आणि मॅनेजर लोक ऑडिअन्समध्ये फिरत होते. स्टेजवर मुख्य पुरुष आणि स्त्रीपार्टीच्या कामाचे प्रदर्शन सुरू होते, पण त्यांचे अभिनय कमी दर्जाचे होते. भटाने प्रॉम्टिंग करताना चांगला अभिनय केला, परंतु मुख्य पात्रांचे बोलणे ऐकू येत नव्हते. नाटकाच्या शेवटी, राजाराणींचे लग्न झाले आणि 'कोरस' गाण्यातून नाटक संपले, मात्र राजाराणी 'कोरसा' मध्ये सहभागी नव्हत्या. या नाटकात नाटकाच्या परिस्थितीचे आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादाचे मजेदार वर्णन आहे.
संपूर्ण बाळकराम - 9
Ram Ganesh Gadkari द्वारा मराठी कथा
2.6k Downloads
8.1k Views
वर्णन
छोट्या जगूचा 'रिपोर्ट' धाकटा जगू कळू लागल्यापासून एका नाटक मंडळीतच होता. एकदा मंडळीच्या मालकाबरोबर एक लग्नसमारंभ पाहून आल्यावर त्याने आपल्या समवयस्क मित्रांना खाली लिहिल्याप्रमाणे 'रिपोर्ट' दिला- खेळ मुद्दाम बांधिलेल्या मांडवात झाला. स्टेज मातीचेच केले होते आणि फारच लहान होते. 'सीन' जंगलाचा होता असे वाटते पण जंगलाच्या 'झालरी' मुळीच नव्हत्या म्हणून त्याच्याबद्दल स्टेजवर झाडांचा पालाच बांधला होता. पडदे स्टेजच्या भोवती न बांधता सगळया थिएटरभोवती गुंडाळले होते. खेळाचे 'पास' फुकट वाटले होते. खुरच्याबिर्च्या काहीच नव्हत्या. सगळयांना जाजमावरच बसावे लागले. 'कुलीन' स्त्रियांसाठी स्टेजच्या आजूबाजूस जागा राखून ठेविली होती पण गर्दी फार झाल्यामुळे त्यांना उभ्याने सगळा खेळ पहावा लागला. वेश्यांसाठी जागा मुळीच ठेवली नव्हती आणि त्या आल्याही नव्हत्या. मॅनेजर लोकच पानविडीतंबाखू घेऊन ऑडिअन्समध्ये फिरत होते.
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा