कथा "श्यामचीं पत्रें" मध्ये एक व्यक्ती वसंत नावाच्या तरुणाशी झालेल्या एका सभा दरम्यानच्या भेटीचे वर्णन करते. सभा संपल्यानंतर, वसंत उत्सुकतेने त्या व्यक्तीकडे पाहात होता आणि त्याला प्रश्न विचारला की तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य आहे का. वसंतने मान खाली घालून त्याच्या संघात असल्याचे सांगितले, परंतु त्याने त्याच्या एकांगी दृष्टिकोनावर पश्चात्ताप केला आणि काँग्रेसच्या झेंड्याखाली येण्याची विनंती केली. पत्र लेखणारा वसंतच्या बदललेल्या विचारांचा आनंद व्यक्त करतो, त्याला पत्राच्या माध्यमातून वसंतच्या निर्णयाबद्दल माहिती मिळाली आणि तो खुश झाला की वसंत संघापासून मुक्त झाला आहे. तो वसंतला शुभेच्छा देत आहे आणि भारतातील सर्व तरुणांना सद्बुद्धी मिळावी, हिंदू-मुसलमान एकत्र यावेत आणि भेदभाव नष्ट व्हावा, यासाठी प्रार्थना करतो.
श्यामचीं पत्रें - 1
Sane Guruji
द्वारा
मराठी पत्र
6.1k Downloads
14.1k Views
वर्णन
तूं मागें पुण्याच्या त्या सभेच्या वेळेस अकस्मात् मला भेटलास. सभा संपली होती. कांही तरुण विद्यार्थी माझ्याभोंवती जमले होते. त्यांतील बरेचजण केवळ स्वाक्षरीसाठीं उत्सुक होते. स्वाक्षरी घेऊन ते गेले. परंतु तूं घुटमळत उभा होतास. तुझ्या डोळयांत एक प्रकारची उत्कटता होती, उत्सुकता होती. मी तुझ्याकडे पहात होतों. तूं माझ्याकडे पहात होतास. जणूं डोळयांआड लपलेलें परस्परांचे रुप आपण पाहूं इच्छित होतों. तुझी-माझी पूर्वीची ओळख ना देख. परंतु त्या एका क्षणी तुझी-माझी ओळख झाली. कायमची ओळख ! आणि मी तुला प्रश्न केला. 'तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघांत आहांत का? ' तूं खाली मान घातलीस. तूं कांही बोलेनास. तुझे डोळे कसे तरी दिसले. आणि थोडया वेळानें पुन्हां तूं वर बघितलेंस. त्या बघण्यांत किती तरी भाव होते !
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा