ही कथा अंमलदाराच्या अंतर्मुखतेवर आधारित आहे, जो वालजी नावाच्या व्यक्तीला पकडण्याच्या विचारात आहे. अंमलदार विचार करतो की, त्याने किती वेळा या वालजीला पकडले आहे, तो किती वेळा पळून गेला आहे आणि त्यावर किती आरोप आहेत. तो वालजीला एक चोर आणि दरोडेखोर मानतो, पण त्याच वेळी तो विचारतो की, या व्यक्तीला नरकात का लोटायचे? अंमलदाराचे जीवन दुसऱ्यांच्या पाठीमागे असलेले आहे, जिथे त्याचे ध्येय गुन्हेगार पकडणे आहे. त्याच्या हृदयातील भावना मावळत जातात, माणुसकी नष्ट होते आणि तो पशू बनतो. त्याला असं वाटतं की गरिबांसाठी लढणाऱ्यांवर पाळत ठेवणे आणि त्यांना पकडणे हे त्याचे कर्तव्य बनले आहे. तो या समाजातील अन्याय आणि गुन्हेगारी यावर विचार करतो, ज्यात समाज व्यवस्था अधिक गुन्हेगार बनवते. अशा परिस्थितीत, अंमलदाराने आपले जीवन आणि कार्य यावर विचार करणे आवश्यक आहे, कारण त्याच्या कामामुळे मानवता आणि भावना मरत आहेत. दुःखी.. - 11 Sane Guruji द्वारा मराठी कथा 4k 5k Downloads 11.3k Views Writen by Sane Guruji Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन वालजी लिलीला भेटायला गेला. तो अंमलदार गाडीत होता. आकाशात आता चंद्र उगवला होता. अंधारात आकाशातील प्रकाश आला. तो अंमलदार विचारू करू लागला, 'या वालजीला का मी पुन्हा पकडू? पुन्हा त्याला जन्मठेप मिळेल. कितीदा पळून गेलेला किती आरोप परंतु हा का चोर? हा दरोडेखोर? हा महात्मा आहे. या महात्म्याला का पुन्हा नरकात लोटू? काय आमचे हे पोलिसांचं जीवन! नेहमी दुसर्यांच्या पाठीमागं असायचं. जीवनातील ध्येय काय, तर कैदी पकडला, गुन्हेगार पकडला! आमची हृदयं शुष्क होतात, भावना मरतात. माणुसकी नष्ट होते. आम्ही पशू बनतो. गरिबांसाठी झगडणारे, त्यांच्यावर आम्ही पाळत ठेवतो. त्यांना क्रांतिकारक म्हणून पकडायचं, फाशी चढवायचं! आणि हे दुसरे गुन्हेगार यांचाही छळ आम्ही चालवायचा! परंतु ते क्रांतिकारकही गुन्हेगार नाहीत, हे चोर दरोडेखोरही गुन्हेगार नाहीत. ही समाजरचना गुन्हेगार आहे. एक श्रीमंतीत लोळतो. दुसरा अन्नाला मोताद होतो. का हे असं व्हावं? चोर, कोण चोर? चोरी करणारा चोर की आजूबाजूस उपासमार असूनही कोठारं भरून ठेवतो तो चोर? समाज ज्यांना चोर म्हणून शिक्षा ठोठावतो, ते चोर किती कर्तृत्वशाली, किती उदार, किती मोठया मनाचे! परंतु त्यांच्या अंगातील हे गुण मातीमोल होतात!' Novels दुःखी.. नंदगाव जिल्ह्याचे गाव होते. नंदगावची वस्ती तशी फारशी नव्हती. वीस हजार जेमतेम लोकसंख्या असेल. फारसे उद्योगधंदे तेथे नव्हते. सरकारी कचेर्या वगैरे पुष्क... More Likes This भज्यांची आमटी द्वारा Vrishali Gotkhindikar वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 2 द्वारा Priyaa शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा