मंचकराव आपल्या घराबाहेर बसले होते, तेव्हा भुजंगराव त्यांच्याकडे आले. मंचकराव भुजंगरावांना 'भुक्कड भुजंग' म्हणून ओळखत होते, कारण त्यांना भुजंगरावांचा वारंवारचा वैताग सहन करायला आवडत नव्हता. भुजंगरावांनी वामनच्या घरात झालेल्या गमतीदार घटनांची माहिती दिली, ज्यात वामन आणि त्याची बायको यांच्यात प्रेमाचा अभाव होता. या गप्पांमुळे मंचकरावांच्या मनात 'नवरा-बायकोत प्रेम हवे' हा विचार आला. त्यांनी गिरिजाबाईलाही प्रेमाची विचारणा केली, पण ती लाजून घरात पळून गेली. मंचकराव विचारात पडले आणि खंडोबाला विचारले की बायका त्यांच्या नवऱ्यावर कशा प्रेम करतात. खंडोबाने त्यांना सल्ला दिला की दारू पिऊन पाहावे. या सर्व गप्पा आणि विचारांनी मंचकरावांच्या मनात प्रेमाच्या विषयावर प्रश्न निर्माण झाला. मंचकमहात्म्य -शेजार आणि प्रेम ! suresh kulkarni द्वारा मराठी कथा 546 2.6k Downloads 8.6k Views Writen by suresh kulkarni Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन मंचकराव घराबाहेर, आपल्या मिशीच्या टोकाला वाती सारखा पीळ देत बसले होते. तेव्हड्यात त्यांचे शेजारी भुजंगराव आले. शेजारी भाडेकरू असेल तर, तो बदलून नवा शेजार येऊ शकतो, पण जर स्वतःहचे घर बांधून रहात असेल तर, तो मधुमेहा सारखा आयुष्याला चिटकलेला असतो. मरणा शिवाय सुटका नाही, त्याच्या किंवा आपल्या! हा भुजंग त्यातलाच. "काय मंचक, निवांत बसलाय."न मागता मिळालेला वैताग म्हणजे 'भुजंगराव', असे मंचकरावांचे व्यक्तिगत मत होते. म्हणून ते भुजंगरावांच्या माघारी त्यांचा उल्लेख 'भुक्कड भुजंग' असा करीत. " आमचे नाव मंचकराव आहे.!" जमिनीवरच्या आपल्या कोल्हापुरी खेटरा कडे पहात, आपल्या उजव्या मिशीवरून, डावी पालथी मूठ फिरवत मंचकराव खर्जात म्हणाले. भुजंगाला आपली चूक कळाली. या मंचकला एकेरी संबोधले More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा