Tanala mhana baay baay - 2 books and stories free download online pdf in Marathi

ताणाला म्हणा बाय बाय..-2

२. मानसिक आरोग्य उत्तम ठेवण आपल्याच हातात....

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

तुम्हाला माहित आहे का कि स्वास्थ शरीराबरोबरच मानसिक आरोग्य महत्वाच असत? मानसिक आरोग्य म्हणजेच मनाचे आरोग्य. तुम्ही फक्त शरीराकडे लक्ष देत राहिलात आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल तर तुमच्या शरीर सुद्धा स्वस्थ राहणार नाही. शरीराची काळजी घेण्याबरोबरच मनाची काळजी घेण सुद्धा अत्यंत महत्वाच आहे. तुम्ही म्हणाल, मला कुठे मानसिक आजार आहे? मानसिक आजार नाही म्हणजे तुमच मानसिक आरोग्य चांगल आहे अस नाही. मानसिक आरोग्य बाबतीत आपण खूपच कमी जागरूक असतो. जास्ती करून आपण फक्त शरीराच्या आरोग्यावरच लक्ष केंद्रित करतो आणि आपल्या लक्षात येत नाही कि शरीराबरोबरच मनाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याहून श्रेष्ठ आहे. तस पाहायला गेल तर, शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा फार जवळचा संबंध आहे. जेव्हा तुमच मन सुधृद असेल तेव्हाच शरीर सुद्धा सुधृद होईल आणि तुम्ही आनंदी राहाल. मानसिक स्वास्थ चांगल असं फार गरजेच असत. तुम्ही काहीही करत असाल त्यात तुम्हाला आनंद मिळण महत्वाच असत आणि त्यासाठी तुमच मानसिक स्वास्थ नेहमीच चांगल राहील ह्या कडे आवर्जून लक्ष दिल पाहिजे.

मानसिक स्वास्थ चांगल असेल तर तुम्ही तुमच आयुष्य पूर्णपणे जगू शकता आणि त्याबरोबर तुम्हाला कोणत्याही समस्येवर सहज रित्या मात करू शकता. जस तुम्ही योग्य आहार घेऊन आपण शरीर स्वास्थ टिकवून ठेवता त्याचप्रमाणे काही गोष्टी करून तुम्ही तुमच मानसिक आरोग्य सुद्धा उत्तम ठेऊ शकता. खर तर तुम्ही योग्य आहार घेतलात, व्यायाम केलात तर त्याचा उपयोग मानसिक स्वास्थ्यावर नक्की दिसून येतो. मन प्रसन्न ठेवण आपल्याच हातात आहे पण त्यासाठी थोड्या गोष्टी करण गरजेच आहे.

बऱ्याच गोष्टींमुळे स्त्रियांमध्ये मानसिक आरोग्य नीट राहत नाही. त्यासाठी बरीच कारण असू शकतात. पण जर योग्य संवाद ठेवला तर मानसिक आरोग्य नीट ठेवण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर, योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य झोप घेतल्यानी मानसिक आरोग्य उत्तम राहू शकते.

*पोषक अन्न आणि मानसिक आरोग्य-

आपण जे खातो त्याचा सरळ प्रभाव आपल्या ऊर्जेमध्ये, शारीरिक आरोग्यावर आणि मूड वर दिसून येतो. त्यामुळे हेल्दी खाण महत्वाच असत. आपण जे खातो ते हेल्दी आहे ते आपण कश्यावरून ठरवू शकतो? हेल्दी डाएट मध्ये सागळ्या प्रकारची पोषण द्रव्य आली पाहिजेत. आपण जे अन्न खातो त्यात अति प्रमाणात साखर, मीठ, फॅट किंवा अल्कोहोल नसले पाहिजे. कोणत्याही अन्नाच्या अति सेवनामुळे शरीरावर परिणाम झालेले दिसून येतात आणि त्याचबरोबर मनावरही त्याचा परिणाम दिसू शकतो. त्यातून योग्य प्रमाणात कॅलरीज शरीराला मिळाल्या पाहिजेत. ज्या अन्नपदार्थातून शरीराला शक्ती आणि उर्जा मिळते आणि शरीर स्वास्थ उत्तम राहण्यास मदत होते. शरीर स्वस्थ असेल कि मग मनाच स्वास्थ सुद्धा उत्तम राहत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सेम डाएट चा उपयोग सगळ्यांवर सारखाच दिसून येणार नाही कारण प्रत्येकच शरीर सारख नसत. प्रत्येकाच्या शारीरिक गरजा वेगळ्या असू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला जे खातो त्यातून योग्य परिणाम हवे असतील तर योग्य व्यक्तीकडून योग्य सल्ला घेण फायदेशीर ठरत.

* व्यायाम आणि मानसिक आरोग्य-

जसा अन्नाचा आणि मानसिक आरोग्याचा संबंध आहे तसाच मानसिक आरोग्याचा संबंध व्यायामा बरोबर सुद्धा आहे. लहान असो किंवा मोठे, सगळ्यांनाच नियमित व्यायाम शरीराच्या हेल्थ साठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी महत्वाचा आहे. नियमित व्यायाम केल्यानी तुमच मानसिक स्वास्थ उत्तम राहत आणि त्याचबरोबर तुमचा मूड फ्रेश होतो ज्यामुळे आयुष्य आनंदी बनण्यात मदत होते. रोज खूप व्यायाम करण शक्य नसेल तर दिवसाला थोडा वेळ तरी व्यायाम होतो ह्याकडे लक्ष ठेवा. प्रतेकानी शरीरच आणि मनाच आरोग्य चांगल ठेवण्याकरता रोज व्यायाम हा केलाच पाहिजे.

नियमित व्यायाम केल्यामुळे तुमचा ताण कमी व्हायला मदत होते. आणि तुम्ही स्वताला डिप्रेशन अर्थात नैराश्या पासून दूर ठेऊ शकता. डिप्रेशन मध्ये असणाऱ्यांना समुपदेशन आणि गोळ्यांबरोबरच नियमित व्यायाम करायचा सल्ला दिला जातो. व्यायामाच्या आधी आणि नंतर शरीरात इंडोर्फिंस नावच केमिकल बनत आणि त्यामुळे स्ट्रेस कमी होतो. त्याचबरोबर तुम्हाला चांगल वाटण्यास मदत होते. कधी कधी मानसिक स्वास्थ बिघडल्यावर दिलेल्या गोळ्यांमुळे तुमच वजन वाढू शकत. पण व्यायामानी तुमच वजन तुम्हाला आटोक्यात ठेवता येऊ शकत.

*झोप आणि मानसिक आरोग्य-

झोप.. शरीराला आणि मनाला आवश्यक असतेच. शांत झोप गरजेची असतेच. झोप नीट झाली कि साहजिकच ताज तवान वाटत आणि आणि तुम्हाला फ्रेश वाटण्यास मदत होते. झोप पूर्ण झाली कि सकाळी फ्रेश वाटेल. पण झोप नीट झाली नाही कि चिडचिड वाढू शकते आणि त्याचबरोबर तुमच मानसिक आरोग्य बिघडू शकत. तुम्हाला शांत आणि गाढ झोप लागत नसेल, किंवा रात्री सारखी जाग येत असेल तर त्याच एक कारण मानसिक स्वास्थ बिघडलंय हे असू शकत. शांत झोप लागण्यासाठी तुम्ही काय करू शकता-

१. रोज ठरलेल्या वेळी झोपा आणि ठरलेल्या वेळी उठा. कधी काही कारणांनी झोपेची वेळ टळून गेली आणि झोपायला तर दुसऱ्या दिवशी नेहमीच्या उठायच्या वेळेपेक्षा जास्ती वेळ झोपून राहू नका.

२. झोपण्या आधी किमान २ तास आधी टीवी किंवा कॉम्पुटर समोर बसून राहू नका. शक्य असल्यास तो वेळ घरातल्या लोकांशी गप्पा मारण्यासाठी घालवावा. त्यामुळे रीलक्स वाटत आणि शांत झोप लागण्यास मदत होते.

३. शक्यतो रात्रीच्या जेवायच्या वेळा चुकवू नका. आणि जड अन्न रात्री घेण टाळा. त्याचबरोबर, रात्रीच जेवण चुकवू नका. कारण पोट फार वेळ रिकाम राहील तर अॅसीडीटी चा त्रास होऊन त्याचा परिणाम झोपेवर होऊ शकतो.

४. रात्री झोपतांना शांत गाणी ऐका. आणि गाणी आपोआप बंद होतील अशी काळजी घ्या. मन शांत झाल कि आपसूकच शांत झोप लागण्यास मदत होते.

५. रोज व्यायाम करा पण शरीराला अति ताण देऊन व्यायाम करू नका. शरीर जास्ती थकल तरी शांत झोप मिळणार नाही.

६. झोपतांना कोमट पाण्याचा शॉवर घेतला तर शांत झोप लागण्यास नक्की मदत होऊ शकते.

इतक सगळ करून सुद्धा जर शांत झोप लागत नसेल तर वैद्यकीय सल्ला घेण हितकारक ठरत.

* ताण आणि मानसिक आरोग्य-

सध्या आयुष्य फार धकाधकीच झाल आहे. त्यामुळे तुम्हाला ताण येऊ शकतो. ताण येण्याची बरीच कारण आहेत. आणि प्रत्येकाची ताण येण्याची कारण वेगळी वेगळी असू शकतात. कधी कधी ऑफिस चे ताण आपण घरी आणतो आणि त्याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या वागण्यातून दिसून येऊ शकतो. तुमची मनस्थिती बिघडली कि आपसूकच त्याचा परिणाम पूर्ण कुटुंबावर पडू शकतो. कधी कधी घराची काम करतांना सुद्धा तुम्हाला ताण जाणवू शकतो. तुम्हाला ताण आला कि चीड चीड वाढून पूर्ण घरच मानसिक स्वास्थ बिघडू शकत. पण तुमच आणि पूर्ण घराच मानसिक स्वास्थ उत्तम ठेवण तुमच्याच हातात असत. घरात नेहमी खेळी मेळीच वातावरण राहील ह्याकडे लक्ष द्या. कधी कधी पूर्ण कुटुंब मिळून हेक्टिक आयुष्यातून सुद्धा थोडे निवांत क्षण बाजूला काढून एकमेकांबरोबर वेळ घालवा. घरातल्या बाई नी तिच मानसिक आरोग्य उत्तम ठेवण खूप महत्वाच असत. म्हणून प्रत्येक बाई नी तिच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ उत्तम आहे ह्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी स्वतासाठी न चुकता थोडा तरी वेळ काढा. जर तुम्हाला वाटल तुमच मानसिक स्वास्थ बिघडलं आहे तर अपराधी मानून न घेता डॉक्टर चा सल्ला जरूर घ्या. तुम्ही रोजच्या आयुष्यात कितीही बिझी असाल तरी अगदी रोजच स्वतासाठी काढा. फार नाही तर किमान १५ मिनिट. त्यात जे जे तुम्हाला करायला आवडत ते करा. वाचन, पेंटिंग, लिखाण किंवा काहीही जे तुम्हाला आवडत ते तुम्ही करू शकता. रोज स्वतासाठी आवर्जून वेळ काढा कारण स्वतासाठी वेळ काढण खूप महत्वाच असत.. अस केल्यानी तुम्हला खूप मस्त वाटेल.

शारीरिक आरोग्य बरोबरच मानसिक आरोग्य नीट आहे ह्याची काळजी घ्या आणि तुमच्या बरोबर घरातल्या लोकांच स्वास्थ जपा.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED