Tanala mhana baay baay - 3 books and stories free download online pdf in Marathi

ताणाला म्हणा बाय बाय..-३

३. दैनंदिन आयुष्यातला ताण कमी करायचाय? हे करून बघा....

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

सध्या स्पर्धा इतकी वाढली आहे कि त्या स्पर्धेमुळे ताण,तणाव किंवा चिंता वाढलेल्या दिसतात. आणि त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या आरोग्यावर दिसून येतो. तुम्हाला माहिती असेल,व्यायाम केल्यानी तुमच शरीर सुधृड होत पण तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये इतके व्यस्त आणि तणावानी ग्रासलेले असता कि तुम्हाला व्यायाम करायला वेळ मिळतच नाही.. आणि तुम्हाला व्यायाम करायची जरूर वाटत नाही! पण एक मिनिट थांबा, जेव्हा आयुष्यात तणाव येतो तेव्हा तो घालवायला एक गुड न्यूज आहे. ती गुड न्यूज म्हणजे, तुम्ही व्यायामानी तणाव घालवू शकता!!!! व्यायाम कोणत्याही प्रकारचा असला, एरोबिक्स किंवा योगा, तुम्ही केलेला व्यायाम तुमचे रोजचे ताण घालवायला मदत करतो. ताण घालवायला नियमित व्यायाम अत्यंत उपयोगी ठरतो. तुमच्या शरीरात न वापरलेली खूप एनर्जी असते. ती एनर्जी योग्य प्रकारे वापरली गेली पाहिजे. व्यायाम म्हणजे हेल्थ क्लब ला जाऊनच केला पाहिजे अस काही नाही. तुम्ही चालायला जाऊ शकता,सायकलिंग करु शकता किंवा तुम्हाला आवडतो असा एखादा गेम खेळू शकता. ह्यातलं काहीच शक्य नसेल तर आणि घरी कुत्रा पाळला असेल तर कुत्राला रोज न चुकता फिरायला घेऊन जाऊ शकता किंवा घरातल्या घरात तुमच्या आवडत्या गाण्यांवर नाचू शकता. कोणत्याही पद्धतीनी व्यायाम होण महत्वाच!!

तज्ञ सल्ला देतात, आठवड्यातले जास्तीत जास्त दिवस मध्यम स्वरूपाचा व्यायाम ३० मिनिट केला पाहिजे. व्यायम करण्याची बरेच फायदे आहेत-

१. व्यायामानी फक्त तुमची हेल्थ सुधारत नाही तर नियमित व्यायाम केल्यामुळे रोजच्या आयुष्यातले ताण तणाव कमी होण्यास मदत होते.

२. व्यायाम केल्यानी तुमचे मसल रीलॅक्स होतात आणि तुम्हाला झोप लागण्यातही मदत होते.

३. शरीराला योग्य प्रमाणत व्यायाम मिळाल्याने इंडोर्फीन नावच केमिकल तुमच्या रक्तात सोडलं जात आणि त्यामुळे तुमचा ताण कमी होतो आणि तुम्ही आनंदी बनता.

४. नियमित व्यायाम केल्यानी नैराश्य आणि अस्वस्थता जायला मदत होते.

५. व्यायाम केल्यानी फक्त ताण जायला मदत होत नाही तर व्यायाम केल्यानी तुम्ही सडपातळ होता त्याचबरोबर सुंदरही दिसता.

६. व्यायाम केल्यामुळे पाठ दुखी कमी होण्यास मदत होते. डायबेटीस अर्थात मधुमेह आवाक्यात राहतो आणि रक्तप्रवाह सुधारल्यामुळे स्ट्रोक यायची शक्यता कमी होते.

शेवटी काय, व्यायाम केल्यानी तुम्ही तंदुरुस्त राहता आणि कधी ताण आला तर त्या ताणावर मात करू शकता.

हे लक्षात ठेवा- व्यायाम कंटाळवाणा होणार नाही ह्याची नेहमी काळजी घ्या. तुम्हाला एक प्रकारचा व्यायाम करून कंटाळा आला तर तुम्ही वेगळ्या पद्धतीचा व्यायाम करू शकता. अस केल्यानी तुम्हाला व्यायाम करतांना कंटाळा येणार नाही. जर तुम्ही रूम मध्ये व्यायाम करत असल तर व्यायामात बदल करून बाहेरचे व्यायाम म्हणजे चालणे इत्यादी करू शकता. जो व्यायम करतांना तुम्हाल मजा येणार नाही असा व्यायाम तुम्ही जास्ती दिवस करू शकतात नाही. व्यायाम करतांना तुम्हाला फ्रेश वाटल पाहिजे. जर व्यायाम कंटाळवाणा झाला तर तुमच्या व्यायामात खंड पडणार हे नक्की. मग व्यायाम करण्याच पण बर्डन राहील आणि व्यायाम करण्यातली सगळी मजा जाईल! व्यायाम असा निवडा जो करतांना तुम्हाला व्यायाम करतोय हे कळणार देखील नाही.

तुम्ही व्यायाम चालू करू असा विचार करायला लागलात कि सगळ्यात आधी तुमच्या मनात शंका यायला लागतात, मला व्यायाम जमेल का? बिझी लाइफ मध्ये व्यायाम करण्यासाठी वेळ मिळेल का? मला व्यायाम कंटाळवाणा वाटणार नाही ना.. आणि तुम्ही व्यायाम चालू करायच्या आधीच मागे हटता. पण जेव्हा व्यायाम म्हणजे बर्डन न समजता व्यायामाची मजा घ्यायला लागल तेव्हा तुम्हाला तुम्ही केलेल्या व्यायामाचे चांगले परिणाम दिसून नक्की दिसून येतील. आणि व्यायाम केल्यावर तुम्हाला फ्रेश वाटेल हेही नक्की. कोणताही व्यायाम करण्याआधी वॉर्म अप करायला आणि मध्ये विश्रांती घ्यायला विसरू नका ज्यानी तुम्हाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही.

काही व्यायाम आणि त्याचे फायदे-

१. चालणे-

चालणे हा एक सोप्पा व्यायाम आहे. अगदी कोणीही ते रोजच्या रुटीन मध्ये वापरू शकतात. चालणे हा एक एरोबिक व्यायाम प्रकार आहे. रोज ठरवून सकाळी जर अर्धा तास चालण हे सहज शक्य होत. चालाण्याबरोबर हळू हळू जॉगिंग केल तर ते हि फायदेशीर ठरू शकत. चालणे किंवा जॉगिंग फ्री व्यायाम आहे.. त्यासाठी फिटनेस क्लब ला जायची आवश्यकता नाहीच! चालण्याचे बरेच फायदे आहेत, चालल्यामुळे हृदयाच काम नीट होत त्याचबरोबर फुफ्फुस आणि पाय मजबूत ह्वायला मदत होते. चालण्याच्या नियमित व्यायाम केल्यानी तुम्ही ऑस्टिओपोरोसिस दूर ठेऊ शकता. नियमित चालल्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवता येत आणि डायबेटीस नियंत्रणात ठेवायलाही मदत होते. नियमित चालल्यामुळे तुमच्या शरीराला लवचिकता येते. जर तुमच्या कामाच्या ठिकाणी लिफ्ट असेल तर त्यावेळी लिफ्ट चा वापर करण्या ऐवजी जिन्याचा वापर केला तरी त्याचा उपयोग होतो.

२. योग-

योग हा प्राचीन काळापासून चालू आहे. योग या शब्दाचा अर्थ "जोडणे' असा आहे. योगसाधनेमुळे मनाचे संतुलन राखले जाते, त्याचबरोबर शरीराची लवचिकता जपली जाते त्यामुळे स्वत:साठी आणि समाजासाठी योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे. योगाचा अजून फायदा म्हणजे, नियमित योग केल्यानी ताण तणावापासून मुक्ती मिळू शकते. योगाचा रोज थोडा वेळ केलेला सराव पुरेसा असतो. पण सातत्य महत्वाचे. प्राणायाम आणि ध्यान धारणा हि ताण तणाव दूर करणारी प्रभावी तंत्र आहेत. योगाच्या सातत्याने शरीरातले विषारी द्रवे बाहेर फेकली जातात त्याचबरोबर मनावरचा ताण तणाव हि कमी होण्यास मदत होते. आणि मन प्रसन्न राहते.

३. ताई ची-

ताई ची हा प्रकार "मेडीटेशन इन मोशन" म्हणून ओळखल जातो. ताई ची मार्शल आर्टसचा निर्माण चीन मध्ये झाला. ताई ची हा मार्शल आर्ट चा प्रकार आहे. आणि हा प्रकार खूप सौम्य आहे त्याचबरोबर ह्या प्रकारामुळे शरीरावर कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही. हेल्थ प्रॉबेल्म वर उपाय म्हणून ह्या प्रराचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर तब्येतीच्या काही तक्रारी उद्भवू नये ह्यासाठीही ताई ची चा उपयोग केला जातो. हा प्रकार खूप उपयुक्त आहे.. ताई ची ह्या प्रकारामुळे ताण आणि तणाव कमी करण्यास मदत होते. आणि शरीराची ताकद वाढते. त्याचबरोबर शरीराला लवचिकता येण्यास मदत होते. ताई ची मुळे शरीराची इम्यून सिस्टम मजबूत करतो. ताई ची चा केल्यानी शारीरिक आणि त्याचबरोबर मानसिक लाभ मिळतात. म्हणजेच ताई ची पूर्ण शरीर हेल्दी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

योगा बरोबरच ताई ची पूर्ण जगभर वापरलं जात आहे. तज्ञांकडून ताई ची शिकून घेऊन आपल्या आयुष्यातला ताण कमी करण्यास नक्कीच मदत होऊ शकते..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED