आयुषः हे...असच असतं Snehal More द्वारा कविता मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

आयुषः हे...असच असतं

आयुषः हे...असच असतं..

तुटलेल्या मनाला जोडणारं..
का कुणी नसतं...
मनातल्या भावना समजून घेणारं..
का कुणी नसतं...
जिव्हाळा लाऊन मधेच साथ सोडून..जाणार्याला..थांबवणार...
का कुणी नसतं..
शब्दांना समजून अर्थ लावणारे खूप असतात...
पण अबोल मनाला ..समजून घेणारं..
का कुणी नसतं...
प्रेम करून आपलं सर्वस्व देऊन..
स्वतः ला विसरणार्या जीवासाठी..
जीव देणारं...
का कुणी नसतं...
पुसलेल्या आठवणींना...पुनः नवीन पानावर रेखाटणार..
का कुणी नसतं...
प्रेमाने मन जिंकणार..
बेभांन होऊन विश्वास ठेवणारं...
आपलं..असं..
का कुणी नसतं...
रोज होणारी सकाळ..
त्यात नाविन्य आणि अशेशी लहर ..आणणारं..
का कुणी नसतं...
वेदना होऊन निराशालेल्या जीवाला
आनंदाने पुन्हा बहरून देणारं ....
का कुणी नसतं ...
पण ...
असूनही ..नसल्याची ओळख करून देणारं
आयुषः हे...असच असतं..

Aathvan

Ek ashi sakal ji athvli tri avismarniyy spandann nirman hotat.

आयुष्य हे असच जगायचं असतं

वाहणार पाणी जस सतत पुढे जात असतं... तसच आपण पुढे जायच असतं...
आपल्यासाठी काय लिहून ठेवलाय ..याचा विचार करण्यापेक्षा ..आपण कुणाच्या आयुष्यात काय लिहून आनंद वाटू शकतो हे महत्वाच असतं...
नेहमी सुखाची अपेक्षा सोडून ..दुख्खा ला देखील जगायचं अस्त... आपल्या ला कुणी साथ द्यावी ..या कल्पने पेक्षा ..आपण कुणाची साथ बनून चाललो ..हे समजायचं असतं...
सुखात आनंद व्यक्त कर्ण सोप्प अस्त ..पण एखाद्याच्या दुखात वेळ काढण ..म्हत्वाच असतं ...
आपल्या आयुष्य्तले ..वाईट क्षण आठवन्या पेक्षा एखाद्याच्या आयुष्यात...आशेची किरण बनून...नवीन जीवन दान द्याच असतं...
जगन सोप कस होईल...या उलट.. कुणाच्या आयुष्यला आधार देऊन पुनः बहर रायचं असतं...
बागेत विविध रंगाची फुले असतात तसच...
विविध आणि सुंदर विचारांनी...जगायचं असतं...
कठीण रस्ता असला..वेदना...असहाय...होत असले तरी...
लक्ष पर्यंत पोचायचं असतं...
तुटलेल्या ह्रिदयाला...अश्रुनी घेरले असले...तरी..
पुनः हसून नवीन आयुष्य घडवायचं असतं.....

प्रेम ...

प्रेम ...एक आगळी वेगळी .. कल्पना ..
मुळात ..याचा अर्थ कसा असतो ..हे सांगण ...म्हणजे खूपच अवघड ..
माझ तुझ्या वर प्रेम आहे .." हे सांगण जेवढ सोप्प आहे तेवढच"
प्रेम "...
याची जाणीव होण अवघड ...
तू ..मला आवडतेस " किव्हा ..
तू ..मला आवडतोस "...हे प्रेम नसत ..
ती फक्त एक आवडच असते ..
प्रेम म्हणजे ..
मनापासून केलेला एक असा स्वीकार जो कधी पुसवन शक्य नाही ..
प्रेम म्हणजे ..
एक ओढ ....कधी न संपणारी ...
प्रेम म्हणजे ..
दुरावा ...ज्यात डोळ्यात आलेले अश्रूंचा प्रतिबिंब हास्यात दिसतो ...
प्रेम म्हणजे ..
आठवण ....जी ..रोज असली तरी ..न दाखवता ..दिसणारी
प्रेम म्हणजे ..
भावनांचा असा आभाळ जो विचारांच्या पलीकडे ..जाऊन ..जीवाला चिंब भिजवतो ...
प्रेम म्हणजे ..
पाऊस ...त्यातला ..तो ओलावा ..जो ..
मीठीत घेतल्याचा ..आनंद देऊन ..
मनात स्पन्दन निर्मान करतो ..
प्रेम म्हणजे ..
अबोल ...शब्द ..
प्रेम ...म्हणजे ...
विश्वास ...ek जिव्हाळा ..
जो काळ आणी वेळेला ..बांधलेला नसतो ..
पण तो फक्त खर्या मनालाच कळणारा असतो ..
खरच ..
प्रेम म्हणजे ..प्रेमच असत ....
पण सगळ्याचं सेम नसत .....

कल्पना....

दुरावा ...
कधी न संपणारा ....
हरवलेल्या स्वप्नांचा ..आरसा दाखवणारा ..
केलेल्या प्रेमाची एक गोड आठवण देऊन पुनः जीवाला ..वेड लावणारा ..
मैत्री ..
एक सुखद स्पर्श ...
मैत्री ..म्हणजे ..एक अशी साथ ..जी .. जिथे कुठे असेल ..आपल्या अस्तित्वाची ओळख देत नेहमी सोबत असते
मैत्री ..म्हणजे ....न सांगता ..भाव व्यक्त होऊन जाणारी ..एक अल्गद भावना ....
किती प्रयत्न करून एक नवीन ..सुरवात केली ..
स्वतःला समजवत ..एक कल्पना ..लिहली ..
आयुष्याच्या या वाटेवर ..फक्त ..कधीतरी आनंदाची ..लहर आली ..
कस सांगायचं ...कुणास ठाऊक ..या सत्याची गाथा परिस्थिती ..मात्र सगळच शिकवून गेली ..

आज खूपच वाईट वाटले ..अगदी ..आशर्यच म्हणाव ....
खरच ..म्हातारपण नक्कोच ....
आज मी पाहीले ले एक दृश्य ....
एक आजी आजोबा बघीतले ...हातात काठी ..
चेहऱ्यावर एक आशा ....डोळ्यात मुलांसाठी दिलेले बलिदान ..
आणी त्यांची आभा अशी ..जशी ..सांगत असे ...आपल्या कर्तव्यांची ..कहाणी ..
दोघ पण थांबले होतेय ...त्यांच्या कडे बघवत नवत ..
काही वेळ थांबलेले ते ...एक पाऊल पुढे घेत समोरून येणाऱ्या गाडी कडे वाटचाल करत होते ..त्यात त्यांचा मुलगा होता ...त्या गाडीला बघून मला खूप बरे वाटले ..मीच आशेला लागले ..कि त्यांचा मुलगा गाडीतून उतरून ...आपल्या आई वडिलांना ..बसवणार ....अगदी स्वतःच्या डोळ्यातून अश्रूंची ती लाट ...जशी नाहीशी होत गेली ..जस जशी ती गाडी त्यांच्या जवळ येत गेली ...
आणि ...हाच तो क्षण होता ..ज्या वेळेस .आजीनी आपल्या काठीच्या आधारे त्रास घेत गाडी चे दार उघडले ... आजोबांनी थकलेले डोळे एक क्षण मुलाकडे वळवून एक आशेची शेवटची जशी भेटच घेतली ....आणि ते देखील गाडीत बसले ...
याचा अर्थ ..मुलाच आई बाबांवरच प्रेम नाहीस झाल ..अस होत ????...
पण ..ज्या आई ने ..हाथ पकडून चालवल .
आयुष्याची ओळख करून दिली ..महत्व समजावले ..त्या मुलाला ..एक वेळ ही ..त्या आईच्या प्रेमाची जाणीव नाही झाली ?..
ज्या बाबांनी ..आपल्या खांद्यावर खेळवून त्याला ..गर्वाने जग्यला ..शिकवले ..आज तोच मुलगा ..आपल्या गर्वाने एवढा मोठा झाला ..की ....एक आधाराचा हाथ तो पुढे नही देऊ शकला ..
नको ....नको असे मह्तार्पण ..जीथे आई बाबांच्या अपेक्षांची रोज बळी पडत असेल ..
खरा तर नको अशी
मुलच! !!!!!!!!...
ज्यांना ..स्वाभिमानाचा धडा शिकवणारे आई वडिलच त्यांच्या साठी नकोशे झालेत .......
लहान असताना आई बाबांचा हाथ धरून चालणारे आज तेच हाथ त्यांच्या म्हातारपणात पुढे यायला का घाबरतात ....???
त्यांच्या मुळे समाजात मान प्रतिष्ठा मिळालेले तेच मुल
आपल्या त्याच आई बाबांना बाहेर घेऊन जायला का माघार घेतात.....
जर त्यांना थोडे सुख देण्याची हिम्मत नसेल तर त्यांना वेदना देण्याचाही अधिकार नहिये....

ओळक असूनही ..अनोळखी वाहवे लागते ..
वेळ ठरवते असे वागणे ज्यात भावना ..नसल्याचे वाटते
शब्द कसे मुके होऊन डोळ्यातून वाहतात
आपल्या माणसाची चाहूल घेण्यासाठी सतत शोध लावतात ..
बेभान होऊन जगावे ......
आनंदाने बहरून जावे ....
साथ अशी असावी आपल्य व्यक्तीची की ..
प्रत्येक परिस्तिथित सावरून जावे ...
असावा विश्वास असा ...
बेधुंद आकाशात पंख
पसरून वावरणारा पक्षी जसा .............____●___●___.................
भेट नाही ती जी अपूर्ण असेल
साथ नही ती खरी जी टिकत नसेल
का अपेक्षा असे की वाहवे चांगले
का झुरत मन अचानक वाटेवर थांबले.........
विचारांच्या खेळात मन इतके रमून गेले..
गम्मतच म्हणावी आयुष्याची.....स्वतःलाच विसरून गेले....

काही गोष्टी संपतात पण ...राहून जाते तर ती त्या क्षणाची आठवण ...
नाती कधी तुटत नसतात ..तो फक्त एक काळ असतो जो ..आपल्याला वाटेल तसा ..घडतं नसतो ..
कीती जरी प्रत्यन केले तरी ..
गेलेली वेळ परत नाही येत ....
का म्हणून आलेला दुरावा आपण संपवण्यासाठी प्रयत्न नाही घेत ....
मोठेपणा न दाखवता ..प्रेमाने वागावे ..
इतरांच्या सुखासाठीच आपले जीवन जगावे ..
नम्रतेने ..वागून ..सगळ्यांचे मन जिंकावे ..
अश्याच पद्धतीने ..आयुष्यात नाविन्याचे धडे ..मिळवावे ..
बनावी साथ अशी कुणाची ..की मन उल्हासाने भरून जावे
असावे संकल्प असे जे स्वप्नांच्या पलीकडे जाऊन अस्तित्वात ..एक सुंदर विश्व
घडवून आणावे .. .
जपावे ..नाते असे ..जे गोडवा देऊन जावे ..
बस .......
एवढेच ..हवे की ...
जगन सुंदर वाटावे ..आणी ..
आपल्याच कुणाच्या सहवासात शेवटचे ..श्वास असावे ..