अपराध बोध - 1 Anita salunkhe Dalvi द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपराध बोध - 1

मेघा संध्याकाळी घरी आली. तिला यायला बराच उशीर झाला होता. ती इतका वेळ कधी घरा बाहेर राहत नव्हती. म्हणजे सकाळी दहा ते संध्याकाळी सात इतका वेळ घराबाहेर राहणार हे तिच्यासाठी खूपच नवीन होतं पण बरेच दिवस तिचा हाच दिनक्रम होता. घरात पाऊल टाकताच कळाल ते घर संपूर्ण अंधारात होत. समीर अजून आला नव्हता तिने लाइट लावले किचन मध्ये जाऊन फ्रिज उघडला. थंडगार पाण्याची बाटली काढली आणि डायनिंग टेबल कडे गेली खुर्चीवर बसून थंडगार पाणी प्यायली. तिला खूप रिलॅक्स वाटलं. डायनिंग टेबलच्या खुर्चीवर नुसतीच मागे टेकून ती छताकडे बघत विचार करत होती. तिच्या मनात अपराध बोध होता काहीतरी भयंकर केल्याचा.

मेघा आणि समीरच्या लग्नाला चारच वर्षे झाली होती. त्यांचं तसं अरेंज मॅरेज पण दोघे एकमेकांना इतके शोभत होते की ,त्यांच्या लग्नात सुद्धा पाहुण्यांना शंका आली की हे लव्हमॅरेज तर नाही. दोघांचे आई वडील सगळ्यांना सांगून सांगून थकले कीं हे लव्ह मॅरेज नाही. पण तरी दोघांच्या आई वडलांना त्याचा आनंदही होता कारण आजकालच्या लव मॅरेज च्या युगात त्यांच्या मुलांनी अरेंज मॅरेज साठी होकार दिला आणि त्यांच्या मुलांना योग्य ते जोडीदार ही मिळाले. दोघांबद्दल सांगायचं झालं तर मेघा तशी बिनधास्त होती आणि समीर समजदार पण जरा लाजरा. मेघा बोलायला तिखट तर समीर कधी कोणासही मन दुखावत नव्हता. समीरला मेघा पहिल्या भेटीतच आवडली होती पण मेघा मात्र समीरशी लग्न आई वडिलांचा मान म्हणून करत होती. लग्ना मध्ये कुठल्या खट्याळ आत्याने “ तुझा नवरदेव हुंडा मागतोय म्हणे ” असे सांगितले यावर ती इतकी भडकली कि तिने लग्नातील मंगलाष्टकांच्या आधी नवरदेवाची बोलण्याची इच्छा व्यक्त केली. सगळेच त्यावेळी गोंधळले. कुणालाच काय झालंय हे कळायला मार्ग नव्हता. मेघाच्या आई वडिलांनाही तिच्या मनाचा पत्ता नव्हता. मेघा काही बोलतही नव्हती. मंडपात सगळे वातावरण ताणल जात होते. तेव्हाच समीर च्या वडिलांनी सगळा प्रकार सावरलाआणि “काय हरकत आहे ?”असे सांगून दोघांना जवळच मंदिरा मध्ये देव दर्शनासाठी पाठवले. दोघेही वर वधूच्या कपड्यात खूप शोभून दिसत होते. मेघा काही सुंदरी वगैरे नव्हती, पण तिच्या चेहऱ्यावर समजदारी आणि स्पष्टवक्तेपणाचे तेज होते. डोळ्यात चमक होती. नाकात नथ हातात हिरव्या आणि मोत्यांच्या बांगडय़ा यांचा कॉम्बिनेशन शोभून दिसत होते. मोरपिसी रंगाचा शालू, कुंदन हार, असा सगळा शृंगार घालून ती मंदिरात गेली. रागात होती. समीर तेथे आधी पोहोचला होता. गोल्डन रंगाच्या बुटी असलेल्या शेरवानी त्यांवर लाल रेशमी काम त्याला खूप शोभून दिसत होते. तो तिला लांबूनच पाहत होता. त्याने तिला या आधीही पाहिलं होतं, पण आजच्या पाहण्यात आणि त्या पाहण्यात जन्म आणि मरण इतका फरक होता. तो तिला बघताच तिच्या प्रेमात पडला. प्रथमदर्शनी प्रेम व्हावं तसाच.

ती मंदिरात आली. त्या समोर उभी राहिली. दोघांनी देवीला नमस्कार केला. ती रागात होती तो काहीच बोलत नव्हता. मग तिनेच सुरुवात केली. ती म्हणाली “मला हे लग्न नाही करायचं “ समीर एकदाच स्तब्ध झाला. त्याला कळालंच नाही की अचानक काय झालं. त्याच्या मनात अनेक शंका यायला लागल्या की मेघाला लग्न का नसेन करायचं. मी तिला आवडलं नाही? तिला कोणी दुसरा आवडता तिचा कोणी मित्र तर नाही! म्हणजे बॉयफ्रेंड वगैरे. ती खरंच माझ्याशी लग्न नाही करणार ?पण मला तिच्याशी प्रेम झालेआहे ते पण आत्ताच जन्म जन्मा साठी हवं असलेलं. कादंबरी मध्ये वाचण्यासारखं पण मग आता हे काय? आता मी काय करू? तीच्या वर लग्नाची जबरदस्ती नाही करू शकत. मला तिला जाऊ द्यायला पाहिजे. मी तिच्यावर असाच प्रेम करेन आयुष्यभर. त्याला तसाच गप्प बघून ति आणखी चिडले. इतके दिवस समजूतदारपणे बोलणारा आणि प्रामाणिकपणाचा देखावा करणारा आज गप्प आहे ,असं तिला वाटलं. मेघा -“ खरच सज्जन वाटला होता तुम्ही मला पण तुमचं आणि तुमच्या फॅमिलीचा खरं रूप मला कळलं चेहऱ्यावरती सुशिक्षितांची मुखवटे घालून काम मात्र अशिक्षितां पेक्षा ही खालच्या पातळीचा करता तुम्ही. एवढीच पैशांची हाव होती तर लग्न ठरल्या दिवशीच सांगायचं ना तेव्हा मी स्वतःहून नकार दिला असता” हे सगळा ऐकताना समीर खूप शांत होता अचानक झालेल्या आरोपां मध्ये त्याला काहीच कळत नव्हतं. पण तीच्या बोलण्या मध्ये व्यवहाराचा संबंध आला आणि तो मध्येच म्हणाला समीर- “तू काय म्हणतेस? आणि पैशाचं काय?” तो जरा रागातच म्हणाला कारण त्याच्या फॅमिलीचा बद्दल बोलेलं त्याला आवडलं नव्हत.. मेघा -” पैशाचं काय ? याचा विचार हुंडा मागायचे आधी करायचा होता “. समीर -“ काय हुंडा ?आणि कोणी मागितला?” मेघा -“तुम्ही आणि तुमच्या फॅमिलीने मागितला हुंडा “ समीरला सगळा गोंधळ करायला वेळ नाही लागला. त्याने तिला विचारलं “म्हणून तू लग्नला नकार देतेस?” मेघा- “ हो मला अशा मुलाशी लग्न नाही करायचं ज्याला पैसा महत्त्वाचा आहे आणि तो हुंडा मागतोय.” तो हसला त्याला जरा बरा वाटला. कारण त्याला माहिती होतं की , हे कारण चुकीचा आहे. त्याने तिला शांत केला. तो म्हणाला “तु तुझा आईवडिलांना विचारले का ? ”ती म्हणाली “नाही. ते तुमची बाजू घेतील !”तो म्हणाला “थांब आपण त्यांना आता विचारुयात. ”त्याने त्याच्या वडिलांना फोन लावला आणि तिच्या वडिलांनाही समोर बोलायला सांगितलं तेव्हा तिला कुठे कळालं कि असं काही झालेलं नव्हतं. ती शांत झाली तिला स्वतःची लाज वाटायला लागली. तिची मान शर्मेने खाली गलीे. समीरला तिची अस्वस्थता जाणवली मग त्याने तिला जवळ घेतले तिची मान हाताने त्यानेे वर उचलली आणि तो म्हणाला अपराधी वाचण्यासारखं काहीच नाही. मला अभिमान आहे कि माझी होणारी बायको स्वतःची मतं समोर मांडण्यासाठी भीत नाही. चला आता निघूया मंडपात सगळे वाट बघत आहेत. ती म्हणाली पण माझ्या मुर्खपणामुळे आपल्या लग्नाचा शुभ मुहूर्त निघून गेला. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले त्याने लगेच ते टिपले आणि तो म्हणाला आपण ज्या मुहूर्तात लग्न करू तो आपला शुभ मुहूर्त असेल.तिने त्याच्या डोळ्यात बघितले. तिला त्याचा खूप अभिमान वाटला. दोघेही निघाले. मंडपात पोहोचतात सगळ्यांचे डोळे दोघांवरती जडले होते. त्याने त्याच्या वडिलांना सांगितले की लग्नाची तयारी करा. सगळे कामाला लागले पण सगळ्या पाण्याच्या डोळ्यांमध्ये एक प्रश्न चिन्ह होता. तिनी तो हेरला विधी सुरू होण्यापूर्वी तिने माईक घेतला आणि तिने बोलायला सुरुवात केली “आपण आज सगळे इथे आमच्या दोघांच्या लग्नाला उपस्थित राहिल्या याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करते आणि कार्यक्रमाला झालेल्या उशिराबद्दल मी आपली सगळ्यांची क्षमा मागते हा उशीर माझ्यामुळे झाला आहे तरी आम्हाला तुम्ही सुखी दाम्पत्य जीवनाचा आशीर्वाद द्यावा ही विनंती धन्यवाद.” या तिच्या बोलण्यावर संपूर्ण मंडप टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमला. समीरच्या आई वडिलांनाही त्यांच्या होणाऱ्या सुनेचा अभिमान वाटला. आणि अशा प्रकारे त्यांचं लग्न पार पडल. या प्रसंगाची आठवणल मेघाला झाली. तिला आणखी ओशाळला सारखा वाटलं. समीरची बदली सहा महिन्यांपूर्वीच नवीन ठिकाणी झाली होती ती दोघं या शहरामध्ये एकटीच राहात होते. आई वडील गावाला राहायचे ,पण सगळं सुरळीत होतं लग्नानंतर तिलाही समीरशी प्रेम झाला होता तो होताच इतका चांगला आणि समजूतदार. तो तीची खूप काळजी घ्यायचा त्याने तिला कसलीही बंधनं घातली नव्हती. ती नोकरी वगरे ही काही करत नव्हती. तिने स्वतःहून घरसजवणार घर चालवणाहि कामा निवडली होती. तो चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये कामाला होता.

तिला अलीकडेच एकदम एकटे वाटायला लागलं होत.ती खूप उदास असायची. समीरला ही कामाचा लोड खूप असल्यामुळे तिला हवा तसा वेळ त्याला तिला देता येत नव्हता. तरि तो पूर्ण प्रयत्न करायचा. ती गप्प गप्प राहू लागली. तिला काहीच नाही कळायचं ती काय करते एवढ्या मोठ्या घरांमध्ये ती एकटीच असायची. घर, गार्डन सजावट करणे ही तिची आवडती कामे होती पण त्यातही तिचं मन लागत नव्हतं. म्हणून ती एकटीच बाहेर पडायची, एकटे मॉलमध्ये फिरण, एकटे गार्डनमध्ये फिरण, त्यामुळे तिचा एकटेपणा आणखी वाढला. तिच्यासाठी शहरही नवीन होते म्हणून जास्त कोणी ओळखीचा नव्हता. असेच दिवस चालले होते आणि एके दिवशी मॉलमध्ये तिला तिचा जुना मित्र भेटला. हर्षवर्धन.