अपराध बोध 4 Anita salunkhe Dalvi द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपराध बोध 4

अपराध बोध 4 मेघा त्यादिवशी संध्याकाळी घरी आली. तिच्या मनात वादळाने थैमान घातले होते तिने केलेल्या चुकीच्या अपराध बोधाने तिचे हृदय भरून आले होते तिला स्वतःची किळस वाटत होती .तिला स्वतःच्या केलेल्या कृत्याची लाज वाटत होती.इतक्या दिवसांमध्ये हर्ष बद्दल जी काही लपवालपवी तिने समीर पासून केली होती त्यामध्ये काही वाईट हेतू नव्हता पण तरीही खोटं ते खोटंच होतं . समीर आणि तिच्यामध्ये काही समस्या नव्हती पण तीच्या एकाकीपणा मुळे झालेली तिची मानसिक अवस्था त्यामुळे तिच्यावर हा प्रसंग उद्भवला होता आणि विवाहबाह्य संबंध या सारख्या अनैतिक गोष्टींच्या जाळ्यात ती फसली होती . तिला तिचे आणि समीरचे नाते अत्यंत प्रिय होते . परंतु या सगळ्या घटनाक्रमांमुळे तिला त्या नात्याची काळजी वाटू लागली तिला समीरची काळजी वाटू लागली . त्याला हे सत्य जेव्हा सांगेल तेव्हा त्याच्यावर याचा काय परिणाम होईल? त्याची भूमिका काय असेल ? तो कसा विचार करेल या सगळ्या गोष्टींचा ? तो समजून घेईल का ? पण ती , तो समजून घेण्याची अपेक्षा मुळीच करत नव्हती . ती त्याच्या अत्यंत टोकाच्या निर्णयासाठी सुद्धा तयार होती . ती कोणत्याही प्रसंगापासून पळणारी मुलगी नव्हती. ती स्वतः केलेल्या गोष्टींचे परिणाम स्वतः भोगणारी आणि प्रत्येक प्रसंगाला सामोरी जाणारी मुलगी होती तिने मनात ठरवलं , की चूक आहे तर आहे ती आता मान्य करायची आणि समीरला पुढचा निर्णय घेण्यास मोकळीक द्यायची. ------- संध्याकाळ ढळत झाली होती . बाहेर अंधार पडत चालला होता आणि तिला तिच्या आणि समीरच्या नात्यांमध्येही अंधारच दिसत होता. ती सोफ्यावर बसली होती समीरची वाट बघत .तिला पुढच्या घडणाऱ्या घटना क्रमाची काळजी वाटत होती. तिचे हृदय धडधड होतरात्रीचे नऊ वाजले समीर यायची वेळ झाली होती ,जसा घडाळ्याचा काटा पुढे सरकत होता तसे तिचे हृदयाची धडधड वाढत होती . ती विचारातच बसली होती , तिला त्या विचारातच झोप लागली. तिने शांत डोळे मिटले आणि सोफ्यावर मागे टेकून बसली . विचारचक्र सतत चालूच होते . घराची बेल वाजली . ---------------------------------तिचे डोळे खुलले , ती उठली . दरवाजा खोलला समीर दरवाजात उभा होता . त्याने घरात शिरण्यापूर्वी रोजच्या सारखाच स्मिथहास्यं केलं . तो आत आला त्याने त्याची ऑफिस बॅग ठेवली .मेघाने त्याला पाणी दिले ,त्याने ते पिले . तो फ्रेश होण्यासाठी निघून गेला. मेघा सगळं सांगण्यासाठी त्याची हॉलमध्ये वाट बघत होती . थोडय़ा वेळात तो बाहेर आला. त्याने तिच्याकडे बघितलं ते दोन क्षण ते एकमेकांकडे बघत उभे राहिले त्याने दिला विचारलं ----#समीर# - ‘काय झालं मेघा ? तुला काही बोलायचं का माझ्याशी ?’ आतापर्यंत मेघा त्याच्याकडे शांतपणे बघत होती पण त्याचा तो प्रेमळ आवाज ऐकताच तिच्या हृदयाचा ठोका चुकला. कारण जेव्हा समीरने तिला विचारलं तुला काही बोलायचंय का ? तिच्याकडे सांगण्यासारखं भरपूर काही होतं एवढा वेळ ति त्याचीच तयारी करत होती .पण ते सांगण्या ऐवजी तिच्या मनामध्ये दुसरे वाक्य तरळत होतं ,ते होत ‘I love you’.पण हे वाक्य तिच्या ओठांवर येत नव्हतं . तिचे डोळे चमकले तिने पटकन समीरची नजर चुकवली इकडेतिकडे वळली उगाचच काहितरी दुसरं काम करायला लागली. त्या दोघांचं लग्न अरेंज मॅरेज होतं , पण समीर वर तिला प्रेम कधी झालं हे कदाचित तिलाही माहिती नव्हतं .त्याच्यापासून आता आपण दूर जाणार या भावनेने तिला त्याच्यावर असणाऱ्या प्रेमाची आठवण करून दिली होती. तिला खूपच असह्य होत होता . तो आता पर्यंत तिचा फक्त नवरा होता ,जोडीदार होता , तो आता प्रियकर झाला होता . तरीही तिने मन घट्ट केले ती वळली समीर तिथेच उभा होता . ----# मेघा # - ‘हो , मला तुझ्याशी काही तरी बोलायचंय?’ ----#समीर#- ‘ हो बोल ना….’ ----#मेघा#- ‘ मी जे तुला आता सांगेन ते प्लीज शांतपणे सलग ऐकून घे .मध्येच मला थांबवू नको आणि त्यानंतर तुला जो काही निर्णय घ्यायचा असेल तो तू घेऊ शकतो . मी तो मान्य करेन , कोणतीही तक्रार न करता.’ ----#समीर#- (काळजीत) ‘काय झालंय मेघा ? तु ठिक आहेस ना?’ ----#मेघा# - ‘समीर गेले काही दिवस तू ऑफिसला गेल्यावर मी घराच्या बाहेर पडते आणि ऑफिसवरून यायच्या आधी घरी परतते . पण मी एकटी फिरत नाही माझा स्कूल - कॉलेज फ्रेंड हर्षवर्धन ,जो आपल्या लग्नात पण आला होता . मी त्याच्या बरोबर फिरत होते(तिच्या डोळ्यात अश्रू होते) तो एक दिवशी अचानक मॉलमध्ये भेटला ,आम्ही खूप गप्पा मारल्या ,तो बिझनेस साठी शहर बघायला आला होता. म्हणून मीच त्याला म्हणाले , मी दाखवते शहर आणि मग मी त्याला रोज शहर दाखवायला जात होते .खरं तर मला तुझ्याशी लपवण्याची काहीच गरज नव्हती ,पण मी या घराच्या एकाकीपणामुळे स्वतःला आणि आपल्या नात्याला एवढ्या शांततेच्या दरीत खेचून घेऊन गेले की त्याविषयी तुझ्याशी बोलण्याची इच्छा झाली नाही . ही माझी चूक होती पण त्यानंतरही मी तुला काही सांगितलं नाही , ही माझी सगळ्यात मोठी चूक होती . हर्षवर्धन बरोबर राहून माझ्या एकाकीपणा दूर झाला आणि मला स्वतःची जाणीव झाली मी स्वतःशी पण बोलत नव्हते ती बोलायला लागले .स्कूल- कॉलेजमध्ये असताना मी निडर आणि बिनधास्त होते. त्याच मी ची मला पुन्हा आठवण झाली . मला मी सापडले आणि मग जाणवलं की हे काही मी करते आहे , खोटे बोलून जाण , तुझ्यामागे परपुरुषाला भेटणे , याला आपल्या समाजात विवाहबाह्य संबंध म्हणतात. (तिचा हुंदका अनावर झाला )मग मला स्वतःचीच लाज वाटली , आणि म्हणून ठरवलं की तुला सगळं खरं सांगायचं आणि मग तुझ्यावरच निर्णय सोपवायचा .तु कोणता टोकाचा निर्णय घेणार असशील तरी मला मान्य आहे .कारण चूक माझी आहे आणि मला त्याचा अपराध बोध होत आहे .’ तिने बोलणं संपवलं ,तिने समीर कडे मान वर करून बघितली . ती त्याच्याकडे काही बोलण्याच्या अपेक्षेने बघत होती . त्याची नजर खाली होती तो शांत होता .त्याने तिला पाणी दिले ती ते पाणी प्यायली .मग तो बेडरूमकडे वळला जाताना तो म्हणाला , -----#समीर#- ‘मला थोडा वेळ दे ,तू पण थोडा वेळ शांत बस.’ मेघा त्याच्याकडे कोरड्यानजरेने बघत होती त्याने बेडरुमचा दरवाजा लावला ती बाहेरच बसली होतीे . समीरला खूप मोठा धक्का लागला म्हणून त्याने वेळ मागितलाय हे समजून तीही स्वतःला कोसत बाहेरच्या सोफ्यावर बसली होती . भयान शांतता घरात पसरली होती इतक्या शांततेचा भंग झाला दारावरची बेल वाजली .सहसा त्यांच्याकडे कोणी येत नव्हतं म्हणून ती गोंधळली ती दरवाज्या खुलायला उठणार तेवढ्याच बेडरूमचा दरवाजा उघडला समीर बाहेर आला त्याने बाहेरचा दरवाजा उघडला .समोर हर्षवर्धन उभा होता ती आश्चर्यचकित झाली हर्ष इथे कसा ? समीरने बोलावलं ?तो आत येताच समीरने हर्षवर्धनला मिठी मारली मेघा बघतच होती. तिला काहीच कळत नव्हतं काय काय चाललंय सगळं? ----#समीर #-खरच मित्रा तुझे धन्यवाद तुझ्यामुळे मला माझी बायको परत मिळाली ती आज माझे शी दिलखुलास बोलते आहे फक्त तुझ्यामुळे. समीर हर्षवर्धनला आत घेऊन आला आणि हर्षवर्धन बसला मेघा सोफ्यावर बसून दोघांकडे बघत होती ,तितक्यात समीर तिच्याकडे आला तिचा समोर जमिनीवर बसले तिचे हात हातात घेतले आणि त्याच्या अश्रू भरलेल्या डोळ्यांनी त्यांनी मेघाच्या डोळ्यात बघितले आणि त्याने बोलायला सुरुवात केली . ----#समीर#- I am sorry मला माफ कर या सगळ्याचं कारण मी आहे ,अपराध बोधाची गरज तुला नाही मला आहे .मी माझ्या कामात इतका व्यस्त होतो .की तुझी काळजी घेणं मला नाही जमले तिथे या नवीन जागी माझ्यावर विश्वास ठेवून तू आलीस आणि मी मात्र तुझ्या विश्वासावर खरा नाही उतरू शकलो माझ्या मुळे तू मानसिक अस्थिरतेकडे ढकलली गेली .मला माफ कर आणि प्लीज तुझा आणि हर्षवर्धनच्या निखळ मैत्रीला या विवाहबाह्य संबंध सारखे घाणेरडे अर्थ लावू नकोस.’ ----#मेघा#- ‘पण मी त्याच्या बरोबर बाहेर फिरायला गेले हे तर खरं आहे ना?’ ----#समीर#- ‘ नात्यामध्ये विश्वास महत्त्वाचा असतो आणि मला तुझ्यावर पूर्ण विश्वास होता , आहे आणि पुढेही राहील’ मेघाला समीरचा अभिमान वाटला . समीरने पुढे बोलायला सुरुवात केली. ----#समीर#- हर्षवर्धन दिवशी तुला भेटला त्या दिवशी तो मला भेटायला आला .त्यांनी मला एक मित्र म्हणून तुझा नी माझ्यात काय प्रॉब्लेम चालू आहे हे विचारलं .मला काहीच कळेना कारण माझ्या मते आपल्यात काहीच प्रोब्लेम नव्हता .मग त्याने त्याला जाणवलेल्या गोष्टी मला सांगितल्या . मला काही सुचत नव्हतं मी काय करू तेव्हा हर्षवर्धन मला डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरांना संपूर्ण परिस्थिती सांगितली तेव्हा ते म्हणाले कि नवीन ठिकाणी अॅडजस्टमेंट ला प्रॉब्लेम होतो आहे म्हणून तुम्ही त्यांना बोलकं करण्याची गरज .तेव्हा हर्षवर्धनेच मदत करायच ठरवल आणि तो म्हणाला “मी तीला कॉलेज आणि स्कूलच्या आठवणीं मधून बोलक करायचा प्रयत्न करेन.” .आणि फायनली तू आज हे सगळं बोललीस आणि मलाच अपराधी वाटतंय. तुझी यात काही चूक नाही आमच्या मनात पण नाही कि तू हे असं काही विचार करशील.’( रडत) ----#मेघा# - ‘प्लीज समीर रडू नकोस .पण खरंच समीर तुम्ही दोघांनी हे माझ्यासाठी केलं खरच मी तुमच्या दोघांचे धन्यवाद कसे कसे मानू काहीच कळत नाही.’ सगळे गैरसमजाचे काळेे ढग दूर झाले होते तरी वातावरण खूपच ताणले गेले होतं म्हणून हर्षवर्धन मध्येच म्हणाला ‘गप ग, जास्त मेलोड्रामा करू नको, आता झालेला सगळा व्यवस्थित , मग!’ ----#मेघा# - ‘खरच हर्षवर्धन तू नसतास तर आमच्या दोघांचा अबोला कधीच संपला नसता आणि आम्ही असेच आयुष्यभर कुढत राहिलो असतो कदाचित काहीतरी विचित्र घडलं असतं .’ ----#हर्षवर्धन# -( स्मिथ हास्य करत) ‘पण काही झालं का ? नाही ना . मग का विचार करते आणि अंत भला तो सब भला .असंही तू जर आई बाबांकडे परत आली असतीस तर माझ्या डोक्याला ताप जास्त झाला असता .यार रोज पिडल असतं तु.(तिघी खूप हसले) चला चला खूप झाल सगळं . आज माझ्याकडून पार्टी तुम्हा दोघांना.’ ----#मेघा# - ‘ तू आमच्यासाठी इतकं केला आज पार्टी आम्ही तुला दिली पाहिजे .’ ----#हर्षवर्धन#-माझ्याकडे पार्टीसाठी कारण आहे .माझ्या ऑफिसच उद्या उद्घाटन आहे आणि म्हणून तुम्हाला आज पार्टी देणार आहे .’ ----#मेघा# - ‘अरे पण तू अजून ऑफिससाठी जागा फिक्स कुठे केली? तुला एकही जागा नव्हती आवडली .’ ----#समीर# - ‘अग तो जेव्हा आला तेव्हा सगळा फिक्स झालं होतं .तो ओपनिंगसाठी आला होता , हे सगळ तुझ्यासाठी करत होता तो.’ मेघाने कृतज्ञतेने त्याच्याकडे बघितलं . तो तिच्याकडे बघून फक्त एक स्मितहास्य केलं.मेघाला खुश बघून त्याला खूप समाधान वाटलं . ते तिघे जेवायला बाहेर चालले होते .हर्षवर्धन कार काढण्यासाठी आधी खाली गेला.घरातून निघताना समीरने सहजच मेघा कडे बघितलं आणि तिला विचारलं ----#समीर # - ‘माझ्या मनात खुप वेळा पासून एक प्रश्न आहे की जेव्हा मी तुला विचारलं कि तुला माझ्याशी काही बोलायचे आहे का? तेव्हा तुला काही तरी बोलायच होतं पण तू लाजून निघून गेलीस…..काय बोलायचं होतं तुला?’ ----# मेघा# - (ती हळूच हसली . तिची नजर लाजेने खाली गेली. ती त्याला हळूच म्हणाली) कारण तेव्हा तुझा प्रश्नाचं उत्तर या इतर गोष्टी नव्हत्या तर I love you होत ………’ समीरने तिची हनुवटी हळूच वर उचलली दोघांनी एकमेकांकडे प्रेमाने बघितले त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि ही त्यांच्या प्रेमळ आयुष्याची खरी सुरुवात होती ………………….*************--*************--*---------**************************************************** वाचकहो ….ही माझी पहिली कादंबरी होती . तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी धन्यवाद. माझी पुढची कादंबरी ही याच कादंबरीमधील पात्र हर्षवर्धन याबद्दलअसणार आहे तर लवकरात लवकर पुढील कादंबरी ‘हर्षवर्धन’ आपल्या भेटीस येईल---------- धन्यवाद.