Raje books and stories free download online pdf in Marathi

 राजे

???? राजे ????

आपण सगळेच म्हणत असतो 'राजे परत या'
'राजे महाराष्ट्राला तुमची गरज आहे'इ.इ.

पन मी म्हणते "का यावं महाराजांनी परत
काय गरज आहे त्यांना परत यायची"

"त्यांनी परत यावं ते दारूच्या आहारी गेलेल्या युवा पिढीला पाहण्यासाठी?
त्यांनी परत यावं ते त्यांच्या स्वराज्यात किती बलात्कार होतात हे पाहण्यासाठी?"

मी एक प्रश्न विचारते"स्वराज्य हे राजेंनी लोकांच्या वासनेचा नंगा नाच सुरु राहावा यासाठी बनवलंय का?
त्यांच्याच नावावर त्यांच्या रयतेला फसवलं जावं यासाठी त्यांनी स्वराज्य बनवलंय का?"

"तो महामानव स्वतः लाच घ्यायच्या विरुद्ध होता
पण त्यांच्या नावावर लाच घेतली जावी यासाठी त्यांनी स्वराज्य बनवलंय का?"

"मुलींवर अँसिड हल्ला व्हावा या कारणास्तव त्यांनी स्वराज्य बनवलंय का?
अहो खरंच या असल्या गोष्टींसाठी त्यांनी स्वराज्य बनवलंय का?"

"तर नाही. त्यांनी स्वराज्य बनवलंय ते रयतेसाठी
पण त्यांची रयतच त्यांची तत्वे पाळत नाही "

"अहो एकच तर तत्व होत त्या महामानवाच ते म्हणजे
'अन्याय करू नका,करू देऊ नका,आणि कोणी केलाच तर सहनही करू नका'"

"पण त्यांची रयत……………………………………
अहो हे एकच तत्व त्यांच्या रयतेला पाळायला अवघड जातंय"

"जर खरंच वाटत असेल की राजेंनी परत यावं , तर एकच करा
या स्वैराचारी राज्याला स्वराज्या सारखे बनवा"

"ते असेल खरे स्वराज्य नव्हे नव्हे"
                   'सुराज्य'"

                हर हर महादेव
                - Bhavika Anil Kalpana Raka
                Pls Share With Name.

इतर रसदार पर्याय