आत्महत्या - एक भयकथा Suvidha द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आत्महत्या - एक भयकथा

एक खोली... जिथे एक माणूस काही मंत्र बोलत बसला होता... समोर एका मुलीला बांधून ठेवले होते.... तिचे केस तिच्या चेहर्‍यावर पसरले होते... बेशुद्धावस्थेत होती ती... एक बाई आणि माणूस त्या मुलीला उठवण्याचा प्रयत्न करत होते... त्या बाईची रडून रडून पुर्ण अंगातील त्राण संपून गेला होता...  एका कोपऱ्यात एक जोडपं उभ होत आणि ते सुद्धा रडत होते.... पण हे सगळ काय होत? ह्याच उत्तर मिळण्यासाठी ४ महिने मागे जाव लागेल....

नेहा, सुधा आणि मंजिरी...  तिघे हि एकदम जिगरी दोस्त... ' दोस्त के लिये कुछ भी... ' सारखी मैत्री. १२ वी पर्यंत एकत्र शिकल्या. नशिब एवढ जोरावर की तिघींना एकच मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. तिघी पण एकदम खूष झाल्या. पण कॉलेज घरापासून लांब असल्याने त्यांनी कॉलेज च्या वसतिगृहात रहाण्याचा निर्णय घेतला.

आणि वसतिगृहात जाण्याचा दिवस उजाडला. कॉलेज अजून ८ दिवसानी चालू होणार होते. सामानाची बांधाबांध चालू झाली. सगळ्यानी आपापल्या परीने सल्ले दिले.  ' नीट राहा...  कोणाशी भांडू नका... वेळे वर खात पित जा... तब्येतीला जपा... अभ्यास नीट करा... ' हे आणि असे खूप सारे सल्ले १५ दिवस अगोदरच दिले जात होते. तिघींना आता ऐकुन कंटाळा आला होता. शेवटी जाताना मंजिरी ची आई हळुच तिला बोलली ' मंजे... अमावस्या आणि पौर्णिमा ला रात्रीच बाहेर पडू नका... भूत झपाटेल... '

मंजिरी जोरजोरात हसू लागली आणि हसतच म्हणाली ' अग आई... भूत बित काही नसतं... कोण सांगत गं तूला हे सगळ ...

आई रागात बोलली ' मंजे जेवढ सांगितल आहे तेवढ लक्षात ठेव.... जास्त दात काढू नको... कळलं का?

' हो आई आलं लक्षात माझ्या... आता निघू मी?

' हो... चल' आई ला आपला हुंदका आवरता आला नाही.

इकडे सुधा आणि नेहा च्या घरी पण हाच  कार्यक्रम चालु होता. शेवटी निरोप समारंभ संपला आणि तिघही आपल्या नवीन प्रवासाला चालु लागल्या पण त्याना काय माहित कि हा प्रवास किती खडतर होणार आहे ते....

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

तिघांना जी खोली मिळाली होती ती ऐसपैस होती म्हणून तिघी जाम खूश होत्या. घरातून आणलेल सामान व्यवस्थित लावून त्या तिघी फेरफटका मारायला बाहेर गेल्या. कुठे काय मिळत हे सगळ बघून पुन्हा वस्तीगृहावर परत आल्या.  काँलेज गेट च्या बाहेर एक मोठ पिंपळाच झाड होत. जेव्हा तिघी बाहेरून आत येत होत्या... का कोणास ठाऊक... पण मंजिरी ला तिथे विचित्र वाटलं. अस वाटत होतं की कोणीतरी तिचा गळा आवळून धरला आहे. श्वास घेण्यास त्रास होत होता. पण जसे ते गेट मधून आत आले परत तिला बर वाटू लागलं. तिला वाटलं तिला भास झाला असेल म्हणून तिने तो विषय कोणाजवळ काढला नाही.

पहिले १५-२० दिवस वस्तीगृहावर आलेल्या मुलींशी ओळख करण्यात आणि काँलेज कस आहे, त्याचे शिक्षक कोण आहेत हे सगळ करण्यात गेलं. आता मन लावून अभ्यास करण्याची वेळ होती. तिघी ही हुशार होत्या. अभ्यासात आणि मजा मस्करी करत महीना कसा सरून गेला कळल देखील नाही. मंजिरी ला शिकवायची फार आवड होती म्हणुन ती काँलेज नंतर जसे जमेल तस गरिब मुलांना शिकायला जात असे. तस तिने वसतिगृहात सांगून ही ठेवल होत. त्या मूळे तिला ९.३० पर्यंत  परवानगी होती.

पण आज सकाळ पासूनच मंजिरी ची तब्येत ठिक नव्हती. पोटात दुखत होते... मासिक पाळी मुळे... त्या मुळे ती काँलेज ला न जाता खोलीतच आराम करत होती. सायंकाळी तिला जरा बरं वाटू लागलं त्यामुळे ती शिकवणी ला जायची तयारी करू लागली. आज तिने आपले केस धुतले आणि मोकळे सोडले. तिचा आवडत्या रंगाचा म्हणजे काळ्या रंगाचा अनारकली ड्रेस घातला. सुधा आणि नेहा तिला चिडवायला लागल्या
' हम्म... आज एवढ नटून थटून का बर शिकवणीला? '

' काही नाही सहज घातला... ड्रेस '

' हम्म... सहजच का'  नेहा आणि सुधा मोठ्याने हसायला लागले.

' तुम्ही हसत बसा मी जाते' अस बोलून मंजिरी निघाली.

आज मंजिरी ला उशीर झाला. आज अंधार पण जास्त वाटत होता पण का?  मंजिरी विचार करत जात होती.

' कदाचित आज अमावस्या असेल' मंजिरी मनातल्या मनात बोलली. तेच समोर पिंपळाच झाड दिसल आणि मंजिरी च्या पोटात भिती ने गोळा आला. त्या दिवशी जे झाल ते आठवल. अंधारात ते झाड अजूनच भयानक वाटत होत. ती खाली मान घालून चालू लागली. झाडाजवळ पोचल्यावर अचानक पानांची सळसळ होऊ लागली. तिने काय झाल म्हणुन वर बघितल तर.... तिला पानाच्या आड दोन डोळे चमकताना दिसले. तशी ती घाबरली. ते दोन डोळे अजून जवळ येताना दिसले. आणि मंजिरी ने जे पाहिलं ते पाहून तिचे दोन्ही हात आपोआप तिच्या तोंडावर गेले. डोळे मोठे झाले. एक आकृती हळूहळू तिच्या दिशेने तिला बघत पुढे आली. एक निर्जीव चेहरा... डोळे सुद्धा अबोल... हातावर जखमा... केस मोकळे... आणि त्या तून टपटप गळणारे पाणी.... हळूहळू ती आकृती  मंजिरी च्या आजूबाजूला फिरू लागली आणि तिच्या पाठी मागे थांबली. मंजिरी ने मागे वळून पाहिलं तस त्या आकृती ने आपल तोंड उघडून मंजिरी वर झडप घातली तस मंजिरी दोन फूट लांब उडाली. तिने मंजिरी च्या शरीरात प्रवेश केला होता.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

मंजिरी निर्विकार चेहर्‍याने वसतिगृहावर आली. आपल्या खोलीचा दरवाजा तिने ठोठावला. नेहा ने दरवाजा उघडला.

' अगं... मंजे आज एवढा उशीर ' नेहा ने विचारल

मंजिरी काही न बोलता सरळ बाथरूम मध्ये गेली. बाथरूम चा दरवाजा तिने धाड करून बंद केला आणि सरळ शॉवर खाली उभी राहिली. पाणी पाहून तिला फार आनंद झाला. २ तास झाले तरी मंजिरी अजून बाहेर आली नव्हती. सुधा ने बाथरूम चा दरवाजा वाजवला.

' मंजे... अग अजून काय करतेस आत मध्ये? आम्ही खाली जेवायला जात आहे' सुधा बोलली.

' तुम्ही दोघी जावा' एक घोगरा आवाज आला.  सुधा ला जरा वेगळ वाटल. पण तिला वाटल हिला बर नाही वाटत म्हणून तिने जास्त विचार नाही केला.

' बर... आम्ही जातो. तुला जेवायला घेऊन येतो' सुधा बोलली.

' हम्म' परत तोच घोगरा आवाज.

त्या दोघी खाली जाऊन जेवून आल्या. मंजिरी कपडे बदलून आपल्या बेडवर  आपले दोन्ही गुडघे छातीजवळ घेउन हाताचा गुडघ्याजवळ विळखा घालून बसली होती. रूम मधल्या झिरो बल्ब कडे एकटक बघत बसली होती. तोपर्यंत नेहा आणि सुधा जेवून खोली मध्ये आल्या. नेहा ने ताट टेबलावर ठेवले आणि ' जेवून घे गं ' अस मंजिरी ला सांगितल अस बोलून दोघीही झोपायची तयारी करू लागल्या. घडयाळात रात्रीचे १२ वाजले होते. दोघी थकल्या होत्या म्हणून लगेच झोपी गेल्या.

सकाळी सुधा ला थंडी वाजत होती म्हणून पांघरूण ओढून घेत होती तर घडयाळात पाहिल. सकाळ च ६.४५ वाजले होते.

' उठल पाहिजे आता' अस म्हणून ती केस बांधत होती. समोरच दृश्य पाहून सुधाला थोडा वेळ काय चाललंय कळालंच नाही. मंजिरी अजूनही त्याच अवस्थेत बसली होती... एकटक झिरो बल्ब कडे बघत... टेबलवर जेवण ही तसंच होत.

'मंजे... काय झालं?... अशी का बसली आहेस... आणि हे काय जेवली पण नाहिस ' म्हणत ती मंजिरी जवळ गेली आणि तिला हलवू लागली. मंजिरीच अंग गरम तव्यासारख तापल होत. तिची अशी अवस्था पाहून सुधा खुप घाबरली. तिने लगेच नेहा ला उठवल. नेहा पण हे सगळ बघून घाबरली.

' लवकर जा आणि मॅडम ना सांगून ये... लवकर डॉकराना बोलवाव लागेल' नेहा धावत मॅडम कडे गेली.

' मॅडम लवकर डाॅकटरांना बोलवा... मंजिरी ला खूप ताप आला आहे '

मॅडमनी दवाखान्यात फोन केला. १०-१५ मिनीटात डॉ. आल्या. मंजिरी ला त्यानी तपासले.

' घाबरण्याचे काही कारण नाही... वायरल आहे बहुतेक... मी औषधे देते वेळेवर दया आणि तिला ८ दिवस तरी आराम करू दया... त्या पेक्षा तिला घरी पाठवा... तिथे तिला जास्त आराम मिळेल '

' थँक्यू ' मॅडम बोलल्या आणि त्या डाॅ. ना सोडायला खाली गेल्या. सुधा आणि नेहा चेहरा बारीक करून बसल्या होत्या. मॅडम वर आल्या आणि बोलल्या

' नेहा, सुधा काळजी करू नका.. मी तिच्या वडिलांना फोन केला आहे... आज संध्याकाळ पर्यंत  येतील ते'

आज नेहा आणि सुधा दोघी ही काॅलेज ला गेल्या नाही. मंजिरी पण झोपून होती. जेवली पण नाही ती न औषध घेतल. संध्याकाळी तिचे वडिल आणि तिचा भाऊ दोघे पण आले. तिला हळूहळू हाताला धरून खाली आणल. तापामुळे तिला नीट चालता ही येत नव्हते. कसतरी तिला गाडीत चढवला आणि गाडी सुसाट निघाली ' कसबे ' गावाला....
हे बघून मंजिरी एकदम किळसवाणे हसली जस की तीच ध्येय पूर्ण होणार आहे.

( पुढील भाग लवकरच प्रदर्शित होईल)