आत्महत्या- एक भयकथा ( भाग २) Suvidha द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आत्महत्या- एक भयकथा ( भाग २)

( भाग एक पासून पूढे)

चार तासांच्या प्रवासानंतर अखेर मंजिरी आपल्या घरी आली.  मंजिरी ला पाहून मंजिरी ची आई खूप रडली.

' काय अवस्था झाली आहे पोरीची' आई अजून रडायला लागली.

' अगं... तिला आराम तर करू दे... लांबच्या प्रवासात थकली असेल अजून आणि तू काय रडत बसली आहेस... पाणी तर दे तिला... '

' हा... आणते' पदराला डोळे पूसत आई पाणी आणायला गेली.

आई  ने सगळ जेवन करून ठेवल होत. मंजिरी हात पाय धूवायला बाथरूम मध्ये गेली. पाणी बघून तिला परत आसूरी आनंद झाला. ती पाण्यात जाणारच होती कि भावाने अडवल

' मंजू... अग अंगात एवढ ताप असताना पाण्यात का भिजायला जात आहे. '

मंजिरी ने एक जळजळीत नजरेने त्याच्या कडे पाहिल तस तो दोन पाऊल मागे गेला. त्याला क्षण भर कळलेच नाही काय झाल ते. ती गुरगुरत होती जस ती आता झडप घालणार आहे. तो घाबरला पण तरी तो तिला हळूहळू तिच्या खोलीत घेऊन जाऊ लागला. खोलीत गेल्यावर त्याने तिला बेडवर बसवले.

' तुला जेवायला आणू का? '

'नको' तोच घोगरा आवाज...

' अग... न खाऊन कस चालेल... औषध पण घ्यायचं आहे. '

' नको मला' आवाजातला राग जाणवत होता.

' मंजू... हट्टी पणा करू नको.... थांब मी आणतो जेवायला... अस नाही ऐकणार तू... '

' एएएएएएए....... तूला कळत नाही एकदा सांगितलेल.... मला काही नको आहे... समजल ' त्याचा हाताचा पंजा जोरात दाबत बोलली.

त्याने झटक्यात आपला हात तिच्या हातातून काढून घेतला. एवढ बोलून मंजिरी धाड करून बेडवर पडली.

' मंजू... काय झालं... बर वाटत नाही का? बोल ना काहीतरी '
पण मंजिरी कधीच बेशुद्ध झाली होती. त्याने लगेच डॉ. ना फोन केला. अचानक काय झाले म्हणून घरातले सगळे घाबरले. डॉ. घाईघाईत आले आणि मंजिरी ला तपासू लागले. आई च्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले.

' घाबरण्यासारख काही नाही.... २ दिवस न खाल्याने अशक्तपणा आला आहे... मी तिला सलाईन लावतो त्या मूळे तिला बर वाटेल. '

डॉ. अजून काही औषधे देऊन निघून गेले. रात्र झाली तरी मंजिरी ला अजून जाग आली नाही. आई रडत तिच्या उशी जवळच बसून होती आणि हळूहळू तीचा डोळा लागला.

रात्री ३-३.१५ च्या सुमारास मंजिरी ला जाग आली. ती बेडवर उठून बसली. नसात रोवलेली सलाईन ची सुई तिने खसकन उपसून टाकले आणि दरवाज्याच्या दिशेने निघाली. हाॅल मध्ये बाबा आणि भाऊ झोपले होते. तिने दरवाजा उघडला आणि बाहेर निघून गेली. इतक्यात भावाला आवाजाने जाग आली आणि बघितले दरवाजा उघडा आहे आणि मंजिरी ही बेडवर नाही. त्याने बाबाना जागं केल आणि ते दोघ बाहेर जाऊन मंजिरी ला मोठमोठ्या ने आवाज देऊ लागले. एका कोपऱ्यात ती पाठमोरी उभी असलेली दिसली. ते दोघ तिच्या जवळ जात होते. मंजिरी ला जशी त्या दोघांची चाहूल लागली तशी ती जोरात पळू लागली. आणि तिचं पळण बघून बाबा आणि भाऊ एका ठिकाणीच पूतळया सारखे उभे राहिले. जस कि पायातला सगळा जीव जणू काही कोणीतरी काढून घेतला आहे. तिच्या एका पाऊला मधील अंतर ८ फूट इतके होते. सामान्य माणसाच्या आकलनाच्या बाहेरच होत हे.... पण हे कस शक्य आहे? विचाराने डोकं भांबावल होत. ते दोघ तिला पकडण्यासाठी तिच्या पाठी पळाले पण तिचा वेग खूप जास्त होता. पण जस ती गावाच्या वेशीवर जवळ आली एकदम थांबली आणि आपली मान तिरपी करुन आपल्या डावी कडे पाहू लागली तिचा श्वास खूप वाढला होता. छाती वर खाली होत होती आणि एकदम खाली धप्प करून पडली. बाबा आणि भाऊ तोपर्यंत तिच्या जवळ पोचले होते.  बाबा मंजिरीच डोक मांडीवर घेऊन रडत होते आणि भाऊ आपले दोन्ही हात जोडून दत्ताच्या मंदिरा समोर उभा होता.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

आई ला जेव्हा हा प्रकार कळला तेव्हा तिला विश्वास बसला कि हे प्रकरण वेगळ आहे. तिने बाबाना हे सांगायचा प्रयत्न केला पण बाबांनी तिला वेडयात काढून गप्प बसवले. खूप दवाखाने झाले , औषधे झाली पण गुण काही येत नव्हता. आजूबाजूचे लोकही आता कूजबूजू लागले की हे डाॅकटरांच काम नाही पण बाबा मानायला तयार नव्हते. दिवसेंदिवस मंजिरी ची हालत खूप खराब होऊ लागली. डोळे खोल गेले. डोळ्यांभोवती काळी वर्तुळे दिसू लागली. अन्न पाणी नसल्यामुळे वजन बरच कमी झाल. ओठांना चीर पडून त्यातून रक्त येऊन ते सूकून गेल होत. ती सलाईन वर जिवंत होती. आईला मंजिरी ची अवस्था बघवत नव्हती. एक दिवशी  शेजारच्या काकू मंजिरी ला बघायला आल्या होत्या. त्यांच्या बरोबर त्यांची म्हातारी आई पण मंजिरी ला बघायला आली. ती अधून मधुन आपल्या लेकिकडे राहायला येत होती त्यामुळे ती मंजिरी ला आणि तिच्या घरच्यांना ओळखत होती आणि मंजिरी ची आई ही तिला बरयापैकी ओळखत होती. दोघी मंजिरी च्या खोलीत गेल्या.

' काय अवस्था झाली आहे मुलीची... ' काकू बोलल्या.

' सगळे उपचार करून झाले पण गूण काही नाही ' आई रडत बोलली.

'  रडू नका मंजिरी ची आई..... सगळ ठिक होईल. देवावर विश्वास ठेवा ' आई हुंदके देत रडत होती.

दोघी खोली बाहेर निघून गेल्या पण काकू ची म्हातारी आई अजून खोलीत उभी राहून मंजिरी ला पाहत होती.  तिला कहितरी वेगळ वाटत होत. ती जवळ जाऊन अजून निरखून पाहू लागली. तस अचानक मंजिरी ने खाडकन डोळे उघडले.  तिचे डोळे लाल भडक झाले होते आणि तीने पटकन तिचा हात पकडला.

' काय ग काय निरखून बघत आहेस? तू अंबेवाडीत राहते ना? '

' हहहह... हो... पपपप... पण का विचारते आहेस? '

' ये म्हातारे..... मला अंबेवाडीला घेऊन चल'

' मममम... मी? '

' तूला विचारते म्हणजे तूच ना'

' का पण? आणि तूला तर बर पण नाही आहे '

' ये म्हातारे..... जास्त प्रश्न नको विचारू... कळल'

ती म्हातारी बाई आपला हात सोडण्याचा प्रयत्न करू लागली पण मंजिरी ची पकड खूप घट्ट होती. मंजिरी तिची धडपड बघून जोरजोरात हसू लागली. कसबस ती आपला हात सोडवून बाहेर पळून गेली. मंजिरी तिच्या जाण्याच्या रस्ता कडे बघत गुरगुरत होती. ती बाई पळत हाॅल मध्ये आली आणि आपल्या मुलीला खेचत घरी घेऊन गेल्या. मंजिरी च्या आईला कळलच नाही काय झाल ते. पण तीने जास्त लक्ष दिले नाही आणि मंजिरी ला बघायला तिच्या खोलीत गेली. मंजिरी शांत झोपली होती. आई पुन्हा आपल्या कामाला लागली. इकडे खोलीत मंजिरी पुन्हा किळसवाणे हसत होती.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

रात्रीचे जवळपास ३ वाजत आले होते तस मंजिरी ला जाग आली. तिने खाडकन आपले डोळे उघडले.  डोळे अगदी लाल भडक झाले होते जणू डोळयात रक्त उतरले आहे. ती एकदम उठली जणू तिला कोणी नियंत्रण करत आहे. खोलीचा दरवाजा उघडून ती बाहेर च्या दरवाज्याच्या दिशेने निघाली. तिने हाॅल मध्ये सगळीकडे नजर फिरवली. सगळे तिथेच बिछाना घालून झोपले होते. दरवाजा च्या आवाजाने बाबांना जाग आली तस त्यानी दरवाज्या कडे पाहिल तर मंजिरी बाहेर जात होती. बाबा पटकन उठाले आणि त्यानी पाठीमागून मंजिरी ला घट्ट पकडले आणि भावाला आवाज देऊ लागले. भावाला आवाजाने जाग आली. पहिले त्याला कळाल नाही काय चाललंय ते पण बाबांनी मंजिरी ला पकडल होत म्हणून तो पण बाबांना मदत करायला उठला. मंजिरी ओरड होती, गुरगुरत होती त्या दोघांची शक्ती तिच्या पुढे कमी पडत होती तरी बाबांनी तिला खेचत खुर्चीत बसवले आणि तिचे हात बांधायला चालू केल.

( पुढील भाग लवकरच प्रदर्शित होईल)