प्रेरक- विचार - भाग- १ Arun V Deshpande द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

प्रेरक- विचार - भाग- १

प्रेरक-विचार -भाग-१

-----------------------------------

मित्र हो - नमस्कार -

समाजात वावरतात असतांना आपले व्यक्तित्व संतुलित , संयमशील , असले तर आपली एक वेगळीच अशी इमेज सर्वत्र निर्माण होते , उत्तमोत्तम ग्रंथ , पुस्तके , थोर-व्यक्तिमत्वांची चरित्र , जीवन-कार्य यांच्या पासून आपण आपल्यातील व्यक्तिमत्वाची जडण-घडण होते,

अशाच काही मौल्यवान [रेरक-विचारावर आधारित असे हे ललित लेख क्रमश आपल्या साठी घेऊन आलो आहे .

प्रेरक-विचार -भाग -१ , कसा वाटला जरूर कळवणे , याचा भाग-२ लवकरच आपल्या पर्यंत घेऊन येतो आहे.

स्नेहांकित -

अरुण वि.देशपांडे - पुणे.

९८५०१७७३४२

-----------------------------------------

लेख-१

जिद्द ,कठोर परिश्रम . वगेरे .....!
-------------------------------------------------------------------

मित्र हो- नमस्कार..
तसे पाहिले तर आपण सामान्य माणसे आहोत ,साधे सरळ असे जगणे आपल्या वाट्याला आलेले असते, ते स्वीकारून आपल्या जीवनाचे रहाट-गाडगे अगदी सामान्यपणे चालू असते ,अशा परिस्थतीत सगळेच एकाच भावनेने जगत असतात असे मात्र मुळीच नसते ,कारण सगळेच काही सामान्यपणे जगणारे नसतात ,
असे खुपजण असतात की त्यांच्या मनात नव्या नव्या कल्पनांचे अंकुर रुजत असतात , मनात खोल रुजून बसलेल्या स्वप्नांचे निखारे धगधगत असतात . अशा जिद्दी आणि महत्त्वाकांक्षी मनाच्या व्यक्तींना गरज असते ती योग्य वेळी योग्य दिशा देणाऱ्या जाणत्या आणि जबादार अशा मार्गदर्शकाची.

आपल्याकडे खुपजण असे आहेत की ..त्यांच्या मनात स्वप्नवत कल्पना असतात ..पण..त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी परिश्रम करायचे असतात ",हे त्यांच्या गावी नसते ..सगळ्या गोष्टी आयत्या मिळाव्यात अशी यांची धारणा असते.
आता तुम्हीच सांगा.."दे रे हरी पलंगावरी "..असे वागून काही मिळवता येईल का.
जो मेहनत करतो ..आणि अशी मेहनत करतांना अपयश आले तरी .त्याने अजिबात खचून न जाता ..नव्या दमाने ,नव्या उमेदीने हाती घेतलेल्या कार्याची पूर्ती होई पर्यंत परिश्रमात कमी पडत नाही.." त्याला त्याच्या कठोर परिश्रमाचे रसाळ असे फल मिळणारच .

मनात जिद्द " नसेल तर .मिळणारे यश सतत हुलकावणी देत असते .कारण..कार्यपूर्ती साठीची वाट पहाणे , त्याची प्रतीक्षा करण्याची तयारी नसणे , या अधीर -वृत्तीमुळे कित्येकजण हाती घेतलेले कार्य पूर्ण न करता मध्येच सोडून परत फिरतात ..अशावेळी धीर देणारे , खचून गेलेल्या मनास उभारी देणारे मित्र भेटणे फार गरजेचे असते दुर्दैवाने नेमक्या उलट स्वभावाचे मित्र भेटले तर ..कार्य होणे तर दूरच .ते पूर्णपणे भरकटून ..भलतेच काही घडण्याची वेळ येऊ शकते.

जिद्द आणि कणखर मनाच्या जोरावर कठीण कार्य सुद्धा यशस्वीपणे पूर्ण करता येते ..या साठी हाती घेतलेल्या कार्याप्रती मनात आस्था असावी लागते ,त्यात गोडी असेल तरच कामात मन लागेल ना ! इतकेच असून चालणार नाही ..स्वतःच्या कार्यक्षमतेवर विस्वास पण असावा लागतो. आपल्या मर्यादा आपण नेहमीच जाणल्या पाहिजे.
शक्तीच्या बाहेर आणि कुवतीला न झेपणारे काम विचार न करता करणे ..यात हाती निराशा लागण्याची शक्यता अधिक असते.

मोठी स्वप्ने जरूर पहावीत ..पण ती सत्यात येण्यासाठी कराव्या लागणाऱ्या मेहनतीची ,परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे , या ठिकाणी फक्त "स्वप्नाळू -वृत्ती "असून काही उपयोगाचे नाही..तर.. मनाच्या ठायी जिद्द असावी लागते, परिस्थती अनुकूल असो वा प्रतिकूल असो ..यातून मार्ग काढणारा तो खर्या अर्थाने "बाजीगर "असतो, त्याची ओळख "मुकद्दर का सिकंदर "अशी आपोआपच होते.
मनगटाच्या बळावर काय काय करता येते "हे गोष्ट मनात असलेल्या जिद्दीच्या जोरावर या जगाला दाखवून देणारे अनेक जांबाज " आपल्या अवतीभवती असतात . अशा सक्सेसफुल व्यक्तींच्या कहाण्या "आपल्या साठी अचूक अशा मार्गदर्शक असतात.
जीवनात यशस्वी असणार्या व्यक्तींचा मूलमंत्र असतो..परिश्रमाला पर्याय नाही.

************

लेख- २ .


कौतुक -शाबासकी ..!
----------------------------------------------------------------
आपण केलेल्या कामाचे कौतुक केले जावे , त्यासंबंधी काही प्रोत्साहन देणारे शब्द बोलवे अशी अपेक्षा करणे "यात गैर मुळीच नाही . आपल्या डोळ्यासमोर एखाद्याने मोठ्या मेहनतीने पूर्ण केलेले काम दिसत असते , हे काम पूर्ण करतांना त्या व्यक्तीने घेतलेले परिश्रम आणि केलेली मेहनत आपण पाहिलेली असते ..आणि आपण पहाणारे या कामाचे एक निरीक्षक असतो ,अशा वेळी तर .आपल्या कौतुकाला , शब्दांना एक किंमत देखील असते ..सहाजिकच आपण या वेळी कसे आणि किती कौतुक करतो याकडे लक्ष असणार.हे उघड आहे..

मित्र हो - इथेच अनेकजण कौतुक करण्याचे टाळतात , किंवा .तोंडावर कुणाविषयी चांगले बोलायचे नाही ", अशाने ज्याचे कौतुक करू तो शेफारून जातो " असे यांचे "स्व-मत "असते.त्यामुळे कौतुक करणे राहून जाते.
कौतुक कुणी कुणाचे करावे ? असा प्रश्न पडू देऊ नका - कारण "आपले कौतुक केले जावे" असे सगळ्यांनाच वाटत असते ,काहीजण तर आपण कौतुकाचे हक्कदार आहोत असे गृहीत धरून चालतात ..आणि त्याच भावनेतून "हाती घेतलेले कार्य पूर्ण करीत असतात..निखळ कौतुक "हे मनास स्पर्श करून जाणारे असते.

कारण याच्या उलट "तोंड देखले कौतुक " हा प्रकार म्हणजे बनावट आणि देखाव्याच्या कौतुकाचा प्रकार आपण एरव्ही सर्वत्र घडतांना पाहतच असतो.
"कौतुक करवून घेणे ", आणि कौतुक होणे " हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. आणि अशा कौतुकाची ठिकाणे व्यक्तिपरत्वे वेग-वेगळी असतात.
उदा - आपण आपल्या साहेबांच्या घरी -किंवा एखाद्या बडया घरच्या पार्टीला गेलेलो आहोत - अशा ठिकाणी .जे जे कुणी निमंत्रित आलेलेल असतात त्यांच्यात " पार्टी -होस्ट बद्दल -त्यांच्या फमिली बद्दल कौतुकाचे शब्द बोलण्याची जणू चढाओढ लागलेली असते ", अशा बोलघेवड्या कौतुक-बहाद्दरांच्या सोबत मितभाषी आणि अबोल स्वभावाची माणसे कौतुक करण्यात कमी पडलीत " हे लगेच पार्टी -होस्ट "यांच्या लक्षात तत्परतेने आणून देणारी मंडळी असतातच.असे व्यावहारिक हिशेबाचे कौतुक "केवळ स्वर्थापोटी केलेले असते..

आपल्या रोजच्या रुटीन -लाईफ मध्ये पावलो पावली कुणाचे ना कुणाचे कौतुक करावे असे प्रसंग नित्य घडत असतात .अशा वेळी प्रसंगोचित कातुक करण्यात आपण कमी पडू नये ", असा प्रयत्न केल्यास .आपल्यामुळे ,आपल्या कौतुकाच्या शब्दांनी , पाठीवर दिलेल्या शबासकीने अनेकंना खूप मोठी प्रेरणा मिळू शकते " हे अत्यंत महत्वाचे लक्षात ठेवता आले तर खूप छान होईल.

जो अगोदरच निपुण आहे, हुशार आहे, कामाचा उरक आहे, समज आहे-उमज आहे" अशा व्यक्तीने केलेले काम हे उत्तमच होणार हे वेगळेपणाने सांगायची गरज नाही ..तरी सुद्धा .अशा व्यक्तीच्या कामाची प्रशंसा करणे , कौतुकभरे शब्द बोलून त्याला शाबासकी देणे "यामुळे एक छान काम होते ते म्हणजे "अश्या व्यक्तींच्या कामाची योग्य दखल योग्य वेळी घेतली गेली "अशी भावना त्याच्या मनात निर्माण होते..

होतकरू उमेदवार नेहमीच कठीण परिस्थितीतून मार्ग काढून हाती घेतलेले काम पूर्ण करीत असतात , अशा व्यक्तीच्या कामाबद्दल ,त्याच्या यशाबद्दल जाणीव ठेवून त्याचे योग्य कौतुक करणे "हे मनाच्या मोठेपणाचे निदर्शक असते. असे पुष्कळदा होत असते की -अनपेक्षितपणे जबाबदारी घ्यावी लागते ,अशावेळी इतरांची मदत घेत हे काम पूर्ण करू शकणारा ..आपल्याला त्याच्यातील अनेक नेतृत्व -गुणांची झलकच दाखवून देत यशस्वी कामगिरी करून दाखवीत असतो.अशा वेळी वरिष्ठांनी दिलेली शाबासकी आणि सहकारी-मित्रांनी केलेले कौतुक "या दोन गोष्टी फार मोठा भावनिक चमत्कार करून जाणार्या असतात.

मोठ्यांना नेहमीच आपले कौतुक करवून घेणे मनापासून आवडत असते ..गृहिणींना -त्यांच्या कला-गुणांचे कौतुक व्हावे वाटते, पालकांना वाटते- आपल्या मुलांच्या कलागुणांचे आल्या-गेल्यांनी भरभरून कौतुक केले पाहिजे ,आपणहून केलेले कौतुक नक्कीच आनंद देणारे असते ,परंतु ..कौतुक करणार्याने सुद्धा आपले कौतुक हे खोटे वा कृत्रिम वाटणारे नाहीये " याची काळजी घेतलीच पाहिजे ,असे केले तरच आपली शाबासकीची थाप खरी वाटेल , कौतुकांच्या शब्दांना ऐकून मन आनंदाने भरून येईल. "कौतुक करणे ,गोष्ट जरी मामुली ,लहान वाटत असली तरी "त्याचे परिणाम फार सुखद आणि मोठे असतात हे विसरून कसे चालेल.

आपल्या परिवारातील बाल-मित्र- मैत्रिणींचे आपण आवर्जून कौतुक केले पाहिजे ..त्यांच्या भावविश्वात तर रोज अनेक गोष्टी घडत असतात ,त्यांच्या हुशारीस वाव देणारे ,त्यांच्या कलागुणांना दर्शवणारे अनेक कार्यक्रम नित्य होत असतात ..अशा कार्यक्रमात .पहिला -दुसरा नंबर आला तरच कौतक ,एरव्ही नाराजी " याचे भान न बाळगणारे वडील माणसे, आणि पालक ..यांनी वेळीच आपल्या वागण्यात बदल करयला हवा. चिमुकल्या मनांना कौतुकांच्या शब्दंनी खूप आनंद मिळतो ..तो आपण देण्यात कमी पडू नये.

आपल्या सहवासात कलावंत ,लेखक-कवी ,खेळाडू , अशी विविध व्यक्तिरेखा असतात.. या सर्व मंडळींना "कौतुकाचे शब्द "हवे असतात , पाठीवरती शाबासकी हवी असते ", अशा सर्वांना -आपण त्यांचे जवळचे आहोत " या भावनेपोटी न चुकता या सर्वांना वेळोवेळी कौतुक-शब्दांचे गुच्छे देत राहावे . बघा आपल्या अशा करण्याने आणि वागण्याने आनंदाचे वातावरण आपोआपच तयार होऊन जाते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

-प्रेरक-विचार - भाग-१