1.बाबा आणि मुलीचे प्रेम
बाबा आणि मुलीचे प्रेम तर अनोखेच आहे,
मुलगी दूर जाताच बाबांचेही मन रमत नाही,
असे आहे बाबा आणि मुलीचे प्रेम.
जन्माला आलेल्या छोट्या शिशूच्या तोंडावर
सर्वात आधी ’आई’ शब्द तर असतोच,
पण दुसरा शब्द बाबाच तर असतो
असे आहे बाबा आणि मुलीचे प्रेम.
हाताचे बोट धरुन मुलीला चालायला शिकवणारे
आणि मुलीचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी
दिवसभर जीवाचा आटापिटा करणारे,
आपल्या मुलीला नेहमी समजुन घेणारे,
असे आहे बाबा आणि मुलीचे प्रेम.
बाबा जेव्हा आपल्या भावना कधीच व्यक्त करत नाही
तेव्हा त्यांचा त्रास नेहमी समजुन घेणारी,
एक लेकच तर असते,
असे आहे बाबा आणि मुलीचे प्रेम.
मुलगी लग्न करुन सासरी जाताना ज्यांच्या
डोळ्यांमध्ये कधी अश्रू बघितले नव्हते
त्याचक्षणी बाबांचेही डोळे पाणावतात,
असे आहे बाबा आणि मुलीचे प्रेम.
आई, दादा आणि ताई या पलीकडचे
एक अतुट नाते म्हणजे ’बाबा आणि मुलीचे बंधन’.
2.अंधश्रदधेने भरकटलेल्या या जगात...
अंधश्रदधेने भरकटलेल्या या जगात
काय काय घडत नाही,
चारही दिशांना त्रासच त्रास
आणि त्यातच चाले सर्व काही.
अंधश्रदधेची वाढलेली ही वाईट प्रवृत्ती
कशी कमी करणार,
धैर्यासारखे सामोरे जाणार
कि त्यातच् जन्मभर मरणार.
आपल्या जीवनाचा झालेला र्हास
आणि लोकांना झालेल भास,
काय आपल्याच या परंपरेत
आपण बसवणार गळ्याला फास.
पण आता बसं
आम्हीच आमच्या या जीवनाचा मार्ग शोधनार
आणि त्याच वाट्याने जाणार,
गुलाबाची ही कळी उमलेल कि नाही
हे आम्हीच आमचे ठरवणार.
3.असे होते शिवाजी महाराज
ज्यांनी सर्व किल्ले जिंकुन आपल्या साम्राज्याचे
नेहमी रक्षण केले आणि आपल्या
प्रजेला नेहमी मान दिला,
असे होते आमचे शिवाजी महाराज
ज्यांनी श्रीमंतीत आदराने झुकायला
आणि गरिबीत खंबीरपणे ऊभे राहायला शिकवले
व खर्या माणसाची ओळख करुन दिली
असे होते आमचे शिवाजी महाराज.
शिवाजी महारजांसारखे राजे दुसरे कोणीच
असु शकत नाही, हे त्यांनी आपल्या
शत्रूंचा विनाश करुन दाखवलेच,
असे होते आमचे शिवाजी महाराज.
शिवजयंती म्हटली की ढोल ताशे आणि गाणे
व लोकांनी केलेले ध्वनी प्रदुषणचे बहाणे
अरे शिवाजी महाराजांची महती तर
सारया जगालाच ठाउक आहे,पण
कोणी शिवाजी महाराजांसारखे बनून
दाखवेल तर गोष्टच निराळी.
इतिहासाच्या पानावर नाव कोरणारया
अशा शिवाजी महाराजांना आमचे त्रिवार वंदन.
4.वेळ
वेळ चांगली असेल तर, सर्वच आपले असतात
वेळ खराब असेल तर, सर्वच परके होतात.
वेळेचे महत्त्व जाणणे शिका, कारण
वेळ घालवता येतो, पण साठवता येत नाही.
सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा
वेळेचा उपयोग करुन, प्रत्येक संधीचे सोने करा.
ह्रुदयात वेदनांचा पुर वाहत असतानासुद्धा,
रडायलाही या जगात वेळ नाही.
5.एका स्त्रीची शक्ती
स्त्रीच एक महान शक्ती
स्त्रीच हाच जगाचा आत्मविश्वास,
पण या जगात का रोखुन ठेवला
जातो तिचा श्वास.
काहीवेळेस ती स्वतःला कमजोर समजते
पण वेळ आली की, ती महाकाली सुद्धा बनते
आणि आपल्या माणसांवर संकट आले की,
झाशीची राणी लक्ष्मीबाई तीच तर असते.
आपला बाळ रडत असताना त्याला चूप करणारी
आपली आई एक स्त्रीच तर असते
आणि धैर्याने एक पाऊल पुढे टाकुन,
आपल्या पतीचे नेहमी रक्षण करणारी एक स्त्रीच तर असते.
शेवटी स्त्रीच हाच जीवनाचा आधार
तिच्याशिवाय तर सारया जगात आहे अंधकार.
6.माणूसकी जपा
माणुसकीचे धडे तर सर्वच देतात,
पण स्वतः कधी माणूस बनुन दाखवत नाही.
समोरच्या व्यक्तीशी नेहमीच चांगले वागा ,हे
सांगणारे तर भरपुर असतात, पण स्वतः
सुधारण्याची वृत्ती ते कधीच दाखवत नाही.
दुसरयांची चुक दाखवणारे तर भरपुर असतात,
पण स्वतःची चुक दुरुस्त करण्याचा प्रयत्न ते कधीच करत नाही.
स्वतःच्या पदाचा गैरवापर करणारे तर भरपुर असतात,
पण दुसरयांचे हित जपणारा तर सापडणेच कठीण.
चोरी, चोरयातुन बलात्कार, निर्व्याज शिशुंवर अमानुश अत्याचार करणारे,
स्वतःला माणुस म्हणून घेतात, असे करुन माणुस
या शब्दाचा अर्थ ते कधीच जाणूण घेत नाही.
म्हणून माणुसकी जपा, माणुसकी दाखवा
आणि आपले व दुसरयांचे जीवन समृद्ध बनवा.
7.समानतेचे महत्त्व
समाजाचा दृष्टिकोन बदललाच पाहिजे
जगात समानता आलीच पाहीजे.
लोकांना जागृत करुन, सुदृढता जपुण
एक पाऊल पुढे टाकलेच पाहीजे.
समानतेचे महत्त्व जाणण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे,
असे करुन एक नवीन आव्हाहन लोकांसमोर उभे केलेच पाहिजे.
आपला गर्व दुर सारुन, दुसरयांसुध्दा तेवढाच
सन्मान देऊन, भारत अग्रेसर झालाच पाहिजे.
’फोडा आणि राज्य करा’ यातून आपल्या समाजात फ़ुट पाडली गेली,
पण आपणही हे दाखवून दिले पाहिजे की,
समानता प्रत्येक भारतवासियांच्या रक्तारक्तां मध्ये आहे.
म्हणूण समानतेचे महत्त्व जाणूण
समाजाचा दृष्टिकोन बदललाच पाहिजे
जगात समानता आलीच पाहीजे.
8.जीवन
जीवन इतके सुंदर आहे की, जगून दाखवा
काहीही सोसावे लागले तरी संपवु नका.
जीवन जगणे जर इतकेच सोपे असते,
तर रडत रडत आपण जन्माला आलोच नसतो
आणि जीवन जगणे जर इतकेच सोपे असते,
तर दुसरयांना रडवुन आपण या जगातुन गेलोच नसतो.
शेवटी जीवनात कितीही दुख आले,कितीही
सोसावे लागले, तरी एकांतातच रडावे लागत
पण मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवुन लोकांमध्ये मात्र हसाव लागत
आपल्या जीवनातला अंधार संपवुन सुर्याला नवीन आव्हाहन करा,
बघा तो तुमच्या जीवनात एक नवी सकाळ घेऊन येईल.
म्हणुण एकदा तरी आपले जीवन जगून बघा
एक नवीन उम्मीद घेऊन ,प्रकाशाच्या दिशेने जाऊन बघा.
कारण जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो...
पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही ,
हे कायम लक्षात असु द्या.
8.कवितेची प्रेरणा
जीवनाच्या मार्गावर चालताना एकटे
तर नेहमीच पडले, तेव्हा काय करु तेच उमगले नव्ह्ते
विचारांचे डोंगर मनात घोंघावत होते.
अचानक शब्दांचे घाव मनावर कोरले गेले,
कविता बनवण्याची ओढ निर्माण झाली आणि
कविता बनवीणे हेच माझ्या आयुष्याचे ध्येय बनले.
कविता बनवण्यात इतके रमले की
माझे सर्वच दुख मी विसरुन गेले.
जेव्हा सर्वांनी साथ सोडली, तेव्हा कविता बनवीणे,
हेच माझ्या आयष्याचे ध्येय बनले
हार न मानुन नेहमी जिंकण्याची आशा ठेवणे,
हे कवितेनेच मला शिकवले.
जीवनात एक क्षण रडवून जातो तर दुसरा
क्षण हसवूनही जातो ,हे कवितेनेच मला उमगले,
म्हणुन कविता बनविणे ही माझ्या जगण्याची प्रेरणा बनली
कारण उमेद,विश्वास व कष्ट हे ज्याच्या
जवळ आहे तो कधीच अपयशी होवू शकत नाही.
कविता बनवण्याची ही प्रेरणा
माझ्या जीवनाची सार बदलून गेली.
9.अशीही एक मैत्रिण असावी
अशीही एक मैत्रिण असावी
जिने माघार न घेता जाणीवपूर्वक नाते जपले पाहीजे.
अशीही एक मैत्रिण असावी
जिने गरज म्हणून नाही ,तर कायम आपल्या ह्रदयाची
हाक एकली पाहीजे.
अशीही एक मैत्रिण असावी
जिने विश्वासाचे चार शब्द बोलुन मन
जिंकून घ्यावे.
अशीही एक मैत्रिण असावी
जी पैशांवाली नको, पण मनाने श्रीमंत असेल.
अशीही एक मैत्रिण असावी
जी बाकी काही हरवले तरी,प्रत्येक
पाऊलावर आपल्या सोबत असेल.
10.ध्यास
ध्यास असा असावा
जिथे आपण संपलो, तरी आपली स्वप्न संपणार नाही.
ध्यास असा असावा
जिथे आपण निजलो, तरी आपला अट्टहास सुटणार नाही.
ध्यास असा असावा
जिथे आपण थकलो, तरी आपले प्रयत्न सुटणार नाही.
ध्यास असा असावा
जिथे शिखर कितीही उंच असले, तरी आपली वृत्ती आपण सोडणार नाही.
ध्यास असा असावा
जिथे वाट जरी सरळ नसली तरी,तुफानातही लवणार नाही.
11.ते क्षण...
एका लेकीसाठी तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर
क्षण म्हणजे,आपल्या आईच्या कुशीत बागळणे.
ते क्षण खरच किती छान होते
जेव्हा गोंडस रितीने माझं नाव घेवुन मला हाक मारायची.
ते क्षण खरच किती छान होते
मला बक्षिसे जिंकलेले बघुन,गोड चुंबन देऊन
मला कौतुकाची थाप द्यायची.
ते क्षण खरच किती छान होते
जेव्हा प्रत्येक सुख दुखात माझ्या सोबत होतीस आणि
माझ्या खांद्यावरच ओझं,तुझ्या खांद्यावर पेलून घेत होती.
ते क्षण खरच किती छान होते
जेव्हा मला राग आलेला असतांनाही,निर्मळ मनाने
मला प्रेमाने घास भरवायची.
ते क्षण खरच किती छान होते
माझा पराभव झेलण्यास मी असमर्थ होती,
त्याक्षणीच माझ्या डोळ्यांतील अश्रु बघुन तुझ्याही डोळ्यांत अश्रु यायचे.
कळले नव्हते तेव्हा तु किती मोल्यवान आहेस.
पण खरच सांगते,माझ्या आयुष्यातील तो सर्वात वाईट क्षण होता
जेव्हा तुझा जळता देह माझ्या डोळ्यांसमोर होता.
12.एक क्षिक्षक म्हणजे...
एक क्षिक्षक म्हणजे,ज्ञानाचा सागर,
ज्यांच्या प्रत्येक शब्दांत असतो एक नवा विचार.
एक क्षिक्षक म्हणजे, ज्यांचा समाज सुधारण्यात असतो महत्वाचा वाटा
तोच दयेचा सागर आणि जगाचा दाता.
एक क्षिक्षक म्हणजे, ज्यांच्या छायेखाली नेहमी सौख्य लाभते
आणि ज्यांच्या सान्निध्यात राहून आपले नाव गाजते.
एक क्षिक्षक म्हणजे, नाही स्वतःला आपल्या ज्ञानाचा गर्व
आणि ज्याच्यांकडुन उभारले जाते एक नवीन पर्व.
एक क्षिक्षक म्हणजे, अंधाराच्या जगात प्रकाशफुलांचे सडे
ओंजळणारा एक महत्त्वाचा घटक.
13.आई मला मारु नकोस
आई जेव्हा मला कळले, मी तुझ्या पोटातून जन्म घेणार
वाटले मला या जगातील सर्वच सौख्य लाभणार.
पण मी मुलगी म्हणून,तुझा निर्णय बदलेल असे वाटले नव्हते.
हक्क आहे मलाही जगण्याचा,हक्क आहे मलाही नाव कमावण्याचा,
पण आई मला मारु नकोस.
तुच दिली साथ मला,तुच दिली आस मला,
विसरु नकोस तुही कधी मुलगी होतीस.
कधीच भार नाही होणार तुझ्यावर
भविष्यात मीच तुझा होईल आधार
आई सोड आता हा जुना विचार
आणि कर माझा आनंदाने स्विकार,
नाही तर होशील पापाचा भागीदार.
14.मला पुन्हा जगायचंय
घाईघाईत उचललेले पाऊल,खुप मोठी चूक होती
कळले नव्हते तेव्हा काय करु?
अपयशाला वारंवार कंटाळून
आत्महत्त्येस मी बळी पडले
आणि त्याच धुंदीत सर्वकाही विसरले.
आसवांचा पूर डोळ्यांत वाहून
जिवाचे बरेवाईट केले
आणि नंतर पश्चाताप करुन
खरे काय ते उमगले.
तेव्हा केला फक्त स्वतःचाच विचार
असे करुन,आपल्या परिवाराला ना सन्मान दिला,ना आदर.
आता या वाईट परिस्थिचा कसा सामना करणार
काय मला पुन्हा जीवन मिळणार,
पुन्हा प्रयत्न करण्याची एक संधी देणार
ज्या आई बाबांना मी कधीच दिली नाही साथ
कधी देऊ शकेल, त्यांच्या हातात हात.
15.फूल
बघा हे सुंदर फुल
क्षणातच मनाला करते गुल.
निसर्गाची आहे शान
सुंदरतेचे प्रतिक आणि रंगीबेरंगी छान.
फुलांची ही थोर महती
सुख दुखात असते सोबती.
फुलांचे ते वेगवेगळे पाहुन रुप
मनाला घायाळ करते खूप.
16.माझी शाळा
विद्येचे हे मंदिर एका छोट्याश्या कोपरयात वसलेले होते.
पण शिकवण अशी कि,जीवनाची दिशाच बदलून गेली.
निरनिराळे खेळ आणि मित्र-मैत्रिणिंची संगत,
मनाला भुरळ पाडणारे आठवणींचे ते क्षण होते.
त्या छोट्याश्या बाकावर बसून भरपूर मस्ती करायची
आणि तिथेच शांतपणे बसून अभ्यास करणे ,अशी आमची प्रव्रुत्ती होती.
पण क्षिक्षकांची शिकवण कायम लक्षात ठेवून वाईट मार्गावर न जाता
कुठेतरी समज नसतांनाही आमचे भविष्य आम्ही घडवित होतो.
समोर एक छोटीशी बाग,जिथे मधली सुट्टी झाली की डबा खायचो
व गप्पाही मारायचो.
नृत्य स्पर्धा,गायन स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग
घेऊन बक्षिसे जिंकायचो.
खरंच माझी ही शाळा जीवनाचे मर्म जुडवून गेली.
17.तरुणाई
आजची ही तरुणाई फेसबूक,ट्विटर,व्हाट्स अप
यामध्ये इतकी गुंतली की,जीवनातील स्वतःचे अस्तित्व
ती विसरुन गेली.
प्रेम करणारे तर असतातच,पण त्यापेक्षाही
प्रेमात जीव देणारे जास्त सापडतात.
आजची तरुणाई इतकी हरवली आहे की,
अपयशाला कंटाळून आत्महत्त्येस ते बळी पडतात व
वाडवडीलांचे संस्कार विसरुन सामुहीक बलात्कार करतात.
आता अशा तरुणाईचा शोध घेतला पाहिजे,
जी कोणावरही अन्याय करणार नाही आणि
कोणाला करुसुद्धा देणार नाही.
खरंच अशी तरुणाई भावी आयुष्यात कधी सापडेल का?
18.दिवा
विझला जो जरी कितीही तरीही त्याचा अंत नाही.
पुन्हा नव्याने पेट घेवून उदयाला येणारा असा दिवा
फक्त आणि फक्त घराची शोभा वाढवित असतो.
सुखाचा एक किरण देऊन जातो,
ज्वलंत राहुनही नाशवंत नाही,असा हा सामर्थ्यवान
दिवा सर्वांच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी पेट घेत राहतो.
अंधाराचे विश्व नाहिसे करुन छोट्याश्या झोपडीतही
जो प्रकाश निर्माण करतो,असा हा दिवा खरंच
सर्वस्व दुखाचा अंत करणारा आहे.
19.एका आईचे मागणे
तुला जन्म दिला मी
तुला खांद्यावर घेऊन, तुझे सर्व मागणे पुर्ण केले,
पण आता दुर परदेशात तु निघून गेलास.
आता तुला आठवेल का रे मी?
माझ्या संवेदनांची जाणीव होईल का रे तुला?
माझ्या ह्रदयाची हाक एकू येईल का तुला?
माझे काळीज धडपडत आहे,फ़क्त तुला भेटण्यासाठी.
काय या जन्मात आपल्या होतील भेटीगाठी.
तुझ्याविना इथे फक्त नैराश्य पडले पदरात
कधी येशील तु, माझ्या या छोट्याश्या दारात.
हे वादळ आता थकले आहे,
पण फक्त वाट तुझीच पाहे.
आता हे शेवटचे एकच मागणे
माझी ही अंतीमयात्रा तुझ्या सहवासात पार पाडणे.
20.थांबू नकोस
अचानक एकदा खुप मोठे अपयश माझ्या वाट्यात आले
आणि ते सोसुन मी थरथराट कापून सुटले.
मग काही शब्द अचानक कानावर पडले
ते एकूण मी क्षणातच स्तब्ध झाले.
शब्द असे,
थांबू नकोस मित्रा,संसाराच्या वाटेवर चालताना
फुलांपेक्षा काटेच जास्त असतात.
आणि तेच आपल्याला जीवनभर रुततात
पण काहीही झाले तरी अपयशाला बळी न पडता
सतत प्रयत्न करत राहणे,हेच जीवनाचे मुळ आहे.
थांबू नकोस मित्रा लक्षात ठेव
आत्महत्त्या हा प्रत्येक गोष्टीचा पर्याय नाही
यशाचे एक पाऊल पुढे टाकुन बघ,
लोक तुला कायमचे लक्षात ठेवतील.
थांबू नकोस मित्रा ,स्वतःला थकू नको देऊस,
नशिबाला दोष नको देऊस,
दुसरयांपेक्षा स्वतःला कमी समजू नकोस,
अडचणींचा सामना करुन फक्त स्वतःला सिद्ध कर,
फक्त एकदा प्रयत्न कर.
21.पैशांची किंमत का आहे?
पैशांची एवढी किंमत का आहे?
ज्याच्याकडे खूप सारा पैसा त्याला आदर
ज्याच्याकडे नाही त्याचा अनादर.
पण हे लक्षात ठेवा ,पैसा माणसाला वर
नेऊ शकतो,पण माणूस कधीही
पैसा वर घेऊन जाऊ शकत नाही.
पैश्याचा कसला हा गर्व,कि त्यासाठी
माणसांनाही मारतात लोकं आणि
पैशांमुळेच तर नाती होतात दूर,
एक दिवस असा येईल की,
लोकांकडे खुप सारे पैसे असतील
पण ज्यांच्यासाठी तो कमवतो आहे, अशी
ती आपुलकीची नाती नसतील.
22.गुढीपाडवा
हलक्या पावलांनी वसंत जेव्हा बहरतो
तेव्हा गुढीपाडव्याचा हा सुख-समृद्धीचा सण
सर्वांच्या आयुष्यात नववर्षाची सुरुवात करतो.
घरोघरी गुढी-तोरणे उभारुन अशा या
गौरवशाली दिवसाची सुरुवात करुन,
महाराष्ट्राची शान असा, हा सण गुढीपाडवा असतो.
असा हा क्षण सोनेरी दिवसाची सुरुवात करणारा
आणि जीवनात रंग भरणारा आहे.
काठिवर कुंकू,रेशमी वस्त्र आणि चांदिचा लोटा
अशी ती गुढी खरंच सुशोभित होऊन दिसते.
23.निर्धार
वाटते असे आज एक निर्धार करावा
आकाशात एक उंच झेप घ्यावी.
सारे स्वप्न सत्यात उतरवुन निर्धाराने सर्वांच्या पुढे जावे.
भरपूर वेदना सहन करुन झाल्यात
आता जोपर्यंत जीव असेल जीवात
तोपर्यंत संकटांवर करणार मात.
निर्धाराने एक पाऊल पुढे टाकून,
ना कोणाचा आधार घेऊन ,
दुखाचे वादळ नाहिसे करुन,
सर्वांना सुखाचा एक क्षण देऊन,
अडथळ्यांना न भिवून,
फक्त असा एक निर्धार करावा
जो हृदयात प्रेमाचे अस्तित्व निर्माण करुन जाईल.
24.आनंदाचा क्षण
एकदा जीवनात आनंदाचा क्षण यावा,
ज्या क्षणाने सर्वच दुख विसरुन फक्त
हसण्याचा मार्ग दाखवावा.
जीवनातला प्रत्येक असा जगता यावा
जसा ना डोळ्यांत अश्रु, ना खोटेपणाचा दावा
मनातली प्रत्येक इचछा पुर्ण व्हावी आणि
वाईट प्रवृत्ती सोडुन,तोच क्षण
चांगलेपणाचा मार्ग दाखवून जावा.
कोणालाही ठाऊक नाही मरण उद्याचे
पण असे जगता यावे, जसे प्रत्येक क्षण सुखाचे.
खरंच एकदा जीवनात आनंदाचा क्षण यावा,
जो गालावर खळी पाडुन स्मितहास्य देऊन जावा.
25.फुलपाखरु
सुंदरतेचे एक प्रतीक म्हणजे फुलपाखरु
ज्याला बघून मन लागते भिरभिरु.
फुलपाखराचे ते विभिन्न रंग
ज्याला बघून क्षणातच होऊन जातो दंग.
डोळे बारिक आणि पंख चिमुकले
व बघता क्षणीच या वेलीवरुन त्या वेलीवर जाऊन बसले.
कधी या खांद्यावरुन त्या खांद्यावर
तर कधी उडाले भरभर.
पण हे गोड फुलपाखरु जगण्याची
प्रेरणा देऊन गेले आणि प्रेम देणारे,प्रेम घेणारे
हे वासरु मनाला वेड लावून गेले.
26.पुन्हा एकदा लहान होऊन जगायचं आहे
आज पुन्हा एकदा लहान होऊन जगायचं आहे
समजुतदारपणाचा कळस दूर सारुन निरागसता जपुन
आपले हट्ट पुर्ण करण्यासाठी,
आज पुन्हा एकदा लहान होऊन जगायचं आहे.
मोठेपणी आपली स्वप्न सत्यात उतरवताना आता थकले आहे.
व स्पर्धेच्या या युगात आता जीव घुटमटत आहे,
म्हणून पुन्हा एकदा लहान होऊन जगायचं आहे.
पुन्हा एकदा आईच्या कुशीत खेळून
प्रेमाचा स्पर्श घ्यायचा आहे.
मोठेपणी शब्दांना गुंफले,भावनांना ओतले व
आठवणींना सुद्धा जपले आता पुन्हा एकदा
चेहरयावर गोड हास्य भरून,
परत पुन्हा एकदा लहान होऊन जगायचं आहे.
27.नदी
जी सतत खळखळत वाहत राहते,
जी दुर्गंधीचा प्रसार केल्यावर सुद्धा
कुणालाही काहीही बोलत नाही व
उद्रेक न करता आपली शांतपणे वाहत राहते.
अशी ती नदी फक्त आपल्याला जीवन जगण्याचा
मार्ग दाखवते.
जी वाट कितीही अडकली तरी
नेहमी नवीन दिशेचा शोध घेते आणि
क्षणभर विश्रांती न करता दुसरयांसाठी फक्त पाण्याचा स्रोत बनते
अशी ती नदी फक्त आणि फक्त आपल्याला कार्यरत
राहण्याचा संदेश देते.
खरंच निसर्गाची ही एक अद्भुत शक्ती आहे
28.सुर्य
ज्याच्या किरणांचा स्पर्श होताच मन उतावीळ होते,
असा तो सुर्य फक्त आणि फक्त आपल्याला
जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो आणि
सुर्याचा तोच एक किरण चेहरयावर तेज सुद्धा निर्माण करतो.
जेव्हा अंधकार होईल,तेव्हा असा एक सुर्यच असेल
जो एक नवीन उम्मीद भरुन प्रकाशाची दिशा दाखवेल.
सुर्याच्या किरणांनी सुरु झालेली ती सुंदर
पहाट मन मोहून टाकते आणि तोच सुर्य
जीवनास मम जोडून देतो.
विशाल क्षितिजावर सोनेरी स्वप्नांची रास
ओलांडणारया अशा त्या सुर्याचा पुत्र कर्ण सुद्धा
दानवीर होता.
अशा त्या सुर्याची आमच्यावर नेहमी दृष्टी राहो.
29.सकाळ
सोनचाफ्यासारखा गंध आहे अशी ती,
सोन्याच्या मुल्या सारखी अशी ती,
सोन्यासारखी नितळ,निर्मळ मनाची अशी ती,
सौंदर्याचा खजिना आहे अशी ती,
सौजन्या ज्या ठिकाणी नांदते अशी ती,
संस्कृतीचा वारसा जपणारी अशी ती,
सृजन शीलता आहे अशी ती.
नितळ स्वच्छ मन आहे अशी ती,
नात्याचे बंधन आहे अशी जीला ती,
निळ्याअभ्र आकाशासारखी इतरांना मदत करते अशी ती,
नितळ पाण्यासारखी आहे अशी ती,
नितीमुल्यांना जपते अशी ती.
लाजाळु मनाची अशी ती,
लालुजपणाला जीच्याकडे स्थान नाही अशी ती,
लपंडाव विचारांचा नेहमी चालतो, अशी ती सर्वश्रेष्ठ सकाळ.
30.आठवणींचे क्षण
आठवणींचे क्षण कधी डोळ्यांत अश्रू आणतात
तर कधी हसवूनही जातात.
आठवणींचे क्षण कधी जगण्याचा मार्ग दाखवतात
तर कधी जीवनाचा अंतही करतात.
आठवणींचे क्षण कधी जखमांवर घाव कोरतात
तर कधी गालावर खुदकन खळी पाडतात
आठवणींचे क्षण कधी माणसांना एकत्र आणतात
तर तेच आठवणींचे क्षण माणसांना दूरसुद्धा करतात.
आठवणींचे क्षण कधी नात्यांना जपतात
तर तेच आठवणींचे क्षण नात्यांना दूर करतात
आठवणी या अशा का असतात.
31.वारयाचा स्पर्श
ज्याचा स्पर्श मनाला मोहुन जातो,
ज्याच्या स्पर्शाने मनातले सर्व दुख आपण विसरुन जातो,
ज्याची शीतलता आपल्याला अचंबित करुन सोडते,
ज्याचा स्पर्श होताच होताच आपणही स्वतःची
ओळख विसरून जातो,
ज्याचा गारवा आपल्या संवेदना जाणण्यास मदत करतात,
ज्याच्या स्पर्शाने सारे पक्षी,प्राणीसुद्धा तृप्त होतात,
ज्याचा वेग वेगवान पळणारया पशुपेक्षा सुद्धा जास्त आहे,
असा तो वारयाचा स्पर्श जो नेहमी आपल्या
सोबत राहून आपली दिशा जाणण्यास मदत करतो.
32.स्पर्धेचे युग
स्पर्धेचे युग,जिथे फक्त स्वतःला सिद्ध करावे लागते आणि
जिथे अनुपस्थिती फक्त बेचव जीवनासारखी असते
स्पर्धेच्या या युगात इतका बदल झाला,की माणूस
कधीही पुर्णतः सुखी होऊ शकत नाही.
स्पर्धेचे हे युग संपायलाच पाहिजे.
आता कुणाबद्दलही ना मनात द्वेष असावा,
ना कोणाशी स्पर्धा असावी.
आता कुणाबद्दलही ना मनात गुर्मी असावी,
ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी.
आता फक्त आपल्यांत जे काही गुण आहेत,
तेच ओळखण्याची हिंमत असावी.
33.आई
आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर,
असे शब्द आपल्या मनात स्फुरतात,
पण हे फार थोड्यांनाच जाणवते की,
या शब्दात सारे जग सामावलेले असते.
आई तुझ्याबद्दल काय बोलणार?
तु दूर जातास,माझेही मन रमत नाही,
आठवण तुझी येताच श्रावण सरी वाहतात नयनातुनी.
फार थोड्यांनाच मिळते ही मायेची सावली,
म्हणुन तर म्हणविते,ती सारया जगाची माऊली.
आई तुझ्या कुशीत येताच,तुझा स्पर्श जाणवताच,
माझ्याही पावलात सामर्थ्य येते.
तेव्हा मला जाणवते,की आई सदैव तिच्या लेकराची असते.
संकटसमयी मला कधीच एकटे जाणवू दिले नाही.
माझी कधी चूक झाली,तर क्षमा दिल्यावाचून राहिली नाही.
ज्यांनी आगळेवेगळे शोध लावले त्यांचे नाव
तर आपण कायम स्मरण करतो,
पण तुझ्यासारखा मायेचा ऊब देणारा अंश, ज्या
देवाने आम्हाला दिला,
त्या देवाला आम्ही साष्टांग नमस्कार करतो.
34.कुणाची तरी साथ हवी
दिवाही वातीशिवाय जळत नाही,
सुंदर झरयालाही नदीची साथ हवी असते,
एका रोपाला जसे सुर्याच्या किरणांची आवश्यकता असते,
तसे मलाही फक्त एकदा कुणाची तरी साथ हवी.
मी वाईट दिशेला जातांना मला हक्काने रागवेल असा
आणि माझ्या जीवनात दुखाचे वादळ येताच,
मला नेहमी सांभाळून घेणारयांची,
फक्त एकदा मला साथ हवी.
दररोज स्वतःला धीर देत असताना
कठीण होईल तेव्हा मला मनापासून
समजवणारा आणि तडजोडीने प्रयत्न करुन
माझ्या जीवाची पराकाष्टा करणारयांची
फक्त एकदा मला साथ हवी.
बस एकदा कुणाची तरी साथ हवी
35.आयुष्य हे असे का असते?
आयुष्य हे असे का असते?
कधी वाटेवर काटे असतात
तर कधी डोळ्यांत अश्रु सामावतात.
आयुष्य हे असे का असते?
कधी संकटांचा सामना करता करता फक्त नैराश्य येते
तर कधी सोबत असणारेच आपल्या दूर जातात.
आयुष्य हे असे का असते?
कधी आपण ज्यांच्यावर खुप प्रेम करतो,तेच दगाबाज करतात
तर कधी आपल्याला गरज असतांना,कोणी मदतीचा हात सुद्धा देत नाही.
आयुष्य हे असे का असते?
जिथे आपल्याला फक्त आणि फक्त स्वप्न दाखवले जातात,
पण ते पुर्ण करण्यासाठी कितीही प्रयत्न,केले तरी ते फक्त
स्वप्न बनूनच राहतात.
आयुष्य फक्त आणि फक्त एक प्रश्न
ज्याचे उत्तर ठाऊक नसलेले.
36.मदतीचा हात
एकदातरी देऊन बघा कधी मदतीचा हात,
एकदातरी देऊन बघा कधी गरिब लोकांना साथ,
फक्त एकदा मदतीचा हात द्या.
एकदातरी एकमेकांचे सुख दुख झोळीत साठवून घेऊन,
जीवन जगण्याचा आधार द्या,
फक्त एकदा मदतीचा हात द्या.
आपल्या जगण्यात चूर न होऊन एकदातरी
आपल्या लोकांची काळजी घ्या,
फक्त एकदा मदतीचा हात द्या.
नाती तागडीत तोलु न देता,स्वतःचा फायदा बघू नका,
एकमेकांवर विश्वास ठेऊन एकमेकांना प्रेम द्या,
फक्त एकदा मदतीचा हात द्या.
झाडांना पाणी हवे असते,फुलांना गंध हवा असतो,
नदीला पावसाची साथ हवी असते,तसेच व्यक्ती
ही कशी एकटी राहणार कारण तिलाही
मदतीच्या हाताची गरज असतेच.
म्हणून फक्त एकदा मदतीचा हात द्या.
37.नातं
नात्यांना कधी मोल असते,तर कधी नाही
नाती कधी विश्वासात असतात,तर कधी नाही
कधी दुरावा असतो तर कधी नाही
कधी कधी नात्यातला तो वादविवाद, तर