Talavya varil bhoot books and stories free download online pdf in Marathi

तलाव्या वरील भूत          दिवे लागायची वेळ झाली होती साधारन ७ वाजत आले होते . आणि त्यात पावसाची रिपरिप चालु झाली होती .वार शुक्रवार सर्षापित्री अमावस्या होती . गावातील सर्वजन खुप खुश होते . त्याला कारण पण तसेच होते . कारण सात वर्षाचा दुष्काळ संपणार होता .
  जसा जसा वेळ पुढे जात होता . तस तसा पावसाचा जोरही वाडत होता जगु शिंदे आजुन घरी आला नव्हता जगु हा सकाळी रानात गेला होता . दिसायला तसा गडी आडदांड ( शारिर यष्टी चांगली ) ताकतीत त्याचा गावात कोण नाद करत नव्हत .  (देवावर भक्ती अपार )
     जगु आजुन आला नाही म्हणूण त्याचे वडील चिंतेत होते . जगु राणातुन लवकर घरी येण्यासाटी निघाला होता पण राण गावापासुण दुर आसल्या मुळे त्याला आर्धा वाटेत पावसाणे गाटले म्हणूण तो एका झाडाखाली थांबला होता पावसाचा जोर वाडत होता . जगु पुर्ण भिजला होता . त्याला ' हि घरी जायची  घाई होती पोटात काळे ओरडत होते . भुकेने व्याकुळ झालेला पावसाने जोर धरला होता जगूच्या लक्षात नव्हत आज सर्वपित्री आमावस्या आहे .जगु पुर्ण भिजला होता आणि तो भिजतच घराकडे निघाला कच्ची वाट रस्त्यात चिखल झालेला . त्याला निट चालता पन येत नव्हत लेंगा चिखला ने माखला होता म्हणूण त्याने लेंगा काडून हातात घेतला होता  जगु चालत चालत मरीआई च्या डोंगराच्या पायथ्याला आला होता . ( डोंगरावर एक मरीआई देवीचे मंदीर आहे . ) त्याने हात जोडले आणि पुढे चालू लागला . तो घराच्या वडीने चालला होता . पण पुढे काय होनार ते त्याला त्याला माहीत नव्हत  डाव साधला होता . घात झाला  जगु मरीआईच्या डोंगराजवळ येऊन पोहोचला होता. त्याने आपले हात जोडले . व तो पुढे चालु लागला त्याला माहीत नव्हते कि पुढे काय होनार आहे   जगु चालत होता वाट तुडवत होता तो आता चालत चालत झळके वस्ती तलाव्या पाशी आला होता 
आता त्या तलाव्या बद्दल सांगायच म्हणाल तर त्या तलाव्याच्या अनेक भयानक व पूरातन गोष्टी आहेत झळके वस्तीवरचे अनेक जूने लोक त्या तलाव्या बद्दलच्या गोष्टी सांगत असतात . अस मि पण ऐकल आहे कि त्या तलव्यात फार वर्षा पासुन एका भुताचे वास्तव्य आहे . आता हे खर आहे का एक काल्पनीक कथा हे मला माहीत नाही ? 
 आता मि त्या भुता बद्दल ऐकलेली एक गोष्ट संगतो झळके वस्ती वरील एक वयस्कर आजोबा सांगतात कि तलाव्या वरील भुताचे नाव आहे दत्ता रामोशी ( कल्पनीक आहे  मनावर घेऊनये ) जून्या लोकांचे अस म्हणणे आहे कि तलव्याच्या दक्षीण बाजूस दहा किलोमिटर अंतरावर एक डोंगर आहे त्याच नाव डांबीचा डोंगर त्या डोंगराला त्या भूताच उस आहे आणी तलव्याच्या खाली मारकीच्या ओढ्यात त्याच पायथ आहे . आसो
 जगू त्या तलावा पाशी आला अन तो ताल चडू लागला 
तो पर्यंत त्याला आवाज आला कोण हायर तिकड? जगू बावरला . इतक्या रात्रीच इकड कोण आल असल मरायला? हा ......तलाव्याच्या खालच्या रानात पवार आंण्णा आल आसतील तो पर्यंत दूसरी हाक कानावर आली आर कोण हाय त्वांड शिवलय वय सांगाया हा . तसा जगू म्हणला मी हाय जगू तुम्ही कोण आंण्णा का ? नाय मि दत्तु .  जगुला हे काय माहीत नव्हत कि काय प्रकार आहे . जगु म्हणला मि नाय येनार तुझ काम आसल तर तु वर ये तसा पूडण आवाज आला तु ऐतो का मि येऊ ति सांग 
                               ....... पुढील भाग लवकरच
                                              

इतर रसदार पर्याय