Gondhal - 4 books and stories free download online pdf in Marathi

गोंधळ... A tale of mistakes भाग ४

आता पर्यंत...

गाडी येऊन सरू च्या घरा समोर थांबली, सरू कोणासोबत क्षण भर बोलायला पण थांबली नाही, जशीच गाडी थांबली तिने दार उघडला आणि रस्ता क्रॉस करून निघून गेली... ऋषी झोपला होता त्याच्या जुन्या प्रेमाच्या आठवणीत गुंतला होता, इरा ने त्याला उठवलं, डोळे उघडताच त्यांनी पाहिलं की सरू जात होती... ऋषी गाडी च्या बाहेर उतरून थांबला आणि शांत पणे सरू ला जाताना बघत होता... आणि सरू ने एकदा पण मागे वळून बघितलं नाही आणि ती निघून गेली........

आता पुढे...

दिन्या ने ऋषि ला अश्वाशन दिलं, आणि परत गाडीत बसवलं... ऋषि च्या चेहऱ्यावरून त्याचे मनातले भाव स्पष्ट कळून येत होते... दिन्या आणि इरा पण शांत होते कोणीच एक मेका सोमर बघत नव्हते, आपल्याकडून काय चूक झाली आहे ते त्यांना बऱ्यापैकी कळलं होतं... 
दिन्या ने गाडी ऋषि च्या घरा समोर थांबवली... ऋषि च्या घरासमोर चा माहोल बघून दिन्या घाबरला, ऋषि च्या घराच्या बाहेरच पोलिसांची गाडी थांबली होती... पोलिसांची गाडी बघून तिघपण सावध झाले... तेव्हाच इरा बोलली
"दिन्या गाडी फिरवं लगेच"... इरा ला पोलिसांची गाडी बघून हे समजलं की नक्की पोलीस त्यांनाच धरायला आले असणार
दिन्या ने पण लगेच गाडी फिरवायला घेतली पण... ऋषि ने दिन्या ला थांबवलं....
"बस्स यार कूट परंत मी असाच पळत रहाणार, अजून किती चुका करू, आणि तुम्ही पण यार थांबा इथंच कधी परंत माझ्या चुकान मध्ये भागीदार होत रहाणार"... ऋषि च्या मनाची वेदना त्याच्या बोलण्यातून छलकत होती...
ऋषि या पुढे काही बोलला नाही आणि गप गाडीतून उतरला, हे बघून दिन्या ने पण त्याच्या विचार मांडला आणि तो ही गाडीतून उतरला... दोघांना समोरून येताना पाहून पोलीस त्यांच्या जागेवरच थांबली ऋषि आणि दिन्या काही न बोलता गप पोलीस च्या गाडीत जाऊन बसले....
ऋषि आणि दिन्या चे आई बाबा खूप तणाव मध्ये होते, जे काय होत आहे त्याच्या बद्दल त्यांना जरा पण ठाऊक नव्हती...ऋषि आणि दिन्या ची आई  रडत होती, पोलीस दिन्या आणि ऋषि ला घेऊन पोलीस ठाण्यात आले... आणि दोघाना लोकअप मध्ये पुरलं...
इथं सरू ची पण अवस्था झाली होती, सरू चे बाबा सरू वर खूप रागावले होते... अगदी रागात सरूला त्यांनी खूप सुनवलं
माझी लाडकी लेक समजून जे हवं ते दिलं तुला... आणि तू असं केलास, माझ्या लाडाचा, माझ्या प्रेमाचा असा फायदा उचलास तू... आज माझ्या मनातून उतरलीस तू, उतरलीस तू माझ्या मनातून
सरू खूप रडत होती, सरू ला हे सगळं आता खूप जळ वाटत होतं... सरू चे बाबा जशेच थोडे शांत झाले सरू तिच्या बेडरूम मध्ये येऊन एक कोपऱ्यात बसून रडायला लागली...
"खूप मोठी चूक केली मी... खूप मोठी चूक केली मी बाबा... माफ करा मला please"... सरू
                                                                         ★
ऋषि सरू आणि दिन्या कॉलेज च्या गेट समोर उभे होते... 
"भरपूर दिवस झाले यार, तुमची ती मैत्रीण इरा नाही दिसली".... सरू
"हो रे दिन्या ही इरा बाई कुठे आहे, येत नाही आज काल कॉलेज ला"... ऋषि
"येणार पण नाही आता"... दिन्या 
"का रे असं काय झालंय तिला".... ऋषि
"गेली ती बंगलोरला, आता इथं कधी नाही येणार"... दिन्या
"बंगलोरला काय मजाक करतोय काल तर होती ना ती"... ऋषि
"तुझ्या काल ला एक आठवडा झाला... आणि तुझं काय लक्षच नाहीये"... दिन्या थोडं रागावलाच
ऋषि हे ऐकून स्तंब झाला... "पण हे तू मला आधी का नाही सांगितलं"... ऋषि अगदी रागात बोलला
"तिने शपथ दिली होती मला तुझी.... म्हणून नाही सांगितलं" .... दिन्या
ऋषि खूप रागात होता... आणि रागात काहीही बडबडत होता...
"तू आधी तुझा राग शांत कर आणि इरा ला कॉल कर विचार तीला काय झालं अचानक पणे अशी का ती तुला न सांगता निघून गेली"... सरू
"हो हो.. मी तिला कॉल करतो"... ऋषि 
ऋषि ने पटकन इरा ला फोन लावला, इरा ने तिथं जसच बघितलं की ऋषि चा फोन येतोय तिने मोबाईल बाजूला टाकून दिला आणि दुसरी कडे तोंड करून रडायला लागली...
ऋषि सारखा फोन लावत होता पण इरा ने एक पण call recieve नाही केला.... ऋषि खूप चिडला होता, त्याला नेमकं काय करावं तेच सुचत नव्हतं...
सरू ने ऋषि चा हाथ धरून त्याला शांत केला...
"असुदे कुठे तरी busy असेल ती, free झाल्यावर जेव्हा तुझे call बघेन लगेच तुला call करेन ती, तोवर शांत हो तू".... सरू ऋषि ला समजवत म्हणाली....
संध्याकाळी इरा ने समोरून ऋषि ला कॉल केला...
"Hello... आहेस कुठे तू , असं अचानक ते पण मला न सांगता गेलीस तू, एकदा पण बोलली नाहीस मला, atleast जाताना भेटून गेली असती मला".... ऋषी
"तुला सांगितलं असतं तर तू मला जाऊच दिलं नसतं... म्हणून नाही सांगितलं , चल ना sorry ना आता... sorry"..... इरा
"नको तुझा sorry मला... मला नाही बोलायचं तुझासोबत"..... ऋषि
ऋषि ने रागात कॉल कट केला, आणि इरा ने पण  तिथून परत कॉल केला नाही...
वेळ पाण्यासारखा वाहत गेला, आणि सरू च्या प्रेमात ऋषि इरा ला जणू विसरूनच गेला, ऋषि आणि सरूचं प्रेम आख्या कॉलेजमध्ये सगळ्यांना माहीत होतं, सगळे त्यांना cool couples म्हणून ओळखायचे...
                                                                            ★
ऋषि आणि सरू मॉल मध्ये बसून गप्पा मारत होते, बोलता बोलता ऋषि एकदम शांत झाला... 
'काय झालं असं काय बघतोय"... सरू थोडं लाजतच बोलली...
ऋषि काहीच बोलला नाही... बस्स शांत नजरेने ने तो सरू ला पाहत होता... व हळूच आपली शांतता मोडत बोलला....
"सुंदर अशे डोळे... जणू आकाशात चम चम करणारे चांदणे"... ऋषि
"अच्छा..... चल काय पण".... सरू
"तुझ्या डोळ्यात पाहतो ना तर अस वाटतं की.... काय सांगू".... ऋषि एकदम उत्साह ने बोलला
"सांग ना, आवडेल मला ऐकायला"... सरू अगदी प्रेमाने बोलली
"तुझे डोळे ना समूनद्रा सारखे आहेत... तुझ्या डोळ्यात नेहमी हलकी सी नमी असते, जशी समूनद्रा ची लाट आल्यानंतर भिजलेली वाळू असते" ... ऋषि
"अच्छा... ! तुला बरं माहीत"... सरू
"मला सगळं माहीत आहे"... ऋषि
"बरं.... मग सांग, आता पुढे काय होणार आहे"... सरू
"पुढे काय, उममम.... जे परंत कॉलेज संपत नाही ते परंत तर तू आहेस"... ऋषि
"म्हणजे... तुला म्हणायचं काय आहे, कॉलेज संपल्यानंतर"...???? सरू
"कॉलेज संपल्यावर एक चांगली मुलगी बघून लग्न करेन अजून काय"... ऋषि
"काय बोललास... जीव घेईन मी तुझा जर मला सोडून दुसऱ्या पोरीला बघितलं तर"... सरू थोडी चिडलीच ती
"अच्छा असं व्हय".... ऋषि हसतच म्हणाला
ऋषी ने हसता हसता सरू ला मिठीत घेतलं... आणि त्यांच्या हसण्या खेळण्यात वेळ कधी निघून गेला त्यांना कळलच नाही... 
संध्या झाली ऋषी आणि सरू एक मेकां मध्ये एवढे गुंतले होते की त्यांना वेळे ची काय ठाऊकच नव्हती, तेव्हाच सरू चा फोन वाजला... 
"बाबांचा कॉल... किती वाजले"....  सरू ने अगदीच भीतीने भरलेल्या स्वरात विचारलं
"६ वाजले... काय झालं, आधी फोन उचल"... ऋषि
"नाही बाबा मारून टाकतील, खूप उशीर झालाय चल चल निघुया लवकर"... सरू
"हो हो तू शांत हो निघुयात आपण काळजी करू नको"...ऋषि
दोघेही तिथून पटकन निघाले, ऋषी ने सरू ला रिक्षात बसवलं... 
घरी पोचलीस की message कर... म्हणत ऋषी जोरात ओरडला, ते परंत रिक्षा पुढे निघून गेली, ऋषी मनात विचार करत होता तिने ऐकलं की नाही, त्याला ही भीती वाटत होती... पण तेच त्याला काळजी ही वाटत होती सरू ची
रात्री चे १० वाजले पण सरू चा न तर कॉल आला न तर message आला... ऋषी घरी आल्यापासून नुसता विचार करत बसला होता, त्याला काहीच सुचत नव्हतं...
तेव्हाच ऋषी चा फोन वाजला... ऋषी खुश झाला पण बघतोय तर काय दिन्या च्या फोन होता, ऋषी ने फोन उचलला आणि रागात बोलला...
"दिन्या उद्या बोलूया आता इथं खूप टेन्शन आहे, चल बाय"..... म्हणत ऋषि ने फोन ठेवून दिला
"इरा वाटाय busy आहे तो, थांब मी परत फोन लावतो त्याला तू होल्ड कर"... दिन्या इरा ला फोन वर बोलला
"नको राहू दे दिन्या, कळलं मला म्हणून मी ऋषी ला फोन नाही केला कारण तो खूप जास्तच busy असतो आज काल"... इरा
"अग येडी अस काय नाहीये, आज ते सरू सोबत गेला होता ना तो फिरायला म्हणून ग"... दिन्या
"बरं सोड उद्या भेटला तर सांग त्याला"... इरा
"हो इरा सांगतो मी त्याला"... दिन्या
"चल ठेवते काळजी घे"... इरा
"हा तू पण... काळजी घे".... दिन्या
इरा आणि ऋषीच बोलणं झालं नाही, दिन्या ने इरा  आणि ऋषी ला काँफेरेन्स कॉल लावला होता ज्याचने तिघं पण एकत्र बोलू शकणार पण ऋषी बोललाच नाही...
रात्र भरात ऋषी ने शंभर message केले पण सरू ऑनलाइन आलीच नाही.... ऋषी रात्र भर जागा रहायलं, नुसतं विचार करत होता, झोप तर त्याला मारण्याची आली होती तरी नुसतं फोन हातात घेऊन बसला होता... मनात फक्त एकच विचार जर झोपलो आणि तिचा मेसे आला तर...
असं करत सकाळ झाली... ऋषी जागाच होता, सकाळचे ६ वाजले होते ऋषि ने परत फोन हातात घेतला आणि message type केला....
"Good morning"...
ऋषि ला अजिबात रहावत नव्हतं तो सकाळी लवकर कॉलेज वर पोचला आणि चहा च्या टपरी वर बसून सरू ची वाट पाहत होता... वाट पाहता पाहता दोन तास निघून गेले सरू चा कॉल पण लागत नव्हता मधीच कॉल लागला तर ती कॉल उचलत नव्हती, शेवटी दोन तास नंतर ऋषि समोर बघतच होता की त्यांनी पाहिलं सरू हळू हळू चालत कॉलेज जवळ येत आहे... ऋषि सरू ला बघून खूप खुश झाला तेच त्याच्या मनात भरपूर प्रश्न पडायला लागले की... सरू फोन का उचलत नाहीये सरू ने चहा च्या टपरी कड लक्ष दिलं नाही आणि निघून गेली...
सरू ला असं जाताना पाहून ऋषि त्याच्या जागेवरून उठला आणि सरू च्या मागे मागे गेला......

......................................To be continued...................................

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED