क्रिष्णा आणि झपाटलेल रिसॉर्ट भाग-७ Hasim Nagaral द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

क्रिष्णा आणि झपाटलेल रिसॉर्ट भाग-७

सकाळची वेळ होती..............पाऊस थांबला होता......पण थंडी अजूनही होती....बाहेर दाट धुके होते.......

प्रतापराव अंगावर शाल घेऊन एका लाकडी खुर्चीवर बसले होते....एका हातात ग्लास होता दारूचा......आणि असच विचार करत एक एक घोट पित होते.....कदाचित मागचा काही दिवसापासून घडणार्‍या घटणांमुळे त्याचा डोक्यावर त्राण

वाढला होता.....तोच दारूचा सहाय्याने हलका करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न चालू होता......

तेवढ्यात दारातून कदम आणि सुबोध आत आले.....कदमचा डोक्यावर जखम होती......दोघांचे केस

विस्कटलेले....कपडे पण तसेच काही ठिकाणी रक्ताचे डाग पण होते......सुबोध चा चेहर्‍यावरची भीती स्पष्ट

दिसत होती......तो अजूनही बिथरला होता.....तो आत आला आणि समोर ठेवलेल्या जग मधील पाणी गटागटा पिऊ

लागला......निम्म अर्ध पाणी तर त्याचा अंगावर सांडल होत.....तो तसाच खुर्ची वर बसला......

"काय झालं तुम्हाला.....??"..........प्रतापराव त्यांची अवस्था पाहून बोलले.....

कदमानी मग जे घडलं ते सविस्तर सांगितलं........

"त्या आत्म्याला मुक्ति हवीय...."कदम त्यांचा आयुष्यात पहिल्यांदाच एवढे सीरियस झाले होते......

कदम प्रतापराव कडे पाहत बोलले....,"प्रतापराव काय आहे त्या जागेच रहस्य....?? कोण आहे

एवढ्या खुनाला जबाबदार...??

प्रतापराव हळूहळू चालत खिडकी जवळ गेले...... क्षणभर सगळीकडे शांतता पसरली.........

सुबोध आणि कदम प्राण कानात आणून त्यांचा प्रतेक शब्द ऐकू लागले......

"मंजिरी........" प्रतापराव सांगू लागले..............

सोळा वर्षा पूर्वी इथे छोटसं पण सुंदर गाव होत........प्रतापराव त्या गावातील एकदम प्रतिष्ठित

व्यक्ति.......अफाट श्रीमंत......गावात त्यांचे दोन वाडे होते......एक वाडा एकदम जंगलजवळ होता......खूप

सुंदर...........घरात त्यांचा एक लहान भाऊ सुशील आणि त्यांचे आई वडील होते.........आईच नाव

जानकी आणि वडील दौलतराव..... सुशील चा लहानपणा पासून जरा जास्तच लाड

केला जायचा.......त्याचाच परिणाम की काय खूप बिघडला होता तो.....सतत दारू प्यायचा......कायम नशेत

असायचा......गावाजवळ तमाशाला जाने......तिथे जाऊन पैसे उधळणे हेच त्याच काम......एकदा तर त्याने घरात

चोरी सुद्धा केली....आणि पकडला गेला........

दौलतराव आणि प्रतापरावांनी खूप मारल त्याला आणि समजही दिली........त्याने वर वर माफी मागून

वेळ मारून नेली.....पण तो आतून अजूनही तसाच होता.......

एकदा तो पहाटे तालुक्याचा गावातून त्याचा जीप मधून येत होता......भयंकर नशेत होता तो......त्याने जीप

गावात आणली.....नुकताच सूर्य उगवत होता.....त्या किरणांबरोबर त्याला काही अंतरावर एक

सुंदर चेहरा दिसला......त्याने गाडी जागेवरच थांबवली......आणि एकटक समोर पाहू लागला......

समोर पांढर्‍या पंजाबी ड्रेस मध्ये एक सुंदर मुलगी होती........एकदम गोरी......निळे डोळे.....नाजुक

गुलाबी ओठ.....कानात सुंदर डूल......दोन्ही भुवयाचा मधोमध एक छोटीसी पांढरी टिकली......नुकतीच आंघोळ केल्याने

तिचे केस अजूनही ओले होते.......गालावर येणारे केस ती हळूच बोटाने कानामागे सरकवत होती......पण

या सर्वात मनमोहक होत ते तीच सुंदर हास्य.........अस वाटत होत जणूकाही सूर्याचा पहिल्या किराणा सोबत

स्वर्गातील परी खाली आलीय जमिनीवर...........

हातात फुलाची परडी घेऊन ती मैत्रिणी सोबत फूल तोडत होती........

सुशील क्षणभर तिला पाहतच राहिला.......नंतर तिने जीप तिचा जवळ नेली आणि हॉर्न वाजवला......

एखाद्या भित्र्या सशा सारखी ती घाबरली आणि सुशील कडे पाहू लागली.......तिची मैत्रीण लगेच तिथून पळून

गेली....

"नाव काय तुझ...?" सुशील तिला निरखून पाहत बोलला.......

"म.....मंजिरी......." ती तिचा नाजुक आवाजात नजर तशीच खाली ठेवून बोलली.......आणि लगेच तिथून निघून जावू

लागली.......

सुशील तिचा छम छम वाजणार्या पैजण कडे पाहू लागला.......

त्याचातील राक्षस जागा झाला होता......त्याने लगेच तिचा मागून जीप नेली.....आणि खाली उतरून तिचा जवळ

गेला आणि खिशातील रुमाल काढून तिचा तोंडात कोंबला........आणि उचलुन जीप मध्ये टाकलं आणि हात पाय बांधले.......मग जीप मध्ये बसून तिला जंगलाजवळील वाड्यावर घेऊन गेला.......

सुशील वासनेने आंधळा झाला होता....मंजिरी बिचारी हात पाय झाडण्या व्यतिरिक्त काही करू

शकली नाही......वाघाचा तावडीत कोवळ हरिण सापडाव अशी गत मंजिरीची झाली होती......बघता बघता सुशील ने

तिचा अब्रूचे लकतरे काढून टाकले........एक नाजुक कळी त्याने कुस्करून टाकली होती........

बघता बघता गावात ही बातमी पसरली.......सुशील च दुष्कर्म पाहून गावातील प्रतेकजण

खवळला होता.......दुसर्‍या दिवशी गावात सभा भरली........मंजिरी तिथेच कोपर्‍यात बसली होती..........

रडून रडून तिचे डोळे सुजले होते.....डोळ्यातील पाणी आटल होत.......

डोळ्यातील आसवांनी आता सुड बनून पेट घेतला होता......

दौलतराव आणि प्रतापराव तिथे आले.....दोघेही भयंकर चिडले होते......

पण सुशील काहीच चुकीच केल नसल्याचा अविर्भावात तिथेच उभा होता.......

दौलतरावांनी मंजिरीचा वडिलांचं बोलणं पूर्ण ऐकून घेतलं......

मग सुशील कडे रागाने पाहत बोलले.....,"काय केलास नराधमा तू हे.......??

सुशील निर्लज्जपणे हसत बोलला...,"काय केल...?? पुन्हा करून दाखवू का आता,,,??

आणि स्वत:च मोठ मोठयाने हसू लागला.....

त्याच अस उत्तर ऐकून दौलतराव चिडले.......

जानकी पण तिथेच होत्या.....,"तुझा जन्म होण्या पेक्षा वरवंटा का आला नाही माझा पोटून...."

त्या रडत रडत कपाळावर हात मारून घेऊ लागल्या........

अचानक त्या थांबल्या आणि दौलतराव कडे पाहत बोलल्या....,"याला मारून टाका.....चेचून चेचून

मारा याला......."

दौलतरावांनी सर्व गावकर्‍याना इशारा केला......,"मारून टाका याला.......तुम्हीच द्या शिक्षा याला...."

त्यांचं ते बोलणं ऐकून सर्व गावकरी त्याचावर तुटून पडले........

मंजिरीचे वडील हात जोडून उभे राहिले......आणि रडत रडत बोलले...,"माझा मुलीच काय....कोण स्वीकारणार

तिला...??

"मी स्वीकारेन तिला.......मी करेन तीचाशी लग्न...." प्रतापराव पुढे येत बोलले.....

दौलतराव आणि जानकीला आपल्या मुलाचा अभिमान वाटू लागला......कारण एका मुलाने त्यांची अब्रू धुळीस

मिळवली होती तर दूसरा मुलगा ती अब्रू परत मिळवून देण्या साठी मंजिरीचा स्वीकार करायला तयार

झाला होता......

इकडे सुशील ला गावकरी दिवसभर हाल हाल करून मारत होते.....नंतर रात्री गावचा बाहेर असलेल्या रेल्वे

रुळाला त्याला बांधून टाकलं.......

सकाळी काहींनी जाऊन पहिलं तर त्याचा शरीराचे तुकडे तुकडे झाले होते.....अगदी ओळखू येत नव्हते एवढे

तुकडे झाले होते......एका पापी ला शिक्षा मिळाली होती.....

बघता बघता सहा महीने होवून गेले होते.....सर्वकाही सुरळीत चालू

होते......मंजिरी सुखाने राहत होती.....

अचानक एके दिवशी विपरीत घडलं.......मंजिरीला भयंकर ताप आला.....अगदी काही मिनिटात तीच शरीर तव्यासारख

तापल होत......

ती ओरडत होती......किंचाळत होती......दौलतराव आणि जानकी पण तिथेच होते.......प्रतापराव डॉक्टर

ला बोलावून आणायला गेले......इकडे तिची अवस्था खूपच वाईट झाली होती.......तिची त्वचा काळी निळी पडू

लागली......आणि बघता बघता तिची त्वचा जळू लागली.......ती तडफडू लागली......त्या दोघांना काय कराव

ते सुचत नव्हतं...

आणि एका मोठ्या किंकाळी सह तिने आपला जीव सोडला........तीच पूर्ण शरीर आखडल होत......

काही वेळाने डॉक्टर आले.....त्यांनाही तिची अवस्था पाहून आश्चर्य वाटलं .....पण आता सर्व संपलं होत....

मंजिरी या जगातून निघून गेली होती......

"मला ही बॉडी पोस्ट मोर्टम साठी पाठवायची आहे....जर तुमची परवानगी असेल तर......"डॉक्टर

धुरी प्रतापरावांना विनंती करत बोलले.....

"आता हे सगळं करून काय मिळणार आहे...?" प्रतापराव भावना आवरत बोलले....

"मृत्यूच कारण....मी अशी केस माझा आयुष्यात पहिल्यांदा पाहतोय.......सो प्लीज......" डॉक्टर

धुरी विनवणी करत होते......

"ठिकय....."प्रतापराव एवढच बोलले दुसर्‍या दिवशी बॉडी परत मिळाली....

पूर्ण गाव मंजिरीला शेवटचा निरोप द्यायला जमा झाल होत......प्रतापरावांनी तिचा चीतेला अग्नि दिला......

सर्व गाव सुन्न झाल होत.......

सगळीकडे शांतता पसरली होती...........पण ही शांतता वादळापूर्वीची होती.......

रात्र झाली होती......दौलतराव शांत झोपले होते......अचानक कसल्याशा आवाजाने ते उठले ...

समोरच दृश्य पाहून त्यांची दातखिळीच बसली......समोर भिंतीवर वर छताचा कोपर्‍याला एक बाई

पालीसारखी चिकटून विचित्र पद्धतीने बसली होती..........चेहरा समोर होता जो केसांनी झाकला होता.......हात

आणि पायांनी तिने भिंत पकडून ठेवली होती.......

तोंडातून एक हिरवट रंगाची चिकट लाळ पडत होती......दौलतराव ते भयंकर दृश्य पाहून थर थर

कापू लागले......कसबस त्यांचा तोंडातून शब्द बाहेर पडले.............," कोण आहेस तू......??

एक वार्‍याची झुलक आली आणि तिचे केस मागे गेले........

विक्षिप्तपणे हसत ती बोलली.....,"मंजिरी......"

तिचा आवाज घोगरा होता..........

आणि मग ती हळू हळू खाली आली.....आणि दौलतराव समोर येऊन उभी राहिली.......

तिने तीच तोंड उघडल........आपली काळी जीभ ती फाटलेल्या ओठावरुन फिरवू लागली......आणि तिने

तोंड उघडल........जबडा आणखी मोठा केला......आणखी मोठा......आणखी मोठा.....

आणि त्यातून ती आत हवा खेचू लागली......

दौलतराव एखाद्या चुंबकासारखे तिचा कडे आपोआप खेचले जात होते.....त्यांचे पाय तिचा तोंडात

होते.......ती स्वतचा आकार वाढवू लागली.......आणि त्यांना आणखी आत खेचू लागली........

दौलतराव सुटकेचा प्रयत्न करत होते पण ते आता शक्य नव्हतं......कमरेपर्यंत त्या आत्मेन त्यांना गिळल होत....

त्यांची हाड आता कडकड वाजू लागली होती.....ते ओरडत होते....किंचाळत होते.....पण

आता त्यांचा आवाज दाबला गेला होता.....कारण त्यांना पूर्ण गिळल होत.....

जानकीला वरचा खोलीत कसली तरी हालचाल जाणवली.....म्हणून ती वर आली....तिने दार वाजवल पण

आतून कसलाच प्रतिसाद नाही भेटला......म्हणून ती दार उघडू लागली.....

ती तिथेच होती अगदी दाराचा वर......भिंतीला चिकटून........

जानकीने दार उघडताच अगदी तिचा समोर ती ओकली.......त्या बरोबर तिचा तोंडातून खूप सारी लाळ पडली आणि त्या सोबत दौलतरावांचा मुडदा ही समोर पडला.......हिरव्या चिकट

लाळेमद्धे भिजलेले ते प्रेत खूप किळसवान होत......जानकी ते पाहून चार पावले मागे

सरकली आणि जोरजोरात किंकाळू लागली.....

अचानक दौलतरावांचा मुडदा उठून बसला आणि बोलला...,"तू पण मरणार..."

आणि पुन्हा निष्प्रान होवून पडला...........

जानकी किंचाळत.......खाली पळू लागली..... अचानक तिचा हात कोणीतरी पकडला.....तिने पहिलं तर

ती मंजिरी होती......भयानक अवतारात..... तिने जानकीचा गळा पकडला आणि वर उचलला......

"मंजिरी......"

मंजिरी आवाजाचा दिशेने पाहू लागली......

प्रतापराव तिचाकडे पाहत होते.....,"अग काय करतेस तू...??का मारतेस त्यांना...."

मंजिरी घोगर्‍या आवाजात बोलली.....,"या दोघांनी मिळून जन्म दिला ना त्या सुशील ला......त्याचीच

शिक्षा देतेय...."

प्रतापराव विनवणी करू लागले.....,"अग आम्ही प्रायश्चित केल ना.....सोड ना माझा आईला......"

मंजिरी क्रूर पणे हसू लागली ..,"ठिकय....सोडते..."

अस बोलून तिने जानकीला खाली सोडलं.....जानकी खाली पडली....लगेच तिने

पायाने तिला जोरात ठोकर मारली.....तिचा डोक्यावर तिचा पाय बसला.....अंड फुटाव तस तीच डोक

फुटल......एका चित्कारसह तिचे प्राण गेले......रक्ताचे शिंतोडे प्रतापरावांचा अंगावर उडाले......

लगेच खिडकीतून उडी मारून ती निघून गेली..........

या नंतर जणूकाही गावात मृत्यूने थैमान घातल होत......प्रतेक घरातून कोणी ना कोणीतरी मरत

होत.....खूप भयानक मरण येत होत......पण त्याच वेळी प्रतापरावांनी एक व्यक्ति बद्दल

ऐकलं......देसाई......

वयस्कर व्यक्ति होते.....पण खूप हुशार.......प्रतापरा­वांनी त्यांना बोलावून घेतलं......

ते वाड्यात आले.......

"गळ्यात रुद्राक्ष.....चेहर्‍यावर तेज....नजर भेदक......पांढरे लांब केस....."

एकूणच तेजस्वी रूप होत त्यांचं.......त्यांचं वाड्यावर पाऊल पडताच एक प्रकारची शांतता पसरली सगळीकडे.......

त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली......प्रतापराव तिथेच हात जोडून उभे होते.....

"हरी ओम........हरी ओम...."

"आहे.....आत्मेचा वास आहे इथे.......त्या आत्मेला कैद करेन मी......"

ते डोळे बंद करून कसल्याशा निर्धाराने बोलले......मग अचानक त्यांनी डोळे उघडले.......

"मला तुमचा घरातील गव्हाचे पीठ हवय......."

प्रतापराव लगेच गेले आणि वाटीतून पीठ आणल......

त्यांनी लगेच त्या पीठा मध्ये मंत्रोच्चार करून थोडसं पाणी टाकलं......मग त्या पिठाचा गोळ्याला आकार

देऊ लागले......

आणि काहीतरी बनवलं.......

त्यांनी सोबत एक हंडा आणला होता......सोन्याचा.......ज्यावर ओम ही अक्षर

कोरली होती.......

त्यांनी मग तो पिठाचा गोला त्यात ठेवला....... प्रतापराव हे सर्व पाहत होते........त्यांना काहीच

कळत नव्हतं......

देसाई त्यांना बोलले........,"हरी ओम.....हरी ओम......."

"या पिठा पासून मी भुंगा बनवलाय.......आणि तो या सोन्याचा हंड्यात ठेवलाय.......आता मी माझा मंत्र शक्तीने

त्या आत्मेला या भुंग्यात आणणार........आणि तिला कैद करून टाकणार......हरी ओम......"

पूजेची सर्व तयारी झाली होती.......

देसाईनी पुजा सुरू केली.......प्रतापराव वाड्याचा बाहेर उभे होते......त्यांना सुरक्षित रिंगण बनवून दिल होत त्यांनी......

त्यांनी मंत्रोच्चार सुरू केले......

निरभ्र आकाशात ढग जमा होवू लागले........वार्‍याने वेग वाढवला होता......

विजा कडाडू लागल्या.......

प्रतापराव सर्व काही मोठ्या धिराने पाहत होते...... देसाई चा तोंडून एक एक मंत्र वज्रासारखे त्या आत्मेवर पडत होते.......

ती आपोआप खेचली जाऊ लागली त्या हंड्यातील भुंग्याकडे..........

भयंकर चीत्कार करत ती आत्मा तिथे आली.......

देसाईनी त्यांचा मंत्रोच्चार अजून वाढवले.........

त्या आत्मेच रूपांतर काळ्या धूरात झाल......आणि ते त्या हंड्यात कैद झाल........देसाई नी लगेच

तो हंडा बंद करून टाकला.............

पण अचानक जणूकाही तिथे भूकंप झाला.......पत्त्याचा बंगल्या सारखा तो बंगला कोसळू

लागला........आणि बघता बघता पूर्ण जमीनधोस्त झाला.........

प्रतापराव इकडे तिकडे बघून हाका मारू लागले.......अचानक एका दगडाखाली हालचाल

झाली.......आणि त्यांचा हात बाहेर आला.......अंगावरील माती बाजूला सारून देसाई उभे राहिले.......

"हरी ओम.........बेटा काळजी करू नको आता.......ती आत्मा तुला आता कधी त्रास नाही देणार.......,त्या हंड्यात कैद आहे

ती....भुंग्याचा रूपात.........पण लक्षात ठेव.......हंडा चुकून पण पुन्हा खोलू नका......"

प्रतापराव सर्व सूचना लक्ष देऊन ऐकत होते............

"पण कोणीतरी आहे......जो त्या आत्मेचा मुक्तीची वाट पाहत राहील........."

"कोण महाराज....?? प्रतापराव बोलले...........

"महाकाळ........"मी माझा दिव्य शक्तीने एवढच जाणू शकलोय........

एवढं बोलून ते निघून गेले.............

प्रतापराव एवढं सांगून शांत झाले.......काही वेळ थांबून पुढे बोलले...,"त्यानंतर पंधरा वर्ष काहीच

घडलं नाही.......पण मागचा वर्षी तो भुंगा हंड्यातून बाहेर पडला आणि पुन्हा एकदा सुरू

झाल.....मृत्युचा तांडव.........."

सुबोध आणि कदम हे सर्व ऐकून बधिर झाले होते........

"मग तुम्ही लगेच महाराजांना का नाही बोलावून घेतलं....??" कदम बोलले.....

"केला होता प्रयत्न....पत्र पाठवल होत त्यांना.......तिकडून उत्तर आल की महाराज आता हयात

नाहीत.......,मग मी पुन्हा सर्व वस्तुस्थिती लिहून पाठवली.....पण तिकडून

काही अपेक्षा नाही....."प्रतापराव निराश झाले होते......

"मग आता काहीच मार्ग नाही का.....??" सुबोध रडक्या सुरात बोलला.....

प्रतापरावांनी समोर बोट केल.........तिथे श्री कृष्णाची मूर्ति होती........

"फक्त तोच आपल्याला वाचवू शकतो......"प्रतापराव बोलले.....

"तो दगड.....??? ही दगडाची मूर्ति काय करू शकणार.....???" कदम बोलले.....

पुढे मूर्ति जवळ गेले आणि बोलले.......,"पता नही लोग पत्थर किसलीए पुजते है.....??"

"किताबे पढने से ज्ञान नही मिलता.......

मंदिर जानेसे भगवान नही मिलता.......

लोग पत्थर इसलीए पुजते है.......

क्योंकी....विश्वास के लायक इंसान नही मिलता..........."

सगळेजण अचानक आलेल्या या आवाजाकडे पाहू लागले.............दारात कोणीतरी उभ होत.....

सहा फुट उंच.....मजबूत शरीरयष्टी...........अंगावर निळा शर्ट आणि सिक्स पॉकेट कार्गो जीन्स....पायात

स्पोर्ट शूज आणि खांद्यावर बॅग घेऊन एक तरुण मुलगा दारात उभा होता..................

मानेपर्यंत लांब केस..........हसरा चेहरा......डोळ्यात वेगळीच चमक होती......

"कोण तू....???" कदम काहीसं वैतागत बोलले....

"मी.....मी क्रिष्णा............" तो तसाच हसत बोलला.........

"इंटरेस्टिंग........" कदम मूर्ति कडे पाहत बोलले......,"देवा तू स्वत: आलास....."

"हॅलो........मी क्रिष्णा देसाई......."त्याचा चेहरा अजूनही हसरा होता.........

प्रतापराव पुढे येत बोलले.....,"म्हणजे तू.....?? देसाई महाराजांचा...???

''नातू...." क्रिष्णा बॅग ठेवत बोलला.....

"तुमचा बद्दल बरच काही आजोबांनी डायरी मध्ये लिहून ठेवलं होत......" क्रिष्णा माहिती देत बोलला.....तुमच

पत्र मिळालं आणि निघालो.....नाही म्हणजे आज काल पत्र येत नाही ना कोणाचं....."

क्रिष्णा शांतपणे बोलत होता.....

"हो माझाकडे फक्त पत्ता होता.....महाराज महाकाळ बद्दल काही सांगत होते.......त्याचा बद्दल

काही माहिती काढली का त्यांनी....."प्रतापराव बोलले....

"हो ती माहिती काढली त्यांनी.....पण अजून बरीच माहिती मिळवायची बाकी आहे....."क्रिष्णा आरामात

खुर्चीवर बसत बोलला..........

"कसली माहिती...."सुबोध पुढे येऊन बोलला......

"पण मंजिरी प्रतापरावांचा जिवावर का उठली....?? आणि महाकाळ कोण आहे....??" कदम त्यांचं पोलिसी डोक

लढवत बोलले..........

"यातील पहिल्या प्रश्नाच उत्तर दुसर्‍या प्रश्नाचा उत्तरात आहे......"

क्रिष्णा केसातून हात फिरवत बोलला....

"कोण आहे महाकाळ....??" प्रतापराव उत्सुकतेने बोलले....

क्रिष्णा उठला प्रतापरावांचा नजरेला नजर देऊन बोलला........,"आपले धाकटे बंधु......सुशील.....जो आता काळ्या जादूचा मालक झालाय आणि बनलाय महाकाळ......."

सर्वजण एकटक क्रिष्णा कडे पाहू लागले......

क्रिष्णा त्यांचे चेहरे पाहून हसत

बोलला....,"तुम्हाला पडलेत तेच प्रश्न मला पडलेत......"

येणार्‍या काळात प्रतापराव सुबोध आणि कदम यांना खूप काही जाणून घ्यायचं होत.....आणि या सर्व

प्रकारावर कायमचा बंदोबस्त करायचा होता.....त्यांची लढाई

होती मंजिरीचा आत्म्याशी आणि सुशील उर्फ महाकाळशी.......पण पहिल्या पेक्षा त्यांचं मनोबल आता वाढल

होत......कारण सोबत होता..........क्रिष्णा.........