कवर फाटलेलं पुस्तक - भाग - I Subhash Mandale द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कवर फाटलेलं पुस्तक - भाग - I

कवर फाटलेलं पुस्तक
भाग-I

कवर फाटलेल्या पुस्तकाचं वरचं पान मळतं, चोळामोळा होतं,ते खराब झालेले पान फाडून टाकले,की पुन्हा दुसरं पान मळतं, चोळामोळा होतं ही सतत होणारी क्रिया आहे, तसंच दुःखाचं आहे.आपण सुख शोधायला लागलो की दुःखचं मिळतं आणि असे दुःख वारंवार मिळतं.
घडून गेलेल्या घटनांची पुन्हा आठवण काढायची नाही असे ठरले होते,पण जे नको आहे तेच घडले,
त्या दिवशी माझे सिनियर साहेब leave वर होते, त्यांनी मला massageकेला, की 'आज होणाऱ्या new joiners चा interview तुम्ही घ्या'
नविन जबाबदारीचा आनंदही होता आणि मनावर दडपणही होते. interview हा HR team सोबत घ्यायचा होता, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नव्हते.
नवीन येणाऱ्या employees ना त्यांचा या अगोदरच्या कामाचा अनुभव आणि त्या work मध्ये त्यांचा  रोल याबद्दल माहिती विचारल्यानंतर त्याची निवड माझ्याकडून नक्की केली जाते, पण HR team, familyची basic information घेत असते.ही information विचारण्यामागचा हाच उद्देश असतो की employees चा सच्चेपणा तपासला जावा.
एका मागून एक employees ची test घेतली जात होती.शेवटी vacancy full झाल्यानंतरही एका गरजू मुलीच्या interview साठी staff member विनवणी करत होते, तसेही अजून extra employeesची joining करायची नव्हती, त्यामुळे HR team चे सदस्य निघून गेले.पण त्यांच्या मनाच्या समाधानासाठी तिचा interviewघ्यायचा ठरवले.
त्या मुलीने दरवाजा उघडला आणि बोलली,
"may I come in sir?"
मी खाली मान घालून पेपर आवराआवर करत बोललो,
       "Yes, come in."
ती मुलगी माझ्या समोर येऊन उभी राहिली.तरीही मी माझ्या कामात व्यस्त होतो.थोडा वेळ झाला तरी दोघांपैकी कोणीही ब्र शब्द काढला नाही.काही वेळ गेल्यानंतर न राहून तीच बोलली,"सर, मी शितल."
"हा बोला, job experience?",मी तिच्याकडे न पाहताच बोललो.
"Job कुठेही नाही",
"Intervie चे पेपर तपासून मान वर करत मी म्हणालो,"without experience आम्ही आपणाला job offer नाही करुss....( मी तिच्याकडे पाहिले अन् तोंडातले शब्द तोंडातच राहिले.मला गहिवरून आलं)....तु?"
"हो,मीच, without experience,"
ती तुटक तुटक बोलली.
अडाणी भाषेत बोलणारी शितल,इंग्लिश शब्दांचा वापर  सराईतपणे करत होती,तिच्यात कमालीचा बदल झाला होता,
"सॉरी,तुला पाहिलंच नाही,उभी का,बस ना"
ती चेअरवर बसली.
मी पाण्याचा ग्लास भरून तिला देत बोललो,"इतक्या वर्षांपासून कुठे होतीस?, त्यावेळी नंतर तु भेटशील असं वाटलं होतं पण तू भेटलीच नाही."

"तुम्हाला अजून आठवतोय तो दिवस?",असे म्हणून तिने पाण्याचा एक घोट घेतला.

"कसा विसरेन तो दिवस, अन् कसे विसरू ते दिवस.....",

या घटनेला आठ वर्षांचा काळ उलटून गेला होता.तरीही तो जसाच्या तसा माझ्या नजरेसमोर उभा राहिला.
         BA पुर्ण झाल्यानंतर कुठे तरी नोकरी मिळाली असं खूप वाटायचं.एक नोकरी मिळाली.महिना बाराशे रुपये,ड्युटी सकाळी आठ ते सायंकाळी सात, शिवाय गावातून दहा किलोमीटर अंतरावर,बससाठी तीस दिवसाचे सहाशे रुपये खर्च करून जावं लागायचं.तरीही नोकरी सोडायची नाही असे ठरवले होते,पण म्हणावा इतका फायदा होत नसल्याने ती शाखा बंद झाली.शाखामालकांंनी आठवण म्हणून शेवटच्या पगारासोबत नोकियाचा 1100 मॉडेलचा मोबाईल दिला. पण
पुन्हा बेरोजगार.घरी म्हशी होत्या,त्या रोज चरायला न्यायच्या.चांगलं शिकून म्हशी वळायला लागल्यामुळे मनात दुःख व्हायचं.
वडिलांचा एक जूना मित्र गावात भेटला.त्यांनी त्याला घरी आणले.बोलता बोलता वडील बोलले,'माझ्या मुलासाठी पुण्यात काय काम मिळालं तर बघ.'
त्यांनी माझी शैक्षणिक माहिती विचारल्यानंतर पुण्यातील माऊली प्लेसमेंटचा अॅड्रेस दिला.
पुण्यात आलो, कसंबसं अॅड्रेस शोधला.आल्याआल्या त्याने पैसे मागितले, सांगितले की,'तुला जी रूम करून द्यायची आहे तिथे अॅडव्हान्स म्हणून काही पैसे द्यावे लागतील.' मीही दिले.
पंधरा दिवस तो फक्त नोकरीसाठी अॅड्रेस देत होता.तिथं जाऊन मी व्हॅकंन्सीची चौकशी करायचो.शहरात नोकरी मिळावी या उद्देशाने आलो.वाटलं होतं आपलं शिक्षण बघून आमच्याकडे नोकरी करा म्हणून कुणीही पळत मागं लागतील.पण 'खेडेगावात शिकलेल्या मानसाचे शिक्षण शहरात आल्यावर कळतं'.

पुण्यात,नोकरी संदर्भात कुणाला मराठीत पत्ता विचारला तर समोरून हिंदीत रिप्लाय मिळायचा अन् हिंदीत प्रश्र्न विचारला की मराठीत उत्तर मिळायचं,सगळा गोंधळ उडायचा.
नोकरी मिळाली नाही.होते नव्हते तेवढे पैसे खर्च झाले होते.रूम होती पण खाण्याची व्यवस्था नव्हती.रोज सकाळी प्लेसमेंट ऑफिसवर जाऊन अॅड्रेस घ्यायचा.दिवसभर नोकरी शोधायची.पाच वाजेपर्यंत रूमवर यायचं आणि सायंकाळी पैसे नसल्यामुळे मंगल कार्यालयात जेवण करायला जायाचं.तिथं ओळीने पाच मंगल कार्यालये आहेत, कोणत्या ना कोणत्या मंगल कार्यालयात जेवण असायचंच,असा दिनक्रम सुरू होता.
महिना संपत आला तरी नोकरी मिळाली नाही, शेवटी प्लेसमेंटवाल्याने रूम खाली करायला लावली.योगायोग असा की ज्या दिवशी रूम खाली करायला लावली त्याच दिवशी नोकरी मिळाली होती.त्याच दिवशी ऑफिसपासून जवळ रूमची चौकशी केली होती,कारण ऑफिस ते प्लेसमेंटवाल्याची रूम यासाठी सहाशे रुपये खर्च होणार होते.
नवीन रूम मालकाबरोबर,महीना पुर्ण झाल्यानंतर पैसे द्यायचा व्यवहारही ठरवला होता.
रूम खाली करायला लावली,हे माझ्या दृष्टीने बरंच झालं होतं,कारण नोकरी लागल्यावर पहिल्या पगाराचे पूर्ण पैसे त्याला द्यावे लागणार होते.त्या दिवशी रात्री दहा वाजता रूम खाली केली.रूम खाली केल्यामुळे  त्याचा आणि माझा संपर्क राहणार नव्हता‌.
नवीन रूम शहरातून बाहेर निर्जन अशा 'बंगला वस्ती'नावाच्या वस्तीत होती.

रूम मालकाच्या मदतीने एक वेळ मेस लावली.महीनाभर जवळ पैसे नसले तरी काळजी करण्याचे कारण नव्हते.
रूम पासून आॅफिसपर्यंत चालत जायचे,दिवसाचे आॅफिस कॅंन्टींगमध्ये जेवण करायचे.ज्याचे पैसे पगारातून कापून घेतले जाणार होते आणि रात्री मेसचं जेवण.
मेसचं जेवण डब्यातून रूमवर 'ती' आणून द्यायची.असा दिनक्रम सुरू झाला.
पंधरा दिवस उलटले, सायंकाळी ड्युटीवरून आलो, रूम मध्ये शिरणार इतक्यात,डबा रूमवर पोच करणारी 'ती' पैसे मागायला आली.
मी तिला म्हणालो,"महिनापुर्ण झाल्यानंतर पैसे द्यायचा ठरलं होतं,मग मध्येच पैसे कसे मागता?,जा,तुझ्या आईला पाठवून दे."

"माझी आय माझ्यासोबत नाय राहत.",ती शांतपणे बोलली.

"मग मेस कोण चालवतं?"

"मीच चालवती."
मला विश्वासच बसला नाही,कारण अशी जबाबदारी सांभाळण्याचे तिचे वय वाटत नव्हते.ती कमी वयात लग्न झालेली अडाणी मुलगी दिसत होती.
महिन्याच्या शेवटी नोकरी मिळाली होती त्यामुळे पगार कमी आला होता, त्यातील खर्च होऊन चारशे रुपये शिल्लक राहिले होते.
मी तिला म्हणालो,"जवळ चारशेच रुपये आहेत, पगार झाला की लगेच देतो."

ती म्हणाली,"अहो, मला माहित हाय ,या वस्तीत फक्त गरीब लोकच येतात, मी प्रेग्नंट असल्यामुळं दवाखान्याला पैसे लागतात.माझाही अडचण हाय"

"माझ्या जवळ तेवढेच पैसे आहेत, पुर्ण महीना कसा घालवायचा ?"

"मी तुम्हाला पैसे मागितले नसते,पण किराणा भरायला देखील माझ्याकडे पैसे उरले नाहीत."
"मला समजतंय, म्हणून आठ दिवस झाले तु फक्त वरण भात देतेय तरीही कुठलीच तक्रार न करता जेवण करतोय"मी माझी बाजू मांडली.

"मी फक्त वरण भात चालू केल्यापासनं सगळ्यांनी मेसचं जेवण बंद केले आहे,ते तुम्ही बघतायच, अन् किराणा भरला नाय तर तुम्हीपण मेस बंद कराल,पैसे नसल्यावर मी मेस कशी चालवायची." तिच्या डोळ्यांत पाणी तरळू लागले होते.

"तुझे मिस्टर काय करतात,त्यांचे पैसे येत असतील ना?"

"आमचा स्वत:चा टेंपो हाय, दोन महीनं झालं, टेंपो घेऊन बेंगलोरला गेलेत,ते आल्यावर पैशाचा प्रश्न सुटंल तोपर्यंत तरी पैसे लागतील,मेस बंद झाल्यावर मी खाणार काय?"
तिचा केविलवाणा चेहरा पाहून मी क्षणाचाही विलंब न करता खिशातून चारशे रुपये काढून दिले.तिने त्यातले शंभर रुपये परत केले.
"असूद्या,अडीअडचणीला उपयोगी पडतील.", असे म्हणून ती निघून गेली.
मला प्रश्र्न पडला,की ज्यांच्याकडे टेंपो आहे, त्यांच्याकडे घरखर्चासाठीही पैसे नसावेत, कसं शक्य आहे?,जाऊदे असेल एखाद्याचा problem.
मी माझ्या मनाची समजूत काढली आणि रूम मध्ये शिरलो.
नुकताच आॅफिसमधून आलेलो, हात पाय धुवून फ्रेश झालो.आणि पुस्तक वाचत बसलो.ऐरवी आठ वाजताच डबा पोच करणारी ती,रात्रीचे नऊ वाजले तरी आली नाही, अजून अर्धातास उलटला तरी ती आलीच नाही.भूक खूप लागलेली, अजून वाट बघू शकत नव्हतो,न राहून मी तिच्या मेसवर गेलो.दरवाजातून आत बघितले तर ती एक चटईवर झोपलेली, मला बघून ती पडल्यापडल्याच बोलली,"माझी तब्येत बरी नाही, त्यामुळे आज स्वयंपाक बनवला नाही."
थोड्यावेळापुर्वी पैसे घेऊन जाताना ठिक होती अन् आता काय झाले हिला.स्वयंपाकाचं काय,वरण आणि भातच तर बनवायचा होता.मला राग आलेला,पण काय करणार, गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता.मी तसाच माघारी फिरलो आणि दुकानातून पार्ले बिस्कीटचे दोन पुढे घेऊन रूमवर आलो.तांब्याभर पाणी घेऊन त्यात बिस्किटे भिजवून खाल्ली.रूम पार्टनर उपाशीपोटीच झोपला होता.मीही अर्धपोटी झोपलो.

क्रमशः
कथेचा पुढचा भाग-II
                               _सुभाष आनंदा मंडले
                                 (9923124251)