ना कळले कधी - Season 1 - Part - 4 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी - Season 1 - Part - 4

'इथून लोकल ट्रान्सपोर्ट मिळुन जाईल'आर्या म्हणाली. 'आर्या for your kind information ह्या वेळेला इथून काहीही मिळणार नाही.आणि जरी काही मिळाल ना तर ते safe नाही'. खर तर आर्याला पण माहिती होत की ह्यावेळेला इथून काहीही मिळणार नाही पण तिला सिद्धान्त चा इतका राग आलेला होता की तिने ठरावलंच होत की काहीही झालं तरी मी ह्याची मदत घेणार नाही.आणि खर तिला कळत नव्हतं की हा इतका का चांगला वागतोय म्हणजे हा सकाळचा खरा की आताचा तिला काहीही कळत नव्हते. पण तिने ठरवलं होतं काहीही होऊ दे पण मी ह्याच्या सोबत जाणार नाही. 'आर्या should we',....??? sir ,खरच तुम्ही जा मी कॅब बुक करेल. कॅब easily मिळून जाईल. आता मात्र सिद्धान्त ला राग च आला मे इथे हिची मदत करायला बघतोय आणि कसला attitude दाखवतीये. 'काय प्रॉब्लेम काय आहे तुझा ?मी opportunity म्हणून तुझी मदत अजिबात नाही करत आहे. its my responsibility'कळलं. पण ठीक आहे मला काय नाही यायचं ना तुला माझ्यासोबत कर कॅब बुक i dont care! अस म्हणून सिद्धांत ने जोरात त्याच्या गाडीचे दार लावले आणि तो रागातच निघाला.
         आर्या ला कळलंच नाही की हा खरा की थोड्या वेळापूर्वी चा आणि म्हणे माझ्यात attitude आहे आधी स्वतः कडे बघ म्हणावं. किती राग घालतो हा डोक्यात. तिने कॅब बुक करायला मोबाइल घेतला आणि तिने बघितले की जवळपास एकही cab avaiable नाही. अरे यार आता तर आर्यांचे चांगलेच धाबे दणाणले. का मी सिद्धांतला नाही म्हंटल तो तर चांगला ऑफर करत होता आता काय करू........???? सिद्धान्त रागात तर निघाला, ह्याची मदत करावी तर ही नाटकं गेलीस उडत मला नाही फरक पडत, 'जा म्हणावं आता कशी जाते ते'.पण थोडं पुढे गेल्यावर त्याने गाडी एकदम slow केली .ह्या वेळेला त्या area मध्ये कॅब मिळणं खरच कठिण आहे आणि आर्याने तिथे एकटीने  थांबणं पण अजिबात safe नाही. 'मी तिला अस एकटीला सोडून यायला नको होतं,पण ती पण काही कमी नाही'. 'ती तर मूर्ख च आहे पण मी मला कळायला नको का'? मी अस एकटीला सोडायला नकोच होत. अस म्हणून त्याने u turn घेतला आणि परत तो ऑफिस च्या दिशेनं निघाला. आर्या मनातून चांगलीच घाबरली होती त्यात तिचा फोन पण dead झाला. इतक्यात तिथे सिद्धान्त आला, काय आर्या आली नाही का कॅब..??? सिद्धान्त सर, खर तर आर्याला तिथे सिद्धांतला पाहून खूप मोठा आधार वाटला तिला मनातून खूप आनंद झाला. तिच्या मनावरचं मोठं दडपण नाहीस झालं. Sir actually currently एक पण कॅब availalbe नाही आहे. 'मला तुझं काही फालतू explanation ऐकायचं नाही आहे 'already late झाला बस गाडीत. आर्या ला मनातून राग येत होता की काय उपकरकारायला आलाय का हा पण आता पर्यायच नव्हता. ती चुपचाप गाडीत बसली . दोघंही एकमेकांशी काहीही बोलत नव्हते पण शांतता बरच काही बोलत होती. आर्याला सिद्धांताचा खूप राग आला होता पण तोच सोबत असल्यामुळे ती निश्चित झाली होती. आणि सिद्धांताला ही तसा मनातून तिचा रागच आलेला होता पण आता तिला एकट सोडण्याच दडपण पूर्णपणे निघून गेल होत. इतक्यात सिद्धान्त चा फोन वाजला त्याने  receive केला 'अरे सिद्धान्त किती उशीर मी वाट बघतीये अरे तुझी लवकर ये ना 'अग आई खरच sorry ग आज थोडा उशिरच झाला, मी आलोच पण तू जेवून घे'. सिद्धांत अरे मी तुला सोडून जेवणार का........????? 'आई तू पण ना'. बर बर आलोच मी take care bye. अस म्हणून सिद्धांत नि फोन ठेवला. आर्या तर त्याचा हा स्वभाव बघून संभ्रमातच पडली .बापरे किती ढोंगी असतात लोक. आई चा तर एकदम श्रावण बाळ दिसतो हा! आणि बाहेर सतत आपला राग चिडचिड. त्याने माधातच गाडी थांबवली.