Naa Kavle kadhi - 1 - 6 books and stories free download online pdf in Marathi

ना कळले कधी - Season 1 - Part - 6

आज आर्या थोडं लवकरच निघाली कारण तिच्या कडे गाडी नव्हती आणि आज तिला अजिबात उशीर करायचा नव्हता. ती वेळेतच ऑफिस ला पोहचली.  पण सिद्धांत तिच्याही आधीच ऑफिस मध्ये हजर होता. पण त्याच्या केबिन मध्ये अजून कोणी तरी बसलेलं होत ज्या व्यक्तीला आर्या आज प्रथमच ऑफिस मध्ये पाहत होती . तिला थोड्या वेळाने कळले की हा विक्रांत आशिष, पूर्वा त्यांचा टीम लीडर जो सुट्टीवर होता आणि आज जॉईन झाला.आणि ऑफिस मधला सिद्धांताचा खास मित्र. आर्या तिचे तिचे काम करत होती .इतक्यात तिच्या एक्स्टेंशन आतून सिद्धांत ने कॉल केला व एक 5 मिनिटांमध्ये कॉन्फरन्स मध्ये सगळ्या टीम ला जमायला सांगितलं. त्याला मीटिंग घ्यायची होती. त्याने सगळ्यांना प्रोजेक्ट समजावून सांगितला आणि प्रत्येकाला दिवसाच टार्गेट दिल .आणि हे complete केल्याशिवाय कोणीही घरी जाणारच नाही ती ताकीदच दिली. आणि सगळे मीटिंग  नंतर भराभर कामाला लागले. आर्यकडे पण बरंच काम होत आणि तीच कालच पण थोडं pending च होत. तिने आधी कालच complete केलं ती नवीन असल्यामुळे तिला थोडा वेळच लागत होता. तीच कालच काम संपवायलच तिला बराच वेळ लागला. सिद्धांतने सगळ्यांनाच  काम कुठपर्यंत आलं हे पाहण्यासाठी एकेक करून बोलावत होता. सगळ्यांची बऱ्यापैकी सुरवात झाली होती.आर्या सगळ्यात junior असल्यामुळे त्याने तिला शेवटी बोलावल. मग आर्या, 'कस चाललंय काम any doubt..??? ' सर actully माझं कालचच काम थोडं pending होत so मी आधी ते complete केलं. आता मी चालूच करते आहे. हे ऐकून तर सिद्धांत ची तळपायाची आग मस्तकात गेली. आर्या listen तू काही कॉलेज ला नाही आणि हा college चा project नाही हेoffice आहे इथे deadlines असतात. तुला महत्व कळत का ह्याच. आणि तुला जबाबदारी नावाचा काही प्रकार असतो माहिती आहे का तुला..???? but sir, i m trying आणि मी खरच deadline च्या आधी complete करेल .कधी आर्या कधी तू तर अजून सुरवात पण नाही केली तुला थोडाही guilt वाटत नाही का ग की आपण अजून सुरवात पण नाही केली आणि वरून म्हणतेही i m trying ! कधी करणार तू  कारण आता लंच ब्रेक होईल म्हणजे 1 - 1:30 तास गेला फुकट,ते काही नाही मला आज काम झालेलं पाहिजे त्याशिवाय घरी जायचं नाही. आणि नसेल करायचं तर तस सांग मी handover करेल कोणाला तरी. झेपेल ना तुला..????? आर्यच्या डोळयांत एकदम पाणीच आलं तिला आजपर्यंत कोणी अस बोललेलं नव्हतं . ती फक्त हो म्हनाली कारण ती आता काही बोलण्याच्या मानस्थितीतीच नव्हती. you may leave now सिद्धांत म्हणाला. आर्या बाहेर आली आणि तिने फक्त कामावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. खर तर मूड नव्हताच पण आता तीने हे challenge म्हणून घेतलं.आणि तिला दाखऊन द्यायचं होत. अस म्हणूच कासकाय शकतो हा कि मी नाही करू शकणार . लंच ब्रेक झाला सगळे जेवायला गेले आर्या मात्र नाही गेली. कारण तिला थोडाही वेळ वाया घालायचा नव्हता. सिद्धांत ने लंच ला जाताना तिला पाहिले, त्याला वाटले येईलच ही थोड्याच वेळात. पणआर्या काही आली नाही, आता मात्र सिद्धांत ला फार वाईट वाटत होते . माझ्या मुळे जेवायला नाही आली ती. shut काय केलं मी हे! नवीन आहे ती इतका नव्हतं बोलायला पाहिजे मी, तिला तर सवय पण नाही ह्या कामाची. आर्यचा विचार करून त्याला जेवण गेलेच नाही त्याने आपला टिफिन बंद केला . अरे 'सिद्धांत डब्बा तर संपव', sorry यार विक्रांत मला भूक नाही आहे.अरे सिद्धांत ऐक तर..... विक्रांत सिद्धांत ला आवाज देत होता पण सिद्धांत केव्हाच निघून गेला होता. आर्या ला अजूनही काम करताना पाहून त्याला वाईट वाटलं खर तर तिने काहीच खाल्लेलं नाही ह्याच त्याला जास्त वाईट वाटलं.
         दिलेल्या वेळेत सगळ्यांनी कामे पूर्ण केली आणि ते निघाले आर्यच मात्र थोडं बाकीच होत पण ती उशिरपर्यंत बसून complete करणार होती. आर्यच्या टीम मधले एव्हाना सगळे गेले होते . इतक्यात आर्याला सिद्धांतने बोलावले तिला माहिती होत आपलं काम झालेल  नाही आता परत हा आपला अपमानच करणार. have a sit आर्या, त्याच्या टेबल वर मस्त पैकी पिझ्झा, snacks ठेवलेले होते तो आर्यला म्हणाला take it आर्या, no thanks sir, मला भूक नाही आहे. हे बघ आर्या मी तुला विचारत  नाही आहे at this time i am your boss आणि माझी order आहे, खाऊन घे. काय विचित्र माणूस आहे! खाण्याची पण ऑर्डरच देतो. तिला आता ऑपशनच नव्हता तिला खावच लागलं. खरं तर आर्याला खूप भूक लागली होती.पण तिल कामाच्या नादात कळलेच नाही आता मात्र थोडस खाऊन तिला बर वाटत होतं. आणि तिला पाहून सिद्धान्तला.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED