ना कळले कधी - Season 1 - Part - 7 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी - Season 1 - Part - 7

आर्या ला खुप भूक लागली होती तिने पटकन खाऊन घेतले, आणि तिने सिद्धांत कडे पाहिले तो तिच्या कडेच पाहत होता. सर झालंय आता मी जाऊ का माझं काम थोडसच काम पेंडिंग आहे मी लगेचच पूर्ण करून  देते. अग पण माझं बोलणं झालं नाही, तुला काय वाटलं मी तुला फक्त खाण्यासाठीच बोलावलं.??? नाही सर अजिबात नाही .मग?? आता आर्या निरूत्तर झाली. आर्या आजच काम पुरे झालं तू जाऊ शकते.नाही सर थोडंच  बाकी आहे मला फक्त 10 मिनिटे द्या,मे हे करू शकते. अगं हो मला माहीती आहे तू हे करू शकते आणि तुलाच करायचं आहे उद्या हवं तर 10 मिनिटे लवकर ये आणि कर आता उशीर झालाय so आजच्यासाठी बस झालं. आर्याला खर तर काम पूर्ण करूनच निघायचं होत ती तिच्या निर्णयावर ठाम होती. ती परत सिद्धांताला म्हणाली ठीक आहे मला उशीर झालेलाच आहे ना मग अजून 10 मिनीटांनी काय फरक पडतो. आणि discussion मध्ये वेळ घालण्यापेक्षा मी काम केलेलं काय वाईट आहे..?सिद्धांतला त्याचे कुठलेली employees कधीही cross नव्हते करत त्याचा रागीट स्वभाव पाहता ते करण्याची कोणाची हिम्मत पण नव्हती होत आणि आर्याने नेमक तेच केलं. त्याला पहिल्यांदा कोणीतरी cross केलं आणि हे तर तो सहनच करू शकत नव्हता. त्याचा आवाज चढला , आर्या  are you crossing me? तुझी हिम्मतच कशी झाली मला नाही म्हणायची?? सर मी कुठे नाही म्हणत आहे मी just उद्या करायचं ते आज करायचं म्हणयीये thats it! आणि असही हे discuss करण्यातच आपण already 10 मिनिटे waste केलेय. ओहह आता तू मला शिकवणार का की कुठे time west नाही करायचा?? म्हणजे तू माझं ऐकणार नाहीच ना??? then get out from here. सर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मला असं काही नाही म्हणायचं इतक्यात सिद्धांत तिच्यावर ओरडलाच will you please shut up and just get out. त्याने जवळ जवळ तिला केबिन मधून हकलूनच दिले.आर्या ला आता मात्र रडणं थांबवतात नाही आलं. तरीही ती तिच्या जागेवर येऊन काम करत बसली. आर्याला रडताना सिद्धांतने पाहिलं होतं पण ह्या वेळी तो प्रचंड रागात होता. 'मला cross करतीये मी तिच्याच भल्यासाठी सांगत होतो आणि हिचा इतका attitude काय समजते कोण ही स्वतःला रड किंवा काहीही कर मला काहीही फरक पडत नाही म्हणावं'.
        आर्या च काम पूर्ण झालं तीला सिद्धांत ला सांगायला जायची मुळीच इच्छा नव्हती.तिला खर त्याच तोंड पण बघायचं नव्हतं.तिने तिच्या त्याच्या केबिन कडे पाहिलं तो निघण्याच्याच तयारीत होता.तिने तिच्या extension वरूनच त्याला कॉल केला आणि आपलं काम झालं हे inform केलं. सिद्धांत ने फक्त ऐकलं त्याने काहीही reply नाही दिला. आणि फोन ठेवून तो निघाला. 'इतका कसला attitude आहे ह्या माणसामध्ये' ह्याचच काम करा परत ह्याचेच बोलणे ऐका. कुठून मिळाला मला हा बॉस. काम केलं नाही तर केलं नाही म्हणून ओरडतो,करायचं ठरवलं तर उद्या कर.नेमकं ह्याला काय हवंय ना हे आधी ठरव म्हणा आर्या स्वतःशीच म्हणाली आणि ती ही निघाली .सिद्धांत गाडी काढत होता तेव्हा त्याला आर्यची गाडी दिसली नाही 'म्हणजे आजही हिच्या कडे गाडी नाही'. आणि तो पार्किंग मध्ये च थांबला.आर्या पार्किंग मध्ये आली तेव्हा तिला लक्षात आलं की आपली गाडी तर service centre  ने pick up केली जी आपल्याला उद्या दुपारपर्यंत मिळणार. 'shut मी कसकाय विसरले आज गाडी नाही'. आता काय ?आणि तिला कालचीच फजिती आठवली . इतक्यात तिथे तिला सिद्धांत ची गाडी दिसली. आर्या बस गाडीत चल, तस तुला ऐकण्याची सवय नाही आहे पण कालच आहे ना लक्षात?? आर्यला सिद्धांत चा तर चेहराही नव्हता पाहायचा आणि त्याच्या सोबत जाण तर दूरची गोष्ट पण तिला नाही म्हणता आले नाही.
        गाडीत कोणीही काहीही बोललं नाही. दोघांनाही एकमेकांच्या बद्दल प्रचंड राग होता. आर्याला सकाळपासूनच थोडं कणकण वाटत होत पण तिने कामाच्या नादात दुर्लक्ष केलं होत. पण आता मात्र तिला चांगलंच temperature जाणवू लागलं. तिला अस झालं होतं केव्हा घरी जाईल आणि केव्हा नाही. सिद्धांत ला आर्याबद्दलचा राग अजूनही कमी होतच नव्हता त्याने मुद्दामून ac full केला. आर्यला ते कळलं पण तिला बोलण्याची इच्छाच नव्हती. एकदाचं आर्यच घर आलं आणि ती उतरली दोघांनीही एकमेकांकडे पाहिले नाही.आर्या घरी आली तिने थोडं जेवून घेतलं आणि ती लगेच झोपलीसुद्धा. सिद्धांत पण घरी आला पण तो थोडासा रागातच तो घरी आल्यावर काहीही बोलला नाही.शांततेत जेवन केलं आणि त्याच्या आईशी थोड्या गप्पा मारल्या.एव्हाना त्याच्या आई ला कळलं होतं की ह्याच नक्कीच काहीतरी बिनसलं आहे.पण तिला त्याच्या ह्या वागण्याची सवय झाली होती, तिला माहिती होत हा सकाळी नॉर्मल होईल. 
       आर्या अगं आज ऑफीस ला नाही जायचं का??? उठ पटकन, आर्याला आवाज देऊनही आर्या उठली नाही म्हणून तिची आई तिला उठवायला आली तिने पाहिलं तर आर्या तापाने चांगलीच फणफणली होती. सिद्धांत ऑफिस ला आला आर्या वेळ होऊन गेली तरीही आली नाही. त्यामुळे तर तो रागात होताच पण जसा जसा वेळ जात होता तशी तशी रागाची जागा काळजीने घेतली. अजून कशी आली नाही ही, गाडी तर नसेल बंद पडली?? नाहीतर काही झालं तर नसेल ? पण तिने inform नाही करायचं का,आपल्याला उशीर होतोय तर साधं काळवाव हे ही नाही कळत का हिला? आज त्याच लक्ष कशातच लागत नव्हत.