आयुष्याचं सारं (भाग -2) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आयुष्याचं सारं (भाग -2)

   घे उतुंग भरारी 


       तिचा नाच बघण्यासाठी पाऊले रोज  त्या नृत्यमंडळाकडे वाड्याच्या दिशेने 
पडायची .... होऊन जाऊदे एकदा ... अशी हाक घोळक्यातून तीन चार झण मारायची ... परत परत नाचण्यासाठी केलेली आजर्व नाही पण लालसी विनंतीच ती ...
तिच्यासाठी पोटाची खळगी भरण्याची हुरूप ठरली ... आता नाचणं त्या कित्येकीसाठी 
नुसता छंद राहिला नाही ... त्यांच्या अश्या जगण्याचा फरक पडतो का कुणाला ?? ....
त्यांचे पितळी हस्यही काय कामाचे ??  अनेक अनुत्तरित प्रश्न .... पण , जेव्हा हे प्रश्न 
त्या नाचरणींना पडतात तेव्हा ....




मूळ कथा :- कोमल प्रकाश मानकर


       पात्रे :- निलिमा , मंजिरी , धोंडो , गण्या , यामिनी ,
                दिपमाला , शिखा .


कृपया माझ्या परवानगीशिवाय ह्या  एकांकिकेचे प्रयोग करू नये . 




( पडदा उघडतो , मराठी लावणी चालू होते .  निलिमा , मंजिरी , यामिनी भीतीकडे तोंड

करून तिघी डोक्यावर दोन हाताने पदर धरून लावणीच्या तालावर उत्साहाने थिरकत असतात .

      एकदम लाईट चालू होताच . तिघीच्या डोक्यावरचा पदरही खाली पडतो आणि चेहरे

प्रेक्षकांच्या दृष्टीला लागतात .  जणू अवकाशातील तारका भूमीवर नृत्य करत असाव्यात उत्कृष्ट भिंवया , उत्तम केश , सुंदर लोचन , हृद्यमंग दंत , शोभासपन्न मुख अशा त्या तिघी महातेजस्वीता भासू लागल्या .

                

त्या प्रत्येकीच्या डोळ्यात वीज कडाडावी अशी ऊर्जा चमकत होती . मद्य प्राशन न करताही अंगात संचारलेली बेहरंगी उत्कटता . घुंगराच्या छन्न छन्न छन्ननन्  ! आवाजाच्या

गर्देत  शिट्टयाच्या आवाज चारही भिंतींना चिरत होता .

नृत्य संपत रंगमच्याच्या एका बाजूला जाऊन आपल्या पायातली घुंगर काढत त्या तिघी बोलत होत्या . त्यांचं बोलणं इतरांना ऐकू येत नाही .

दोन तेवणाऱ्या समया रंगसंगतीत सौम्य जळत होत्या . त्या तिघीच्या

नृत्याची वा वा ! करायला तिथे बाकी मंडळातील सदस्य प्रवेश करतात . )


दिपमाला :- ( हसतच ) हाहाहा !    काय काय फासलं चेहऱ्याला अप्सरा दिसण्यासाठी

निलीनं . कोणते कोणते पावडर लावून पाहिले .

( रागाने )

निलिमा :- ये दिपे चूप कर की ,  सजून धजून गेल्याबिगर कोण पाहित्यात का आपल्याकडं ?

मंजिरी :- होय ग . अगदी मनातलं बोलली बघ

सजनार सवरणार नाही तर कोणी बी इकडं नाचं बघायला येणार नाही आपला .

(ओरडत)

शिखा :- ये गण्या अरे , इकडे काय बसलास तू जा चक्कीवर दळण घेऊन ये .

यामिनी :- पीठ संपलं एवढ्या लवकर ?

शिखा :- खाणारी इथं आठ तोंड अन चार पाहिल्याचं पीठ ते किती दिवस पुरणार ? ?

(  खेकत )

गण्या :- हे बघ मला आधीच लय काम पडली आहे उद्या जाऊन घेऊन येईन .

निलिमा :- जातो आता की नाही . ( ओरडते  )

मंजिरी :- पीठाला जायचं नसेल तर चुलीत गोवऱ्या टाकून खाशीन .

( चिडून  )

गण्या :- गोवऱ्या खाशीन म्हणे तू खा की तुमच्या मंडळात रहायचा बी लय कंटाळा आला मला जातो मी हे मंडळ सोडून शहरात कामाला .

यामिनी :- ( शांतपणे ) तिचं बोलणं अंगावर नको घेऊ रे गण्या . बायको आहे न ती तुझी .

गण्या :- ह्या नाचरणींच मढ गेलं हिचा कोण विचार करतं . दहा माणसासोबत नाचणं न भरन आपलं पोटं .

मंजिरी :- बघितलं कसा चरचर  बोलतोय ते . हाय का बाईचा जातीला किंमत .

कोणतं काम येतं ग ह्याला लग्न झाले तेव्हा पासून बघिती आहे माझ्याकमाईवर जगतो तै .

( आता  गण्याचा राग अनावर झाला आणि तो मंजिरीच्या अंगावर धावून गेला .  )

गण्या :-  काय व्ह  लै माजलीस व्हय . काय म्हणत नाही त्याचा फायदा घेतेस चाल दाखवतोच तुला नवऱ्याचा तोंडाला कसं तोंड देणं रहायत तै .

( तिच्या दंडाला हात धरून तो तिला बाहेर ओढत नेऊ लागला एवढ्यात . )

निलिमा :- ( आडवी होत ) ये सोड तिला .

गण्या :- ( रागातच )  नाह्य सोडत का करशील ??

निलिमा :- ( त्याच्या तावडीतून मंजिरीला सोडवत ) ये लाव ग पोलिसांना फोन . काय

समजून ठेवलं रे तू आम्हांसनी याद राख गाठ माझ्याशी आहे . मंजिरीला काही बरं वाईट

झालं तर .

( गण्या तिथून निघून जातो . परत कधीच तो त्या मंडळात पाय ठेवत नाही . पण मंजिरी तो परत यावा म्हणून त्याच्या येण्याची आस धरून बसलेली असते . )

मंजिरी :-  गण्या आता परत कधीच इथे येणार नाह्य का ?? कुठे राहत असेल तो

कसा राहतं असेल ??  त्याला माझी आठवण नसेल येत का ? ? ....

दिपमाला :- तो नरकात गेला असं समजून जग तू आता . त्याला नाह्य ना तुझी फिकीर 

मग कशाला एवढं त्याच्यासाठी मरमर करतेस तू ?? आम्ही आहोत ना सगळे इथं तुझे .

( शिखा , निलिमा , दिपमाला नृत्याची तयारी करीत असतात . तेवढ्यात बाहेर गावी गेलेला धोंडो परत येतो . )

धोंडो :- काय बाई  शिखा तुझी ना कंबरच लचकत नाही आजकाल .( तिच्या नृत्याकडे बघत तो टाने मारू लागला . )

शिखा :- ( रागात ) का रे मेल्या आल्या आल्या तू माझ्या  कंबरेवच नजर रोखून बसला .

धोंडो :- नाह्य म्हणजी तुला नाचता नाह्य आलं तर पैसा भेटायचं नाह्य आपल्या

मंडळाला . पाखरं जातील की अशी भुरकून उडून .

यामिनी :-  ( बाहेरून येत सर्वांना  मंचकावर चालायला सांगू  लागली .) चला ग चला नाचायला .

( एवढ्यात  मंजिरीला उलट्या होऊ लागल्या .  तिच्या  जवळ निलिमा थांबली . )

निलिमा :- कसं वाटतंय आता ??

मंजिरी :-  निलू  आपण इस्पितळात जायला पाहिजे . मला खूप

रात पासून मळमळ वाटतंय .

निलिमा :- बरं मी डॉक्टरीन बाईला इकडं घेऊन येते तू थांब इथंच .

( डॉक्टरीन आल्या नंतर कळते मंजिरी तीन महिन्यांची गर्भवती आहे . गर्भ पाडणं पण

आता मंजिरीच्या जीवाला धोका ठरू शकते . )

मंजिरी :-  हे भगवंतां हे काय केलं रे माझ्यासोबत कसं वाढवू ह्या मासाच्या गोळ्याला . ( मोठ्यांने टाहो फोडत रडू लागते )

निलिमा :- ( तिला समजवत ) हे बघ मंजिरी तुझा ह्यात काही दोष नाही जे झालं ते झालं आता हे लेकराले मोठं कर तू .

मंजिरी :-  ( आक्रोश करत ) गण्याचा शोध घ्या तुम्ही . लोक काय म्हणतील समाज जगू नाहय देणार असा बिन नवऱ्याचा नारीला .

( नृत्य संपून सर्वे आत येतात तेव्हा त्यांना मंजिरीच्या आक्रोशातून बोलण्याने समजते . )

शिखा :- ( धीर देत ) मंजिरी हा आक्रोश सोड तू आता आम्ही आहोत ना इथं .

(  दोन महिने लोटतात . मंजिरीचं पोट बाहेर येऊ लागते . नवरा पण आता सोडून गेलेला अशा ही अवस्थेत तिच्या जवळ नाचण्याशिवाय कोणताच पर्याय नसते . ती मंचकावर नाचायला लागते . )

यामिनी :- मंजिरी लोक बघ कशी बघताय तुझ्याकडे अजून तर नृत्याला सुरुवात झाली तू जा ना इथून ... जा ! ( कुजबुजतच म्हणाली )

मंजिरी :- बघू देत ना काय जात कुणाचं त्यांच्या नजरेने बघतात .

यामिनी :- अगं नाचता नाही येत आहे तुला अशा अवस्थेत .

मंजिरी :- मग काय करू मी

( ती अशी बोलतच तर प्रेक्षकांतून दगड गोट्याचा तिच्यावर वर्षाव होऊ लागतो . कोणी तर ओरडून म्हणतो , बाजूला करा रे हिला इथून नाचता येत नाही न चालली नाचायला . )

निलिमा :- (  तिचा हात धरत ) चल तू इथून  .

मंजिरी :- अगं ही तीच लोक आहेत ना काल परवा मला परत एकदा होऊन जाऊदेत म्हणारी , दोन दा तीनदा नाचली तरी ह्यांच पोट न्हवतं भरत ना नाच बघून न आज .....

निलिमा :- आज तू पोटशी आहे म्हणून हा कावा ... ( तिला आत नेत )

( बघता बघता नऊ महिने होऊन गेलेत मंजिरीने एका गोडस मुलीला जन्म दिला .

ती मुलीला धोंडो जवळ ठेवत नाचायला जायची . अर्ध तीच लक्ष नाचण्यात असायचं .

मुलीला भूक लागली की ती रडायची तिचा आवाज  त्या मंचकावर चालू असलेल्या नाच

गाण्याचा आवाजात मिसळून जायचा .  घुंगराच्या तालात ती ही बैताल होत दोन

पैशासाठी नाचायची . )

दिपमाला :- तो मिशिवाला बघ तुला इशारा देत आहे जा घेऊन ये . ( हळूच कुजबुजत तिला समजेल अशा हातवाऱ्याने )

( ती मंचकावरून खाली जाते त्याच्याजवळ पैसे त्याच्या हातातले हिसकून घेताच तो तिचा हात पकडतो . )

मंजिरी :- सोडा माझा हात

तो :-  नाही सोडणार धरला हात हा आता जन्मभऱ्यासाठी .

मंजिरी :- राव साहेब सोडा म्हणते ना माझा हात . ( नाचणं बंद होतं . सर्वे तिथे उभे राहून बघत असतात . )

तो :-  हे बघ तू माझ्या सोबत नाही आलीस ना तर मी सांगते इथेच विष घेईन .

(  विष तिच्या समोर धरत )

मंजिरी :-  ( वरमते ) क्षमा करा मला . मी नाही येऊ शकत तुमच्या सोबत  .

तो :- ठीक आहे नको येऊ मी घेतो हे विष .

( मंजिरीची पोर खूप रडत होती बाहेर काय तमाशा चालला हे बघायला धोंडो मुलीला घेऊन बाहेर येतो . मुलीचं रडणं बघून मंजिरीच मन कासावीस होतं . तिची पाऊल आपसूकच मुलीकडे धाव घेतात . मुलीला कडेवर घेत तिला ती कुरवाळते तिच्या गालावर हलकेच आपले ओठ टेकवते . आणि तिला हृदयाशी घट्ट धरून )

मंजिरी :- हे बघ चालता हो इथून परत कधी इथे दिसू नको . नाचनारिण म्हणजे

काय वाटली तुला ?? तुझी प्रॉपर्टी नाही मी आता पर्यंत शांत होती तुझं ऐकून घेतलं . पण तू तुझा पुरुषी अहंकार झडकडायला तयार नाहीस ....

अरे थु असल्या पुरुषाला . एकट्या बाईला तू  काय समजला मी तुझीच होणार हा ??

( असं म्हणत ती मोठ्याने हसू लागली )

मंजिरी :- अरे जा रे मेल्या इथून

दिपमाला :- ( मंचकावरून उतरत )  विष पिणार होतांना तू हिच्यासाठी दाखवला ना तुझ्यातलाच विषारी साप . जा निघ तू इथून आम्ही सर्व आहो मंजिरीच्या सोबत तिला

एकटी स्त्री कधीच नको समजू ...

तो :- अहाहा !... माझ्या प्रेमाला खोटं समजती आहे तू .

मंजिरी :- हो का मग गिळ हे विष . वाढू दे ती ढास बघू दे किती प्रेम करतो ते येऊ देत तुझे ते हात माझ्यापर्यत ....! भिती नाही मला कशाची . आमचं नसणं अमान्य असणाऱ्या अस्तित्वाला शून्याकडे घेऊन जाणारा प्रवास दुःखी कसा करेल ?? इथे साक्षी आहेत सारे माझ्या . तुझ्या सारख्या दुष्ट पुरुषाची मी खुनी नसेल .

तो :- तुला मी दुष्ट ध्रुत वाटतो ना घे ! ( तो विष प्राशन करतो . )

ढास अतिशय वाढते तो खोकत -( मला कसकसच होतंय ग ...)

( सर्व आत जातात ... मंजिरी मात्र घुटमळते एकदा नजर आतील  खोलीकडे आणि हातात असलेल्या पोरीच्या मुखवट्याकडे टाकते . प्रकाश अंधुक होत जातो . मंजिरीच्या चेहऱ्यावरचा संभ्रम वाढतो . खोकल्याची ढास एकदम थांबते ... रात किड्याचा आवाज

किर्रकिर्र साऱ्या नाट्यगृहांतील वातावरणाला वेढून टाकते आणि पुढच्याच क्षणी .....)