Paavsachya sari aani majhi pari books and stories free download online pdf in Marathi

पावसाच्या सरी आणि माझी परी ।


Copyright ©  All rights reserved 
मिलिंद चंद्रकांत गुजर. asserts the moral right to be identified as the author of this work. This book or parts thereof may not be reproduced in any form, stored in any retrieval system, or transmitted in any form by any means - electronic, mechanical, photocopy, recording, or otherwise - without prior written permission of the author, except as provided by copyright law. The information and the opinions contained in this book are intended to be educational and not for treatment or prescription of any illness or any problem whatsoever. This is work of fiction. The author is in no way liable for any adverse effect resulting from the use of information within this poem book.


माझा कविता संग्रह अर्पण आहे। माझ्या आई- वडिलांना , भावंडांना, नातेवाईकाना, गुरूजनाना,  मित्र- मैत्रिनींना , आणि तिला जी ह्या कवितांचे कारण आहे।
वाचन प्रेमी रसिकांसाठी । कविता संग्रह घेवून आलो आहोत।
तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा
लेखक :- मिलिंद गुजर .
  

                   

         कविता संग्रह - 

 
    पावसाच्या सरी आणि माझी परी ।


"" पहिला पाऊस आणि  पहिल प्रेम ""

आज पुन्हा ती सर पावसाची,
माझ्या खिडकीपाशी रिमझिम बरसली'
मनात साठवलेली आठवण तुझी,
थेंबां-थेंबातूनी विरघळली....!!
                                       - मिलिंद गुजर


                 

                 
       !! आठवणींचा पाऊस !!

मुसळधार पाऊस रोज ईथे ही पडतो,
तो मात्र तुझ्या अठवणींचाच असतो?...
सुगंध प्रेमाचा  दरवळत असतो,
मन आठवनींत सये रमलेला असतो...
असवांचा सोबत नजराणाच असतो..

हळू हळू डोळे मिटत असतो...
स्वप्नात तुझ्या रमत असतो..
हातात तुझा हात असतो..
सत्यात मात्र दुरच असतो....
सत्यात मात्र विरहच असतो..
सत्यात मात्र आठवणींचाच पाऊस असतो....!!
                                                - मिलिंद गुजर . 

       
             !! थेंबात पावसाच्या तू असावी .... !!


थेंबात पावसाच्या तू असावी,
केसांतून ओघालूंन गालांवर यावी,
संथ वारयातहि तू असावी,
कवटाळूनी मज मिठित घ्यावी,
दुराव्यात ही प्रीत असावी,
दूर असूनही जवळीक वटावी...!!
                          - मिलिंद गुजर 

     


        !! आजही पाऊस तसाच आहे ....!!

आजही पाऊस तसाच आहे,
विरहात प्रितीच्या रडत आहे ,
थेंबा- थेंबांतुन प्रेम वाहत आहे,
आठवणींचा पाऊस पड़त आहे,
मुंबईस प्रेमात भिजवित आहे,

आज ही पाऊस तसाच आहे,
विरहात प्रितीच्या पड़त आहे ...!!
विरहात प्रितीच्या रडत आहे ...!!!

                    - मिलिंद गुजर .


विस्कटलेला  सारा खेल हा,
आता डाव पुन्हा कसा मी मांडू,
अश्रुनचे हे मोती ,किती वेळा मी सांडू !!
भावनांचा ही होतो विटू दांडू,
मेंदु चा ही होतो चेंडू,
विरहात तुज्याच होतो मी वेडू,
वेदना ह्या जीवाच्या , कोणा समोर मांडू
नात हे सजनी नको मध्यानंतरी  तोड़ू।

विस्कटलेला सारा खेल हा,
आता डाव पुन्हा कसा मी मांडू,
अश्रुनचे हे मोती ,किती वेळा मी सांडू !!


    तुजविण सखे सांग कसे जगावे ?

नयनांच्या जाळयात पुन्हा कसे अड़कावे?
आगित विरहाच्या हृदयास किती  जालावे?
आठवनींच्या वादळास सांग कसे थांबवावे ?

मैत्रित मित्रांच्या पुन्हा कसे रमावे?
विसरून सारे दुख सांग कसे हसावे?
पावसास अश्रृंच्या सांग कसे थांबवावे?
सरित दुखाच्या सांग किती भिजावे?
घाव काळजाचे सांग कसे लपवावे?

दुःख जीवनातले सांग कोणास सांगावे?
तुजविन सखे,  सांग कसे जगावे?
आठवनींना तुज्या सांग कसे रोखावे ?

तुजविन सखे सांग कसे जगावे ?


              तू पुन्हा परतावे 1

परतीच्या पाखरां सवे,
तू पुन्हा परतावे,
दुःख काळजातले उडवून न्यावे,
तुज्यात सखे गुंग राहिलो
आठवणीत तुज्याच झुरत रहिलो।

तोडून हे बंध सारे
सखी तू परत येरे
विसरून सारे रूसवे- फुगवे
सुरुवात करु पुन्हा नव्याने।

परतीच्या पावसा सवे
परतीच्या पाखरां सवे
पुन्हा तू आयुष्यात यावे ।।        तू पुन्हा परतावे 2

परतात जसे पाखरांचे थवे,

तूही तसे पुन्हा परतावे,

आठवणीच्या सागरात ऐसे किती पोहावे,
नोकेस आता मझ्या डुबवून जावे,
विरहाच्या ठिणगीत किती होरपळावे
हॄदयाच्या  अग्नीत जळून जावे।

परतीच्या पाखरां सवे ,
तू पुन्हा परतावे,
काळजातील दुख घेवून जावे।।

                                     - मिलिंद गुजर .

इतर रसदार पर्याय