Chaha khari aani ti books and stories free download online pdf in Marathi

चाहा, खारी आणि तितुला भेटवस्तू देण्या पेक्षा शब्दाना आपल्या नितळ मैत्री चा रंग चढवून,पहिल्या भेटि, आणि आपल्या मैत्रिच्या प्रवासा ची मैत्रीगाथा लिहून माझी ही छोटीशि भेट..

प्रत्येकाच्या जीवनात असते ना ति एक मैत्रीण जी प्रेम आणि मैत्री याच्या मध्यात असते,म्हणजे तीच न माझ नात हे एका प्रवाश्या सारख म्हणजे आयुष्य या नदितुन प्रवास करतं असताना किंवा आनंद घेत असताना ज्या बोट ची गरज असते ति बोट म्हणजे रश्मि जे प्रत्येक वेळी दुःखा च्या या टोकावरुन सुखाच्या त्या टोका वर असलेल्या सानिध्यात घेऊन जाते,

प्रेम या शब्दला जर खरच एखद्या गोष्टी ची गरज असेल तर ति मैत्री किंवा ति मैत्रीण तस काही म्हंयला हरकत नाही..

बिचारी वर्गमैत्रीण च जिच नाव आणि चेहरा हा आपल्या भविष्याशि निगडित असेल याची कल्पना नव्हतिच, आता म्हणजे ५-६ वर्षा नंतर इंस्टाबाबा च्या कृपेने घडत गेल्या गोष्टी,हळू हळू मैत्री च्या बंधनात अडकलो न आज तिच्या घरा शि सुद्धा नात जुळल,

समविचारी,अवडी निवडी सारख्याच,विश्वास,गोडवा,याच मिश्रण असलेला हा गोलगप्पा.आमच्या मनात कधी च एकमेकां विषयी मैत्री पलिकडल्या भावना आल्याच नाही.कारण मैत्रीला जर प्रेम नावाचा गंज चढ़ला की ते नात तूटायला वेळ लागत नाही.

माझ्या विषयी आदर ति नेहमी च बाळगते..
आणि विशेष म्हणजे माझ्या प्रेमाला लोणी लावण्यात पण ति यशस्वी झाली,रश्मि,तिला ही एका क्षणात आवडली,रश्मि आहे च अशी एका क्षणात मोहित करणारी अगदी निरागस बाळा सारखी.म्हणजे आम्ही कधी प्रत्यक्ष बोलो नाही किंवा भेटलो नाहीये पण एखाद्या चा चेहरा पुरेसा असतो त्या व्यक्तीला ओळखायला.

आणि तिचा हट्ट च होता कि तिच्या वर आमच्या मैत्री वर शब्दरचना करावी म्हणून,कारण माझे शब्द हे नहेमि तिच्या साठी असतात जिथे माझे शब्द हरवतात जिथे माझ मन आणि आत्मा अडकुन पडलेला असतो.
रश्मि च्या हट्टा पोटी जोर जबरदस्ती ने हक्का ने तिने शब्दरचना करायला सांगितली म्हणून हा आमचा प्रवास लिहतोय शेवटी आहे च की ते "हर एक फ्रेंड कमीना होता हैं'"

खुप म्हणजे खुप दिवसा पासून ठरवल च होत भेटायच तारीख तशी ठरलेली च होती ३ मे.
माझी उत्सुकता तर वाढलेली च होती कारण आमच ठरलेल च होत भेटल्या नंतर चहा आणि खारी,

बिस्किट्स, खारी आणि चहा साठी आम्ही एखद्या चे प्राण पण घेऊ एवढी आवड़..
पण आमच्या साठी किंवा आमच्या वाटेवर ची खारी आजुन बनली च नसवी म्हणून च की काय भेटनयाचा योगायोग येत च नव्हता..


आज म्हणजे २४ मे ला भेटण्याचा निर्णय झाला पण एखद्या सुखद वाटेवर मांजर आडवी जावी तशी एक काळी मांजर आडवी आली,

तिची मैत्रीण आणि माझी स्माइल या दोघीन ची भेट,स्माइल तीच नाव लिहनयाची मुभा नाहीये मला,
पण थोडक्यात सांगायचं झाल तर चिड़की,रागिट पण तिचा हसरे पणा ही तितकाच गोड़,

आज त्या भेटणार याची खंत होती पण काही झाल तरी तिखट आणि साखर यांचा मेल नाही होऊ शकत. म्हणून गुपचुप रागा ला एक हसरे वळण देऊन गप बसलो..

शेवटी २६ मे तारीख निश्चित झाली,
तिच्या आईचा ही हट्ट होता मि याव म्हणून,आणि पहिल्यांदाच नितळ मैत्री ची भावना समजून घेणारे आई वडील दिसले,कदाचित मुलीं वरचा विश्वास असावा त्यांचा म्हणून च की काय ति कधीच त्यांचा विश्वासा ला तड़ा येऊ देत नाही,


चहा,खारी आणि ति याची मैफिल जमली,
चहा चा रंग ही हुबेहुब तिच्या चेहऱ्या सारखा च होता,खारी पण मि तीच ऊचलि जी मोटी होती,
मोट्या खरच खुप गुलगुलित आहे राव..!

अगदी खारी न तिच्यात फरक च नाही..!

पहिली भेट त्या मुळे कोंडल्या सारख होत होत,
आई तशी छान च होती,न रष्म्या ख़ुप जास्त गुलगुलित च दिसत होती.

थोड़ दबुन असल्या मुळे म्हणा एक वेगळी च बंधने आपल्या वर आहेत म्हणून तोंड ज़रा शांत च होत, प्रश्न सूचत नव्हते,बोलन सूचत नव्हतं एवढा भेकड आहे मि माहित च नव्हतं मला,

काही तरी कुजबुजत गप्पा मारल्या आम्ही पण मि काय मि स्वतः काय बोलो देव जाने,

झाली पण फाइनली थोड़ी भीत भीत का होईना,भेट झाली...!

इतर रसदार पर्याय