प्रलय - ८ Shubham S Rokade द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रलय - ८

प्रलय-०८

     रक्षक राज्याची राज्यसभा आज बर्‍याच दिवसांनी भरली होती .  महाराज राजसिंहासनावरती आपल्या हातात सुवर्णपात्र घेऊन मदिरापान करत बसले होते .   प्रधानजींना कारागृहात टाकल्यापासून प्रधान पदाचा भार सेनापतीकडे सोपवण्यात आला होता . सेनापती अंबरीश बोलत होते...
" महाराज आपल्या सैन्याची जी पहिली तुकडी आपण काळ्या भिंतीपलीकडे पाठवली होती त्याबाबत एक बातमी आहे.....
" कोणती बातमी आहे अंबरीश....
    अलीकडे महाराज थोरामोठ्यांचा मान ठेवायचा विसरत होते. ते सर्रास सर्वांना एकेरी नावाने संबोधत होते .  बऱ्याच जणांची फरफट होत होती पण महाराज पुढे कोणी काही बोलत नसे .  जेव्हा सेनापती अंबरीशजींना महाराजांनी  अंबरीश असे संबोधले तेव्हा   त्यांना राग अनावर झाला  , कारण जेव्हा महाराज  जन्मलेही नव्हते तेव्हापासून सेनापती अंबरीश हे रक्षक राज्याच्या सेवेत होते . त्यांना राग येणे सहाजिकच होते, पण महाराजांपुढे त्यांनी नमते घेत . पुढे बोलायला सुरुवात केली....
"  महाराज आपल्या राज्यातील सैन्यातील ती सर्वात  धाडसी , पराक्रमी आणि कधीही न हरवली जाण्यासारखी तुकडी होती.....
" एवढी प्रस्तावना कशाला करताय अंबरीश ...? सरळ सांगा बातमी काय आहे....? उगाच आमच्या वेळेचा अपव्यय करू नका.....
" महाराज भिंतीकडे गेलेल्या आपल्या तुकडीतील फक्त पाच सैनिक शिल्लक आहेत . ते माघारी परतले आहेत .  बाकी सर्वांना शत्रूने मृत्यूच्या दारी पोचवलं आहे....
" कोण आहे हा शत्रू ....? जो आपल्या राज्याबरोबर युद्ध करण्याच्या तयारीत आहे.....
" महाराज आपले सैनिक व त्या तुकडीचा प्रमुख  अभिजीत अद्वैत जे काही सांगत होता त्यावरून हे साधंसुधं नाही . तुम्ही स्वतः ऐका ......
राज्यसभेत एका बाजूला उभा असलेल्या अद्वैतकडे सेनापतीने पाहिले . अभिजीत अद्वैत पुढे येऊन बोलू लागला....
" महाराज आम्ही काळ्या भिंतीपासून अर्ध्या कोसावर ते असू . दिवसभराच्या प्रवासानंतर सैनिक दमले होते .  आम्ही त्या ठिकाणी मुक्काम करायचं ठरवलं . सर्वांनी आपापले घोडे बांधून दिले व शेकोटी पेटवून त्या ठिकाणी बसले .  मी माझ्या काही मित्रांबरोबर फेरफटका मारण्यासाठी गेलो होतो . जेव्हा परत आलो तेव्हा मी जे दृश्य पाहिले ते फारच भयानक होतं..... महाराज आपले सर्व सैनिक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते  .  शेकोटीभोवती पंधरा माणसे बसली होती .  ती माणसे विचित्र आवाजात काहीतरी ओरडत होती व  आपल्या सैनिकांचे मांस खात होती.....।
      हे ऐकल्यानंतर महाराज विक्रम मूर्खासारखे मोठमोठ्याने हसत सुटले . त्यांच्या हसण्याच्या आवाजाने संपुर्ण  राज्यसभा भरून गेली .  बऱ्याच वेळ हसल्यानंतर त्यांनी अद्वैत व त्याचा साथीदार मित्रांना पकडून तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला....
    त्यावेळी सेनापती म्हणाले " महाराज अद्वैत हा विश्वासू तुकडी प्रमुख आहे . त्याला तुरुंगात टाकण्याचे कारण मला समजले नाही.....? 
" अंबरीश एवढी साधी गोष्ट कळत नाही का....?  अद्वैत व त्याचे साथीदार मित्र जेव्हा बाहेर गेले तेव्हा हल्ला झाला , याचा अर्थ काय होतो....? याचा अर्थ एकच होतो अंबरिष . तो म्हणजे अद्वैत व त्याचे मित्र हे शत्रूला मिळाले आहेत . त्यांनी शत्रूला त्यांचा ठावठिकाणा दिला व वेळही दिली .  जेव्हा सैनिक बेसावध होते तेव्हा त्यांनी शत्रूला आपल्या सैन्यावर आक्रमण करू दिले . व स्वतः जाऊन लपून बसले . नंतर ही बनावट कथा आपल्याला सांगत आहेत.....
" महाराज मी बनावट कथा का सांगेन ....? मी माझ्यासाठी साथीदार सैनिकांचा ,   मित्रांचा असा सौदा करू शकत नाही . ते माझ्या तुकडीतील सैनिक नव्हते ते माझे बंधू होते .  त्यांच्या जीवाशी खेळ मी कधीच करणार नाही....
    अद्वैतला तुरुंगात जातोय ,  याचं दुःख वाटत नव्हतं .  पण जो गुन्हा त्याने केला नव्हता , जो गुन्हा त्याच्या ध्यानीमनी नव्हता  , त्या गुन्ह्याचे पातक त्याच्या माथी लावले जात होते .  तो रडवेला झाला होता . त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते .  ज्या राज्याच्या प्रति तो इतका विश्वासू व प्रामाणिक राहिला त्याच राजाने त्याच्या माथी देशद्रोहाचे इतके मोठे पातक लावावे हे त्याला सहन झाले नाही.......
" महाराज असे करू नका असे केले तर आपल्या सैन्याचे मनोबल खच्ची होईल.........."सेनापती शेवटची विनवणी करत म्हणाले
     इतर मंत्र्यांनी सेनापतीच्या बोलण्याला दुजोरा दिला तेव्हा महाराज ओरडून म्हणाले
" मी या राज्याचा राजा आहे आणि मी आदेश दिला आहे या सैनिकांना आताच्या आता तुरुंगात टाका अन्यथा त्यांच्याबरोबर तुम्हालाही तुरुंगात जावे लागेल.......
सर्व गप्प झाले अद्वैत व त्याच्या साथीदारांना पकडून तुरुंगात नेण्यात आले.....
" अंबरीश अजून काही आहे का ....? आम्हाला आमच्या कक्षात जायची घाई आहे......
" महाराज विश्वकर्मा तुरुंगातून निसटला आहे......
     या वाक्यावर ती महाराज विश्व महाराज विक्रम एकदम शांत झाले . त्यांचा चेहरा क्रोधाने पूर्ण भरून गेला .  डोळे इतके मोठे झाले होते की ती बाहेर पडतील की काय असे वाटत होते .  त्यांनी त्यांच्या हातातील सुवर्णपात्र अंबरीश यांच्यावर फेकून मारले.....
" तुम्ही सेनापती आहात आणि प्रधानजीही.... काय करत आहात तुम्ही .....? आपल्या सैन्याची एक तुकडी होत्याची नव्हती झाली .  देशद्रोही विश्वकर्मा पळून गेला आणि तुम्ही आम्हाला तोंड वर करून सांगताय......? 
" महाराज काल रात्रीपासून विश्वकर्मा च्या शोधात चारी दिशांना सैनिकांच्या तुकड्या गेलेल्या आहेत.....
" झालं ,  झालं ना , एवढच होताना ....? का अजून काही बातमी द्यायची आहे......? "  महाराज विक्रम वैतागून आणि ओरडून बोलत होते
    त्यावेळी परराष्ट्र व्यवहार सांभाळणारे वृद्ध मंत्री उठून उभा राहिले. महाराजांच्या भितीमुळे ते वृद्ध मंत्री थरथरत होते . थरथरतच त्यांनी बोलायला सुरुवात केली....
" महाराज संसाधन समूहाच्या राज्यातून दूत आलेला आहे.....
पूर्वेकडे असलेली पाच राज्य ही संसाधन समुहाची राज्य म्हणून प्रसिद्ध होती .या पाच राज्यातून मिळणारी खनिज संपत्ती ही मौल्यवान होती . ती खनिज संपत्ती संपूर्ण पृथ्वीतलावर ती वापरली जात होती.....
" बोलवा त्याला पुढे , तो काय भेट घेऊन आला आहे काय आपल्यासाठी .....? महाराज म्हणाले
" नाही महाराज .....असं म्हणण्याचे त्या वृद्ध मंत्राचे धाडस झालं नाही . तो दूत एक पत्र घेऊन आला होता .  महाराजांनी बोलल्यानंतर तो पत्र वाचू लागला.....


" प्रति रक्षक राज्याचे महाराज विक्रम यांस सप्रेम नमस्कार.......

   महाराज संसाधन समूहाच्या पाच राज्यावर आक्रमण करून मातीतल्या लोकांनी  राज्ये त्यांच्या ताब्यात घेतली आहेत . पाचही राजांना बंदी बनवून कारागृहात टाकले आहे . आम्हाला मदतीची पुकार करण्यासाठी हे पत्र लिहिण्याची संधी दिली आहे . परंपरेने चालत आलेल्या आपल्या सहयोगी राज्यांना आम्ही पत्र लिहीत आहोत . इतकी वर्षे आम्ही तुम्हाला खनिजसंपत्ती पुरवत आलो आहोत , आता आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे .  ती भिंत पाडण्याची आज्ञा तुम्ही दिली आहे ,  भिंत पाडण्याच्या ऐवजी इकडे येऊन आमची राज्य आम्हाला प्राप्त करून द्यावीत . भिंत काय कोणीही पाडू शकतो .  भिंत पाडण्यात कसले आले आहे मोठे राजेपण .... तुम्ही खरेच राजा व मर्द  असाल तर संसाधन समूहातील पाचही  राज्य  त्या लोकांपासून  सोडूवून आमच्या ताब्यात द्या......

     त्या दुतांने पुढचं वाचायच्या अगोदरच महाराजांनी त्यांची तलवार घेत त्या दुताच्या जवळ जात , त्याचं मस्तक त्याच्या धडापासून वेगळे केलं .  संपूर्ण राज्यसभेत रक्ताचे शिंतोडे उडाले......

         आयुष्मान व भरत या दोघांना मिळून बाराशे पन्नास व  चैतन्य आणि कनिष्का या दोघांना मिळून बाराशे पन्नास असे चौघांना मिळून  पंचवीसशे कोसाचं अंतर पार करायचं होतं . प्रत्येक पाव कोसांवर असलेल्या खड्ड्यांमध्ये बी टाकत चौघेही  निघाले होते .  भरत व कनिष्क दक्षिणेकडे बरेच अंतर पार करून भरपूर पुढे गेले होते , कारण दक्षिणेकडे फार काही जंगले नव्हती . रस्ते होते . फक्त प्रवास करायचा होता .  मात्र उत्तरेकडे रस्ते व्यवस्थित नव्हते . बऱ्याच वेळा घोड्यावरुन उतरून पायी चालत जावं लागायचं . त्यामुळे आयुष्मान व भरत यांची चाल जरा मंद होती .  त्यांनी आतापर्यंत फक्त दीडशे कोसाचं अंतर पार केलं होतं . एवढे अंतर पार केलं पण त्यांना एकही मनुष्याची वस्ती दिसले नाही , किंवा एकही जंगली प्राणी त्यांच्या वाटेत आला नाही .  आकाशात उंचावर ती उडणारा एक गरुड मात्र त्यांना दिसला होता....

" आयुष्यमान तुला जर वाटत होतं , तर तू तिला बरोबर घेऊ शकला असता .  तसेही सभेचा प्रमुख होता तू , तू घेतलेल्या निर्णयाला कोणी विरोध केला नसता .   आपण कोणाला सांगितलंही नसतं....
     जेव्हा पासून ते तिला मागे सोडून आले होते तेव्हापासून आयुष्यमान गप्प गप्पच होता . त्यामुळे भरत आयुष्यमान ला म्हणाला....
" भरत्या मी कुणाला सांगितलं नाही , पण मला ती खूप आवडते . आतापर्यंत मी इतका फिरलो.  इतक्या स्त्रिया बघितल्या . तिच्या होऊनही कैक पटीने सुंदर , रूपवती पण माझं मन कधीच मोहित झालं नाही.....
" मग काय आता पुढचा वारसदार निवडून संसार थाटायचा विचार दिसतोय.....? 
" नाही भरत्या , अरे हा काळ फार विचित्र आहे . महाराज विक्रमने भिंत पाडण्याचे आज्ञा दिली आहे . त्याबरोबर सर्वत्र कोलाहल माजलेला आहे . भिंत पडल्यानंतर काय होईल काही सांगता येत नाही .  आणखी बऱ्याच गोष्टी आहेत . त्यामुळे याच वेळेला जर मी वारसदारांच्या सभेचा त्याग केला तर ते योग्य ठरणार नाही.....
" तेही आहेच म्हणा आणि अचानक ओरडला
" अरे तो बघ ....केवढा मोठा रेडा आहे तो..... "  भरत एका मोठ्या रेड्या कडे बोट करत म्हणाला . तो खरच खूप मोठा ,  काळा रेडा होता . साधारणपणे अडीच तीन हात लांब आणि तेवढ्याच उंच . वजनात कमीत कमी पाच ते सहा मणाचा (१मण=१६०किलो)तर नक्की असेल.....

" अरे भरत्या त्यावरती कुणीतरी बसल्यासारखं वाटतंय बघ......
    रेडा संथ गतीने चालला होता त्या . रेड्या वरती टाकलेल्या कापडाच्या झोळीत एक लहान मुल , व रेड्यावरती एक माणूस बेशुद्ध पडल्यासारखा वाटत होता .  दोघांनी आपल्या घोड्याची गती वाढवली .  रेड्याच्या बाजूला गेले  . त्यांनी त्याला थांबवलं . वरती बसलेल्या माणसाला त्यांनी खाली उतरवले . ते त्या झोळीतील मुलाला उतरून काढणार होते पण जंगलातून सिंहाची गर्जना ऐकू आली .गर्जना ऐकल्यानंतर तो रेडा जरा  हालचाल करू लागला . भरताने त्याची येसन (येसन म्हणजे रेड्याच्या नाकातून आरपार काढलेले दावे ) धरत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला , पण आता सिंहाची गर्जना फार जवळून येत होती.  तो रेडा भारताच्या हातून सुटून पळाला.  तो रेडा वेड्यावाकड्या उड्या मारत फिरत होता . त्याच्यावरच असलेली झोळीही हलत होती . ती झोळी कोणत्याही क्षणी खाली पडू शकत होती व त्यातील मुलाला  मार बसून ते मुल दगावण्याची होण्याची शक्यता होती . इकडे सिंह गर्जना करत आयुष्यमान च्या अंगावर धावून येत होता . " भरत्या तु जा आणि त्या झोळीतील मुलाला कसेही करून वाचवा , मी या माणसाकडे बघतो ...........
       त्याच वेळी रेड्याने उंच उडी मारली ,  त्याच्यावर असलेली झोळी उंच उडाली आणि खाली दगडावर आपटणारच होती तेव्हाच इकडे  सिंहाने आयुष्यमान वरती धाव घेतली........
       पुन्हा एकदा तो सिंह आणि रेडा जागीच स्तब्ध झाले . उंच उडालेली झोळी गरुडाने त्याच्या चोचीत पकडून व्यवस्थितपणे खाली ठेवली .........

         जलधि राज्याच्या युद्ध कक्षात भरलेल्या तात्काळ बैठकीचा निर्णय झाला होता . बाटी जमातीच्या लोकांना जलधी राज्यात आश्रय दिला जाणार होता . त्या लोकांनी   सैनिकांना फक्त त्या विशिष्ट प्रकारच्या बासर्‍या कशा बनवायच्या व ती धून कशी वाजवायची हे शिकवायचे होते . त्याचबरोबर कसेही करून महाराज विक्रमांना ती भिंत पाडण्यापासून थांबवायचे असाही निर्णय झाला होता . बैठक संपल्याची घोषणा झाली होती पण  हेर पथकाचा प्रमुख कौशिक म्हणाला.....
" महाराज अजून एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणुन देऊ इच्छितो , ती म्हणजे काल आपल्या संशोधन शाळेत झालेला हल्ला मारुत राजाच्या आज्ञेवरून झाला होता .....
     मारूत राजाचे नाव ऐकल्यानंतर कैरव महाराजांच्या कपाळावर आठ्या पडल्या ....
"  इतक्या वर्षात मारूत राजांची खबरबात नव्हती अचानक हे कसे उद्भवले .......
" ज्या  व्यक्तीने हल्ला केला होता , तो मनुष्य अजूनही फरार आहे . त्याला शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत . तू सापडल्यानंतर आपल्याला याबाबत अजून माहिती कळू शकेल . पण आता अशाप्रकारचे हल्ले होणार नाहीत असं  आपण म्हणू शकत नाही , आपल्याला आपली सुरक्षा वाढवावी लागेल..........

" व्यतयाबद्दल क्षमस्व ,  पण रक्षक राज्याचे प्रधान विश्वकर्मा , राजकुमारी अन्वी आणि राजकुमार देवव्रत जलधि राज्याच्या सीमेत आलेले आहेत..... पुढच्या काही तासाच ते राजमहली असतील.....
कौशिका चा विश्वासू हेर भार्गव आत येत  बोलला....।.