प्रलय - ११ Shubham S Rokade द्वारा साहसी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रलय - ११

 प्रलय-११


       कितीतरी शतके अगोदर , काळी भिंत सुद्धा बांधण्याच्या अगोदर , संपूर्ण पृथ्वीवरती फक्त एकच राजा राज्य करत होता . संपूर्ण पृथ्वी त्याच्या अधिपत्याखाली सुखाने नांदत होती .  पृथ्वीवरचा तो पहिला राजा होता ज्या राजानं देवाच्या आशीर्वादाने संपूर्ण पृथ्वीवरती आपले आधिपत्य आणून सगळीकडे सुख शांती व समृद्धी पसरवली होती.... 

       असं म्हणतात राजा साक्षात ईश्वर होता आणि राणी साक्षात देवी .  त्या राणीकडून राजाला तिळं झालं . एकाच वेळी  तीन राजपुत्र राजमहालात रांगू लागले . 
एकाचं नाव होतं कैरव , दुसऱ्याचं सोचिकेशा आणि तिसऱ्याच मारुत .तिन्ही राजपुत्र एकत्र शिकू लागले .  सर्व काही समजून घेऊ लागले ,  युद्ध कलेपासून नीतिशास्त्र पर्यंत सर्व काही त्यांना शिकवले जात होतं . तिन्ही राजपुत्र एकमेकांना वरचढ होते..... अशी वेळ आली की  तिन्ही राजपुत्रांनी पृथ्वीतलावरच्या असलेल्या सर्व प्रकारच्या युद्धकला निपुण केल्या .  नीतिशास्त्राचे धडे त्यांना मुखोद्गत झाले .  आता वेळ होती त्यांच्या विवाहाची त्यांच्यासाठी सर्वत्र राण्यांचा शोध सुरू झाला ज्याला त्याला योग्य ती राणी सापडली व तिघांचाही एकाच वेळी मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला . असं म्हणतात ज्यावेळी  तीन राजांचा विवाह सोहळा होता ,  त्यावेळी संपूर्ण पृथ्वीतलास पुरेल इतकं इतकं अन्न त्याठिकाणी बनलं होतं....

        पण जेव्हा राजा वृद्ध होऊ लागला त्यावेळी वारसदार निवडायची वेळ आली .  तेव्हा इतक्या दिवस गुण्यागोविंदाने राहणाऱ्या या तीन राजपुतांमध्ये वादावादी होते की काय असे साऱ्यांना वाटत होतं . पण त्या वृद्ध राजाने आपल्या राज्याचे तीन विभाग करून तीन राजपुत्रांना त्यांचे त्यांचे राज्य सोपवले व उत्तरे च्या जंगलात निघून गेला.......

तेव्हापासून या पृथ्वीला त्रिखंडी पृथ्वी असं म्हणायचा प्रघात पडला . एका खंडावर मारुत राज्यांचं मारुती हे राज्य दुसऱ्या खंडावर ती सोचिकेशा राजांचं अग्नेय हे राज्य आणि तिसरं कैरवांच जलधि हे राज्य......

   पुढची कैक शतके या तीन राजांच्या पिढ्यान् पिढ्याया संपूर्ण पृथ्वीतलावर , त्रिखंडी पृथ्वीवरती राज्य करत होत्या. मात्र जशा पिढ्या पुढे सरकत होत्या तसे राजे अधिक अधिक विलासि बनत गेले . ते नेहमी राजमहालात असायचे , बाहेर निघाले तर फक्त शिकारीला किंवा पर्यटनासाठी निघायचे . त्यांना प्रजेची मुळीच चिंता नसायची . आपल्या  ऐषो-आरामासाठी प्रजेची पिळवणूक करायलाही मागे-पुढे बघायचे नाहीत .  त्यामुळे राज्यातील प्रजा या राजांच्या विरोधात उभी राहू लागली .  याला अपवाद होता तो म्हणजे जलधि राज्याचे कैरव राजे ,  त्यांनी कधीच प्रजेला उघडे पडू दिले नाही .  दुष्काळ असो वा सुकाळ असो ,  वर्षा होवो अथवा न होवो त्यांनी नेहमी प्रजेची काळजी घेतली . त्यामुळे जलधि राज्याने सुख-समृद्धी च्या सर्व रेखा पार केल्या .  उलट मारुत व अग्नेय राज्यांमध्ये गरिबी , भुक , बेरोजगारी ,  यासारख्या अनेक समस्या उभ्या राहिल्या होत्या .  जनता संतापली होती . त्यामुळे वेळोवेळी जनतेतून उठाव होऊ लागले . 

   नेहमी चालणाऱ्या अशा उठावातून मारुत व अग्नेय राज्यातून फुटून , छोटी-छोटी राज्य बनू लागली  . मारूत व अग्नेय राज्यांचे विघटन झाले व त्यातून अनेक राज्य बनली पण जेव्हा विघटन झाले त्याच वेळी मारुत व अग्नेय या वंशांचाही निर्वंश झाला  . क्रांतिकारी गटांनी सर्व राजवंशी लोकांना शोधून शोधून मारले .  तेच क्रांतिकारी गट नवीन राजे झाले व पुढे त्यांच्याच पिढ्यानपिढ्या त्या राजसत्ता उपभोगू लागल्या.....

       पण या साऱ्यातून मारुत राजाचे काही वंशज जिवंत होते .  त्यांनी पृथ्वीतलावर असलेल्या एका गुप्त ठिकाणी आसरा घेतला होता . कित्येक पिढ्या ते त्याच ठिकाणी लपून होते . त्यांनी जगाला आपल्या अस्तित्वाची चाहूल लागू दिली नव्हती . मात्र त्यांना जगाच्या अस्तित्वाची चाहूल होती .  त्यांच्या मनात संपूर्ण जगाची सत्ता घ्यायची महत्त्वाकांक्षा होती . अजूनही ते सत्तेसाठी सत्ताकारण करायला विसरले नव्हते . नवीन जन्मलेल्या मारुताला सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवल्या जात होत्या . सर्व प्रकारची शस्त्रांची शिकवणी त्याला दिली जात  होती . मुलगा असो वा मुलगी प्रत्येक जण युद्धकलेत निपुण होता .  

     मारूत परिवारांचा एक छोटंसं गाव वसलेलं होतं .  त्या गावाचा सर्व कारभार अकरावा मारुत राजा पाहत होता . सध्या तो अंथरुणाला खिळून होता . पुढचा वारस निवडून त्याच्याकडे सर्व सूत्रे  द्यायची ती वेळ होती . राजाच्या शेजारी त्याचे सर्व पुत्र बसले होते . आजूबाजूला प्रमुख लोक उभे होते . एका बाजूला पत्नी व मुलगी आरूषी  उभी होती. लहान आवाजात थांबत थांबत राजा बोलत होता....
" हीच ती वेळ आहे . मूर्ख विक्रमाने भिंत पाडण्याची आज्ञा दिली आहे .  मातीतल्या लोकांनी संसाधन राज्ये ताब्यात घेतली आहेत . भिंत पडल्यानंतर सर्वत्र हाहाकार माजेल . हीच ती वेळ आहे . पुन्हा पृथ्वीवरती मारूतांची सत्ता प्रस्थापित करण्याची . आपल्या पूर्वजांचा प्रतिशोध घेण्याची  .  " 
आरुषीला जवळ बोलून तिचा हात हातात घेत राजा म्हणाला
" आरुषी तू आता सर्व मारूतांचे नेतृत्व करशील .  आपल्या पूर्वजांचा प्रतिशोध घेशील . आपल्या पूर्वजांना ज्यांनी मारले , आपल्या राजस्त्रियांचा ज्यांनी बलात्कार केला ,  आपल्या लहान मुलांच्या ज्यांनी कत्तली केल्या त्या सर्वांच्या वंशजांना   नरकयातना देऊन मृत्यू दारी पोहोचवायचं आहे तुला...... त्या सर्वांच्या पिढ्यांचा निर्वंश तुला करायचा आहे .   आणि आपले बंधू राजे कैरव यांनाही सोडू नकोस . ज्यावेळी आपला निर्वंश होत  होता त्यावेळी षंढासारखे हे गप्प बसले . त्यांचाही प्रतिशोध घ्यायचा आहे तुला...... त्या सार्‍या लोकांना  नरकयातना द्यायच्या , जे लोक एकेकाळी मारुताच्या निर्वंशसाठी  , अपमानासाठी कारणीभूत ठरले.......

   आणि आरुषीच्या हातात हात असताना अकराव्या मारुत महाराज यांनी प्राण सोडले आता आरुषी ही बारावी मारुत महाराणी होती. तिच्या नजरेतून जणू ज्वाला निघत होत्या . प्रतिशोध हेच तिच्या जन्माचं उद्दिष्ट होतं आणि आता ती मारूतांची महाराणी झाली होती........

           महाराज विक्रम त्यांच्या फौजफाट्यासह काळा विहिरीपाशी पोहोचले . काळी विहीर कित्येक शतके त्या ठिकाणी होती . असं म्हणतात जर खरा सैनिक मृत्यू दारी असेल व त्यांनं जर का विहिरीचे पाणी प्यायला तर तो मरणाच्या दारातून सुद्धा परत येऊ शकतो . अशा काळ्या विहिरीपाशी दहा हजारांचा फौजफाटा घेऊन महाराज विक्रम उभे होते .  सर्व सैनिकांच्या पुढं एकच उद्दिष्ट होतं .  ते म्हणजे तिथून काही कोसावर ते असलेली काळी भिंत पाडायची . काळी भिंत पडल्यानंतर पलीकडे जाऊन  देशद्रोह यांच्या अड्ड्यावर छापा मारून देशद्रोह्यांना कंठस्नान घालायचं....... 

     महाराज विक्रम सैनिकांसमोर उभे होते . सैनिका समोर उभा राहून ते भाषण करत होते . त्यांचा आवाज वाढवण्यासाठी त्यांनी समोर ध्वनिवर्धक धरला होता. दहा हजारांच्या सैन्यासमोर महाराज विक्रम जोश पूर्वक मोठ्या आवाजात बोलत होते.....

"  माझे सख्खे काका व राज्याचे प्रधान हे आपल्या राज्याच्या विरोधात जाऊन देशद्रोह यांच्या टोळीला सामील झाले .  राजा बनण्याची त्यांची वासना इतकी मोठी होती की  ;  ते राज्याशी , राज्यातील जनतेची ही द्रोह करून बसले .  भिंतीपलीकडे असलेल्या देशद्रोह्यांची टोळीला त्यांनी शस्त्र साठा पुरवला .  वेळोवेळी त्यांना ते सर्व प्रकारच्या सोयीसुविधा सुविधा पुरवत आले .     पलीकडे असलेली देशद्रोह्यांची टोळी वेळोवेळी आपल्या राज्यात येते .  आपल्या राज्याला लुटते ,  आपल्या राज्यातील स्त्रियांचा बलात्कार करते , लहान मुलांना पळवून नेते .  या सर्व गोष्टी साठी कारणीभूत आहे ती म्हणजे काळी भिंत . त्याआख्यायिका जाणून-बुजून पसरवले गेल्या आहेत . कारण तिकडे सर्व राज्यांना त्रास देणारी देशद्रोह्यांची टोळी असते . बरीच राज्य त्या देशद्रोह यांच्या टोळी मुळे त्रस्त आहेत पण त्या देशद्रोह यांच्या टोळीला सर्व राज्यातील काही लोक सहाय्य करतात कारण त्यांना त्यांची राजकीय पोळी भाजून घ्यायची असते . आत्ताच ती वेळ आहे आपल्या देशासाठी लढण्याची आत्ताच वेळ आहे आपल्या देशातील स्त्रियांच्या सन्मानासाठी लढण्याची , आत्ताच वेळ आहे स्वतःच्या संरक्षणासाठी आक्रमण  करण्याची..... रक्षक राज्यांनी नेहमी रक्षण केलेला आहे .  पण आता रक्षक राजे आक्रमण करतील आणि ज्यावेळी रक्षक आक्रमण करतात त्यावेळी साक्षात मृत्यू ही घाबरतो......
तुम्ही सर्वजण तयार आहात ना मृत्यूला घाबरवायला..... रक्षण करणं आता बास झालं आता वेळ आहे आक्रमण करण्याची..... काळ्या भिंतीकडे .....
असं म्हणून महाराजांनी घोषणा दिली .  त्यांच्या पाठोपाठ सर्वजन ओरडले " काळ्या भिंतीकडे ....
 महाराज विक्रमांच्या जयघोषात सर्व सैनिक भिंतीकडे रवाना झाले....... 

       आयुष्यमान भारत व मोहिनी या तिघांच्या समोर त्या मनुष्याने प्राण सोडला .  जाता जाता तो एकच वाक्य बोलू शकला होता 
" उत्तरेला न्या , माझ्या मुलीला . उत्तरेला न्या , माझ्या मुलीला.....।

    ती छोटीशी लहान मुलगी होती .  जिला त्यांनी त्या रेड्याच्या झोळीतून काढलं होतं .  तिचे डोळे काळे कुट्ट होते . डोळ्याभोवती असलेल्या काळ्या व्रणामुळे ती फार विचित्र दिसत होती . ती मोहिनीच्या हातात होती .  आयुष्यमान म्हणाला 
  " मोहिनी तू या मुलीना घेऊन माघारी जा ...आम्हाला लवकरात लवकर उत्तर कडे जात सर्व बिया टाकल्या पाहिजेत . कोणत्याही क्षणी महाराज विक्रम ती भिंत पाडू शकतात . त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला आमचं काम केलं पाहिजे....
" आयुष्यमान मी तुझ्याबरोबर येण्यासाठी इतक्या दूर आले आणि तू मला माघारी पाठव . या मुलीचा वडीलही म्हणत होता मुलीला उत्तरेकडे घेवून जा , मी या मुलीला घेऊन तुमच्याबरोबर येणार आहे....
आयुष्यमान ला मोहिनीला नकार देण्याचं जीवावर आलं  . 
" पण तुझा हा घोडा फार अंतर चालू शकणार नाही .  माझ्या मते या घोड्यावर फार तर तू अजून काही कोस येऊ शकते . त्यामुळे मी तुला सांगू इच्छितो की या घोड्याबरोबर आमच्याबरोबर येणार असशील तर तू घरी माघारी गेलेलं बरं होईल , कारण काही अंतर गेल्यानंतर हा घोडा दमून जागेला बसल्याशिवाय राहणार नाही....

" असं म्हणतोस........
         असं म्हणत मोहिनीने डोळे झाकले काही क्षणात तिच्या मागे असलेला तिचा जुना घोडा चौखूर उधळत निघून गेला व जंगलातून एक विचित्र प्राणी बाहेर येताना दिसला . तू घोडाच होता पण त्याला घोड्यासारखे तोंड नव्हतं ते तोंड मानवा सारखं होतं.....

" हा माझा जुना मित्र अश्वराज पवन.......
तू स्वराज भवन लांब उड्या मारत त्यांच्यापाशी पोहोचला होता . 
    "  वारसदारांचा सभा प्रमुख आयुष्यमान याला माझा नमस्कार......
तो अश्व प्रमुख पवन म्हणाला . 
     आयुष्यमान आश्चर्यचकित झाला . त्यावेळी मोहिनी म्हणाली

"  अश्वराज पवन हा त्यांच्या प्रजातीचा उरलेला शेवटचा अश्व आहे .  ज्यावेळी भिंती पलीकडील सम्राटाने काळी भिंत बांधण्याचा अगोदर पृथ्वीतलावरती आक्रमण केलं होतं ,त्यावेळी अश्वराजांची संपूर्ण प्रजात नष्ट झाली होती .  पण हा तेव्हा लहान होता . त्या वेळेपासून तो या जंगलात लपून छपून राहत आहे . मी लहान असताना एकदा जंगलात गेल्यानंतर मला याची जाणीव झाली होती आणि त्यानेही माझ्यातले गुण ओळखले .  तेव्हापासून तो माझा मित्र आहे . अश्वराजांचे जीवन फार दीर्घकालीन असते .  आत्ता कुठे त्याने तारुण्यात पदार्पण केले आहे.....।

अश्वराजावरती स्वार होऊन त्या मुलीला घेउन मोहिनीही  आयुष्यमान व भरताबरोबर  उत्तरेकडे निघाली .  त्यांना आता बडबड करायला हवी होती , कारण काळी भिंत बांधण्यासाठी महाराज विक्रम सर्व सैन्य घेऊन निघाले होते....

    जलधि राज्याचे वीस हजाराची सैना रक्षक राज्याकडे निघाली होती . सैन्याच्या पहिल्या रांगेत महाराज स्वतः त्यांच्याबरोबर युवराज देवव्रत , महाराज विश्वकर्मा व राजकुमारी अन्वी ,   हेर प्रमुख कौशिक आणि जलधि राज्यातील इतर मंत्रीगण होते . 20000 घोडेस्वारांची सैना रक्षक राज्यशरती चालून निघाली होती .  त्यांचे उद्दिष्ट फक्त एकच होतं ,  ते म्हणजे महाराज विक्रमांना त्यांच्या महाराज पदावरून पदच्युत करून विश्वकर्मां रक्षक राज्याचा महाराज बनवायचं . त्यासाठी युद्ध करायला लागलं तरीही ते तयार होते . कारण काळी भिंत पाण्याची जी आज्ञा महाराज विक्रमांनी दिली होती ती युद्धापेक्षा भयंकर होती.....

     त्यांनी जलधि राज्याची सीमा त्यांनी कधीच ओलांडली होती . काळ्या भिंतीच्या समांतर ते निघाले होते . त्यांना महाराज विक्रमांची सैना काळ्या भिंतीपर्यंत जाण्याच्या अगोदर अडवायची होती . 

 सर्वत्र फक्त घोड्यांच्या टापा व वाऱ्याच्या वाहण्याचा आवाज पुरून उरला होता . मात्र अचानक भिंती पलीकडून उंच उंच आवाजात चित्र-विचित्र घोषणा ऐकू येऊ लागल्या . त्या घोषणांचा आवाज इतका मोठा होता की घोडेही घाबरून खिंकाळू......

" ही तर त्रिशूळांच्या सैन्याची घोषणा आहे .....
महाराज कैरव म्हणाले.......

" काय ....... त्रिशूळांच्या सैन्याची घोषणा ........? 
त्रिशूळांचे सैन्य ही एक काल्पनिक कथा आहे ना ......? "  युवराज देवव्रत महाराज कैरवांना  म्हणाले...

"  बऱ्याच गोष्टींचे अस्तित्व आपल्याला जाणवत नाही जोपर्यंत त्या गोष्टी आपल्या समोर येऊन उभा टाकत नाहीत ती स्त्री शिवरायांचे नाही जरी कल्पना असली मात्र आता ते आपल्यासमोर उभा आहे आणि आतापर्यंत जो दुसऱ्यांच्या सैन्यासमोर टाकले आहे त्याचा त्याचा नायनाट झाल्याशिवाय राहिला नाही......
महाराज कैरवांच्या चेहऱ्यावर जन्मजात भीती दिसत होती . महाराज कैरव घाबरल्याचे आतापर्यंत त्यांच्या कोणत्याच मंत्र्याने कधीच पाहिलं नव्हतं .....

" महाराज विश्वकर्मा तुम्ही सैनिकांची एक तुकडी घेऊन जा व कसेही करून महाराज विक्रमांना भिंत पडण्यापासून थांबवा .  आम्ही या त्रिशळांच्या सैन्याबरोबर काही काळ काढतो......

महाराज विश्वकर्मा काही  घोडस्वार स्वार घेऊन निघाले ......