Prerna - aaji aajoba books and stories free download online pdf in Marathi

प्रेरणा - आजी आजोबा

आजी आजोबांचे जीवन म्हणजे एक आगळे वेगळे जीवन असते.जीवना मध्ये
संसार करत असतांना अनेक सुख दुःखाचे
प्रसंग अनुभवलेअसतात.मुलगा,सून,नातवंड असतात,तस पाहिलं तर आनंदी जीवन.पण
मनामध्ये कुठे तरी हूर हूर वाटत असते.
असाच एक दिवस,साधारण पणे
रात्रीचे नऊ वाजले असतील,नुकतेच जेवण
झाले होते.आजी पलंगावर बसल्या होत्या,
पण कसला तरी विचार करीत होत्या,तेवढ्यात आजोबा आले,व म्हणाले,अहो!सौ.कसला एवढा विचार करताय,आजी एकदम भानावर आल्या व म्हणाल्या, शेजारच्या सरस्वती बाई भेटल्याहोत्या,त्या म्हणत होत्या,नुकतच चारी धाम यात्रा करून आलो,रामेश्वरला पण जाऊनआलो.आपलं पहाना! आयुष्य गेलं,तुम्ही रिटायर होऊन पाच वर्षे झाली,तरी ना अजून, काशी,ना चारिधाम. एकदा तरी जावं अशी फार इच्छा आहे.परमेश्वराची इच्छा.
-२-
आजोबांनी,आवंढा गिळला,गहिवरून
आलं, तुला तर कल्पना आहेच,आपण छोटयाशा खोलीत,एकत्र राहत होतो.पण
खर्च आपण करत होतो.बाकी कधी पैसे
घरात देत होते कधी नाही, आजोबा बोलू
लागले,तू जाउबाईंचं दुखणं भाण केलस,
दिरांचे कपडे धुवून,इस्त्री सुद्धा केलीस,
पण कुणी तुझी कदर केली नाही.
सोसायटीमधून कर्ज काढून पुतणीचे
लग्न करून दिले.आणि निवृत्त होई
पर्यंत कर्जाचे हप्ते फेडत होतो.मध्यंतरी
मुलीचे लग्नाकरिता प्रॉव्हिडंटफंडातून
लोन काढलं,आणि संगळ्यांचे शिक्षण
त्यामुळे पैसे शिल्लक पडले नाहीत,
मनात असून सुद्धा कुठे जाता आले नाही
तू समंजस असल्यामूळे संसाराचा गाडा
व्यवस्थित चालला.
आजीने लगेच उत्तर दिले,अहो!
हे काय बोलता संसाराचा गाडा व्यवस्थित चालण्यासाठी दोघांची मन एक असावी लागतात,तेव्हा तुमचाही मोठा वाटा आहे.पाहू जेव्हा केव्हायोग येईल तेंव्हा काशी विश्वेश्वराला जाऊ."चित्ती असो द्यावे समाधान".
-३-
आजोबा पत्नीला म्हणाले,आपण
आता पर्यंत समाधानच मनात आलो,पण
या समाधानात आनंद नाही.
आता हेच पहाना! निवृत्त होण्याचे अगोदर, सहा महिने कागद पत्रखात्याकडे पाठवावे लागतात,तेव्हा कुठेनिवृत्ती वेतन मिळते.पण तुला सांगतो,माहिती भरतांना त्यामध्ये असा एक रकानाआहे की,तुमचा निवृत्ती नंतरचा पत्ता लिहा.
हे सांगत असताना आजोबाचे डोळे पाण्याने
भरून आले.अहो! डोळ्यातपाणी, आजोबांनी अश्रू पुसले आणि म्हणाले,निवृत्ती नंतरचा पत्ता लिहिण्यासाठी स्वतः चे घर नाही,कोणता पत्ता द्यायचा.
हा विचार मनात आला, आता तूच सांग
मला काय वाटलं असेल,गहिवरून आजोबा
म्हणाले,आणि त्याच क्षणी आजीच्या डोळ्यातून अश्रू आले.क्षण भर शांतता
दोघेही काही बोलले नाहीत.
आजीने लगेच विषय बदलला,आणि म्हणाल्या, आठवते का तुम्हाला,एक दिवस
आपला मुलगा गजानन आला व म्हणाला
की आपण पुण्याला राहायला जाऊ,तेथे
घर भाड्याने घेऊन राहू. आजोबा पत्नीस
म्हणाले माझी समजूत काढतेस का?
आजोबा म्हणाले निवृत्ती नंतर
पुण्याला,हडपसर येथे भाड्याने घर घेतले.
आपल्या जबाबदाऱ्या संपल्या नव्हत्या,
मुलीचं व मुलांचं लग्न व्हायचं होत.त्या
करिता रु.५०० ,पेन्शन विकली होती
त्याचे काही पैसे व काही प्रॉव्हिडंट फंड,मिळून
पैसे ठेवले होते.जवळच तिथे एक घर 1,BHK ते बुक केलं.गजानन मुलगा यांच्या नावावर कर्ज काढलं व काही रक्कमरोख भरली.
आजी आनंदाने म्हणाली,मला आठवतो तो दिवस,खरोखरच आयुष्यातीलआनंदाचा क्षण स्वतःच घर,कल्पना सुद्धाकेली नव्हती,हे म्हणत म्हणत असतानाआजीचा कंठ दाटून आला.तोंडातूनउद्गार निघाले,"परमेश्वराची कृपा"
-४-
आजी बोलतच होत्या, गजानन चे लग्न झाले,सीमा चे लग्न झाले खूप समाधान वाटलं
नातू घरात रांगू लागला.सुनीता सुस्वभावी सून
घरात आली.,एक दिवस माझ्या हाताचे हाडाला
दुखापत झाली.त्या वेळेस सून बाईनी किती
काळजी घेतली,नोकरी करून तिला हे सगळं
करावं लागतं असे.आजी थोडावेळ थांबल्या
आणि म्हणाल्या, अहो! काय सांगू तुम्हाला,
आपला नातू,स्वामी, ज्या वेळेस मला म्हणतो
आजी,तू कशी आहेस,काळजी घे.त्याचे हे शब्द
ऐकल्यावर,माझं उर आनंदानं भरून येत.हे
सगळं सांगत असताना आजीचा कंठ दाटून आला.
--५--
आणि तो आनंदाचा क्षण आला.'आजी म्हणाली',आठवत का! एकदिवस संध्याकाळच्या वेळी,आपण बसलो असतांना मुलगा व सून आले
आणि म्हणाले,"आपण सगळ्यांनी काशीविश्वेश्वराच्या दर्शनाला जायचं,तेही विमानाने.आजोबा आणि आजी एकदम उदगारले काय!,विमानाने! ,आता पर्यंतच्या
आयुष्यात विमान हा शब्द नुसता ऐकला होता
आता प्रत्यक्ष विमानात बसण्याचा योग. दोघानाही खूप आनंद झाला.आणि तो दिवस
उजाडला आजी,आजोबा,नातू,सून व मुलगा
सगळे काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला आले.
आजी व आजोबाच्या आनंदाला पारावार नव्हता
ते दोघेही म्हणाले ,"विश्वेश्वरा आज आम्ही धन्य झालो.तुझी लीला अगाध आहे, तू आमचं
ऐकलस."
अनायसास त्यामुळे, मथुरा,वृंदावन,आग्रा, त्रिवेणी संगम पाहण्याचा योग आला,'कधी कधी
अनपेक्षित असे योग येऊ शकतात,की ज्याचा
आपण कधीही चुकून सुद्धा विचार केलेला नसतो' ,आजोबा सहज बोलून गेले.अनेक
वर्षांपासूनची इच्छा परमेश्वराने पूर्ण केली,आजी बोलली.
--६--
आम्ही दिल्ली येथील लॉज वर उतरलो
होतो, सगळे गप्पा मारीत होतो,आजी व आजोबांचा आनंद द्विगुणित झाला होता,आजोबा बोलत होते,काशीविश्वेश्वराचे दर्शन म्हणजे महदभाग्य, आता पर्यंत टी व्ही वर लाल किल्ला पाहिला होता तो प्रत्यक्ष पहिला,जगातले आश्चर्य ताज महाल पहिला,आणि विमानाचा प्रवास
ज्याची कधी कल्पनाही केली नव्हती.परतीचा प्रवास सुरु झाला.घरी आलो.
--७-
एक दिवस शेजारच्या वंदनाताई आल्या
व म्हणाल्या, अहो आजी! सुहृद संस्थे तर्फे
एक परिसंवाद आयोजीत केला आहे विषय आहे
"आजी आजोबा आणि सुखी जीवन" तुम्ही बोला
काही तरी. आजी परिसंवादाला हजार राहिल्या
काही महिलांनी आपले विचार मांडले.आता आजीची वेळ आली.
आजी बोलायला उभ्या राहिल्या,
क्षणभर थांबल्या आणि बोलायला सुरुवात केली," आजी आजोबा आणि सुखी जीवन" हा विषय ठेवला फार चांगलं झालं.
आजीचा आवाज खणखणीत होता,मुळात सुखी
नसण्याचं कारण शोधून काढा,प्रत्येकाची कारणे
वेगळी असू शकतात.या कार्यक्रमाला बरेच आजी आजोबा हजर आहेत,मी सुखी नसण्याचं कारण सांगण्याचा खोलात जाणार नाही.पण सुखी होण्याचा मंत्र जरूर सांगेन.
प्रथम स्वतः ला बदला,तुम्ही आयुष्यभर
संसार तुमच्या मना प्रमाणे केला.आता सुनांना,
मुलांना त्यांच्या मना प्रमाणे,त्यांच्या पद्धतीने
संसार करू द्या,आम्ही काटकसरीने संसार केला,
महागड्या वस्तू कधी अणल्या नाहीत,आम्ही पाटावर बसून जेवत होतो,आता खुर्चीवर बसून
जेवतात हे विचार सोडून द्या,थोडक्यात काय तर,स्वतः ला बदला, कालानुरूप विचार बदला,घरातील माणस, सून,मुलगा,नातू,नात हे तुमचेच आहेत त्यांच्यावर प्रेम करा.ते चुकले तर रागवा तो तुमचा अधिकार
आहे पण शब्द नीट वापरा."सत्यं ब्रूयात प्रेमं ब्रूयात" सत्य सुद्धा प्रेमळ भाषेत सांगा.
सगळे तुमच्यावर प्रेम करतील आणि तुम्हीच
म्हणाल आमच्या सारखे 'सुखी आजोबा" आम्हीच.
हा माझा संदेश तुम्ही पाळा व इतरांनाही
सांगा. "टाळ्यांचा कडकडाट झाला आणि आजीच भाषण संपलं.



इतर रसदार पर्याय