मरण Vinayak Mandrawadker द्वारा मानवी विज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मरण

मरणः
तीन अक्षरांचा शब्द 'मरण' ऐकून खूप लोक घाबरतात, का? विचार करायचा का? हो म्हंटलं तरच पुढे जाऊ शकतो. तुम्ही नाही म्हंटलं तरीही मी हो समजून पुढे जाणार आहे, कारण ५०० शब्दांचा लेख मला पूर्ण करायचा आहे.
बालपणी कोणी मेले तर आम्हाला तिकडे पाठवीत नव्हते, जवळचे नातेवाईक गेले तरी. मला वाटते,१० वर्षांपासून थोडा फार मुलांना कळायला लागते की मेला किंवा मरण यांच्या अर्थ, तरीही भीतीने जास्त खोलात जात नाही. मोठे वयाच्या माणूस सुध्दा समजून सांगत नाही. मेलेल्या माणूस परत येत नाही येवढे मात्र सर्वांना माहिती असते. आणि हे शंभर टक्के खरे आहे.
आता आपण बघूया खोलात. निसर्गाच्या नियमानुसार पुरुष आणि स्त्री एकत्र आले, ती वेळ जुळून आली असेल तर एक जीव ९ महिन्यात जन्माला येते. ते बाळ, मुलगा असो किंवा मुलगी असो , शरीर घेऊन येते. हे शरीर आईच्या दूध व वयाप्रमाणे इतर अन्न खाऊन वाढत जाते. तो जीव, देवानी दिलेल्या आयुष्यातील सुख-दु:ख भोगून एके दिवशी शरीर सोडून जाते. ह्यालाच म्हणतात मरण.
जन्मापासून मरेपर्यंतचा काळाला आयुष्य म्हणतात. माणूसाचा आयुष्यावरून तीन प्रकारच्या वर्गीकरण केलेले आहे. वयाच्या ३२ वर्ष आयुष्य असलेल्या माणसाला अल्पायुषी, ३२ ते ६४ वर्ष आयुष्यात मेलेल्या माणसाला मध्यायु आणि ६४ ते पुढे जगलेला माणूस दीर्घायुषी असे म्हणतात. जन्मकुंडली बघून चांगले ज्योतिषी हे सांगू शकतात.
आता बघूया मरणा चे प्रकार.
मरणाचे सहसा असे वर्गीकरण करण्यात येईल.
१. नैसर्गिक मरण:
२. अनैसर्गिक मरण:
१. नैसर्गिक मरण: वर सांगितले प्रमाणे माणूस जन्माला येताना आयुष्य घेऊन येतो. त्या प्रमाणे एक सेकंड कमीजास्त न करता आयुष्य संपल की मरावं लागते.
माणूस म्हातारा होतो.
मरणाला काही कारण पाहिजेच ना? ह्याच्यात २ तरेचे आहे.
अ) बिन आजारी मरणे: हे लोक खूप नशीबवान असतात. आजारपण म्हणजे दुखणे. आजारी न पडता, मरण कसा येतो? आपला शरीरामधे हार्ट म्हणजे ह्रदय आहे. जो पर्यंत ह्रदय काम करतो तो पर्यंत माणूसात चैतन्य राहते. जेंव्हा ह्रदय काम करायचं थांबला की शरीर पण निश्चेतन होवून जाते. ह्याला म्हणतात हार्ट फेल. काही आजारपण नसताना असे मेले तर बिन आजारी मरणे, म्हातारपणानी मरणे किंवा नैसर्गिक मरणे (Natural Death) असे म्हणतात।
ब) आजारी होवून मरणे: शरीरातील काही सिस्टिम बिघडले तर माणूस आजारी पडतो. आजार खूप वाढली तर माणूस मरतो. आजार खूप प्रकारचे असतात. डायबेटिस,कँन्सर,पँँरेलेसिस इत्यादी रोगाना काढणे सोप नाही. अशा रोगाने माणूस त्रस्त होवून मरतो. पँरेलेसिस आणि डायाबेटिस थोडा फार आटोक्यात आलेल्या आहेत. कँन्सर पहिल्या स्टेजमधे बर होवू शकते. काही लोक जाँडीसनि मरतात. पूर्वीचे प्लेग, काँलरा,टाईफाइड इत्यादी आजारपण कमी झालेत.
२. अनैसर्गिक मरण:
अ) अपघाती मरण
ब) खून होऊन मरणे
क) देशासाठी मरणे
अ) अपघाती मरण: हल्ली तंत्रज्ञान खूप वाढलेले आहे. रस्त्यावर चे वाहन, पाणीवर चालणारे जहाज, हवेत उडणारे विमान जसे आनंददायक शोध झाले आहेत तसेच ते अपघातात अडकून लोकांना मारून देणारे दु:खदायक शोध म्हणावे लागेल.
आगलागून अपघातात मरणारे लोकांच्या बातम्या खूप वेळ वाचायला मिळतात.
माणूस चालताना दूसरे वाहन ठोकून मरणारेँची संख्या सुध्दा वाढत आहे.
म्हणून आपण घराबाहेर असताना खूप काळजी घेतली पाहिजे.
बस दरीत पडून लोक मरतात. घर कोसळून मरणे, पूल पडून लोक मरणे, वीज लागून मरणे हेही सुध्दा अपघाती मरणात येतात.
ब) खून होऊन मरणे: दोन माणसा मधे वादविवादात,भांडण होतात. असे दुष्मनी वाढून एकाने दूसर्या ला मारून टाकतो. ह्याला म्हणतात खून. असे मरण तरी पेपरमध्ये खूप वाचायला मिळते.
क) देशासाठी मरणे: लढाईत मरणे देशासाठी बलिदान होऊ शकते. हे मरण खूपच चांगली गोष्ट आहे.
अत्ता मरणा वर खूप चर्चा झाली. निष्कर्ष काढायचा असेल तर मी असा म्हणेन की मरण चुकत नाही. आपण मिळालेल्या आयुष्याची चीज करावी. नाव कमवावे. मनुष्य जन्म ८४ लाखात एक आहे. मरणाचे काळजी करूनये. नामस्मरण करत आनंदाने, परोपकारी होऊन जीवन जगावे.