Pralay - 20 books and stories free download online pdf in Marathi

प्रलय - २०

प्रलय-२०

   
    महाराणी शकुंतलेपासून भक्तांनी   राजकुमारास घेतले .  तो राजकुमार त्यांनी ' त्याच्या '  ताब्यात दिला .  तो  तोच होता .  संपूर्ण शरीराभोवती काळे वस्त्र परिधान केलेला , विचित्र काळ्या पक्षावरती बसलेला .  त्याच्याभोवती सदैव काळ्या ढगांचे विचित्र आवरण असायचे .  बोटावर मोजण्याइतक्याच लोकांना त्याचा चेहरा माहीत होता .  त्यामध्ये महाराणी शंकूतलेचाही समावेश होता .  ज्यावेळी राजकुमार त्याच्या ताब्यात दिला . त्यावेळी भक्त त्याच्या मागोमाग निघाले .  मात्र त्या भक्तांमध्ये मिसळून उत्तरेच्या सैनिक तळ्यावरती उपस्थित असलेला अभिजीत अद्वैतही निघाला .  हा तोच अद्वैत होता ,  जो तीनशेजनांच्या तुकडीचा प्रमुख होता .  ज्या तुकडीला भक्तांनी काही दिवसांपूर्वी नष्ट केले होते . त्याच्या हृदयात प्रतिशोधाची आग धडधडत होती .  त्यामुळे तो भक्तात मिसळून त्यांना नष्ट कसे करता येईल याचा शोध घेण्यासाठी त्याच्या मागोमाग निघाला होता..... मात्र काही अंतर चालत गेल्यानंतर तो काळा आकार म्हणजे ' तो ' थांबला .  त्याने काहीतरी हालचाल केली   .  ती कोणाला दिसली नाही ,  मात्र ते अंधभक्त आता आपापल्या वाटेने चालले होते . जणू त्यांच्यावरच नियंत्रण कुणीतरी काढून घेतलं होतं . आणि ' तो ' आता वेगाने निघाला होता ; ज्या ठिकाणी त्याला जाणं गरजेचं होतं......

       मारूत राजे जितकी वर्षे लपून होते तितकी वर्ष त्यांचे अस्तित्व टिकून होते.  तेही  फक्त लपून राहून .  मात्र आता ते खुल्या मैदानात आले होते . त्यांनी प्रलयकारिकेला जन्म दिला होता .  प्रलयकारिका संपूर्णपणे आरुषीच्या आज्ञेत होती .  ज्यावेळी मारुत राजांनी प्रलयकारिकेला निर्माण करणाऱ्या पुजाऱ्यांना आश्रय दिला , त्यावेळी त्यांना पुढील संकटाची जाणीव नव्हती .  मात्र त्या पुजाऱ्यांकडून जन्मोजन्मी सेवा करण्याची शपथ मारुत राजे घ्यायला विसरले नव्हते .  त्यामुळे ते पुजारी मारुती राजांसाठी बांधले गेले होते .  अशाच एका पुजाऱ्याच्या एक मुलगा म्हणजे तो होता.....

 त्याचं नाव पार्थव होतं . मारूत राजांचा मुख्य पुजारी ज्याने मारुत राज्यांसाठी प्रलयकारिकेला निर्माण केलं .  त्या पुजाऱ्याचा मुलगा म्हणजे तो पार्थव होता....

तो त्या लहानग्या राजकुमाराला घेऊन त्याच्या वडिलांसमोर उभा होता . 
" बाबा आता ती वेळ जवळ आली आहे . प्रलयकारिकेची शक्ती वाढवण्याची .  प्राणिमात्रांवर चालत असलेली तिची शक्ती आता वाढवायला हवी .  मनुष्यांवर नियंत्रण करणे तिला फारशे अवघड जाणार नाही . आपण लवकरात लवकर या प्रक्रियेसाठी सुरुवात करायला हवी.....
" पार्थ तू खरच भोळा आहेस . तू मी सांगितलेलं सर्वकाही ऐकतोस . एकही प्रश्न न विचारता सर्वकाही करतोस . तुला वाटतं की मी हे जे सर्व काही करतो आहे ते मारुत राजांसाठी करतो आहे.....
" म्हणजे आपण हे त्यांच्यासाठी करत नाही का...?
" किती आणि काय काय नाही केलं आपण  ,   इतकं सर्व आपण दुसऱ्यासाठी करायचं काय गरज आहे ......?  महाराज सत्यवर्माच्या महर्षीची हत्या करून , त्याची त्वचा चोरून तू जे काही बोललास , राजाला ते खरं वाटलं . त्याने स्वतःच्या राजपुत्राला राजमहालासकट जाळून टाकलं .  ते आपण मारूतांसाठी नाही स्वतःसाठी केलं . नंतर महाराणी शकुंतलेला तुझ्या जाळ्यात ओढून घेऊन तिच्या पोटी गर्भ ठेवला तेही आपण मारुतासाठी नाही केलं . विक्रम जन्मल्यानंतर त्याला रक्षक राज्याचा महाराज बनवण्याचा  जो खटाटोप केला तो मारुतांसाठी नाही केला . जेव्हा त्याला सत्याची जाणीव झाली तेव्हा आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सुवर्ण पात्र व त्यामधील मदिरा आपण मारुतांसाठी नाही निर्माण केली......

    आपण महाराज विक्रमांना आपल्या ताब्यात ठेवलं त्यांच्याकरवी आपण भिंत पाडण्याची आज्ञा दिली . मी स्वतः  बाटी जमातीच्या लोकांबरोबर समजूत करून त्यांच्या बासरीची शक्ती वापरून सामान्य जनतेला त्रिशूळ सैनिक बनवलं आणि जलधिंच्या सैनिका विरुद्ध उभा केले .  मी जलधि आणि रक्षक राज्यांमध्ये युद्ध लावले .  मी सर्वत्र कोलाहल माजवला . हे सर्व मारुरतासाठी नाही केले...... तर हे सर्व मी माझ्यासाठी केलं .  आता त्या लहान मुलाचा वापर करून , प्रलयकारिकेची शक्ती वाढवून तिला माझ्या नियंत्रणाखाली घेऊन मी संपूर्ण पृथ्वीतलावरती राज्य करणार . काळ्या भिंतीचे भय दाखवून मी माझा हेतू साध्य केला आहे . काळ्या भिंतीपलीकडील सम्राट कधी जागृत झालाच नव्हता . सर्व काही मीच केलंय. ते अंधभक्त , ते त्रिशूळ सैनिक ही सर्व माझीच कारस्थाने आहेत .  एकदा भिंत पडल्यानंतर सम्राटाला जाग येईल , तेव्हा त्या सम्राटाचा वापर करून  संपूर्ण पृथ्वीतलावरती माझे एकछत्री साम्राज्य असेल......

" पण बाबा तुम्ही तुम्ही असं कसं करू शकता .....
   पार्थव  खरच खूप साधा भोळा होता . त्याला त्याच्या वडिलांचा हा अवतार पाहून काहीच कळेना.....
" तू काही काळ काही काळ विश्रांती घे पार्थव .....
    असं म्हणत त्या पुजार्‍याने हवेत हात फिरवला . पार्थव त्या लहान मुलाला घेऊन त्याच्या कक्षात निघाला....

   राजमहर्षी  सोमदत्तांनी सांगितल्याप्रमाणे राजमहाला नजीक असलेला दीपस्तंभ पेटवून उडता बेटांच्या मदतीसाठी संदेश पाठवला होता , पण ती मदत येईल तेव्हा खरे...... त्रिशूळ सैनिकांवर ती कोणता उपाय  करावा यासाठी सर्वजण विचार-विमर्श , चर्चा करत होते .  आपल्याच लोकांना मारणे कुणालाही शक्य नव्हते , आणि त्यांना न मारावे तर त्यांचा स्वतःचा मृत्यू अटळ होता .  एका बाजूला विहीर तर एका बाजूला आड अशी त्यांची परिस्थिती झाली होती .  त्रिशूळ सैनिकांना मारावे तर सामान्य नागरिक मरत होते ,   सैनिकांना न मारावे तर त्यांना स्वतःला मरावे लागणार होते .  आपल्याच राज्यातील सामान्य नागरिक त्रिशूळ सैनिक कसे झाले हे त्यांना माहीत नव्हते .  त्यांना त्यांना माणसात कसे आणायचे याबद्दल त्यांचा याबद्दल त्यांची चर्चा चालू होते......
राज्यात जाऊन आलेल्या हेरांनी हेरप्रमुख कौशिकला बाजूला घेत काहीतरी सांगितले . कौशिकच्या चेहऱ्यावरती गंभीर भाव आले होते .  तो समोर येत बोलू लागला.....
" महाराज आपण ज्या काही बाटी जमातीच्या टोळ्यांना आश्रय दिला होता , त्यातील बऱ्याच टोळ्या निघून गेल्या आहेत . आपल्या विश्वासू हेरांनी आणलेल्या बातमीनुसार बाटी जमातीच्या काही लोकांनी बासरी वाजवत आपल्या सामान्य जनतेला नियंत्रित करून त्यांच्या मागोमाग नेलं आहे.... 
      "  म्हणजे आपल्या लोकांना त्रिशूळ  सैनिक बनवण्यामागे बाटी जमातीच्या लोकांचा हात होता तर........"     महाराज कैरव रागाने बाटी जमातीच्या नायकाकडे बोट करत म्हणाले
"  ताबडतोब त्याला अटक करा.....
" नाही महाराज माझा यात काही दोष नाही ....मी फक्त एका टोळीचा प्रमुख आहे . अशा अनेक टोळ्या आहेत .  आमच्या टोळीतील लोक अजूनही तुमच्या आश्रयात आहेत . महाराज ज्या इतर टोळ्यांना तुम्ही आश्रय दिला होता त्यातील एक टोळी नेहमीच मारूतांच्या संपर्कात राहिलेली आहे .  त्या टोळीतील लोकांचा हा उपद्व्याप असावा असा मला संशय आहे.....
     तो बाटी जमातीचा नायक कळवळून बोलला.....
" आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. जर तुमचे लोक त्रिशूळ सैनिक बनवू शकतात , तर त्या सैनिकांना सामान्य माणूसही बनवू शकतात .  आत्ताच्या आत्ता मला माझे लोक माणसात आणायचे आहेत .  तुम्ही तयारी करा अन्यथा शिक्षा भोगायला तयार राहा......
महाराज कैरव संतापाने बोलले...
" क्षमा करा महाराज क्षमा करा ... त्रिशूळाचे सैनिक बनवण्याची शक्ती , बासरी ती धुन बाटी जमातीतील नाही... मारूतांच्या पुजाऱ्यांची ती प्रक्रिया आहे . आमच्या काही टोळ्या मारुताच्या पुजाऱ्यांच्या संपर्कात आहेत , त्या टोळ्यांचे हे कारस्थान असावे ......
     तो नायक रडकुंडीला आला होता 
  " आत्ताच्या आत्ता सांगा आपण त्या लोकांना कुठे शोधू शकतो ...... तुम्हाला इतके सारा माहित असून तुम्ही इतका वेळ गप्प राहिला.... तुम्हाला आता शिक्षा नक्की होणार आहे....
सैनिकांकडे पाहत महाराज कैरव म्हणाले त्यांना बंदिस्त करून टाका...

    बाटी जमातीच्या  त्या टोळीच्या नायकाला एका खांबाला बांधले होते .  कौशिक त्याच्यासमोर उभा होता...
" मला सांग त्यात त्रिशूळ सैनिकांना सामान्य माणसात कसं आणायचं...?   तुम्ही त्यांचं वशीकरण कसं केलं..? त्यांच्यावरील नियंत्रण कसं काढायचं....?
कौशिक त्याला त्वेषाने प्रश्न विचारत होता...

     " मला खरच माहित नाही आमच्या टोळीचा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही ....आणि मला त्याबद्दल माहिती असतं तर मी आधीच सांगितलं असतं.  मला फक्त एवढच माहीती आहे की आमच्या काही टोळ्यांचा मारुतांशी संबंध आहे ; पण मला माहीत नव्हतं की या त्रिशूळ सैनिकाच्या प्रकरणामागे त्यांचा हात असेल.  म्हणून मी बोललो नाही .....
तो नायक खरा बोलत होता
 "मला सांग कोणत्या टोळ्यांचा यामध्ये समावेश आहे आणि आता आपण त्यांना कुठे शोधू शकतो....

" मी खरं बोलत आहे मला काहीच माहित नाही . माहित असतं तर मी सांगितलं असतं ,  मी पहिल्यापासूनच तुमची मदत करत आलेलो आहे . मी खोटं का बोलेन...?

   " तुला काहीतरी सांगितलं पाहिजे .....!
       कौशिक वैतागला होता . रागाला जाऊन त्याने त्या त्याच्या श्रीमुखात भडकवली.....

    " मी खरं बोलत आहे याच्याहुण अधिक मला काही माहीत नाही . मी एवढी तुम्हाला मदत केली मी तुम्ही मलाच आरोपी समजत आहात ......" 
तो नायक आता मुसमुसून रडत होता
तेवढ्यात एक हेर  सैनिक त्या ठिकाणी आला .  त्याने कौशिकला काहीतरी सांगितलं . कौशिकने ताबडतोब महाराजांचा कक्ष गाठला....
 " महाराज व्यत्ययाबद्दल क्षमा असावी . बाटी जमातीच्या काही टोळ्या मारूतांच्या जुन्या महालाकडे कडे जाताना दिसल्या आहेत.... महाराज या त्याच टोळ्या आहेत ज्यांनी आपल्या सामान्य नागरिकाला त्रिशूळ सैनिक बनवले .   आपल्या राज्यातील थोडेफार लोक या टोळ्यांच्या मागोमाग जाताना दिसत आहेत......
"  म्हणजे या टोळीतील लोकांना जर आपण पकडून आणलं तर आपल्या समोरील त्रिशूळ सैनिकाचं आव्हान संपुष्टात येऊ शकते. आपले लोक पुन्हा व्यवस्थित होऊ शकतात....
" होय महाराज..... पण त्यांनी काही लोकांना त्यांच्या बरोबर नेले आहे . वेळ पडली तर ते लोक आपल्या सैनिकांना विरुद्ध लढू शकतात . त्यामुळे आपण सरळ सरळ युद्ध करू शकत नाही.....
" भिंती पलीकडील त्रिशूळ सैनिक भिंत पडल्याशिवाय लढू शकणार नाहीत . त्यामुळे याठिकाणी थांबण्यात अर्थ नाही . सर्व सैनिकांना सामान्य माणसात आणायचा असेल तर त्या टोळीला कसेही करून पकडायला पाहिजे .  आणि त्यां टोळीला पकडण्याच्या अगोदर भिंत पाण्यापासून थांबवलं पाहिजे..... म्हणून काही सैनिक याठिकाणी थांबतील . बाकीचे सैनिक महाराज विक्रमावरती आक्रमण करायला जातील व उरलेले बाटी जमातीची ती टोळी पकडण्यासाठी........

    महाराज विक्रम आणि महाराज विश्वकर्मा ,  रक्षक राज्याचे जुने प्रधान हे दोघेही वाटाघाटीसाठी जमले होते . एका बाजूला विक्रमाची छावणी होती तर ददुसऱ्या बाजुला महाराज विश्वकर्माचे जलधि राज्याकडून आणलेली सेना होती....
महाराज विशश्वकर्मा बोलले...
" विक्रमा तु माझा पुतण्या आहेस आणि तू हे जे काही चालवले आहेस ते योग्य नाही . माझ्यामागे जलधि राज्याची सुसज्ज पाच हजारांची सेना आहे .  उरलेली सेना कोणत्याही क्षणी या ठिकाणी येऊन पोचू शकते .  तुझ्याकडे फक्त पाच हजाराची सेना आहे , आणि ते सैनिकही आपल्याच राज्याचे आहेत . आपल्या राज्यातील लोकांचा निष्कारण बळी देण्याचा माझा मुळीच हेतू नाही . म्हणून मी तुला सांगायला आलो आहे.   आत्ताच्या आत्ता आम्हाला शरण ये  आणि भिंत पाडण्याचा तुझा आदेश मागे घे , अन्यथा युद्धा वाचून आम्हाला पर्याय राहणार नाही...

" देशद्रोही आणि विश्वासघातकी माणसाला राज्याच्या हिताचे बोलण्याची काही गरज नाही . माझ्या राज्याचे हित कशात आहे हे मला माहीत आहे . भिंतीपलीकडे कोणाकोणाचे काय धंदे चालतात हे मला चांगलंच माहित आहे . भिंत पडल्यानंतर कुणाचं नुकसान होणार आहे हेही मला माहीत आहे . राजाने काय करायचं काय नाही हे तुम्ही शिकवण्याची मला गरज नाही....
" तू म्हणतो तसे असुदे .  भिंतीपलीकडे काही चालत असुदे , पण भिंतीवरून पलीकडे जाऊन तू त्या लोकांचा समाचार घेऊ शकतोस . त्यासाठी भिंत पाडण्याची गरज नाही . हे तुझ्या स्वतःचे विचार नाहीत . तुझ्यावरती कोणाचा तरी नियंत्रण आहे . तू कोणाच्या तरी नियंत्रणाखाली हे सारं करतोयस ...तू असा नाहीस...
       प्रधानजीच्या या वाक्यानंतर विक्रम क्षणभरासाठी थांबला . त्याच्या डोळ्यात निरागसतेची एक छटा दिसून गेली .  पण काही क्षणांतच तो बोलू लागला ....
    " कोण कोणाच्या नियंत्रणाखाली आहे , हे सारं जग पाहत आहे . राजसत्तेच्या हव्यासापोटी दुसऱ्या राज्याची सेना घेऊन स्वतःच्या राज्यावर आक्रमण करणारा राजा जगाने पूर्वी कधीच पाहिला नसेल....
" विक्रमा मी तुला कसं सांगू .  तु हे सर्व का करतोय ,  ते मला कळत नाही . भिंतीच्या कितीतरी गोष्टी तू लहानपणापासून ऐकत आला असशील . भिंत पडल्यानंतर होणारा मृत्यूचा तांडव तुला माहित नाही काय......? 
" आता गपचूप तुम्ही तुमच्या सैन्यातळावरती जा .  नाही तरी या ठिकाणी मृत्यूचा तांडव व्हायला वेळ लागणार नाही.... हेच बोलण्यासाठी तुम्ही इतक्या सैनिकांनिशी आला आहात का ....? गपचूप माघारी जा अन्यथा तुमचा मृत्यू फार दूर नाही.....
महाराज विक्रम घोड्यावरती बसत म्हणाले
" विक्रमा तु आम्हाला युद्ध करण्यावाचून पर्याय ठेवलेला नाही....
  " कोण युद्ध करणार , तुम्ही....? महाराज विक्रमाने कुत्सित हास्य केले . त्याबरोबर महाराज विक्रमा बरोबर आलेल्या सैनिकांनी महाराज विश्वकर्मा बरोबर आलेल्या सैनिकांवर ती एकाच वेळी धावा बोलला . अचानक झालेल्या हल्ल्याने गडबडून गेले महाराज  विश्वकर्माचे सैनिक जागीच ठार झाले . वाटाघाटी करण्यासाठी सर्व प्रमुख लोक आले होते .  सर्व प्रमुखांना महाराज विक्रमाने बंदी बनवलं . जलधि राज्याची सेना आता नायकाविना पोरकी होती . त्यांना आदेश देणारा कोणीच नव्हतं....
 
   " जलधि राज्याच्या सैन्याकडे एक दूत पाठवा .  त्यांना म्हणावं तुमच्या सर्व प्रमुखांना जिवंत पाहायचं असेल तर आत्ताच्या आत्ता उलट्या दिशेने कूच करून जलधि राज्याकडे निघा.... 
   महाराज विक्रम त्या  बंधकांना घेऊन त्यांच्या सैन्यतळाकडे निघाले...

      तंत्रज्ञ मंदारचा मुलगा शौनक आणि वारसदाराच्या सभेचा भरत दोघे मिळून उत्तरेकडील सैनिकी तळाकडे निघाले होते . पण वाटेतच त्यांना अश्वराज पवन गाठ पडला .  त्याने उत्तरेच्या तळावर घडलेला सर्व किस्सा शौनकला सांगितला....

" मग आता काय करायचं....? भरत म्हणाला . 
"  मंदारने तुम्हा दोघांना कसेही करून भिंत पाडण्यापासून रोखण्याची आज्ञा दिली आहे . त्याने हे दृश्यरूपांतरण कापड दिले आहे . त्याचा वापर करून सैनिकांना काहीतरी दाखवण्या बाबत मंदार बोलत होता..... अश्वराज पवन म्हणाला....
" बरोबर आहे भिंत पडल्यानंतर जे काही होईल तर सामान्य माणसाला कळलं म्हणजे सैनिकांना कळलं तर भिंत पाडायला कोणी धजावणार नाही .  एकदा भिंत पडण्यापासून रोखलं तर पुढच्या बऱ्याच गोष्टी टळतील .  बाबांचं म्हणणं बरोबर होतं . आपण लवकरात लवकर विक्रमाच्या सैनिकी तळाकडे निघायला हवं .  त्या ठिकाणी आपण सैनिकांना  काय होणार आहे ते सांगू.... परिणाम कळाल्यानंतर कोणीच भिंत पाडायला धजावणार नाही....
भरत व शौनक बरोबर अश्वराजही विक्रमाच्या सैनिकतळाकडे निघाले . त्या सैनिकांना सर्व काही सांगून भिंत पडण्यापासून थांबवायचा त्यांचा हेतू होता......
   
    आयुष्यमान आता पूर्णपणे बरा झाला होता .  त्याच्या समोर तो म्हातारा बसला होता बाजूला दोन बुटके आज्ञाधारकपणे उभे होते . सुरुकु आता त्याच्या चांगल्या सवयीचा झाला होता .  सुरुकु वरती बसून त्याच्यासोबत त्याने एक दोन छोटे प्रवासही केले होते .  आता त्याची प्रलयकारिकेला थांबवण्यासाठी प्रलयकारिकेला रोखण्यासाठी जाण्याची वेळ आली होती .
   " तू जाण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे.....
 तो म्हातारा बोलू लागला
" तू मला बरेच प्रश्न विचारले .  काही प्रश्नांची उत्तरे तुला मिळाली आहेत . काहींची तुला शोधावी लागतील ...आणि आता एका प्रश्नाचे उत्तर सांगतो ते म्हणजे प्रलय म्हणजे नक्की काय आहे.... तुझी निवड फक्त प्रलयकारिकेला थांबवण्यासाठीच नाही तर इतरही बऱ्याच गोष्टींसाठी झाली आहे . प्रलय नक्की कशामुळे येतो आणि का येतो हे मी आता तुला सांगणार आहे....
कितीतरी हजारो वर्षांपूर्वी देव आणि मानव एकत्र हसायचे एकत्र राहायचे . ईश्वराने कितीतरी प्रकारचे प्राणी निर्माण केले .  वनस्पती निर्माण केल्या .  वेगवेगळे जीव निर्माण केले . त्यातील बरीच जीव मानवा हून बुद्धिमान होते .  मानवाहुन संवेदनशील होते . मात्र मानव हा नेहमीच ईश्वराचा लाडका प्राणी राहिला आहे....
जरी मानव हा विश्वाचा सर्वात लाडका असला तरी मानवानेच ईश्वराला सर्वात जास्त त्रास दिला आहे मानवाला नेहमीच शक्तीचा मोहर राहिलेला आहे स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी कोणतेही कृत्य करायला मागेपुढे पाहिले नाही फार पूर्वी ज्या वेळी देव आणि मानव एकत्र राहायचे . त्या वेळी एका मानवाने एक घोर पापकर्म केले . आणि त्याचे फळ म्हणूनच त्या ईश्वराने संपूर्ण पृथ्वीला श्राप दिला . आणि तो श्राप म्हणजेच प्रलय होय....
" कोणते पाप कर्म केले , आणि श्राप म्हणजे नक्की कशा प्रकारचा दिला ......" आयुष्यमान विचारले . पण तेव्हाच सुरुकु  जोरजोराने ओरडू लागला . त्या म्हाताऱ्याला   आणि आयुष्यमानलाही त्या ओरडण्याचा अर्थ समजला .   आयुष्यमानला आता निघावे लागणार होतो .  सुरूकुला प्रलयकारिकेची जाणीव झाली होती . तिचा सामना करण्यासाठी आयुष्यमान सुरूकुवरती स्वार होत हवेत उडाला.....

      सुरुकुची गती प्रचंड होती . काही काळ उडाल्यानंतर त्याने गती कमी करत सुरुकु  खाली उतरला . आयुष्यमान ला एका बाजूला मोहिनी बसलेली दिसली तिच्या डोळ्यात आसवे जमा झाले होते ज्या वेळी तिने रुद्राचा तो लहान मुलगा मारला त्यावेळी तिला काहीतरी वेगळीच जाणीव झाली .  आपलं जीवन हे नाही . आपले जीवन काहीतरी वेगळा आहे .  त्या ठिकाणाहून बाजूला होत गरुडावर बसून ती  दूर आली होती . तिला त्रास होत होता .  तिला काहीच आठवत नव्हतं.....

    ज्यावेळी तिला आयुष्यमान दिसला त्यावेळी तिला सारं काही आठवलं .  तिने पळत येत आयुष्यमानला मिठी मारली . दोघेही एकमेकांच्या सहवासाचे भुकेले होते..... वस्त्रांचा अडसर बाजूला झाला .  ते दोघे एकमेकांचे शरीर अनुभवत होते.... ओठाला ओठ मिळाले . दोघे सुखाच्या गर्तेत बुडून गेले.... ती मोहिनी होती आणि तो आयुष्यमान होता आणि दोघेही एकरूप झाले होते .  सुखाच्या परमोच्च क्षणी मोहिनीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली .  तिच्या हातात खंजीर होता आणि त्या खंजीराने आयुष्यमानच्या  वेग घेतला.....

    "   प्रलय येणार आहे  मनुष्यजात नष्ट करण्यासाठी ....  एकही मनुष्य प्राणी या पृथ्वीतलावर जिवंत राहणार नाही . पण जो कोणी माझं अनुकरण करेल आणि जो कोणी माझा अनुयायी होईल .  त्याला या पृथ्वीतलावर कशा पासूनच धोका नाही .  जो कोणी माझा अनुग्रह नाकारेल , जो कोणी माझा अनन्वय  नाकारेल त्याला प्रलयाची भीती आहे .   माझ्या अनुयायांना प्रलयापासून संरक्षित करण्याची माझी जबाबदारी आहे ......

       माझा अनुयायी होण्यासाठी तुम्हाला फार काही करायचे नाही . हे पवित्र जल तुम्ही प्राशन करा .  जे माझे पवित्र पाय धुऊन काढलेले आहे  , आणि माझ्या सर्व आज्ञांचे पालन करा ...... " 

    मोठ्या जनसमुदायासमोर उभारून तो भाषण करत होता . तो स्वतःला देव म्हणत असे . प्रलयानंतर येणाऱ्या नवीन जगाचा जणू तो स्वामी असणार होता . 

" तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी पहा .....

    असं म्हणत त्याने त्याच्या अनुयाकडे हेतुपूर्वक पाहिले .   त्याच्या अनुयायांनी हवेत दोन गोळे फेकले .  हवेत गेल्यानंतर ते फुटले . त्याच्यातून धूर बाहेर निघाला .  व  त्यांच्यासमोरील संपूर्ण आकाश एक काळ्या छायेखाली भरून गेलं . हळूहळू त्यामध्ये दृश्ये दिसू लागली . ती दृश्ये पाहून जनसमुदायाचा थरकाप उडाला .  सर्वजण त्याच्या पुढे गुढगे टेकून पवित्र जल पिऊ लागले.....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED