आपली लव स्टोरी - 2 Vaishali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आपली लव स्टोरी - 2

नील आणि त्रिशा दोघेही गाडीत बसले नील ने गाडी चालू केली दोघेही शांत होते काय बोलावे हे च कळत नव्हतं.त्रिशाचे घर आले नील ने गाडी थांबवली, त्रिशा उतरली नील : थांब ना त्रिशा थांबली तू उत्तर दिलं नाही तु अजून प्रेम करते ना माझ्या वर तिने त्याच्या कडे पाहिले तुला काय वाटतं तु असा प्रश्न विचारला कस काय? तिला राग आला ती जायला लागली त्याने पटकन तिचा हात पकडून sorry sorry please don't go तिने हात झटकला नील आधीसारख रिलेशन नाही आपलं मला वेळ पाहिजे विचार करायला. नील :हो तुला किती वेळ हवा तेवढा घे मी wait करेन असं म्हणून तो निघून गेला .
त्रिशिचा फोन वाजला काॅल रिसीव करून हा बाबा मी खाली च आहे आले आले. आईने दार उघडलं किती उशीर झाला आज... काय आई 12-1 वाजल्या सारखं बोलते. काय झालं, काही नाही गं जा फ्रेश हो जेवायला वाढते नको मला भूक नाही अस म्हणून ती रुम मध्ये गेली त्रिशा च्या डोक्यात विचाचक्रस सुरू झाले .सकाळी त्रिशा आॅफिस ला जाण्यासाठी तयार झाली, ती शांत च होती बाबा च्या शेजारी जाऊन बसली नाश्ता झाला .ती निघाली नील तिच्या घराबाहेर थांबला होता त्रिशा त्याला बघून तु इथे काय करतो अगं मी पण आॅफिस ला चाललो होतो तुला पण पिक करुन दोघेही जाऊ असा विचार मनात आला म्हणून आलो . आता तसं नातं निर्माण करण्यासाठी वेळ दे मला, तुझ्यावर मी प्रेम करते पण विश्वास नाही आता तेवढा...... नील ला ते शब्द टोचत होते पण ती जे बोलत होती ते बरोबर होते नील म्हणाला sorry त्रिशा मी विचारून ययाला हवं होतं असं म्हणुन तो निघून गेला त्रिशा पण तिची गाडी घेऊन गेली आॅफिस मध्ये दोघेही शांत होते नील ला खुप वाईट वाटले कारण त्रिशा च बोलण कधीच असं नव्हतं तो भूतकाळात गेला त्रिशा ने फोन केला की तो जे काय काम सोडून तिच्या कडे जायचा ती किती उद्धट बोलू पण त्यात तिच प्रेम दिसत होते लग्नाची बोलणी सुरू असताना मी निघून गेल्याने तिला राग आहे हे लक्षात येत होतं नील ला.... त्रिशा च्या डोक्यात नीलचा विचार होता काय करू मी त्याला माफ करु का आणि परत जर तो निघून गेला तर... अर्जुन सरांनी बोलवले माडे काका म्हणाले " हो हो आले"म्हणून सांगा थोड्या वेळाने त्रिशा आत गेली आणि प्रोजेक्ट बद्दल चर्चा सुरू केली पण तिचे लक्ष नव्हते. अर्जुन काय झालं मॅडम कुठं लक्ष आहे ती भानावर आली, हा काय बोलत होता अर्जुन तिच्या कडे पाहत म्हणाला काय प्रोब्लेम आहे का मी काही मदत करू शकतो का ?त्रिशा अरे काही नाही रे थोडं डोक जड वाटतय अस बोलत असताना नील केबिन मध्ये येतो त्रिशाची नजर नील
कडे वळते नील अर्जुन ला फाइल देतो मला थोडे पर्सनल कामासाठी जाव लागेल तु ते फाइल बघून घे त्रिशाला बघून न बघितल्यासारखे करून निघून गेला त्रिशा ला कळालं होतं की नील ला वाईट वाटले आहे
आई:: आज लवकर कस काय आला हसत विचारले नील शांत च होता। आई ::काय झालं मुड का आॅफ ....आहे आई त्रिशा माझ्या आॅफिस मध्ये आहे काय बोलावे हे च कळत नव्हतं आईला ती त्याच्या कडे बघतच राहिली नीलने पुढे बोलायला सुरुवात केली मला मागे वळून परत बघायचे नव्हते पण ती समोर आली आता परत तिला गमवायचे नाही मला। तीन वर्षापूर्वी जे काही आमच्या दोघांमध्ये वाद झाले होते ते मी तिला बघताच क्षणी विसरून गेलो आई मला तिच्याशीच लग्न करायचे आहे आई शांतच होती आई काही तरी बोल ना ... मी काय बोलू अरे इथे आम्ही तुझ्या साठी मुलगी बघतो आणि तु त्रिशा मध्येच गुंतला आहे नील तिच्या तून बाहेर पड ज्या दिवशी ती तुला जाऊ।नको म्हणाली तेव्हा च माझ्या मनात तून उतरली ती ....आई मी तूला काय सांगतो तर तु मागच घेऊन बसली काय आई असं म्हणून निघून गेला अरेेपण... रात्र झाली त्रिशाला झोप येईना उठून बसली बाहेर रपरप......आवाज ऐकू येत होता त्रििशा ने खिडकी उघडली जोरदार पाऊस पडत होता। पावसाचे थेंब अंगावर शहारे आणत होतेे. त्रिशाला तिचे आणि नील च्या जुन्या आठवणीत रमून गेली. सकाळी लवकर उठून तयार झाली .आई ने बाबांना इशारा केला त्रिशा बघत होती काय झालं आई बोल काय बोलायचं आई बाबा तिच्या कडे बघत होते. आई ::अगं काल अर्जुन च्या आजी ला बघायला गेलो होतो .हो का, बरी आहे का तबियत? होच म्हणायच आता वय झालंय ,आई माझ झाला नाश्ता.. मी चालले अगं ऐकून घे ना बोल लवकर मला उशीर होतोय अर्जुन च्या बाबांनी लग्नासाठी मागणी घातली तूला..काय बोलते आई तु "त्रिशा ओरडुन बोलली "अगं तुला कधी ना कधी लग्न कराव लागेल ना आहो तुम्ही काही तरी सांगा ना अर्जुन किती चांगला मुलगा आहे. त्याच्या सारख स्थळ परत मिळणार नाही हो कि नाही आहो तुम्ही तुला कधी कुठल्या गोष्टी बोलाव्यात कळतच नाही मी काय केले आता आई बाबांची दोघेही बडबड चालू असताना त्रिशा ने पळ काढला तिने डोक्याला हात लावला आणि एकटीच बरळत होती. एक तर लाईफ मध्ये एवढे प्रोब्लेम आणि आता हा अर्जुन मध्येच माझ आणि अर्जुन लग्न बोलायलाच किती विचित्र.. आफिस मध्ये गेली त्रिशा शांत बसली होती समोरुन नील येत होता ती त्याच्या कडे बघत होती पुजा काही तरी बोलत होती आणि नील सुध्दा मस्त हसत तिच्या शी गप्पा मारत होता ते बघुन त्रिशा चा पारा चढला ती दोघांच्या समोर येऊन थांबली नील ने तिच्या कडे बघितले त्रिशा म्हणाली पुजा गप्पा झाल्या असतील तर कामाच बघायच का तुम्ही नंतर निवांत बसून गप्पा मारत बसा... नील काही न बोलता आत केबिन मध्ये गेला त्रिशा पण त्याच्या मागे गेली त्रिशा काम करता करता त्याच्या कडे बघत होती तिला पूजा आणि तो काय बोलत होते हे जाणून। घ्यायचे होते नील त्याच काम करण्यात मग्न असताना मोबाईल मेसेज आला तो बघून हसत होता त्रिशा च लक्ष्य सगळे तिकडेच होते आणि त्यात पूजाच्या हतात पण मोबाईल त्तिने पटकन उठून नीलला विचारले मघाशी पूजा काय बोलत होती तुला नील ला कळाले च नाही ती काय बोलते तो तिच्या कडे प्रश्न अर्थी नजरेने पाहत होता आणि म्हणाला पूजा का काही नाही असचं का? ती रागाने बघत म्हणाली स्टेट्स वर तूझे आणि तिचे फोटो कस काय मी आत्ता बघितले अगं काल रात्री मी फ्रेंड स बाहेर गेलो। होतो। ती पण त्याच हॉटेल मध्ये आली होती तेव्हा ते तर फोटो क्लिक केलेत. त्रिशा :तुला काय? त्रिशा बोलणारच कि तिला लक्षात आलं माझा कायसंबंध आहे नील ला बोलायचा, तिने फाईल्स घेतल्या काही न बोलता निघून गेली नील ला खूप छान वाटलं त्रिशा ने पहिल्यासारखा त्याच्या वर हक्क दाखवला .अर्जुन ला माहीत होते की त्रिशा च्या आई बाबा ना लग्नाचा प्रस्ताव दिला आहे अर्जुन ला हि त्रिशा आवडत होती पण ते त्याने दाखवलं नव्हत त्रिशाच्या घरून होकार आला पण नव्हता म्हणुन त्याने तिला त्याबद्दल काही विचारले नाही त्रिशा ने पण त्या गोष्टीला महत्त्व दिले नाही घरी जाऊन बघु म्हणून सोडून दिले आफिस मध्ये मिटींग होती सगळे मिटींग साठी आले नील आणि अर्जुन आले नव्हते त्रिशा च लक्ष त्या पूजा कडे ती तिच्या फ्रेंड ला फोटो दाखवत होती नील सर असे तसे म्हणून तारीफ करत होती तिने त्रिशा ला पण फोटो दाखवले त्रिशा वरवर स्माईल केली पूजा चे नील वर क्रश आहे हे तर सगळ्यांनाच माहीत होते त्यात तिला चिडवत पण होते तिला त्रिशा ला खुप जेलस वाटत होतं सीमा म्हणाली पुजा ला मग सरांना प्रपोज तर कर निशाना बसला कि तुझी लाईफ पूर्ण स सेट होऊन जाईल त्रिशा कडे बघत म्हणाली" हो कि नाही ग " ती काहीच बोल ली नाही नील आणि अर्जुन आले सगळे शांत झाले आणि प्रोजेक्ट वर चर्चा सुरू केली थोड्या वेळाने मिटींग संपली सगळे निघायला लागले नील अर्जुन पण जायला लागले त्रिशा ने अर्जुन ला हाक मारली, थांब जरा मला तुझ्याशी बोलायच नील ने तिच्या कडे वळुन बघितले अर्जुन म्हणाला बोल ना त्रिशा नील कडे बघत म्हणाली .थोड पर्सनल बोलायच आपण लंच ला बाहेर जाऊ या का ?अर्जुन तर सातव्या आसमान वर गेला त्याने परत एकदा विचारले काय बोलली तु ,लंच ला जायचे का? हो हो मी तर तयार च आहे ,मी दोन मिनटात आलोच मग निघुया .त्रिशा" हो ये तु "नील :अर्जुन गेल्यावर बोलला तु मला जळवण्यासाठी करते ना हे सगळ त्रिशा:तुला काही ही वाटतं मला काम आहे त्याच्या कडे म्हणून ,पण मी तूला का सांगते नील :काय करायचे ते कर मी पण अस कोणाबरोबर बाहेर गेलो ना तेव्हा ये तू विचरायला त्रिशा ::मला काही फरक पडत नाही नील:: हो बघितल मी सकाळी फक्त फोटो काढले तर तु मला विचारायला आली त्रिशा त्याच्या कडे रागाने बघत निघून गेली नील ने हातातली फाईल जोरात आपटली .... अर्जुन चा बर्थडे होता मोठी पार्टी ठेवली होती ....त्रिशा ला बिलकुल जायच नव्हत पण आई तर मागे च लागली जा म्हणून, आणि त्यात छान आवरून जा.. त्रिशा मस्त ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस घालून तयार झाली .तिच्या आॅफिसमधली फ्रेंड रिमा पण तिच्याबरोबर येणार होती त्रिशा रिमाच्या घराबाहेर वाट पाहत होती रिमा: साॅरी साॅरी लेट झाल्याबद्दल त्रिशा :चल लवकर बस आता त्रिशा ने गाडी स्टार्ट केली रिमा: यू लूकींग सो प्रीटी त्रिशा :थँक्स तू पण छान दिसते सूरज बघतच राहिल तुला (रिमाचा बॉयफ्रेंड सुरज ) रिमा : मग लग्नाचा विचार केला आहे की नाही त्रिशा :"वेडी आहेस का तू "लग्न अर्जुन बरोबर कधीच शक्य नाही। रिमा :अगं सरांना तूझ्या बद्दल फिलिंग आहे मी स्वतः observe केले मी आणि स्वभावाने अत्यंत सुंदर आहे तुला काय वाटतं . त्रिशा : हो गं अर्जुन खुप चांगला आहे पण मी कधी त्या नजरेने बघितलेच माझ्या मनात फक्त नील त्रिशा शांत झाली काहीच बोलली नाही. रिमा तिच्या कडे आश्याचर्रयाने बघत म्हणाली..काय बोलली तु नील सर खरचं बोलतेस तू? तूला नील सर आवडतात त्रिशा यावर काही च बोलली नाही रिमा : कधी झालं तु मला काही च बोलली नाही का? अगं बोल ना काय विचार ते मी तूला त्रिशा ने कार थांबवली दोन मिनिटे शांत बसली .रिमा टक लावून तिच्या कडे बघत होती त्रिशा :मी तुला आत्ता जास्त काही सांगू शकत नाही तिने दिर्घ श्वास घेतला आणि म्हणाली नील माझा एक्स बॉयफ्रेंड आहे तीन वर्षापूर्वी आमच ब्रेक अप झाल होतं याच्यापुढे मला काही विचारू नको please ....त्रिशाने कार चालू केली रिमाला काय बोलाव कळतच नव्हते ती ने काही च विचार ले नाही दोघीही पूर्ण रस्त्यात शांत होत्या पार्टी मध्ये पोहचल्या रिमा उतरली त्रिशा तिला पुढे जा. मी कार पार्क करून आले अस बोलली त्रिशा ने गाडी पार्क केली नील ही आला त्याने त्रिशा ला बघितले तो तिथेच थांबला त्रिशा पर्स मधून मोबाईल काढून सेल्फी काढत होती. नील तिच्या कडे बघत होता आणि गालातल्या गालात हसत होता तिचे नखरे सेल्फी काढताना आधी जसे होते काहीच बदल झाला नाही ती फोटो क्लिक करत असताना नील त्रिशा च्या शेजारी जाऊन म्हणाला माझ्या बरोबर एक फोटो क्लिक कर ना,त्रिशा दचकली किती घाबरले ना,मी ...पागल "साॅरी नीलने खिशातून मोबाईल काढला एक सेल्फी त्रिशा ने मान हलवली. नील ने फोटो काढायला मोबाईल आडवा धरला नील ला माहीत होते.. कि त्रिशा ला आडवा मोबाईल धरून पिक्चर्स क्लिक करायला आवडत नाही. मुद्दाम त्याने धरला होता त्रिशा ने मोबाईल कडे बघितले आणि म्हणाली नील तसं नको क्लिक करू त्याच्या हातातला मोबाईल घेऊन उभा धरला तिनेच पिक्चर्स क्लिक केले तीन चार फोटो काढल्यावर तिच्या लक्षात आले ती पटकन बाजुला सरकली नील कडे मोबाईल दिला आणि निघाली नील हि तिच्या मागे निघाला नील च्या चेहरा खुलला होता त्याला परत आधीचे दिवस आठवत होते पार्टी ला रंग चढला होता काही जण डान्स करत, तर काही ड्रिंक ,स्नॅक्स , पार्टी सगळे जण एन्जॉय करत होते .अजून केक कटींग झाले नव्हते त्रिशा अर्जुन ला शोधत होती अर्जुन ने त्रिशााला बघितले तो तिच्या जवळ आला तिनेे त्याला विश केले आणि हग केेेलं. मागून नील सुध्दाआला त्याने त्याला विश करून हग केलं नील बोलला" नाईस पार्टी" "ओ थँक यू" अर्जुन बोलला तितक्याच सगळे फ्रेंड अर्जुन ला केक कापून घेऊ चल म्हणुन बोलायला लागले.. सगळे जण जमा झाले कॅल्डल फ्लो करुन केक कट केला अर्जुन ला केक खाऊ घातला आता त्याचे फ्रेंड डान्स करायला फोर्स करत होते. तो त्रिशा जवळ आला आणि म्हणाला "कॅन आय डान्स विथ यू"त्रिशा ला सगळ्यांसमोर त्याला नाही म्हणता आलं नाही तिने नील कडे बघितले त्याच्या चेहऱ्यावरून वाटत होते कि त्याला बिलकुल आवडले नाही अर्जून ने तिच्या बरोबर डान्स चालू केला अजुन चार -पाच जण आले डान्स करायला अर्जुन त्रिशा कडेच बघत होता ते तीला आॅकवर्ड फिल होत होते .अर्जुन ::खूप छान दिसते आज तु त्रिशा : थॅंक्स नील च दोघांकडेच लक्ष होते पुजा नील कडे आली सर डान्स करणार माझ्याबरोबर नील नाही म्हणाला त्रिशा च लक्ष गेले नील कडे पुजा त्याला फोर्स करत होती पण नील तिला नाही बोलला ती "ओके" म्हणून तिथून निघून गेली त्रिशाला छान वाटले तीही अर्जुन ला म्हणाली मी आलेच असं म्हणुन तिथून सटकली आणि फ्रेंड च्या ग्रुप गप्पा मारायला सुरूवात केली अर्जुन ला त्याचे फ्रेंड चिडवत होते काय रे लवकर आला डान्स करून वहिनीला आवडत नाही का, तुझ्या बरोबर टाईम स्पेंड करायला नील तिथेच होता. त्याने ते ऐकले त्याला पहिले कळालच नाही ते कोणाबद्दल बोलातायेत अर्जुन पुढे बोलला नाही तस काही नाही आणि त्रिशा कडे बघितले त्याने फ्रेंड बोलले मग लग्नाची तारीख पक्की केली का अजून नाही त्रिशा चे घरचे तयार आहेत त्रिशाला वेळ हवा आहे म्हणून थांबले नील ला ऐकुन शाॅकच बसला त्रिशा ने त्याला काहीच सांगितले नाही त्याला एवढा राग आला होता तो त्रिशा जवळ गेला आणि म्हणाला मला तुझ्याशी बोलायच आहे त्रिशा च्या आजुबाजूचे नील कडे एकटक बघत होते त्रिशा नील ला हसुन म्हणाली आपण नंतर बोलू नील नाही मला आत्ताच बोलायच मी बाहेर आहे ये तू अस म्हणून निघून गेला बाहेर त्रिशाने फ्रेंडसकडे बघून हसत म्हणाली काही तरी कामाच असेल आले मी एक्सुजमी, त्याच्या स्वरावरुन कळलं होतं की ?काही तरी वेगळं च बोलायच आहे हे तिथे असलेल्या ना गोष्ट जाणून आली होती. त्रिशा रागारागात बाहेर गेली नील तिथे थांबला होता त्रिशा ने बडबड सुरु केली ,तूला काही कळत का ?सगळ्या समोर मला ओरडुन बोलायचा काय हक्क आहे तुला ,नील चिडला... तुझ आणि अर्जुन च लग्न ठरलं आणि तुला मला सांगाव पण वाटलं नाही तुझ सगळ ठरलंच आहे तर मला का वेळ मागितला तेव्हा बोलायचे ना मला तुझ्याशी सबंध ठेवायचा नाही मी वेट करतो तुझ्या रिप्लाय चा आणि तु .... त्रिशा त्याला थांबवत बोलली नील तुला कोण बोलल. अस कोण बोलल स्वतः मी माझ्या कानानी ऐकलं एक मिनीट माझ ऐकून घे .नील त्रिशा च काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हता त्रिशा खूप झालं आता प ण मला कंटाळा आला ह्या सगळ्या गोष्टी चा तूला जे करायचं ते कर त्रिशा चा आवाज चढला हो मला काय करायच तू सांगू नको. दोघेही एकमेकांना दोष देत होते। नील रागाने तिथुन निघाला गाडी जोरात स्टार्ट केली नील ला जाताना बघून आयुष्यातून कायमचा जाईल अस त्रिशाला वाटलं तिने घाबरुन नीलला हाक मारली. थांब नील कार हळू चालव। पण नीलला ऐकू गेले नाही त्रिशा पण त्याच्या मागे गाडी घेऊन गेली गाडीत बसून नील ला काॅल करत होती पण नील रागात असल्याने त्याने काॅल रिसीव केला नाही त्रिशााला खुप टेंशन आलं त्याची कार पण दिसत नव्हती ती रस्त्याने नील ची कार शोधत होती थोड्या वळणावर येऊन नील ची कार दिसली तिने तीच्या
गाडी चा स्पीड वाढवला नील ला हार्न दिला नील ने मिरर मध्ये बघितले पण त्याने गाडी थांबवली नाही त्रिशा त्याच्या गाडी जवळ येत म्हणाली नील कार थांबव मला तुझ्याशी बोलायच आहे नील : मला काही ऐकायचे नाही तु जा त्रिशा त्याच्या शी बोलताना तिचे पुढे लक्ष गेलं नाही समोरून गाडी आली तिने पटकन स्वताची गाडी वळवली आणि तिचा गाडी वरचा कंट्रोल सुटला गाडी जोरात जाऊन झाडावर आदळली नील ची गाडी पुढेच होती त्याने बघितले त्याने ब्रेक दाबला तो सुन्न होऊन बघत होता कानात।टीऽऽऽऽअसा आवाज घुमू लागला लोक गाडी जवळ आली नील गाडीतून उतरला पाय सुन्न पडले होते पुढे पडत च नव्हते लोकांचा आवाज येत होता नील खुप घाबरला तो धावत जाऊन गर्दीला ढकलून पुढे गेला त्रिशा च्या डोक्यातून रक्त येत होतं ती बेशुद्ध अवस्थेत होती लोकांनी गाडी तून बाहेर काढले नील ने तिच्या गालावर वरून हात फिरवून तिला मिठीत घेतले तिला उठवायचा प्रयत्न करायला लाग ला खिशातून रुमाल काढून डोक्यावर ठेवून तिला उचलून घेतले गर्दीतल्या एकाने गाडी घेऊन समोर आला बसा पूढे हॉस्पिटल आहे चला लवकर नील त्रिशा ला घेऊन गाडीत बसला खूप वेळ त्रिशा दिसत नाही म्हणून अर्रजुने फोन लावला त्रिशा चा फोन तिथेच पडला होता गर्दी तल्या माणसाने फोन उचलला अर्जुन ला अपघाताची माहिती दिली अर्जुन खुप घाबरला तो ही पार्टीतून निघला त्याच्या बरोबर चार पाच जण आले हाॅस्पिटल मध्ये तिच्या वर उपचार सुरू झाले नील ला काहीच कळत नव्हतं तो डॉक्टरांना विचार रात तिला जास्त लागल नाही ना प्लीझ तिला।शुद्धीवर आणा लवकर डॉक्टर तुम्ही शांत व्हा आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत थोड्या वेळाने अर्जुन आणि तिचे फ्रेंडस आले ते नील ला विचारायला लागले कस काय झालं तुम्ही दोघे पार्टी सोडून बाहेर कुठे गेले होते पण नील ला काहीच कळत नव्हतं कोण काय बोलतंय तितक्याच डाॅक्टर बाहेर आले नील धावुन त्रिशा ची विचार पुस करायला लागला ती बरी आहे ना ती शुध्दीवर आली का अर्जुन ला नील च त्रिशाबद्दल च काळजी करणं थोड वेगळे च दिसत होते डॉक्टर म्हणाले हो She is fine काळजीच काही कारण नाही आता डोक्याला मार लागल्याने बेशुद्ध आहे थोड्यावेळाने शुद्धीवर येईल नील च्या जीवात जीव आला थँक यू डॉक्टर मी भेटू शकतो का अर्जुन ने डाॅक्टर ला विचारले नील ने अर्जुन कडे बघितले तेव्हा तो मागे सरकला हो हो तुम्ही थोड्यावेळाने घेऊन जाऊ शकता अर्जुन आत गेला नील ला जायचे होते पण स्वतः ला त्याने सावरले हे सगळं त्याच्या मुळे घडलं होत त्याला स्वताःचा खुप राग येत होता तेवढयात त्रिशा चे आई बाबा आले खुप घाबरले होते नील बघुन ते हा कस काय इथे विचार करायला लागले पण ती वेळ नव्हती ते त्रिशा कडे गेले अर्जुन होता आईने अर्जुन ला विचारले कस काय झाले हे आणि रडायला लागली अर्जुन म्हणाला रडू नका काकू त्रिशा ठिक आहे काळजीच कारण नाही बाबा डाॅ क्टर ला भेटून आले आई ला समजावले नर्स म्हणाली तुम्ही बाहेर थांबा पेशंट शुद्धीवर आल्यावर मी सांगते अर्जुन म्हणाला आपण बाहेर बसू या काकू ते बाहेर आले बाहेर आल्यावर नील दिसला तू इथे कस काय नील बाबांनी विचारले अर्जून ने ओळख करून दिली अर्जुन बोलला तुम्ही ओळखता एकमेकांना यावर ते काहीच बोलले नाही अर्जून ने नील ला विचारले अरे तुम्ही दोघे पार्टी सोडून बाहेर कुठे गेले होते। आणि। अपघात झाला कस काय मागून नील चे आई वडील आले ते ही घाबरले नील च्या आई ने उशीर झाला म्हणून नील ला काॅल केला त्याचा मोबाईल दुसऱ्या माणसाने उचलला आणि हाॅस्पिटल आहे अपघात झाला असे ऐकल्यावर त्यांना नील ला च काही झालं का म्हणून त्याचे आईवडील आले नील तुला काही झालं तर नाहीना डोक्यावरून हात फिरवत होती मला काही झालं नाही आई मग कोणाला लागलं त्रिशाचा accident झाला नील नील च्या बाबांनी त्रिशाच्या आईवडिलांना त्रिशा ची तबियत कशी आहे म्हणून विचारलं ते म्हणाले आता ठीक आहे अर्जुन ने नील ला परत विचारले कस काय झाले त्याला जाणुन घ्यायची इच्छा झाली होती दोघे पार्टी सोडून कुठे गेले होते नील म्हणाला माझ आणि त्रिशा च भांडण झालं होतं माझ्या मी रागाने तिथून निघालो मला माहित च नाही ती पण माझ्या मागे आली ती माझ्या बरोबर बोलतच होती समोरुन कार आली आणि तिची कार झाडावर आदळली नील च्या डोळ्यातून पाणी येत होते अर्जुनचचे ही डोळे पाणावले होते हे सगळं माझ्या मुळे घडलं मी एवढा केअरलेस कस काय झालो
तो स्वताला दोषी मानत होता नीलची आई म्हणाली तु झा काही दोष नाही त्रिशा ची आई आधीच चिडली होती त्यात नील ची आई अस म्हणाली त्यांचा पारा चढला आणि बोलायला चालू झाली हो तुमच्या मुलाचा काही च दो ष नाही बर का ?आमच्या मुलीला अक्कल नाही मागे गेली त् मला माहीत झालं असत ना कि तु परत आला तेव्हा तिला तुझ्या पासून लांब ठेवले असते आज मला कळालं इतके दिवस तूझ्या बरोबर काम करत होती अर्जुन तर ऐकून शाॅकच झाला हे दोघे जण आधीपासूनच ओळखतात नील च्या पण आईचा आवाज चढला दोघी ही एकमेकांना दोष देत होते आणि तिथे असलेले शांत उभे राहून ऐकत होते नील चे त्रिशा चे बाबा दोघींना शांत करायला लागले पण नील ला त्रिशा ची काळजी लागली होती अजून ती शुद्धीवर आली नव्हती . नील च्या आई ने नीलचा हात पकडला चल नील इथुन .....पण तो जागचा हलला नाही आई मी त्रिशा ला सोडून जाणार नाही आणि मी काहीच बोलायच्या मनःस्थितीत नाही ये. बाबा नी आई ला समजावले तो येणार नाही थांबू थोड्यावेळ आई काही न बोलता नील शेजारी थांबली पण अर्जुन च्या पायाखालची जमीनच सरकली होती नील त्रिशा एकमेकांना वर प्रेम करतात त्रिशा हळु हळु डोळे उघडे करत होती। तिच डोके जड झाले होते तिला नील चा विचार आला नील ला काही झाले तर नाही ना ती उठली नर्स म्हणाली तूम्हाला बरं वाटतय का तिला नील कुठे दिसला नाही नर्सला तिने विचारले माझ्या बरोबर कोण आलं होतं का नर्स म्हणाली सगळे बाहेर आहे तुम्ही। शुद्धीवर येण्याची वाट बघत थांबले तिने नर्स चा हात पकडला आणि रूमच्या बाहेर अली आई ने त्रिशा ला पकडलं तु ठीक आहे ना माझा बच्चा त्रिशा बोलली। हो नील तिला बघताच क्षणी समोर आला आणि म्हणाला तुला त्रास होत नाही ना बंर वाटतं ना त्रिशा काहीच बोलली नाही ती एकटक पाहत होती नील मागे झाला त्रिशा चे बाबा चल घरी जाऊन आराम कर आई हो अर्जुन मी घरी सोडतो चला आई चल त्रिशा पण त्रिशा नील ला बघत। थांबली तिने आईचा हात बाजूला केला सगळे तिच्या कडे च पाहत होते ती नील जवळ गेली तिचे डोळे पाण्याने भरलेले होते ती नील च्या गळ्यात पडून रडायला। लागली नील ने ही तिला आपल्या मिठीत घट्ट धरले आई ने त्रिशा ला ओडले नील ने तिला सोडले बाबा त्रिशा ला बोलले चल बाळा घरी जाऊन आराम कर त्रिशाला नीलला सोडून जायची इच्छा होत नव्हती तिने नील कडे बघितले तो ही तिच्या कडे बघत होता डोळ्याने इशारा दिला जा म्हणून ती निघाली। नील त्याचे आईवडील ,अर्जुन सगळे निघाले अर्जुन घरी आला गाडी तुन उतरून बाहेर च बसला त्याचे सगळे स्वप्न तुटले होते त्याला घरी कस सांगू कळत नव्हतं इकडे त्रिशा घरी आल्यावर आई बाबा चिडलेच होते पण त्रिशा ची तबियत बघून दोघेही शांत होते त्रिशा ला आईने रूम मध्ये घेऊन गेली आई तिच्या शी बोलत नव्हती त्रिशा म्हणाली आईला साॅरी आई मी आधी सांगायला हवे होते आई बोलली आपण यावर तु बरी झाल्यावर बोलू तु झोप काही हवं असेल तर सांग रूममधून निघून गेली आई एकटीच हाॅल मध्ये येऊन रडत होती बाबा आले आणि खांद्यावर हात ठेवून रडून काय होणार आहे आपणच दोषी आहे ह्या सगळ्या गोष्टी साठी आणि चेअर वर बसले नील ने तर खूप तिला संभाळून घेतले पण त्रिशा ला स्वताच खरं करायच असतं तिला आपण सवय लावली ती मागायच्या आधी तिच्यासमोर ती गोष्ट ठेवली आ़पण आई वडील आहो म्हणून करत होतो पण नील ने खूप तिला प्रेम दिल ती जी म्हणल ती पूर्व दिशा कधी तिच मन दुखावलं नाही त्याने तिला एक गोष्ट मागितली की ...हिने नातं च तोडले अशी हि मुलगी आणि तु त्रिशा च अर्जुन बरोबर लग्न करायला तयार झाली ती कधी काय करेल कळणार नाही तीन वर्षांनंतर नील ला आपण बघतो आजही त्रिशावरच प्रेम कमी नाही झालं देवाच्या ही मनात आहे नील त्रिशा ची आयुष्य भरची साथ आई काही च बोलली नाही शांत विचार करत होती त्रिशा सकळी ऊठून बाहेर येऊन बसली होती आई ने तिला चहा दिला आणि आत आली त्रिशा आई शी काही ना कारणांनी बोलायचा प्रयत्न करत होती आई ला जास्त वेळ अबोला धरता आला नाही त्रिशा ने आईचा रुसवा काढला तिकडे नील ला त्रिशा ची काळजी लागली होती पण तिला फोन किंवा भेटायला गेलो तर अजुन प्रोब्लेम वाढतील त्याला राहवलं नाही त्रिशा ला मेसेज पाठवून दिला how are you? त्रिशा काल रात्री पासून नीलच्या मेसेज काॅलची वाट बघत होती मेसेज बघून खूप खुश झाली लगेच रिप्लाय केला तिने मी ठिक आहे don't worry नील ला बर वाटल तिला वाटलं अजून काही तरी मेसेज। येईल पण नील ने केला नाही ती विचारात पडली तितक्याच बेल वाजली अर्जुन आला होता.आई ला खुप गिल्टी झालं होतं काल एवढे घडून सुध्दा त्रिशाची तबियतीची विचार पुस करत होता अर्जुन त्रिशा थोडायावेळ शांतच होते अर्जून :मी तूला नील बद्दल काही विचारणार नाही शेवटी तुझं पर्सनल आहे तुझी इच्छा मी तुला फक्त एवढंच विचारतो तू माझ्या बरोबर लग्न करणार... तु झ काहीही उत्तर असू मी तयार आहे त्रिशा ला कस त्याला बोलावे हे च कळत नव्हतं त्रिशा म्हणाली अर्जुन मला तु खुप आवडतो अँज अ फ्रेंड यापलीकडे काही च नाही साॅरी अर्जुन मला समजून घे मी फक्त नील वर च प्रेम करते तीन वर्षं आम्ही वेगळे होतो असा एक दिवस गेला नाही कि त्याला मिस केल मला हे हि माहित आहे की नील ही माझ्या शिवाय राहू शकत नाही. तो माझ्या पेक्षाही जास्त प्रेम माझ्या वर करतो हे बोलायला ही मला गर्व वाटतो मी त्यावेळी खुप स्वार्थी झाले होते तेव्हा च मी हट्ट सोडला असता तर आज ....त्रिशा शांत झाली अर्जुन तिलाच बघत राहिला तिचे शब्द मनावर वार करत होते त्याला त्याचे उत्तर मिळाले होते अर्जुन हसत म्हणाला आपण जीवनसाथी झालो नाही तर काय झालं एक चांगले फ्रेंडस राहुच त्रिशा बोलली हो तुझ्या सारखा मित्र मला हवा आहे दोघेही एकमेकांना बघून हसले अर्जुन ने तिला बाय केलं आणि तिथुन निघाला.. गाडीत बसल्यावर त्याच्या अश्रुंचा बांध फुटला.....