सहयाद्री आपाल्या गडांच्या राजासह आमचे स्वागत करायला अनेक हात पसरवून उभा होताकाही ट्रेकक अचानक ध्यानीमनी नसताना घडून जातात...तसेच आमच्या बाबतीत झाले होते...रविवार आणि सोमवार सुट्टी जोडून आली होती...आणि आम्ही "किल्ले प्रतापगड" ला जायचे जवळ जवळ नक्की केले...शुक्रवारी खरेदी आणि तयारी निमित्त मी आणि भिवाजी दादर ला फिरत होतो(लीडर लोकांना हे असे करावेच लागते )...तेव्हा एक ठिकाणी पोस्टर पाहिले...सोमवारी दसऱ्याच्या निमित्ताने गडावर काही कार्यक्रम होता आणि त्या निम्मिताने पोलीस बंदोबस्त असणार हे उघड होते...तेव्हा दसऱ्याच्या दिवशी आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्याचा आमचा बेत बारगळला....९ जण गुडघाय्ला बाशिंग बांधून तयार होते...आता माघार घेणें जवळ जवळ अशक्य होते..काँट्रीब्युशन आले होते...खरेदी पण झाली होती...
शनिवार ऑफिसचे काम राहिले बाजूला...सर्व नक्की करण्यात वेळ गेला...तेव्हा सर्च करता करता डोळयासमोर " किल्ले राजगड "चे नाव आले... आणि मी, भिवाजी आणि दीपक एकदंम बोलून गेलो...हा पक्का...मग काय...सर्वाना SMS केले ( व्हाट्सअँप नव्हते तेव्हा )...दादर वरून मी , दीपक, किरण, बळीराम, राकेश आणि ठाणे स्टेशन ला भिवाजी , अमित आणि अनिल मेहता ( ह्याचा हा पहिलाच ट्रेकक होता...ऑफिस मध्ये होता हा आमच्या..प्रथमच झारखंड सोडून मुंबई ला जॉबच्या निमित्ताने आला होता) असे भेटलो...आणि बरोबर ११. १५ ला डेपोत पोचलो... ११. ३० ची शेवटची स्वारगेट ची एशियाड होती ( त्यानंतर S.T एकदम सकाळी होती)...प्रसाद अजून एक मेंबर डेपो वर आधीपासून आला होता...पण त्याला येणे शक्य नव्हते असे समजले आणि पेनल्टी म्हूणन तो अजून ५०० रुपये द्यायला तयार होता...पण मी आणि भिवाजी (ट्रेककचे लीडर) ते स्विकारायला स्पष्ट नकार दिला ( केवढा मोठेपणा हा आमच्या मनाचा बघा )..
इमाने इतबारे स्वारगेट S.T अगदी वेळेवर आली आणि ११.३० ला आम्ही निघालो...गाडी अगदी खाली होती..ऎसपैस पसरायला आम्हाला जागा मिळाली..आणि त्याचा फायदा घेत आम्ही गपगुमान ताणून दिले...सकाळी ३ वाजता गाडी स्वारगेट ला पोचती झाली..चौकशी केल्यावर कळले राजगड च्या दिशेने जाणारी "वेल्हे" यष्टी ( तिथल्या भाषेत ) S.T वेळापत्रकांनुसार ६.१५ आणि भारतीय वेळापत्रकानुसार ६. ३० किंवा ६. ४५ ला येणार होती...तब्ब्ल ३ तास होते हातात... करणार काय ??? आम्ही झोपायचा प्रयत्न करून पाहिला...पण छे तिथल्या मच्छरांनी आणि वेगवेगळ्या आवाजांनी तो हाणून पाडला... ५ वाजले होते..तेवढ्या २ तासात भिवाजी सोडून आम्ही सर्व गुपचूप बसून होतो...मात्र भिवाजी तेवढ्या वेळात जवळ जवळ १० ते १२ वेळा "वेल्हे" यष्टी ची स्वारगेट ST स्टॅण्डवर सर्व कॉउंटवर चौकशी करत फिरत होता आणि तेच उत्तर टी-शर्ट ( पदर नव्हता ना त्याच्याकडे....खीखीखीखी) मध्ये पाडून घेत होता ...अमित ला आणि मला मात्र आता भीती वाटत होती...हा भिवाजी आता वैतागून स्वतः S.T चालवतो कि काय ??
हातात अजून १ तास होता....तेवढ्या वेळात सर्वानी निसर्गाच्या हाकेला हो देऊन मोकळे होऊन घेतले ..आणि तिथल्या एका हाटेल मध्ये मोर्चा वळवला...यथेच्छ मिसळ पाव वर ताव मारला आणि पॉट स्थिर-स्थावर झाल्यावर..."वेल्हे" यष्टी ची वाट पाहत उभे राहिलो...बरोबर आपल्या स्वतःच्या वेळापत्रकानुसार गाडी ६. २५ ला आली ...आणि हे ५० ते ६० जण गाडी पकडायला धावत सुटले...त्यातला त्यात दीपक, भिवाजी आणि अमित ने धावत जाऊन आणि अक्षरशः झोपून गाडीत जागा मिळवली...आम्हाला पुणे - वेल्हे या हमरस्त्यावरील "मार्गासनी" या गावी उतरायचे होते (गुंजवणे दरवाज्याने राजगङ)...आणि पुढे जाऊन हीच S.T किल्ले तोरणा च्या पायथ्या जवळ जाते...त्यामुळे ट्रेककर लोकांची ह्या S.T ला गर्दी असते...पुणे वरून राजगड ला जायला ५ वाटा आहेत त्यातला त्यात "गुंजवणे दरवाज्याने राजगङ " आणि "पाली दरवाज्याने राजगड" हे आम्ही निवडले होते.. त्यातही पाली गावची S.T ची माहिती न मिळाल्यामुळे आम्ही "गुंजवणे दरवाज्याने राजगङ " हा मार्ग नक्की केला...
८ च्या सुमारास गाडी "मार्गासनी" पोचली तिथे आम्ही ८ जण आणि अजून एक ग्रुप८जण एकूण १६ जण मिळून सुमोत बसलो(आमच्या बॅगे सकट)...चालत जायचे असेल तर १ ते १.३० तास लागतो...८.३० च्या सुमारास आम्ही गुंजवणे गावी पोहचलो...आणि पुढे बघतो तर काय..सहयाद्री आपाल्या गडांच्या राजासह आमचे स्वागत करायला अनेक हात पसरवून उभा होता...आमची चढाई सुरु झाली "गुंजवणे दरवाज्याने राजगङ "...अर्ध्या वाटेवर आलो जवळ जवळ १. ३० तास चालत होतो आम्ही तेव्हा वरून येणाऱ्या एक ग्रुप कडून आम्हाला समजले आणि आमची पण खात्री झाली...आम्ही वाट चुकलो.. फोटो काढण्याच्या नादात आम्ही भलती कडेच भरकटलो.....
क्रमश :