Pralay - 22 books and stories free download online pdf in Marathi

प्रलय - २२

प्रलय-२२

महाराज विश्वकर्मा जलधि राज्याकडून जी पाच हजारांची सैन्य तुकडी घेऊन आले होते त्या तुकडीच्या तळावरती स्मशान शांतता पसरली होती . काही वेळापूर्वी एक जळता तीर येऊन जमिनीत घुसला . त्याच्यावरती असलेल्या संदेशपत्रांमध्ये एक मजकूर लिहिला होता . " गपचूप , जिथून आला तिकडे माघारी जा , अन्यथा तुमच्या महाराज विश्वकर्मासहीत इतर सातही जणांच्या बलिदानासाठी तयार राहा..... "
विक्रमाने रितिरिवाज व परंपरा बाजूला सारत बोलण्यासाठी , संधी करण्यासाठी आलेल्यांवरती पाठीमागून वार केला होता . त्याच्यांबरोबर आलेले सैनिक मारून टाकत उरलेल्यांना कैद करून आणलं होतं . ज्या लोकांना त्याने कैद केलं होतं ते सामान्य सैनिक नव्हते . कसलेली योद्धे , राज्यसभेतील मंत्री , मुत्सद्दी होते . त्यांच्या मृत्यूमुळे जलधि राज्याची सैन्याला कधीच न भरून निघणारी हानी होणार होती . सारेजण विक्रमाच्या ताब्यात असल्याने सेनेची धुरा भगीरथाच्या खांद्यावर होती . त्या स्मशानात शांततेला तोडत तो बोलू लागला....
" जेव्हा जेव्हा शत्रू कूटनीती किंवा कपटकारस्थान करतो त्या त्या वेळी समजून जा कि समोरासमोर युद्ध करायला तो घाबरलेला आहे . याचाच अर्थ विक्रम आपल्या बरोबर युद्ध करायला घाबरत आहे . आपण जरी त्याला घाबरत नसलो तरी आपणही हे त्याच्याशी समोरासमोर युद्ध करू शकत नाही , कारण महाराज विश्वकर्मा सोबत इतर सात मंत्री व मुत्सद्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे.... आपण युद्ध करणार हे तर नक्की पण जरा हुशारीने . विक्रमाला आपण दाखवून देऊ आपण जेव्हा कट-कारस्थान करतो त्यावेळी शत्रूची कशी नाकाबंदी होते . उद्या उगवत्या सूर्याबरोबर आपण आपला तळ उठवणार आणि जलधि राज्याच्या दिशेने निघणार , मात्र आपण अगदी मुंगीच्या गतीने हळूहळू निघणार . तेही रात्रीपर्यंत... एकदा का विक्रमाची खात्री पटली की आपण निघून चाललो आहोत , तेव्हा एक तुकडी विक्रमाच्या तळावर जाऊन विश्वकर्मा ना सोडवणार व परत आणणार . तोवर आपल्या लांब पल्ल्याच्या तोफा आपण तयार करून ठेवायच्या व आपले मंत्री आपल्या गोटात आले की तोफा डागायला सुरुवात करायची...." भगीरथाच्या या भाषणाने सेनेमध्ये जोश पसरला . पण या योजनेसाठी ते सात जण नक्की कोठे ठेवले आहेत हे माहीत असणे गरजेचे होते , आणि ते शोधून काढण्याची जबाबदारी भगिरथाने घेतली . " ज्या ठिकाणी त्यांना बंदिस्त ठेवले असेल त्या ठिकाणाहून मी काहीना काहीतरी खून करेन की जेणेकरून तुम्हाला ती अंधारातही दिसेल..." असं म्हणत भगीरथ त्याची हेरगिरी करायला तयार झाला...
विक्रमाच्या सैन्य तळापासून काही अंतरावरती एक नगर होतं . त्यांत भगीरथाने व्यापारी होत प्रवेश केला . मदिरेच्या दुकानातून त्याने मदिरा घेतली . नंतर वैद्याकडून काहीतरी औषधे व सुगंधी द्रव्ये घेतली . बराच वेळ तो सारकाही मिसळत होता . त्याने एक प्रकारची सुगंधित मदिरा तयार केली . त्याच्या व्यापारी मित्राला त्याने एक प्यायला दिला , तो जागीच जिंगल आणि बेशुद्ध झाला . ती मदिरा घेऊन तो विक्रमाच्या सैनिकी त्यावर जाण्यासाठी निघाला . रात्र होण्याची वाट पाहत तो बराच वेळ थांबला . इतके दिवस काही न करता बसून असलेल्या असलेल्या सैनिकांसाठी करमणूक म्हणून वेश्या घेऊन जाण्याचा त्याच्या डोक्यात विचार आला . त्याला विश्वकर्मा व इतर जणांना बंदिस्त केल्याचे ठिकाण तर माहीत झाले होते . त्याच ठिकाणी त्याने वेश्यालयातून काही वेश्या नाचण्याच्या कार्यक्रमासाठी आणल्या . नाचगाण्याच्या कार्यक्रमात गुंग झालेल्या सैनिकाला त्याने सुरुवातीला साध्या मदिरीचे वाटप केलं . नंतर जरा नशा चढल्यावरती , त्याने बनवलेली मदिरा सर्वांना वाटली . एकापाठोपाठ एक सर्व सैनिक बेशुद्ध झाले . आलेल्या वेश्या आल्या वाटेने निघून गेल्या . भगीरथाने एक मोठा टेंबा घेवून लांब बाबूवर बांधून हवेत उंचावला व वाट बघत राहिला.....
ठरल्याप्रमाणे घोडेस्वारांची एक जलद तुकडे विक्रमाच्या सैनिकी तळापासून काही अंतरावर ती थांबली होती . ज्या वेळी हवेत तरंगता टेंबा दिसला त्या वेळी 50 सैनिकांची तुकडी हळूहळू पुढे सरकू लागली . टेहाळणी पथकाचे सैनिक अधून मधून येत होते . त्यांचा तिथेच निकाल लावला जात होता . शेवटी ते अपेक्षित ठिकाणी पोहोचले . सर्व सैनिक बेशुद्ध होते . ज्या ठिकाणी विश्वकर्मा व त्यात सात जणांना बंदिस्त करून ठेवले होतं ते भुयार होतं . " आत फार काही सैनिक नाहीत वरच्या सैनिकांचा तर निकाल लावलाच आहे . " भगीरथ त्यांना म्हणाला . ते सर्व कारागृहात पोचले . सर्वांना सोडून ते बाहेर पडू लागले. पण समोरच एक सैनिक चालत येताना दिसला . त्याला बेशुद्ध पडलेले सैनिक दिसले . त्याचा हात कमरेच्या शंखाला गेला . तोवरच त्याच्या गळ्याचा एका भाल्याने वेध घेतला . तळातून बाहेर पडण्याच्या मार्गावर असतानाच त्या रात्रीच्या शांततेत शंखाचा आवाज घुमला . बाहेर पडले खरे त्यांच्या मागे सैनिक लागले . भगीरथाने गडबडीत जळता तीर त्यांच्या स्वतःच्या तळावरती सोडला , आणि ठरल्याप्रमाणे विक्रमाच्या सैनिकांवर तोफा दहाडून बरसू लागल्या . आता युद्धाला सुरुवात झाली होती....
रुद्रा त्या जंगलातील जमातीचा प्रमुख झाला . त्याला त्याच्या पदावर ती बसवण्यासाठी विशेष कार्यक्रम ठेवलेला होता . नाचगाणे मदिरा स्वादिष्ट जेवण सारं काही होतं . पण रूद्राचे मन थाऱ्यावर ती नव्हतं . मीरा अजूनही त्याला टाळत होती । सारा प्रसंग झाल्यापासून त्यांचं बोलणं झालं नव्हतं. प्रमुखाच्या खोलीत तो समारंभासाठी तयार होत होता . मीरा काहीतरी ठेवण्यासाठी त्याठिकाणी आली . पण त्याला पाहताच ती गडबडीने निघुन जाऊ लागली .
" मीरा माझं म्हणणं ऐकून घे ..." तिला अडवत तो बोलला .
" काय ऐकून घ्यायचं आहे , ज्या लोकांनी तुला घर दिलं , परिवार दिला , प्रेम दिलं . त्यांचा कसा घात केला हे ऐकून घ्यायचं ; की स्वतःच्या फायद्यासाठी पोटच्या पोराचा ही बळी दिला हे ऐकून घ्यायचं ... "
रुद्राला काहीच बोलता आलं नाही .
" मला कळत नाही लोकांनी तुला का म्हणून प्रमुख केलं...? लोक फसतील तुझ्यात चालीला . आरुषीला मारलं म्हणून तुझी पापं धुतली जाणार नाहीत , आणि एक लक्षात ठेव कोणताही निर्णय घेताना विचार करून घे . नाहीतर तुझ्या मृत्यूची गुढ साक्षात देवालाही उघडता येणार नाही . "
त्याचा हात बाजूला सारत रागारागात मीरा निघून गेली . रुद्र अधिकच खचला . केलेल्या कृत्यांचा त्याला पश्चाताप होत होता . आता त्याला स्वतःचाच राग येऊ लागला . कोणत्या क्षणी त्यांना मदत करण्यासाठी तयार झालं असं त्याला वाटू लागलं . रागारागाने त्याने वस्तूंची तोडफोड सुरू केली . शेवटी वैतागून त्याच्या डोळ्यातून पाणी आले. त्याचा पश्चाताप खरा होता पण तो ते कसे सिद्ध करणार... मीराच्या प्रमाणे ते लहान मुल त्याचेही होतं . तो मुलगा त्याचाही होताच......
समारंभ सुरू झाला सुरुवातीला नाचगाण्याचे करामतिचे , आणि नंतर नंतर मोठ्या योद्ध्यांच्या द्वंद्वाचे कार्यक्रम झाले . नंतर त्याच्याकडून शपथ घेण्यात आली " हे जंगल , जंगलातील वृक्ष, वेली , पशुपक्षी , प्राणी , कीटक , माती , हवा ,पाणी या सार्‍यांची सुरक्षा करण्याची माझी जबाबदारी आहे ...."
त्यानंतर बराच वेळ कार्यक्रम चालत राहिले . रुद्राने भरपूर मदिरा घेतल्यामुळे तो धुंदीत होता . तो धुंदीतच त्याच्या खोलीत आला . त्याठिकाणी मीरा बसली होती.... " मीरा... मीरा ....
तो रडत रडत तिच्याकडे गेला . तो रडत रडतच बोलत होता . पण त्याला बोलू न देता तिने त्याला झोपवले . त्याचे कपडे काढून बाजूला टाकत स्वतः विवस्त्र झाली . रुद्र अजूनही धुंदीत होता . त्याच्या वरती आरुढ होत ती हालचाल करू लागली . काही वेळानंतर रुद्राचे बीज तिच्या गर्भाशयात जातात ती बाजूला झाली . कपडे घालत मागील दाराने निघून गेली . ती मीरा नव्हती . मात्र तेव्हाच पुढील दारा समोर उभी असलेली खरी मीरा रागारागाने तिथून निघून गेली ......

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED