प्रलय - २५ Shubham S Rokade द्वारा साहसी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रलय - २५

प्रलय-२५

सुवर्णनगर , लोहगड , रत्नागिरी अग्नी आणि ज्वाला ही पाच संसाधनं राज्य होती . पाच राज्यात नावाप्रमाणेच विविध खनिजे व संपत्ती होती . त्या पाच राज्यांवर ती इतर सर्व राज्यांची मिळून सत्ता होती . स्थानिक लोकांना म्हणजेच मातील्या लोकांना तिथे बळजबरीने कामाला लावले जात होते . मात्र त्या लोकांनी उठाव करून पाचही राज्य ताब्यात घेतली होती . मातीतल्या लोकांचा नेता अंकित होता . पाच राज्यांमध्ये आता त्याच्या नेतृत्वाखाली बरेच बदल झाले होते . त्यांच्याकडून जनावरासारखे काम करून घेतले जायचे आणि पुरेसे अन्नही नाही दिले जायचे . पूर्वी इतर राज्यांची सत्ता असल्याने व्यापार नावाची गोष्टच नव्हती. जे ते राज्य लागेल त्या गोष्टी ज्यांच्या त्यांच्या हिश्यातून घेऊन जायचे. त्यामध्ये हाल व्हायचे तिथे स्थानिक लोकांचे. इतर लोक त्यांना मातीतले लोक म्हणायचे खरे मात्र ते स्वतःला पहिले मानव म्हणायचे . तसे पाहता आता संसाधन राज्ये पूर्णपणे प्रथम मानवांच्या ताब्यात होते . त्यांनी स्वतःच सैन्यही तयार केलं होतं . उपलब्ध खनिजांपासून वेगवेगळी शस्त्रेही तयार केली होती . जरी बाहेरून कोणी आक्रमण केलं तरी तरीही त्यांना सहजासहजी राज्य हस्तगत करता येणार नव्हतं .

पूर्वी पाच नामधारी राजे होते त्यांना दररोज आठ तास काम काम करायला लावलं जात होतं , आणि पूर्वी जे इतर लोकांना खायलख जे अन्न दिलं जात असे तेच त्यांनाही दिलं जात होतं . पूर्वी त्या लोकांना त्रास होत होता तो आता बंद झाला होता . अंकित पाच राज्याचा प्रमुख असला तरी प्रत्येक राज्यात पाच जणांचं विश्वस्त मंडळ असे 25 जण त्याने सर्व कारभार चालवण्यासाठी निवडले होते . त्याला वाटलं होतं सर्व राज्य आपल्या लोकांकडे आल्यावरती पहिल्यांदा विरोध होईल तो बाहेरील राज्यांचा , ज्यांनी त्यांच्यावरती गुलामगिरी लादली होती त्यांचा . मात्र ज्या विश्वस्त मंडळाच्या ताब्यात त्याने लोहगड हे राज्य सांभाळण्यासाठी दिलं होतं त्यांनी त्याच्या विरुद्ध उठाव केला . त्यांच्याशी हर प्रकारे संवाद साधण्याचा प्रयत्न करून पाहिल्यानंतर शेवटी सैनिक घेऊन स्वारी करण्याचे ठरवले . त्याची युद्धनीती भयानक होती . फार काही रक्त न सांडता लोहगड त्याच्या ताब्यात आले . त्या पाच गद्दार नेत्यांना व त्याच्या विश्वासू नि खास निवडक लोकांना त्याच्यापुढे उपस्थित केले होते ......
" पिढ्यानपिढ्या आपण आपलं जीवन गुलामगिरीत जगत होतो . आपण या पृथ्वीतलावरील प्रथम मानव , मुक्तपणे पृथ्वीतलावरती विहार करण्याऐवजी या खाणीत काम करण्याची गुलामी त्यांनी आपल्यावरती लादली . आपल्याला आपले सण-उत्सवही साजरे करता येत नव्हते . आपली परंपरा पुढे चालवता येत नव्हती . आपण फक्त जनावरासारखे काम करत होतो . आता उठावानंतर परिस्थिती बदललेली आहे . पाचही राज्यावरती आपली सत्ता आहे . आता आपण एकत्र यायचं सोडून याच्यांसारखे लोक आपल्या आपल्यात फूट पाडत आहेत . आता तर कधी नव्हे ते अधिक एकत्र येण्याची गरज आहे . या पृथ्वीतलावरील खनिज संपत्ती आपल्या ताब्यात आहे . आपण काहीही शक्य करू शकतो . फक्त गरज आहे ती एकत्र येण्याची . आपापसात मतभेद नकोत . कुणाला काही बोलायचे असेल तर त्यांनं समोर येऊन बोलावं , प्रत्येकाच्या मताचा आदर केला जाईल . पण पाठीमागे असले धंदे करू नयेत . ......."
असं म्हणत त्याने त्याची तलवार काढली व पाच जणांचा प्रमुख ज्यानं सर्वांच्या डोक्यात विश पेरलं होतं त्याचं शीर धडावेगळे केले....
" हा आपलाच माणूस होता , पण या एका माणसामुळे आपली १७ माणसे मृत्युमुखी पडली . त्यामुळे त्याला शिक्षा होणं आवश्यक होतं.......
अंकितच्या अशा धडाडीच्या निर्णयामुळे प्रथम मानवांचा प्रमुख झाला होता त्याच्या प्रत्येक निर्णयाला सामान्य जनतेचा पाठिंबा असायचा.....

मारूतांच्या जुन्या महालात मुख्य पुजारी भैरव त्याचा मुलगा पार्थव आणि प्रलयकारिका उभे होते . तो महाल मारूतांच्या गतवैभवाची साक्ष देत होता . मात्र आता त्याची अवस्था दयनीय झाली होती .
" आपल्याला जर सार्‍या पृथ्वीवरती साम्राज्य पसरवायचं असेल तर पहिल्यांदा संसाधन राज्य ताब्यात घ्यावी लागतील एकदा का संसाधन राज्यांवर की सत्ता आली की बाकीच्या राज्यांवर ती सत्ता मिळविण्याचा मार्ग मोकळा होतो ......" भैरव बोलत होता .
संपूर्ण पृथ्वीवरती साम्राज्य प्रस्थापित करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती . प्रलयकारी केला जागृत करून स्वतःच्या फायद्यासाठी वापरून तो आगीशी खेळत होता . त्याने प्रत्येक विधीमध्ये थोडाफार बदल केला होता जेणेकरून प्रलयकारीका त्याच्या ताब्यात राहील .
" पण उडत्या बेटांवरती असलेलं प्रलयाला जागृत करण्यासाठी लागणारे........
प्रलयकारी का भैरवाला तोडत मध्येच बोलू लागली । पण तिचं वाक्य पूर्ण होण्याअगोदर ही भैरवाने त्याच्या हाताची मूठ वळताच ती तडफडून खाली पडली व भयंकर वेदनांमुळे विव्हळू लागली.....
" मी सांगतो तेच करायचं बाकीचं बोलायचं नाही.....
भैरव बोलला . भैरवने केलेल्या विधींमुळे तिची शक्ती भैरव आणि त्याचा मुलगा पार्थव या दोघांवरतीही चालत नव्हती....
" संसाधन राज्यात मध्यंतरी उठाव होऊन नवीन राजा उदयाला आला आहे . मला त्याचं मस्तक हवं आहे . आणि सार्‍यांना कामाला लाव . खनिज तेल , कोळसा लोखंड आता भरपूर लागणार आहे . त्याने प्रलयकारिकेला आदेश दिला . ती गपचूप तिथून निघून गेली .
" पार्थ तुला तू विश्वनाथ माहित आहे ना रे .....
भैरव तो मुख्य पुजारी त्याच्या मुलाला म्हणाला
" हो माहित आहे ....
" तो कुठे आहे हे जरा माहिती कर.... त्याची भेट घ्यायची आहे . आपल्या नियोजनाप्रमाणे काळी भिंत पडायला हवी होती . मात्र त्या तंत्रज्ञ मंदारच्या मुलाने मध्येच घोळ घातला . आपल्याला लवकरात लवकर भिंतीपलीकडील सम्राटाची गरज आहे . कारण मारुत आग्नेय आणि जलधि राजे एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत . त्यांच्यासोबत तंत्रज्ञ मंदारही आहे . त्यामुळे निव्वळ प्रलयकारीका असून भागणार नाही....
त्याचा आज्ञाकारी पुत्र पाठव लगेच निघून गेला. मारुतांचा मुख्य पुजारी म्हणजेच भैरव कितीतरी वर्षांपासून नियोजन करून , प्रत्येक घटना त्यावर ती येणाऱ्या क्रिया-प्रतिक्रिया यांचा अभ्यास करून त्याने अतिशय कलाकुसरीने विजयासाठी असणारा हा सारा साचा तयार केला होता . लहानपणी तो मारूतांच्या आश्रयाला होता . त्यावेळी त्यांच्याकडे ना कोणतं राज्य होतं ना कसाची सत्ता होती तरीही त्यांच्याकडे किती गर्व असायचा . भैरवाची लहानपणी फार हुडतूड व्हायची . त्यामुळे त्याच्या मनात त्यांच्याविरुद्ध द्वेष भरला होता . अकराव्या मारूत राजाच्या पत्नीला जेव्हा प्रसुती वेदना चालू झाल्या त्यावेळी दुसऱ्या एका दासीलाही प्रसूतिवेदना सुरू होत्या . भैरव हा बऱ्याच शास्त्रांमध्ये निपुण होता. वैद्यकीय शिक्षणातही त्याचा कोणी हात धरू शकत नसे . अकरावा राजा मारुत कितीतरी वर्षापासून मुलासाठी प्रयत्न करत होता . मात्र अजूनही त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले नव्हते . मात्र यावेळी राणी गरोदर राहिली होती आणि मुलही सुदृढ जन्माला आले. पण भैरवाने राणीचा मुलगा दासीच्या मुलीबरोबर बदलला . ती मुलगी म्हणजे आरुषी होती व तो मुलगा म्हणजे रुद्र होता . भैरवाच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. जर रुद्राचा मृत्यु झाला तर तीन राजे एकत्र येणारच नाहीत आणि प्रलयकरिकेला कोणीच अडवू शकणार नाही .

क्रमःश....