Pralay - 27 books and stories free download online pdf in Marathi

प्रलय - २७

प्रलय-२७
त्या तीन माया होत्या . म्हटल्यातर तीन होत्या . म्हटल्यातर एक होत्या . एक माया तीन प्रकारची किंवा तीन माया एक प्रकारच्या . एकाच वेळी तिघींचा जन्म झाला होता . तीन बहिणी भलत्याच प्रसिद्ध होत्या . त्यांची माया कोणालाही मोहित करणारी होती . ते सुंदर रूप . तो महाल . महालातील प्रत्येक गोष्टीला त्यांचा मायावी स्पर्श होता . साक्षात भगवंताला ही त्यांच्या मायेचा हेवा वाटतो असे म्हणतात . त्या तिघींचा संवाद चालला होता .
पहिली माया
" प्रत्येक राजाकडून बीज आलेलं आवश्यक होतं प्रत्येकीने आणलंय ना....."
" हो मी मारूत राजाकडून . मारुतांचा राजा खरा प्रमुख आहे जंगली लोकांचा . एका जंगली स्त्रीचं रूप घ्यावे लागले मला . ....." दुसरी माया
" जलधिच्या राजकुमाराची आवड आणि निवड छान आहे . साधारण मानव आहे ती , मात्र सौंदर्य अगदी ओसंडून भरलय तिच्यात . रक्षक राज्याची राजकुमारी झाली होते मी , देवाव्रतासोबत....." तिसरी माया
" अरे फारच आनंदी दिसतेस तू..... दुसरी माया
" अरे जुन्या आठवणी जाग्या केल्या त्याने . मला खूप आवडला तो . मी बक्षीस म्हणून त्याला घ्यावं म्हणते...." तिसरी माया
" काहीही बोलू नकोस , मुर्खासारखं.... पहिली माया
" हो हो मला माहित आहे . म्हणूनच त्याला खुश करण्यासाठी काळ्या महालातील त्रिशूळ आणून दिला . त्याला हे सारं कळल्यावर स्वखुषीने येईल माझ्याकडे....... तिसरी माया
" आमच्या दोघीच सोड , तू आग्नेयेकडून जाऊन आले का नाही.... दुसरी माया
" हो माझंही काम झाले आता आपल्याकडे तिन्ही राज्यांची बिजे आहेत . आता फक्त योग्य वेळेची वाट पाहायची आहे... पहिली माया
" तंत्रज्ञ मंदार , म्हातारा मांत्रिक , आणि सुरूकुचालक आपल्याला शोधायला आलेले आहेत . त्यांना सांगायला हवा ..... दुसरी माया

तंत्रज्ञ मंदार , तो म्हातारा मांत्रिक , आयुष्यमान नि ते दोन बुटके अचानक त्या मायावी महालांमध्ये बोलवले गेले . त्या तीन मायावतींनी त्यांना भेटण्यासाठी बोलवलं होतं . तो महाल काय आलिशान होता . आग्नेय राजांच्या महाला पेक्षाही त्याची भव्यता दिव्य होती . समोर रत्नखचित सुवर्ण मंडित आसणे होती . त्यावर ती त्या तिघीही बसल्या होत्या .
" प्रलयकारिकेचा जन्म झाला आहे . सुरुकुचालक तिला थांबवू शकला नाही आणि तुम्हा दोघांनाही ते शक्य नाही . म्हणून तुम्ही आमच्या कडे आलात ....
देवव्रताला त्रिशुळ , देणारी तिसरी माया म्हणाली...
" तू गप्प बस ग..... दुसरी माया म्हणाली ....
" तिला अजून थोडा मोठा बोलण्याचा अनुभव नाही तुमचं येण्याचं कारण आम्हाला ज्ञात आहे , तुम्हाला अजूनही काही सांगायचं आहे का .......
" काही नाही . प्रलय थांबवण्यासाठी आम्ही काही तुमची मदत करू शकतो का.... तंत्रज्ञ म्हणाला ...
" आमची पद्धत फक्त आम्हालाच माहित आहे . फक्त आम्हीच कार्यान्वित करू शकतो . तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रयत्न करा . योग्य वेळ आली की आम्ही कार्यवाही करू.... पहिली माया
आणि पुन्हा एकदा ते सारे महला बाहेर फेकले गेले.....

जेव्हा रुद्राला कळाले कि रात्री भलताच घोळ झाला , त्यावेळेस त्याची अवस्था फार विचित्र झाली होती . त्याला अजूनही आठवत होतं कि ती मीराच होती , पण त्याला कळालं होतं की ती मीरा नव्हती . मीरा सारखी दिसणारी दुसरी कोणती तरी येऊन त्याच्यासोबत हा खेळ खेळून गेली होती.
" स्वतःवरती शिव कर्ण बंद कर या जगासमोर अनेक मोठे प्रश्न आहेत आणि केव्हाही जागृत होऊ शकतो त्याला थांबवण्यासाठी तुझी गरज आहे या जगाला ......
अचानक खोलीतून आवाज येऊ लागला . आग्नेयांचे पूर्वज मारुतांच्या राजाला बोलवण्यासाठी आले होते...
" जास्त काळजी करू नकोस आम्ही काही शत्रू नाही ना मित्र आहोत गरज आहे मार्गांच्या खऱ्या वारसाची म्हणून तुझ्याकडे आलोय.......
त्यांनं आजूबाजूला पाहत आवाज कुठून येते बघायचा प्रयत्न केला , पण त्याला कळालं नाही . पुन्हा एकदा मारूतांचे नाव ऐकताच रुद्राच्या तळपायाची आग मस्तकाला गेली . त्याने तिथेच असलेल्या एका एक पाण्याने भरलेला जग उचलून जोरात फेकला .
" कितीही आदळआपट केली तरी सत्य काही बदलणार नाही . तु मारूत होतास , मारुत आहेस आणि मारूत राहणार आहेस . तू मारूतांचा खरा बारावा राजा आहेस....
" मारुतांचा नि माझा संबंध केव्हाच संपला आहे . सगळे मारूत मला मृतासमान समान आहेत . मारुत माझ्यासाठी तेव्हाच मेले त्यावेळी न केलेल्या गुन्ह्यासाठी त्यांनी माझ्या आईला शिक्षा दिली . नंतर मलाही त्यांनी बहिष्कृत केलं.......
" तरीही तू त्यांना मदत केलीस ना . ज्या लोकांनी तुला साथ दिली त्यांना धोका दिलास ना.....
" तिथेच चुकलो मी . मला वाटलं ते घर आहे। आरुषी मुळे मी जरा गाफील झालो . पण आता मला माझं खरं घर आणि माझं खरं कुटुंब कुठे आहे हे चांगलेच समजलेला आहे..... आणि जोपर्यंत हे माझं घर आणि हे माझं कुटुंब सुरक्षित आहे तोपर्यंत मला बाहेरच्या जगाची अजिबात काळजी नाही . एकदा फसलो होतो आता पुन्हा फसणार नाही . मी मारूत नाही . मी या जंगलातील रहिवाशी आहे आणि हे जंगलच माझं घर आहे . बाहेरचं जग जळून खाक झाला तरी चालेल जोपर्यंत हे जंगल व माझी लोक सुरक्षित आहेत तोपर्यंत मला बाकीची काळजी नाही.....

जलधि राज्याचे राजमहार्षी व इतर जाणकार लोकांनी तो काळ्या महालातील त्रिशुळ वापरून त्रिशूळ सैनिकांना माणसात आणण्याचा उपाय शोधून काढला होता . त्यासाठी लागणारे सर्व साहित्यही गोळा झालं होतं। होमकुंड पेटला . सर्व बाबी पूर्ण झाल्या होत्या. इतर सर्व विधिही पूर्ण झाल्यानंतर राज महर्षींनी तो त्रिशुळ उचलला व होमकुंडाकडे जावू लागले . तो त्रिशुळ एकदा होमकुंडात पडला की सर्व संपणार होते . पण त्याच वेळी भिंती पलीकडून त्रिशूळ सैनिकातून एक त्रिशूळ फेकला गेला व तो राजमहर्षींना लागला . राज महर्षींची जागेलाच माती झाली .
त्रिशूळ सैन्य यासाठीच प्रसिद्ध होतं त्यांच्यात त्रिशूळचा स्पर्श नि मानवाचं अस्तित्वच नष्ट व्हायचं . राजमहर्षी होत्याचे नव्हते झाले आणि एकापाठोपाठ त्रिशुळ येऊ लागले . बरेच सैनिक बेसावध होते। ते जागीच मृत्यू पावले . त्यांची झालेली माहिती वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर उडू लागली . काहींनी सावध होत ढाली आडव्या धरल्या पण साध्या ढालींचं त्या त्रिशुळापुढे काही टिकाव लागत नव्हता . त्या ढालीसकट त्या सैनिकांची माती झाली .
" अभिमंत्रित ढाली घ्या अभिमंत्रित ढाली ....." महाराज कैरव बोलले .
मात्र त्याचवेळी एक त्रिशूळाने त्यांच्या छातीचा वेध घेतला . तेही जागेल्याच नष्ट झाले . महाराज कैरवांना या दिवसाची अपेक्षा होतीच . त्यामुळे ज्या दिवशी त्यांनी त्रिशूळ सैनिकाची आरोळी ऐकली होती त्याच दिवसापासून त्यांनी अभिमंत्रित ढाली तयार करण्याची आज्ञा दिली होती .

अभिमंत्रित ढाली प्रत्येकाच्या हाती जाईपर्यंत निम्म्याहून अधिक सैन्य नाहिसे झाले होते . शेवटी कसेबसे युवराज देवव्रताने तो त्रिशुळ घेत अग्निकुंडात टाकला . त्याबरोबर ते त्रिशुळ येणं बंद झाले . त्रिशुळ सैनिक नाहीसे झाले होते . तिथे आता जलधि राज्याचे सामान्य नागरिक होते . पण अर्धे सैन्य त्यासाठी बळी गेले होते . युवराज देवव्रताच्या डोळ्यात प्रतिशोधाचा अग्नी पेटला होता .

क्रमःश .....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED