Apurn - 1 books and stories free download online pdf in Marathi

अपूर्ण... - भाग १"पाहिले ना मी तुला, तू मला ना पाहिले, तरी कुठे मन वेडे गुंथले"....

हरी असाच दारू ची बाटली हातात घेऊन आपल्याच धुंदीत चालत घरी जात होता... चालत चालत तो रेल्वे क्रॉससिंग ला पोचला...

गाणं म्हणत म्हणत तो फाटक क्रॉस करत होता आणि मधीच तो पट्टरीवर बसला आणि जोर जोरात गाणे म्हणू लागला, हरी ला नशेत तो काय करतोय की कुठे बसला आहे त्याची जरा पण जाणीव नव्हती तितक्यात जोरात गाडी चा आवाज आला पण हरी ला काहीच शुद्ध नव्हती तो आपल्याच धुंदीत गाणे म्हणत होता.....

गाडी चा आवाज हळू हळू मोठा होत होता हरी ने जसच बघितलं की गाडी जवळ येत आहे तो उठला आणि गाडी च्या समोर पट्टरीच्या मधोमध येऊन थांबला...

त्याने डोळे बंद केले आणि दारू ची बाटली हातातून सोडली आणी हळूच म्हणाला "ईशा".….

हरी चा जीव मात्र जाणारच होता तितक्यात एका मुलीने जोरात हरीचा हाथ ओढला आणि हरी पट्टरीवरून खाली पडला, गाडी निघून गेली....

हरी ला काही समजलच नाही की नेमकं काय झालं, तो उठला आणि स्वतः सोबतच बोलायला लागला.…

"मी मेलो की नाही, स्वर्ग कुठे आहे.... सगळं काळं काळं दिसतंय हम्म नरक असेल हे"...

"यमदेव कुठे तुम्ही .... मी हरी, आलो इथं स्वागत करा माझा"...

तितक्यात ती मुलगी बोलली... "जिवंत आहे तू , समजलं का जा आता घरी"....

"जिवंत, तू वाचवलंस मला"...
"हो मीच अजून कोण दिसतंय का तुला इथं मीच वाचवलं तुला"....

"का वाचवलं मला, ए बघ ऐक घरी जा खूप रात्र झाली आहे घरी तुझी वाट पाहत असेल आई जा, हा जा"...

"ते तू समझ घरी, आई तुझी वाट पाहतेय, का स्वतः सॊबत असं करतोय जा घरी जा"... ती मुलगी अगदी प्रेमाने हरी ला बोलली

हे ऐकताच हरी परत खाली बसला आणि रडू लागला....

"काय तोंड घेऊन घरी जाऊ, मला नाही जगायचं, मी खूप चुका केल्या पण आता बस आता माझा कडून नाही होत आहे"....

"तू काहीच चुकीचा केलं नाहीये,प्रत्येक माणसाच्या जीवनात अशे दिवस येतात, जसंचांगलं वेळ निघून जातो हेहि निघून जाणार".... ती मुलगी

"पुढच्या महिनाला माझं लग्न आहे आणि आज मी, आज मी त्या लग्न साठी नकार दिला, आई बाबांनी त्या मुलीचा आई बाबांना काय जवाब दिला असेल, त्यांच्यावर काय वितली असेल आणि तू मुलगी तिची काय चूक होती बिचारी तिची काय अवस्था असेल हे ऐकून.... काय करू काहीच कळत नाही".….. हरी

"मग घरी जा आणि लग्न साठी हो म्हणून टाक"....

"नाही , लग्नाचा निर्णय टर मी असच रागात घेतला होता, मला वाटलं नव्हतं की एवढं सगळं होऊन जाईल मला तर फक्त इशा ला घाबरवायचं होतं पण यार, कायचं काय झालं सगळं.... पूर्ण वाटोळं करून ठेवलं आहे मी"....

"अजून काही बिघडलं नाहीये इशा ला जाऊन खरं सांगून टाकना म"...
"नाही ऐकत ना ती, आणि आता जेव्हा पासून तिला माझं लग्न जमलंय हे कळलं तेव्हा पासून तर ती अजिबात बोलायला मांगत नाही"....

"मग आता तिला सांग की तू लग्न मोडलं तिच्यासाठी, sorry बोल तिला माफी मांग"...

"ती ऐकेन का"...??

"हो ऐकेन ना, आणि आता घरी जा आई वाट पाहते तुझी"....

"तू पण जा तुझी आई पण वाट बघत असेल तुझी, चल मी तुला घरी सोडतो तसाही खूप रात्र झालीय कुठे राहते तु सांग,मी येतो तुला सोडायला"....

"मी तर इतच राहते"....

"इथं, कुठं....मस्करी करू नको चल मी सोडतो तुला"...

"अरे खरच मी इतच रहाते थांब तुला खोटं वाटाय ना"....

हरी ला काहिच समजत नव्हतं,ती मुलगी वळून समोर एका पट्टरिवर जाऊन थांबली.... आणि हरी काय विचार करेन त्या आधीच वेगाने एक गाडी त्या पट्टरीवरून गेली...

हरी जोरात ओरडला.....आईईए

गाडी तिथून निघून गेली, गाडी गेल्यावर हरी ने पाहिलं की तिथं कोणाचं नव्हतं, हरी खूप घाबरला त्याच्या अंग पसिनेने भिजलं,
आणि तितक्यात हरी ला आवाज ऐकू आलं...

"हरी घरी आई वाट बघतेय जल वकर घरी"....

आवाज ऐकताच हरी ने मागे फुडें काय बघितलं नाही आणि धावत सुटला फाटक ओलांगून तो पुढे जाऊन थांबला....

हरी खूप घाबरला होता, हिम्मत करून त्याने मागे पाहिलं....

आणि मागे पाहतच तो परत दचकला ती मुलगी तिथंच त्या गाडी च्या पट्टरीवर उभी होती आणि हारी ला हाथ हलवून "bye" म्हणत होती...
हे बघताच हरी ने देवाचा नाव घेतला आणि जोरात धावत सुटला.....
........….............................………………………. To Be continue ..................................................….……………......


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED