Apurn - 2 books and stories free download online pdf in Marathi

अपूर्ण... - भाग २

जसा तसा हरी बिल्डिंग जवळ पोचला... हरी चे हाथ पाय अजून थरथरत होते, हरी घरा जवळ पोचला आणि जोरजोराने बेल वाजवू लागला...
आई ने दार उघडला..…

"हरी काय झालं, घाबरलास की काय स्वाश घे आधी थांब मी बाबांना उठवते".... आई

"नको आई राहूदे बाबांना उठवू नकोस, काय नाही झालं... मी ठीक आहे तू जाऊन झोप".… हरी, हरी ने आरामाचा स्वाश घेतला...

"अरे पण अवस्था बघ तुझी घामाने भिजला आहेस पूर्ण.… कायझालं सांगशील"

"आई बोलो ना काही नाय झालं तू झा आणि झोप…. हा आणि बाबांना उठवू नकोस, सकाळी बोलूया"

हरी बेडरूम मध्ये आला, आणि बेडरूम मध्ये येताच त्याला गरगरल्या सारख वाटायला लागलं, हरी च्या नजरे समोर सगळं गोल गोल फिरत होतं आणि तो एक दम बेड वर पडला आणि झोपी गेला..…

"अगला स्टेशन डोंबिवली"...

"Next station dombivali"....

"पुढील स्टेशन डोंबिवली"…..

हरी एक ट्रेन मध्ये दाराच्या जवळ टेकून थांबला होता, गाडीत annoucment चालू होती पुढील स्टेशन ची अगदी मारण्याची गर्दी... थांबायला सुद्धा जागा नव्हती

गाडी स्टेशन वर येऊन थांबली, लोक गाडीतून उतरत होते त्यात हरी ने त्या मुलीला ही उतरताना पाहिलं आणि अचानक हरी ला असं वाटलं की जग जणू जागच्या जागे वर थांबला आहे सगळे आप आपल्याला जागे वर स्तंभ झाले हरी ने हळूच त्या मुलीला आवाज दिला

"ए तू... कोण आहेस".... हरी

ती मुलगी मागे वळली आणि अचानक सगळं जसं होतं तसं झालं गाडी परत चालू झाली... पण त्या गाडीत हरी आणि त्या मुलीला सोडून कोणाचं नव्हतं

"मला नाही ओळखत तु पण मि ओळखते तुला"....

"कोण आहेस तू, माझा जीव वाचवलंस तू".... हरी

"मी तुझी soulmate".….

"Soulmate"... ????

"हो, मी तुझा जीव वाचवलं पण काय, तू मला घाबरतोस ना म्हणून मी जातेय".....

तेवड्यात गाडी बरोबर त्या फाटक च्या इथं येऊन थांबली.…. आणि ती मुलगी खाली उतरली

"मी आहे इतच आहे, तुला जर कुठे नाही भेटली तर इतच भेटेन मी"....
आणि हरी एकदम अलार्म चा आवाज ऐकून उठला.....

"नशीब स्वप्नं होतं".... हरी

हरी हॉल मध्ये येऊन खुडचिवर बसला....

तितक्यात बाबांनी विचारलं, "कुठे होतास रात्री, काय झालं होतं"....
"काय नाही बाबा सगळं ठीक आहे"..... हरी

"ठीक तर असणारच ना तुम्हाला कुठे चार लोकांमध्ये तोंड दाखवायचं असतं, जीमेदारी नावाची , शिष्ट नावाची तर वस्तू आहेच नाही ना आपल्यात, काय"....????

"बाबा हो माहीत आहे मला, चुकी झाली माझी"...

"बाळा चूक नाही खूप मोठी चूक केली आहेस तू".....

तितक्यात आई ने बाबांना मध्येच बोलतांना अडवलं.... "अहो जाऊद्याना"....

"चढवा अजून डोक्यावर चढवा"..… बाबा रागात उठून निघून गेले

हरी डोक्यावर हाथ ठेऊन तिथंच बसून होता, आई जवळ आली आणि हरी चा हाथ धरला, बाळा.... हाथ धरताच आई मोठ्याने बोलली....

"हरी काय झालं तुला बाळा तुझं अंग तर ताप्लाय आखं"...

"काय नाही आई जाऊदे"...

"जाऊदे काय जा तू जाऊन झोप, आज काय कुठे बाहेर जाऊ नकोस, मी डॉक्टर ला पण घरी बोलावते".....

आईने हरी ला जबरदस्ती रूम मध्ये पाठवलं आणि हरी जाऊन झोपला…...

थोड्या वेळ नंतर डॉक्टर आले त्यांनी हरी ला तपासलं आणि एक इंजेक्शन दिलं..…

"काय नाही थोडा ताप आहे बरं होऊन जाईल".... डॉक्टर
"ठीक आहे डॉक्टर".... आई

हरी झोपूनच होता, रात्री तो जेवायला ही नाही उठला... दुसऱ्या दिवशी सकाळी, हरी उठला आता त्याला बरं वाटत होतं, तो ऑफीस साठी तयार झाला... आणि नास्ता करून निघाला....

खाली उतरताना त्याने घरातून बाहेर निघायच्या आधी आईने त्याचा हथावर एक काळा डोरा बांधला होता आणि हरी निरखुन त्या डोरालाच बघत होता...

दिवस खूप चांगला गेला.… संध्याकाळी घरी येताना हरी ने हिम्मत करून इशा ला कॉल केला... पण इशा ने कॉल उचला नाही

हरी चालत चालत फाटक जवळ पोचला, फाटक पाहताच त्याला पर्वा रात्री सगळं घडलेलं आठवायला लागलं... आणि अचानक त्याच्या फोन ची रिंग वाजली, हरी ने बघून खुश झाला....

इशा चा फोन होता...

"हॅलो... इशा".... हरी ने उत्तर दिलं

"कॉल केला होतास".... इशा

"हो, कशी आहेस"...

"ठीक आहे मी"...

"बरं, मग लग्नाची शॉपिंग कशी चालु आहे"...

"कुठलं लग्नं इशा, ते तर मी फक्त तुला घाबरवण्यासाठी बोललो होतो, खरं तर असं काहीच नाहीये'.....

"मला घाबरवण्यासाठी खोटं बोलू शकतोस पण माझ्या घरी येऊन तू आई बाबांन सोबत बोलू नाही ना शकत"...

"बोलतो ना इशा तू बोल आता येऊ का"...

"का यायचा आहे तुला नको येऊस ना, मला गरज नाहीये, मी विसरून गेली तुला, तू पण विसरून जा परत कधी चुकून पण कॉल करू नकोस मला"....

"इशा ऐक तर"....

इशा ने काहीच ऐकलं नाही आणि फोन ठेऊन दिला….

हरी एक दम शांत झाला आणि घरी निघून आला....

रात्री ची वेळ होती हरी झोपला होता आणि ईशा चा विचार करत होता तितक्यात त्याला पर्वा रात्रीचा किस्सा आठवला....

ती मुलगी बोलली होती "अजून काही बिघडलं नाही इशा ला जाऊन खरं सांगून टाक"....

हरी स्वतः सोबतच बोलू लागला…..

"नो doubt ती मुलगी भूत होती, पण तिने माझं जीव वाचवलं, मला त्रास नाही दिला आणि इतकाच नाही ती बोलली पण मला की इशा ला खरं सांगून टाक"...

"आणि बहुतेक म्हणूनच मी आज हिंमत केली इशा सोबात बोलायची.... ती कोण आहे यार"

तेव्हाच हरी ला त्याचं स्वप्नं आठवलं.... जर कुठे नाही भेटली तर मी इथंच भेटेन....

हे आठवतच हरी पटकन उठला आणि फाटक जवळ गेला.... हरी ला भीती पण खूप वाटत होती पण ती मुलगी कोण आहे तिने हरी ला का वाचवलं, हरी ला ते माहीत करायचं होतं आणि त्या साठी त्या मुलीचं भेटणं गर्जेजचं होतं...

हरी फाटक ओलांडून त्या पट्टरीवर आला आणि इथं तिथं तिला शोधू लागला पण ती मुलगी हरी ला कुठेच दिसत नव्हती....

हरी विचारात पडला की नेमकं काय करावं, त्याला भित्ती पण वाटत होती रात्री चा काळोख आणि त्यात रेल्वेचा फाटक....

हरी ला काहीच सुचत नव्हतं की काय करावं, तेव्हाच तो हळूच बोलला....

"तू बोलली होतीस ना की भेटशील मला इथं, मी नाही घाबरत तुला ये समोर.…. Soulmate"

तेव्हाच एक बाजूने हळूच आवाज आला.... "हरी"

हरी आवाज ऐकताच दचकला त्याचे हात थरथरायला लागे, त्याच्या कपाळाला घाम फुटला आणि तो मागे फिरला.......
....................….................................... To Be Continued ...................................................................


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED