अपूर्ण... - भाग ३ Harshad Molishree द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपूर्ण... - भाग ३

मागे फिरताच त्याने पाहिलं की... रात्रीच्या काळोखात जिथं काहीच दिसत नव्हतं अश्या गुप्त काळोखात नुसतंच त्या मुलीचा चेहऱ्यावर उजेड उठून दिसत होतं, जणू कोण भूत नाही पण एक आधी अपसारच स्वर्गातून खाली उतरलीय...

"मग काय बोलली ईशा"... ती मुलगी

"तुला कसं माहीत मी ईशा सोबत बोललो".… हरी

"मला माहित आहे, पण तू हे सांग की काय झालं, मिटला तुमचा भांडण"...????

"नाही ना आता तर खूप रागावलीय ती, म्हणे फोन पण करू नकोस कधी, काय करू काहीच समजत नाहीये मला.... एकतर बाबा नीट बोलत नाहीये वरून इशा पण, काय करू काहीच कळत नाहीये"...

"हो हो... धीर घे सगळं ठीक होईल, ये बस".….

हरी त्या मुलीसोबत तितच पट्टरींवर बसला...

"अच्छा मला एक सांग असं काय झालं होतं की तुझं आणि ईशा चं भांडण झालं, जरा मला तुमची स्टोरी सांगशील"...

हरी थोडं गालातच हसला, आणि बोलला......

"खूप चांगला चालू होतं सगळं, अजून पण आठवतं तो कॉलेज चा दिवस जेव्हा पहिल्यांदा मी ईशाला पाहिलं होतं आणि कधी आम्ही दोघंही एक मेकांच्या एवढे जवळ आलो काही कळलंच नाही, बघता बघता कॉलेज चे तीन वर्षनिघून गेले, ती पण जॉब ला लागली आणि मी पण"....

"प्रत्येक रविवारी आम्ही ठरवून भेटायचो, मूवी, डिनर साठी.... खूप मस्त चालू होतं".… हरी

"मग एवढ चांगलं चालू असताना मग का भांडलास तिच्या सोबत".... ती मुलगी

"त्या दिवशी मी तिला लग्नासाठी प्रोपोसे केलं आणि ती म्हणाली की".... हरी तिच्या आणि ईशा बद्दल त्या मुली ला सांगू लागला....

"हरी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण मी घरी नाही सांगू शकत, मला भित्ती वाटते, मला नाही वाटत की बाबा आपल्या लग्ना साठी परवानगी देतील please जसं चालू आहे तसं चालू दे".... ईशा

"ईशा आज ना उद्या तुला बाबांना सांगावाच लागेल ना, आपण आयुष्यभर तर असं नाही ना जगू शकत, चार वर्षे झाले आपल्या relation ला आता आपण पुढचा विचार केला पाहिजे".... हरी

"हरी please पण मि कधी पुढचा विचार केलाच नाही"...
"ईशा तू हे काय बोलतेय आज झालाय काय तुला".....

"हरी please seen create करू नकोस"....

"Please ईशा seen मी नाही तू create करतेय".....

"हरी माझ्यात हिम्मत नाहीये खरच आणि मी त्यासाठी काहीच नाही करू शकत, प्ली जबरदस्ती करू नकोस"....

"जबरदस्ती, जर असंच करायचं होतं तर मग इतके वर्ष का अडकवून ठेवलंस मला, का अशे प्रेमाचे स्वप्ने दाखवलेस"...

"हरी ते स्वप्ने मी पण बघितले आहे तुझा सोबत"....

"पण तुला ते पूर्ण नाही ना करायचे"....

हे ऐकून ईशा चूप झाली आणि पुढे काहीच बोलली नाही….

हरी पुढे काय बोलला नाही ना तर ईशा काय बोलली, हरी तसाच तिथून निघून गेला

२ दिवस निघून गेले ईशा चा काहीच फोन नाही आला... तेव्हा हरी ने समोरून कॉल केला

"Hello ईशा"....

"हम्मम्म्म… बोल"

"२ दिवस झाले काहीच कॉल नाही मेसेज नाही, काय झालं ठरवून घेतलंस का हां... break Up"…....

इतकं ऐकताच ईशा अगदी रागात बोलली.…

"हो ठरवलंय तुला वाटाय ना तर हो करायचं आहे मला break up नाही रहायचं मला अश्या व्यक्ती सोबत जो मला समजून घेत नाही"....

इतकं सांगून ईशा ने रागात फोन ठेवून दिला, हरी ला काहीच कळत नव्हतं की काय चाललय,पण त्याला इतकी खात्री होती ईशा आता त्याला नाही भेटणार...

बघता बघता १ महिना निघून गेला, हरी ने खूप प्रयत्न केलं,पण त्याला शेवटी एकच उत्तरं मिळालं...

"हरी तुला कळत का नाही मी नाहीये रेडी लग्नासाठी".... ईशा
"मग हे प्रेम, हे सगळं काय timepass होतं".... हरी

"तुला जे समजायचं आहे ते समज, मला फरक पडत नाही".... ईशा

हरी ने ह्यापुढे ईशा सोबत बोलण्याचा प्रयत्नं पुढे केला नाही, ह्याच मधी ईशा ने भरपूर प्रयत्नं केलं हरी सोबत बोलण्याचा पण हरी नेहमी टाळत गेला....

आणि २ महिन्या नंतर शेवटी हरी ईशा ला भेटायला रेडि झाला…. आणि ते दोघं भेटले

हरी येऊन शांत बसला होता , ईशा सारखं हरी कडे बघत होती
"बस्स ना आता, किती तो राग.... sorry ना शोना".....ईशा

"माझं लग्न ठरलंय, पुढच्या महिन्याला लग्न आहे माझं".... हरी

ईशा हे ऐकून shock झाली, पुढे काय बोलावं नेमकं तिला काय कळतंच नव्हतं, हरी उठून निघून गेला, आणि ईशा तिथंच बसून रडू लागली....

वेगाने एक रेल गाडी समोरच्या पट्टरीवरून गेली, आणि हरी च्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, ती मुलगी हरी च्या जवळ आली आणि त्याच्या हाथ पकडायला जातच होती तितक्यात.....

…....….................................................. To Be Continued .….…...................................................................