माझा कोपरा भाग तिसरा PrevailArtist द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझा कोपरा भाग तिसरा

"ओ तुम्हाला काय करायचं तो काय पण करेल इथे आणि हां चंद्रशेखर नाही आहे कळलं तेव्हा तुम्ही जावा" ती बोलते
मी तिच्याकडे बघून इशारे करतो (हात जोडून) अग बाई बस कर माझे बाबा आहेत ते
"अच्छा तर मग ह्याच नाव काय आहे कळेल का मला" बाबा

"ह्याच नाव आहे प्रदीप घाडगे आहे ओके कळालं ना आता मग तुम्ही इथून जा तुमचा मुलगा असेल तिथे दुसरीकडे जाऊन शोधा कोणत्या तरी टवाळक्या मुलीसोबत जावा इथून आम्हाला privacy हवीय"

privacy हे ऐकल्यावर माझ्या बाबांचा पारा अजून वाढला आणि
मी हिला इतकं आवरायचं नाव घेतो तर ही आवरतच नाही माझ्या जीवाची धडधड वाढत जात होती मी नुसता तोंडावर हात ठेवून बसलो होतो तेवढ्यात बाबांनी माझा कान जोरात पिळला आणि
"अरे ऐ कारट्या कॉलेज सोडून तू इथे गप्पा मारतोयस मुलीशी आणि स्वतःच्या नावाची लाज वाटते काय तुला म्हणून तू प्रदीप नाव ठेवलस आ तू काही बोलणार आहेस कि मी अजून काय बोलू"
त्यांचा आवाज वाढण्याआधी आणि अजून असलेली नि नसलेली इज्जत जाण्यापेक्षा
मी बोलोलो,"अग हे माझे बाबा आहेत ग (तिच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले दिसले) आणि माझं नाव चंद्रशेखर आहे प्रदीप नाही ते तुला इंप्रेस करण्यासाठी बोलोलो होतो आणि खरंच तुझ्या सोबत... "
पुढे बोलणार तर ती शहाणी कोल्ड कॉफी माझ्या अंगावर टाकून गेली मी इतका बरबरटलेलो कि तुम्ही समजून घेऊ शकता ना...

मग मी बाबांसोबत घरी गेलो, घरी गेल्यावर बाबा खूप हासत होते आल्या आल्या त्यांनी बहिणीला आणि आईला जे काय झालं ते सांगितलं आणि त्या पण माझ्या अवतारवर हसले

मला इतकं लाजल्या सारखं झालं की मी माझ्या कोपऱ्यात जाऊन बसलो खूप रडायला आलेले तिथेच मी खूप वेळ रडत बसलो होतो ज्या जागी मी कोणाला यायला देत नसे तिथे बाबा येऊन माझ्या बाजूला बसले
"हे बघ मला माहितीय मी खूप चुकीच्या वेळी आलो मी चुकी मान्य करतो पण बाळा दुसऱ्यांना फसवून काय करायचं होत तुला आणि तू कोणाला फसवत होतास ती तुझ्यावर प्रेम करते तिला वाईट वाटलं रे पण तू एक जाणून कि तू चुकीच्या माणसाला निवडलस तुझ्या फक्त नावावरून तिने तुला नाकारलं पुढे अजून तू काही चुकीचा वागलास आणि काही ते चुकीचं वागणं किंवा काही खोटेपणा तिच्या समोर तुला प्रकट करता नाही आलं तर त्यात तुझीच घुसमट होणार ना
खोट्यावर आयुष्याची आपण इमारत नाही उभारू शकत हे लक्षात ठेव , म्हणतात प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असत ते केव्हा माफ असत जेव्हा आपल्या सोबत एक विश्वासू व्यक्ती असेल तेव्हा नाही तर ह्या वाक्यला पण अर्थ नसतो रे

चंद्रशेखर हे नाव खूप चांगलं आहे , ह्या एका नावाच्या व्यक्तीने आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले होते त्यांच्या कर्तृत्वाने सगळ्यांची त्यांनी मन जिंकली होती आणि तू ह्या नावासाठी लढ म्हणजेज काहीतरी चांगलं करून दाखव आणि खरं वाग
आजच्या आयुष्यात खरं वागणं सुध्दा एक लढा असतो आणि तो तू स्वतःशी लढ म्हणजे बघ तू पण सगळं जग जिंकाशील"
तुझ्या वर राग नाही आहे पण आजच जनरेशच आहे तस लगेच मोहून जात , आपल्याकडे मोठ्या वस्तू नाही, त्याच्याकडे ते आहे हे आहे असं तुम्ही करतात पण प्रत्येक वस्तू आणि आदर मिळवण्यासाठी तुम्ही मेहनत हि घेतली पाहिजे"

ज्या कोपऱ्यात मी एकटा बसून समस्यांचे समाधान काढत असे आज त्याच कोपऱ्यात माझ्या बाबांचं मला समजावणं इतकं आवडलं होत की आणि मी चुकलोय पण ती चूक कशी सुधारावी हे त्यांनी मला जाणवुन दिल.