Bandini - 12 books and stories free download online pdf in Marathi

बंदिनी.. - 12

0....... माझ्या life मधला 'अनय' नावाचा chapter क्लोज झाला होता...!!!😑

दिवसामागून दिवस जात होते... मी अजून नवीन जॉब शोधला नव्हता.... कदाचित तिथेही मला आत्ताचं ऑफिस आणि अनय हेच आठवत राहिलं असतं.. मला थोडा वेळ हवा होता... सध्या मी घरीच राहून आईला मदत करत होते.. पप्पांना हवं नको ते बघत होते आणि आमच्या लाडक्या ऋतू च्या सहवासात वेळ घालवत होते..! ☺️ बघता बघता दोन महिने होत आले .. पावसाळा संपून दिवाळीचे वेध लागले.. आणि इकडे आई पप्पांना सुद्धा चांगली संधी मिळाली होती... मी घरीच असल्यामुळे मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम त्यांनी चालू केला... आज ह्या मुलाला.. तर उद्या त्या मुलाला.. एक पसंद नाही पडला की दुसरा.. माझा नाईलाज होता....😔 काहींना आई पप्पांनी reject केले.. तर काहींना माझी उंची जास्त वाटली..तर काहींना वयामध्ये जास्त अंतर नको होतं.. 😐 मलाही माझ्या अपेक्षा विचारल्या गेल्या पण.. माझ्या अपेक्षांचा प्रश्नच नव्हता... माझ्या अशा काही अपेक्षा उरल्याच नव्हत्या... मी हे लग्न केवळ आई पप्पांच्या इच्छेखातर करत होते.. खरं तर त्यांचीही काही चूक नव्हती...त्यांना माझ्या अवस्थेची कल्पना नव्हती.... त्यांची मुलगी उपवर झाली होती.. त्यांच्या मते तिच्या लग्नासाठी ही योग्य वेळ होती..

माझ्या डोक्यात मात्र कधी कधी विचार यायचा... अनय ने तर माझं सर्वस्व व्यापून टाकलंय... मग तरीही मी निभावू शकेन हे नवीन नातं? माझ्या मनावरची जखम तर अजून ओलीच आहे.. अशा अवस्थेत मी त्याचं मन जपू शकेन?? खरं तर मला वेळ हवा होता हे सर्व accept करण्यासाठी.... पण आई पप्पांना काय सांगणार होते... खरं सांगण्यात तर आता अर्थच नव्हता....शेवटी जे होईल त्याला सामोरं जाण्याची मी तयारी केली....😑

अशातच आई पप्पांना एक मुलगा पसंत पडला... 'विक्रांत'.. एकुलता एक.. बहिणीचं लग्न झालेलं.. चांगल्या पगाराची नोकरी.. दिसायलाही मला शोभेल असा.. घरात माणसेही मोजकीच..! आई पप्पा नाही बोलतील तरच नवल..!!
शेवटी सर्वांच्या पसंतीने आमचं लग्न ठरलं... माझी पसंती ही आई पप्पांच्या पसंतीवरच अवलंबून होती.. त्यामुळे मी ही होकार दिला... ऋतू साठी हा खूप मोठा धक्का होता... तिने एकांतात मला ह्या सर्वाचा जाब ही विचारला..

"तायडा.. इतक्यात तू लग्नाला तयार ही झालीस? ... स्वतः चा तरी विचार करायचास एकदा.."

"आता कसला विचार करायचा ऋतू.. आई पप्पा माझं वाईट तर नाही करत आहेत ना.. त्यांनी आजपर्यंत जे माझ्यासाठी केलंय त्याची भरपाई तर कधीच होऊ शकणार नाही.. पण निदान त्यांच्या खुशीसाठी मी एवढं तर करूच शकते ना...शिवाय आता थांबून अनय परत येणार आहे का माझ्या आयुष्यात? " बोलता बोलता मला भरून आलं..

ऋतू ने मला घट्ट मिठी मारली.. कितीतरी वेळ आम्ही दोघीही अश्रू गाळत होतो...

- - - - - - - XOX - - - - - - -

अखेर आमचं लग्न झालं आणि मी सासरी आले..माझं सासर माझ्या माहेरपासून जास्त दूर नव्हतं.. फार तर अर्ध्या तासाचं अंतर असेल.. घरात मी, सासू सासरे आणि विक्रांत आम्ही चौघेच होतो... मी नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत होते... शेवटी माझ्यासोबत जे झालं होतं त्यात या सर्वांचा काय दोष होता.. विक्रांत, त्याचे आई वडील, बहीण सर्वजण खूप चांगले होते.. मला सांभाळून घेत होते.. नाव ठेवण्यासारखं काहीच नव्हतं.. विक्रांत ही मला नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा.. मला हवं नको ते बघायचा... सर्व सुरळीत चालू होतं...

- - - - - - XOX - - - - - -

सर्व आठवता आठवता पहाटे कधीतरी डोळा लागला.. सकाळी विक्रांत ने ही मला लवकर उठवलं नाही.. तो ही उशीराच उठला...प्रवासामुळे थकवा जाणवत होता..
तरीही माझ्या आधीच उठून त्याने आंघोळ केली.. चहा करून घेतला.. आणि मग मला हाक मारत म्हणाला,

" मीरा.. उठतेयस ना.. मी जरा नवीन ऑफिस मध्ये जाऊन येतो.. इथे आल्याचं inform करून येतो.. उद्यापासून जॉईन व्हावं लागेल.."

"ह्म्म्म..." मी अजून गुलाबी झोपेतच होते.. डोळे न उघडताच मी विक्रांत ला response दिला..

तशी विक्रांत ने माझ्या अंगावर उशी फेकून मारली.. मी एकदम उठून बसले.. आणि विक्रांत कडे रागवल्याच्या आविर्भावात बघितलं...आणि त्याला मारण्यासाठी उशी हातात घेतली.... तसा तो हसत हसत हॉल मधे पळाला.. आणि तिथूनच ओरडला...

"बाईसाहेब... येताना थोडं सामान आणि आत्तासाठी काहीतरी पार्सल घेऊन येतोय.. डोन्ट वरी!😜" आणि तो बाहेर पडला...

मी बेडवरून उतरले.. आणि जवळच्या खिडकीवरचा पडदा सरकवला.. "वॉव!! Marvellous!!".. मी बाहेर बघत उद्गारले...! क्वार्टर समोर एक सुंदर बाग होती.. हिरवेगार गवत.. त्यावर कुंपणाच्या आकारामध्ये लावलेली ती छोटी छोटी फुलझाडे.. रंगीबेरंगी फुले त्यावर आनंदाने डोलत होती... छोटी छोटी फुलपाखरे भिरभिरून त्या फुलांसोबत जणू शिवाशीवीचा खेळ खेळत होती... सूर्याच्या किरणांची तर जणू शर्यत लागली होती... एकापाठोपाठ एक येऊन बागेतल्या इवल्या इवल्या गवताला शिवून परत माघारी फिरत होती... फुलझाडांपलीकडे white कलर चं ते कुंपण.. कुंपणाच्या आत असे चार ते पाच क्वार्टर्स.. एका कुंपणापलीकडे आणखी एक कुंपण त्यात परत चार - पाच क्वार्टर्स.. जणू छोटीशी कॉलनीच होती ती.. किती सुंदर दृश्य होतं ते...!! 😍😍 रात्रीच्या अंधारात काही कळालं नव्हतं पण आत्ता ते सुंदर दृश्य बघून मनावरची मरगळ एकदम दूर झाली...😄 मन अगदी फुलपाखरू होऊन बागडू लागलं... अगदी 'त्या' क्षणासारखंच...!!..... मी परत विचारांत हरवले...!

लग्नानंतर काही दिवसांनी मी जवळपासच असलेल्या एका कंपनी मध्ये जॉईन झाले....स्वतः चं मन रमवण्यासाठी.. तसंही घरी जास्त काम नसायचं.. त्यामुळे दिवसभर कंटाळा यायचा.. म्हणून विक्रांतनेच आवडत असल्यास जॉब करण्याचा सल्ला दिला..आणि मी ऑफिस ला जाऊ लागले..


लग्नानंतरही अनय ची आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नाही.. कित्येकदा त्याच्या आठवणी माझ्या उशींची अभ्रे भिजवत..पण माझं दुःख कोणालाच माहीत नव्हतं... कित्येकदा त्याच्या ओढीने मी तळमळायचे.. पण कृष्णा ची मीरा बनून राहणंच कदाचित माझ्या नशिबी होतं!! 😓


बर्‍याचदा अनय राहत असलेल्या शहरात मी काही कामानिमित्त जायचे.. कधी विक्रांत सोबत.. कधी सासू सोबत... प्रत्येकवेळी असं वाटायचं की कुठेतरी तो दिसावा... नजर भिरभिर फिरून त्याचा शोध घ्यायची ...पण अनय कधीच दिसला नाही 😑.. मी तरी किती वेडी होते.. ते शहर नजरेच्या टप्प्यात बसेल एवढं छोटं होतं का...! एवढ्या मोठ्या शहरात अनय ला कुठे शोधणार होते मी.. ना माझ्याकडे त्याचा नंबर होता ना पत्ता... 😒 ऑफिस मध्ये जाणं बंद झालं तेव्हाच काही दिवसांनी मी मोबाईल मधला तो सिम बंद करून त्यात नवीन सिम टाकला होता.. त्याबरोबर सिम मध्ये सेव्ह केलेले सर्व नंबर्स डिलीट झाले होते.. अनय पासून दूर राहायचं मी ठरवलंच होतं ना!.. आणि आता तर तो मोबाईल ही पप्पांकडेच असायचा.. लग्नानंतर विक्रांत ने मला नवीन स्मार्टफोन घेऊन दिला होता...


अनय ची आठवण आली की मी वेडीपिशी व्हायचे.. सारखं वाटायचं.. कुठे असेल तो.. काय करत असेल?...


सुरुवातीला अधून मधून तन्वी चा फोन यायचा.. पण मी कधीच तिला अनय बद्दल विचारलं नाही.. तिनेही कधी त्याचा विषय काढला नाही.. मी ऑफिस सोडत असल्याचं तिला सांगितलं नाही म्हणून ती थोडी चिडली ही होती..पण मला माहित होतं ती मनातून खुश च झाली असणार..!


असाच एकदा दुपारी तन्वी चा फोन आला.. मी सासरीच होते.. म्हणाली,


"माझं लग्न ठरलंय.. ये लग्नाला... मी कार्ड घेऊन येईनच घरी.. पण म्हटलं आधी फोनवरुन कळवते.. 😄" ती काहीशी लाजत लाजत बोलत होती..


मी एक दीर्घ श्वास घेतला.....मनात कुठेतरी कालवाकालव झाली... पण विचार केला.. आता निदान ती दोघे तरी एकत्र असतील.. कायम!.. त्यांना तरी त्यांच प्रेम मिळालं..


"अरे वा!.. Congratulations!! कधी आहे लग्न? "


" अगं हो.. आधी विचार तर कोणासोबत ते..." ती हसत हसत म्हणाली...


मी मनात चरफडले.. ही का माझ्या हृदयावर घाव घालतेय? 😑.. मला ऐकवायचं आहे का हिला की अनय आता तिचाच होणार आहे.. कायमचा! 😓... नको गं तन्वी असं करू.. नाही सहन होत आता त्या वेदना..! 😫 खूप त्रास होतो गं.. माझं मन ओरडत होतं... 😣


मी काही बोलत नाही असं बघून तीच पुढे बोलली..


"अगं, रितेश माहितीये ना तुला... Finance डिपार्टमेंट मधला.. 😄.. त्याने मला प्रपोज केलं.. त्यांच्याच डिपार्टमेंट मधल्या रिया through त्याने मला लग्नासाठी विचारलं.. मग मी त्याला आई पप्पांना भेटायला सांगितलं... घरच्यांनी पसंत केलं... आणि ठरलं लग्न... 😄😄"


मला तर आजूबाजूचं सर्व गोल गोल फिरत असल्यासारखं वाटायला लागलं.. डोळ्यांसमोर अंधार दिसायला लागला.. ती अजून पण काही बडबडत होती.. पण माझ्या डोक्यात काही शिरतंच नव्हतं... माझ्या डोक्यात एकाच प्रश्नाने थैमान घातलं होतं.. अनय चं काय?? 😮पण शब्द ओठांवर येतच नव्हते.. तीच कधीतरी 'बाय.. ठेवते फोन'.. असं म्हणाली तेव्हा फक्त 'हां' एवढंच बोलू शकले मी... 😑 तिने फोन ठेवला आणि मी मटकन खाली बसले.. डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते.. अनय कुठे असेल? ... तो कसा असेल?.. तन्वी भांडली तर नसेल ना त्याच्यासोबत..? पण ज्याअर्थी ते दोघे वेगळे झाले त्याअर्थी त्यांचं काहीतरी चांगलंच बिनसलंय..


मला आता आणखीनच अस्वस्थ वाटू लागलं.. अनय ची काळजी वाटायला लागली.. तो वरुन कितीही rude वाटत असला तरी त्याने हे सर्व मनाला लावून घेतलं असणार.. तन्वी दुसर्‍या कोणासोबत तरी लग्न करतेय हे ऐकून त्याच्या मनाला काय वाटलं असेल.. तिने तरी लगेच एवढ्या टोकाचा निर्णय का घेतला.. प्रेम होतं ना तीचं अनय वर..!.. तिच्या बोलण्यातून तर असं वाटत होतं की ती खूप खुश आहे...

माझं तर डोकं गरगरायला लागलं होतं.. मी येऊन बेड वर पडले.. बर्‍याच वेळाने कधीतरी डोळा लागला.. किती वेळ मी अशी झोपून होते मलाच कळालं नाही.. आईंच्या आवाजाने मी उठले..त्या माझ्या रूम मध्ये येत म्हणाल्या..

"मीरा.. काय झालंय.. अशी झोपलीस का यावेळी?"


मी डोळे उघडून खिडकीबाहेर बघितलं तर अंधार दाटून आला होता.. आपण कुठे आहोत आणि काय झालंय आपल्याला हे आठवायला मला काही सेकंद लागले.. तेवढ्यात आईच पुढे येत म्हणाल्या, "काय झालंय.. बरं नाही वाटत आहे का?" आणि त्यांनी माझ्या कपाळाला हात लावून बघितलं.."अरे बापरे! ताप आहे अंगात.. तू काहीच कसं बोलली नाहीस आमच्याजवळ?"


मला तर काही कळतच नव्हतं नेमकं काय होतंय.. मी ही स्वत:च्या कपाळाला हात लावून बघितला..' अरे हो.. मला ताप भरलाय'..


आई म्हणाल्या.." विक्रांत येईलच इतक्यात.. तू आधी डॉक्टर कडे जाऊन ये बघू.."


"नको आई मी गोळी घेईन.. बरं वाटेल लगेच "- मी


" अज्जिबात नाही.. आधी डॉक्टर कडे जाऊन ये.. चांगलाच ताप भरलाय.." - सासू


विक्रांत आल्यावर आईंनी आधी मला डॉक्टर कडे पाठवलं.. रात्री गोळी घेतल्यावर जरा बरं वाटलं.. विक्रांत ला वाटलं viral fever asel..पण मला नेमकं काय होतंय याची कल्पना कोणालाच नव्हती.. 😔


एकीकडे अनय ची काळजी वाटत होती.. तर दुसरीकडे विक्रांत ला cheat केल्याचं फील येत होतं.. कितीही झालं तरी आता तो माझा नवरा होता.. एक बायको म्हणून त्याच्यावर माझं प्रेम ही होतं.. मी माझ्या संसारात रमलेही होते... पण अनय माझं पहिलं प्रेम होतं.. त्याला मी कशी विसरू शकत होते...ते ही इतक्या लवकर?? 😓😑


- - - - - - - - XOX - - - - - - -


तन्वीचंही लग्न झालं... ती घरी कार्ड घेऊनही आली होती.. म्हणुन मी आणि विक्रांत लग्नाला गेलो होतो.. ऑफिस चा बराचसा स्टाफ आला होता लग्नासाठी.. दोघेही एकाच ऑफिस मध्ये होते ना!.. तिथेही माझी नजर अनय ला शोधत होती.. मला माहित होतं जरी तन्वी ने त्याला invite केलं असेल तरी तो नाही येणार... पण जिथे जिथे त्याच्या असण्याची शक्यता असायची तिथे तिथे माझी नजर त्याला शोधत रहायची.. पण तो एकदाही कुठे दिसला नाही.. 😢

अनय कुठे आहेस तू??????
To be continued..

🙏इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED