Matrutva - 2 books and stories free download online pdf in Marathi

मातृत्व - 2

@#मातृत्व#@ (2)
सौ. वनिता स. भोगील

तस पारस म्हणाला..... ही माझी बायको,,'प्रिया'...
... आणी प्रिया, या आपल्या शेजारच्या 'जोशी काकु',,,,,
,,, प्रिया तशी संस्कारी मुलगी ति लगेच काकुना नमस्कार करते काकु म्हणून पाया पडली,,, तसा पारस पण काकुंच्या पाया पडला,,,
...मनात नसताना काकुनी "सुखी रहा" असा आशीर्वाद दिला,,,
पुढे पारस प्रिया ला सांगू लागला,,,
या काकु म्हणजे फक्त शेजारी नाहीत, त्या मला आईसारख्या जपतात,,
तेवढ्यात 'आई' ए 'आई' म्हणत स्वाती तिथे आली,
पारस ने तीची पण प्रियाशी ओळख करून दिली..
स्वाती तर अगदी रडवेली झाली प्रियाला बघून...
. ति जास्त वेळ तिथे न थांबता सरळ निघुन गेली.
जोशी काकु पण बळेच स्माइल देत निघुन गेल्या.
..... पारस ,प्रिया चा नवीन संसार आज पासून चालू झाला,,

...
इकडे काकु आणी स्वातीची हालत अशी झाली होती की, बोलता ही येइना आणी सहन ही होईना,,,,
.......
प्रिया ने लगेच नवरी पण सोडून घर अवरायला घेतल,
पारस ही मद्त करत होता.
दुसऱ्या दिवसांपासून रोजच रूटीन चालु झाल दोघांच.....
...ऑफिस, घर सगळ अगदी छान चालत होत,
सुट्टीच्या दिवशी जोशी काकु आवर्जून येऊन बसत,,
प्रिया पण काकु चा आदर करत ऐसे,,
स्वातीच्या मनात खुप राग होता प्रिया बद्दल ,पण तस कधी ति दाखवत नसे...
दोघी मायलेकी मनातून प्रियाचा तिरस्कार करत होत्या,
दोघिंच्या मनात वेगळच काही कट कार्यस्थान शिजत होत,,
प्रिया आणी पारस ला याची किंचित सुधा कल्पना नव्हती....
...... एक दिवस प्रिया सकाळी उठली नाही,
पारस ला जाग आली तेव्हा त्यानेच प्रियाला जागे केले..
तेव्हा प्रिया डोक्याला हात लावून म्हणाली ,,,,पारस...... खुप जड़ झाल आहे डोक,, उठायची इच्छा च नाही....
पारसला वाटले दिवसभर काम आणि दगदगिने त्रास होत असेल.....
म्हणून त्याने उठण्याचा प्रियाला आग्रह केला नाही,
तोच उठून फ्रेश झाला,,, चहा टाकला,,,
चहा घेवून बेडरूम मधे आला..
प्रियाला आवाज दिला ,,उठा रानीसाहेब,,,,चाय हाजिर है!!
प्रिया ने डोळे उघडले,,, हातात चहा चा कप घेवून पारस शेजारी बसला होता...
..... तीने पारस कड़े पाहुन देवाचे आभार मानले,, एवढा प्रेम करणारा नवरा दिला म्हणून,,
तेवढ्यात तिला कसतरी व्हायला लागले,,
बेड वरची उठून वॉशरूम मधे धावतच गेली,,, काय झाल प्रिया?
पारस पाठोपाठ गेला.
प्रिया ऊल्टी करत होती,
पारस घाबरला, ति चुळ भरून बाहेर आली, पारसने तिचा हात धरत तिला आधार देत बेडवर बसवले,,,
लगेच मोबाइल घेवून डॉ. ना कॉल केला..
जवळच एक ओळखीचे डॉ. होते,
रिक्वेस्ट केली पारसने त्याना...
ते म्हणाले दहा मिनिटात आलोच.
प्रिया ला अस काय झाल अचानक म्हणून पारस काळजीत होता...
प्रिया समजावत होती, काही नाही झाल मला, उगीच नको काळजी करु....

...
तेवढ्यात दारावरची बेल वाजते,
,,,, पारस पटकन जावुन दार उघड़तो,
या.... डॉक्टर साहेब,, बघा न अचानक प्रियाची तबेत बिघडली,,, काय झाल असेल हिला???
चिंतेच्या स्वरात पारस डॉक्टर ना वीचारु लागला...
डॉक्टर म्हणाले मला अगोदर तपासून तर दे,,,
डॉक्टर नी प्रियाला तपासले.......
...
मेडिसिन बॅग आवरत डॉक्टर म्हणाले,,, पारस!!!
हा, डॉक्टर. .काय झालय प्रियाला?
डॉक्टर हसुन म्हणाले, काळजी करण्यासारख काहिं नाही,,,
म्हणजे डॉक्टर???
अरे तू बाप होणार आहेस...........
....... काय सांगता डॉक्टर???
पारसला आनंदात पुढे काय बोलाव काहीच समजत नव्हत.
.. डॉक्टर नी काही मेडिसिन लिहून दिल्या,,,,
डॉक्टर ची फीस देवून त्याना दारापर्यंत सोडल..

......... परत येवून प्रियाकडे आनंदात पाहू लागला,,,,
प्रिया लाजली,तस तो म्हणाला,,, काय रानीसाहेब,,, आता तुम्ही आई होणार अण मी बाबा......प्रिया लाजुन पारस च्या कुशीत शिरली,,,,,,,
पारस खुप आनंदात होता,,,,
प्रिया ला तर आई होणार हे खुप सुखद वाटत होते,,
आता पासुनच ति स्वप्न पाहू लागली.........

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED