Matrutva - 3 books and stories free download online pdf in Marathi

मातृत्व - 3

*@#मातृत्व#@(* 3)
*सौ. वनिता स. भोगील*

प्रिया ला जवळ घेत पारस ने तिच्या माथ्याचे चुम्बन घेतले.....
... प्रिया खर सांगू ,आज माझ्या आयुष्यात माझ्या हक्काच्या दोन व्यक्ति झाल्या,,
ज्याना मि कधीच सोडू शकत नाही.....
.. दोघेपण खुप आनंदात होते,
पारस म्हणाला प्रिया आज आराम कर, ऑफिस मधे मि कळवतो,,
मी मेडिसिन घेवून येतो,,
म्हणून पारस बाहेर निघाला.
तेवढ्यात जोशी काकु समोरून बोल्या काय रे आज ऑफिस ला सुट्टी आहे का?
नाही काकु, जायच आहे न.
ते प्रियाला जरा बर वाटत नव्हत म्हणून थोड उशिरा जाणार आहे.

अरे काय झाल प्रिया ला? आजारी आहे का ती? कुठे आहे?
पारस उत्तर दयायच्या अगोदरच काकु प्रियाकडे जाण्यासाठी घरात शिरल्या..
पारस मेडिसिन आनायला निघुन गेला..
..
काकु प्रिया जवळ बेड वर जावुन बसल्या,
अग प्रिया काय झाल? पारस बाहेर भेटला ,म्हणाला तुला बर वाटत नाही म्हणून,
काय झाल? काल पर्यंत तर ठीक होतीस..
....
अहो काकु काळजी करण्यासारख काही झालेल नाही,
माझ जरा डोक जड़ आल होत आणी कोरडया उल्टया झाल्या,,
प्रिया ने काकु ना सांगतच लाजुन खाली मान घातली,
काकु वयस्कर अनुभवी, त्यानी लगेच ओळखले.......
असय होय,,,,,,,
मग त्यात घाबरन्यासारख काही नाही,तू आई होणार आहेस.....
प्रिया म्हणाली हो काकु डॉक्टर येवून तपासून गेलेत, तेच मेडिसिन आनायला पारस गेला आहे.......
काळजी घे.
एवढंच म्हणून काकु स्वताच काळजीत असल्यासारख घराबाहेर निघुन गेल्या...
... प्रिया खुप आनंदी होती,,
पारस आला , त्याने स्वताच्या हाताने नास्ता बनवला, प्रियाला औषध व नास्ता दिला.....
तीला आराम करायला सांगून फ्रेश होण्यासाठी गेला...
....
प्रिया बेडवर आराम करत होती,
,,थोड्या वेळात पारस फ्रेश होवून आला,
प्रियाला म्हणाला मी खिचडी बनवून ठेवतो तू आरामात फ्रेश होवून जेवण कर.
मी ऑफिस ला जातो, आणी संध्याकाळी लवकर येतो,
पण तू काहीच काम करायच नाही,प्रिया बर म्हणाली,
पारस ऑफिस ला निघाला,प्रियाजवळ जावुन म्हणाला आता तुला दोघांची काळजी घ्यायची आहे,,,,,
प्रिया .......हम....
बाय करून तो ऑफिस ला गेला..प्रिया बेड वरुण उठली,
फ्रेश झाली,
केस विंचरन्यासाठी आरशासमोर उभी राहिली,,,,
स्वतःला पाहुन तिचे तिलाच। हसू येत होत....
किती भाग्यवान आहे मी, पारस सारखा जीव ओवाळून टाकनारा नवरा भेटला, आणी आता आई होणार किती सुखी आहे मी.
अस स्वतशीच म्हणत होती...
. तेवढ्यात जोशी काकु परत आल्या,
काय ग लगेच कामाला लागलिस की काय???
अश्या वेळेस आराम करायचा असतो,
सोड बघू ते काम,
अहो काकु मी काम नव्हते करत, पारस सगळ करून गेलाय...
... बर मग जेवायला मी आणून देते,
नाही ,,नको काकु पारस खिचड़ी बनवून गेला माझ्यासाठी.
लगेच काकुंचा चेहरा पडला,,,,आणी म्हणाल्या, हो का?
बाई खूपच प्रेम करतो ग तुझ्यावर,
पण तुला सांगू प्रिया, हे नवरे सगळे मूल होईपर्यंत रानीसाहेब म्हणतात आणी एकदा ति आई झाली की हे साध बायकोला विचारत देखील नाहीत....लगेच प्रिया म्हणाली, अस आमच्या बाबतित कधीच होणार नाही। कारण पारस माझ्यावर जीवापाड प्रेम करतो,
तो माझ्याकडे कधीच दुर्लक्ष्य करणार नाही
काकुनी तोंड फिरवल आणी म्हणाल्या तुझ ख़र होओ,,
मी असे खुप पाहिलेत म्हणून सांगीतल तुला....
पुढे काकुनी विचारल कितवा महीना आहे तुला?
त्यावर प्रिया म्हणाली.
काकु दोन महीने झाले डेट चुकलेली...
बरबर म्हणून काकु निघाल्या,,
दाराजवळ जावुन परत वळून म्हणाल्या काळजी घे बाई, मोठ घरात कुणी नाही म्हणून सांगते..
पण त्यांच्या बोलण्यातून कुठेतरी वेगळीच भाषा जाणवत होती,,,
प्रियाने त्यांच्या बोलण्यकडे लक्ष दिले नाही,,,,,,,
तेवढ्यात मोबाइलची रिंग वाजली,,,,,,,,
फोन पारस चा होता,
हेलो........
पारस....
काय रानीसाहेब कशी आहे तबेत?
बरी आहे,,, तू पोहचलास न ऑफिस ला??
हो आताच पोहचलो आणि तुला कॉल केला, म्हटल बघाव मॅडम आराम करत आहेत की नाही....
प्रिया.... अरे हो आराम च करत होते,,,
जोशी काकु आल्या होत्या त्यांच्याशी थोड बोलत बसले होते...
बर, आताआराम कर,
चल ठेवू फोन.....
हो ठेव..
पारस.... बाय..
प्रिया....बाय......
इकडे काकुना काय कराव काही समजत नव्हत..
लग्न झाल्यापासुन त्याना प्रियाबद्दल एवढा राग होता,,
त्याना वाटायच हिच्या जागी माझी स्वाती असति,,
एवढे लाड तिचे झाले असते...
स्वाती तर प्रियाशी कधीतरी मोजके बोलायची,,
प्रियाच काय कराव याचाच ति विंचार करायची.........

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED