Bandini - 15 books and stories free download online pdf in Marathi

बंदिनी.. - 15

........ आज मन खूप खुश होतं 😇.. पण वाईट ही वाटत होतं की तो माझ्यापासून एवढा दूर आहे.. 😑

दुसर्‍या दिवशी सकाळी मी आईकडून निघाले आणि माझ्या घरी आले.. सासू सासरे त्यांच्या मुलीकडे म्हणजेच विक्रांत च्या बहिणीकडे गेले होते.. ते संध्याकाळ पर्यंत परत येणार होते.. विक्रांत ऑफिस ला गेला होता.. माझी आजचा दिवस सुट्टी बाकी असल्याने मी घरातच होते.. मी माझी कामे आवरली.. जेवण वगैरे बनवलं.. आणि रिकामी बसले असताना मला अनय ची आठवण आली.. तसं बघितलं तर कालपासून तो जराही डोक्यातून गेला नव्हता माझ्या..! पण त्याने कॉल करायला सांगितलं होतं मला... त्याचा आवाज ऐकण्यासाठी माझेही कान आतुर झाले होते.. मी मोबाईल हातात घेतला..

'काय करू.. कॉल करू की नको.. योग्य आहे का हे?.. आता असं मी अनय ला कॉल करणं😕.. पण तो आधीपासूनच माझा चांगला फ्रेंड आहे.. As a friend बोलायला काय प्रॉब्लेम आहे मीरा..?'
मी स्वतःशीच बोलत होते.. माझ्या मनाला त्याची ओढ लागलीच होती.. मी त्याचा नंबर डायल केला आणि मिस कॉल केला.. दोन मिनिटांतच एका unknown नंबर वरुन कॉल आला.. मी तो receive केला.. मी काही बोलायच्या आतच पलीकडून आवाज आला..

📞हां बोल मीरा..

📞अरे.. तुला कसं कळलं हा माझा नंबर आहे 😕

📞अगं.. इंडिया मधून स्वतःहून दुसरं कोण कॉल करणार मला.. म्हणून कळलं मला.. की हा तुझाच नंबर आहे.. त्यात काल बोलणंही झालं होतं ना आपलं.. (तो हसून म्हणाला)

📞ह्म्म्म जा बाबा.. 😏😒 (मी फुरंगटून म्हणाले)

📞आता अजून कुठे पाठवतेस मला.. 😁.. बोल ना.. कशी आहेस? तुझा आवाज पण तुझ्यासारखाच गोड वाटतोय मीरा .. कित्ती दिवसांनी ऐकला...

मी गालात हसले.. 😄

📞हा कुणाचा नंबर आहे?

📞अगं ऑफिस मधून कॉल केलाय मी.. हा ऑफिसचाच नंबर आहे..

📞ओके..

📞मीरा.. I m sorry.. तुझ्याशी बोलताना वाटतच नाही की तुझं लग्न झालंय.. मला अजूनही त्या दिवसांत असल्यासारखं वाटतय.. म्हणून काहीही बोलून जातो मी.. खरच सॉरी...

📞 I know अनय.. मी समजू शकते.. तू मनाला लावून घेऊ नको..

बराच वेळ तो बोलत होता.. खूप काही.. फोन ठेवायची त्याची इच्छा नव्हती.. मलाही वाटत होतं की त्याने असंच बोलत राहावं माझ्यासोबत.. पण तो ऑफिस मध्ये होता.. नाइलाजाने त्याने नंतर बोलू म्हणून फोन ठेवला..
मलाही एवढ्या दिवसांनी त्याचा आवाज ऐकून भारावल्यासारखं झालं होतं..!

- - - - - - - - - - XOX - - - - - - - - - -

एकमेकांसोबत चॅटिंग करताना आम्हाला दिवस पुरत नसे.. इतके दिवस जे मनात साठवलं होतं ते आम्ही एकमेकांसोबत बोलत होतो.. एकदा मी चॅटिंग करताना जरा घाबरतच त्याला विचारलं..

"अनय, तू तर तन्वी ला like करायचास ना?"

तन्वी चा विषय काढला की तो थोडा चिडायचा.. आत्ताही तो मला म्हणाला..

"कशाला तिचा विषय काढतेस.. तू तुझ्याबद्दल बोल ना.."

"अनय प्लीज.. मला ऐकायचंय.."

"पण मला तिच्याबद्दल काहीही बोलायचं नाहिये.."

"प्लीज प्लीज.... अनय.... प्लीज.... 😕"

"ह्म्म्म...... हे बघ.. मी तिला like करायचो.. But only as a friend.. तिची मस्ती करायचो मी नेहमी.. तिला चिडवायला मजा यायची.. पण आमच्यामध्ये असं काही नव्हतं.. मला माहितीये ती मला like करायची.. पण मला तू आवडायचीस.. पण तू जास्त त्या परेश बरोबर असायचीस म्हणून मला वाटलं की तुमच्या दोघांमध्ये काहीतरी आहे.. तुझ्यापासून दूर राहण्यासाठी मी जास्तीत जास्त वेळ तन्वी सोबत रहायला लागलो.. तिच्याशी बोलायला लागलो.. पण तिच्याशी बोलत असतानाही माझ्या डोक्यात फक्त तूच असायचीस.. 😑 .. तू आणखी थोडे दिवस जरी तिथे असतीस ना तर मी तुला नक्की विचारलं असतं.."

"I think.. तिने तुला शर्ट गिफ्ट केलं होतं आणि तू तिला t-shirt ही दिलं होतंस एक... 😐"

" हां.. तिने मला शर्ट गिफ्ट केला होता.. माझ्या बर्थ डे च्या वेळी..पण मी तिला काहीच दिलं नव्हतं.. 🤔"

" पण.... तू आणि तन्वी एकमेकांना भेटला ही होतात ना 😞? "

" हो.. स्टेशन बाहेर ती भेटली होती मला एकदा.. अचानक.. ठरवून भेटलो नव्हतो आम्ही.. ती तिच्या friends सोबत आली होती तिथे.. "

" काsssय?... पण तिने तर मला सांगितलं होतं की तुम्ही दोघे मॉल मध्ये गेला होतात एकदा.. 😡"

" नाही मीरा.. मॉल मध्ये नाही.. आम्ही फक्त एकदाच स्टेशन वर भेटलो होतो.. ते पण अचानक!...... तू का विचार करतेस एवढा?? हे बघ अशाने तुलाच त्रास होईल.. माहित नाही तिने तुला अजून काय काय सांगितलंय... 😡
She was not like u.. She was cunning.. म्हणून मी कधी तिच्यात involved झालो नाही.. इतकच काय मी इथेही कधी कुठल्या मुलीकडे त्या नजरेने बघितलं नाही.. I love YOU Meera...and I missed you a lot ..😖"

अनय ची अवस्था काय असेल आत्ता हे इथून ही मला कळत होतं.. त्यामुळे मी आणखी काही विचारलं नाही..पण तन्वी चा खोटेपणा बघून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली होती.. 😠😠

- - - - - - - - XOX - - - - - - - -

अशातच नोव्हेंबर मध्ये एके दिवशी तो दहा दिवसांची सुट्टी घेऊन इंडिया मध्ये त्याच्या घरी आला.. आल्यावर त्याने मेसेज करून मला तसं कळवलं.. पण नेमकं त्याच वेळी माझ्या सासरच्या नात्यातलं एक लग्न होतं.. लग्न घरातलंच असल्यामुळे मी त्यात बिझी होते.. एक सून म्हणून घरची कर्तव्ये पार पाडण्यात मी गुंतून गेले होते.. त्याने आल्यापासून तीन - चार वेळा मेसेजही केले.. भेटण्यासाठी..!! पण मला काही जायला मिळालं नाही.. 😒 घरात लग्न असताना घरी तरी काय सांगून जाणार होते... लग्ना आधीचे आणि नंतरचेही सर्व कार्यक्रम यांमुळे मी अडकून राहिले.. त्यानेही यायच्या आधी मला नक्की तारीख कळवली नव्हती.. नाहीतर मी त्याला थोडं late यायला सांगितलं असतं... शेवटी तो तसाच परत दुबई ला निघून गेला 😑 .. मला खूप वाईट वाटलं.. 😖.. आता तो परत इकडे येईपर्यंत तरी भेटण्याची आशा नव्हतीच..
भेटणं आमच्या नशिबातच नाहीये का??!!! 😩😭.. माझं मन आक्रोश करत राहिलं.....

त्यानंतर मी मेसेज करून त्याला खूप वेळा सॉरी बोलले.. पण तो नाराजच होता.. सॉरी बोलून त्याचा राग जाणार नाही मला माहीत होतं..नकळत का होईना मी दुखावलं होतं त्याला.. 😑.. त्यालाही माहीत होतं खरं तर की माझ्या न येण्याला खरच काहीतरी कारण होतं.. मी मुद्दाम नाही केलं असं.. आणि तेव्हाही हे सर्व मी त्याला मेसेज करून समजावलं होतं.. पण त्याच्या मनाची माझ्याकडे असलेली ओढ त्यालाही स्वस्थ बसू देत नव्हती...


थोडे दिवस लागले त्याला नॉर्मल व्हायला.. पण त्यानंतरही तो माझ्यासोबत बोलताना अधून मधून नाराज व्हायचा.. त्याच गोष्टीवरून..'फक्त एकदाच भेट.. मला तुला बघायचंय..' असं सारखं बोलत रहायचा..


त्यानंतर तो आला ते फेब्रुवारी मध्ये.. तेव्हा पण तो आल्यावर सुरुवातीचे काही दिवस काही अर्जंट कामामुळे मला जाता आलं नव्हतं.. आणि मी जायला निघाले तेव्हा तो नेमका आजारी पडला.. त्याला तिथल्याच एका हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट केलं होतं.. चार दिवस तो हॉस्पिटल मध्ये होता.. माझं मन इकडे लागेना.. सारखं वाटू लागलं.. त्याला भेटून यावं... पण त्याने हॉस्पिटल मध्ये यायला मना केलं.. त्याच्या घरचेही तिथे असणार होते.. म्हणून तेव्हाही जाता आलं नाही.. त्यानंतर तो चार - पाच दिवस इकडेच होता.. त्याच्या घरी.. पण हॉस्पिटल मधून जस्ट डिस्चार्ज मिळाला असल्याने बाहेर पडणे त्याला शक्य नव्हते... 😐 काही दिवसांनी तो परत दुबई ला निघून गेला... याही वेळेला न भेटता.. 😩


आता तर तो आणखीनच नाराज झाला.. चिडचिड व्हायला लागली त्याची.. मला एकदा भेटण्यासाठी तो तळमळत होता.. माझी तरी वेगळी काय अवस्था होती.. मीही तळमळत होतेच त्याला भेटण्यासाठी.. पण खरच काय चूक होती ह्यात माझी..😖


तो आता जास्त बोलायचा नाही माझ्यासोबत.. प्रेम होतंच पण माझ्यासोबत बोलल्यावर त्याला जास्त आठवण यायची माझी आणि त्यामुळे जास्त त्रास व्हायचा.. म्हणून तो स्वतःला busy ठेवायला लागला.. चुकून कधीतरी मेसेज करायचा.. मीही मग त्याच्यापासून लांब रहायला लागले.. माझ्यामुळे त्याला त्रास व्हावा असं मलाही वाटत नव्हतं.. 😑.. आठवण तर खूप यायची त्याची.. पण मी तरी काय करू शकत होते... आणि माझी आठवण काढल्याशिवाय त्याचाही दिवस जात नसेल हेही मला चांगलंच माहीत होतं..


काही महिने गेले.. अशातच एकदा विक्रांतची बदली गोव्याला होत असल्याचं समजलं..!! पुढच्या महिन्यातच आम्हाला तिकडे शिफ्ट व्हायचं होतं.. वेळ मिळेल तशी सामानाची बांधाबांध आम्ही करत होतो.. मी ऑफिस मध्ये resignation letter देऊन आले.. जसजसा जायचा दिवस जवळ येत होता.. तसतशी माझ्या मनाची बेचैनी वाढतच होती... आता अनय ला आपण कधीच भेटू शकणार नाही म्हणून मन तडफडत होतं.. 😫😭😭


अनय चा अधून मधून मेसेज येत होता.. मी त्याला भेटल्याशिवाय तो नॉर्मल होणार नव्हता.. पण आता ते शक्य नव्हतं.. मी त्याच्यापासून दूर रहायचं ठरवलं.. मी त्याला नाही सांगितलं मी गोव्याला जात असल्याचं.. नाहीतर तो आणखी बेचैन झाला असता.. जर न सांगता गेले तर माझा राग राग करून कदाचित त्याने मला विसरायचा प्रयत्न तरी केला असता... म्हणून जाण्यापूर्वी मी माझा तो सिम मोबाईल मधून काढून ठेवला... त्यामुळे तो मला contact करू शकत नव्हता.. Whatsapp वर आमची चॅटिंग सुरू झाल्यापासून माझं जुना fb अकाऊंट वापरणंही बंदच झालं होतं...त्यामुळे सध्या तरी संपर्कात येण्याचा काहीच प्रश्न नव्हता.......



आणि.. मी गोव्याला आले.. 😩😫


इकडे आल्यानंतर मी नवीन सिम घेतला.. अनय ची आठवण तर होतीच पण तरीही मी रूळले होते इथे.. इथलं वातावरणच तसं होतं... मनाला मोहून टाकणारं...! घरी एकटीच असल्यावर मात्र अनय ची आठवण काढणं चालूच होतं..


- - - - - - - - XOX - - - - - - - -


Goa..


आज किचन मध्ये काम करता करता door बेल वाजली म्हणून मी दरवाजा उघडायला गेले.. विक्रांत आला होता ऑफिस वरुन.. त्याच्या हातातून Tiffin आणि बॅग घेत मी आत आले.. तो फ्रेश झाला.. आणि मी त्याला चहा बनवून दिला... चहा घेता घेता म्हणाला..


"मीरा, काही दिवसांसाठी मुंबई ला जायचंय आपल्याला .. आपल्या घरी.. तिथल्या ऑफिस मधली थोडी कामं आहेत.. आठ दिवसांनी परत येऊ इकडे.. ऑफिस मधूनच पाठवतायत.. आई बाबांना ही भेटता येईल.. चार महिने झाले इकडे येऊन.. कामाच्या गडबडीत घरी जायलाच मिळालं नाही...😒 तू ही आई पप्पांना, ऋतू ला भेटू शकशील..☺️ "


" हो चालेल.. मी बॅग्स भरते "..


सर्वांना भेटायला मिळणार म्हणून मी खूप खुश झाले.. 😄



To be continued..

🙏





इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED