Ashtavinayak - 3 books and stories free download online pdf in Marathi

अष्टविनायक - भाग ३

अष्टविनायक भाग ३
याची कथा पुराणात अशी दिली आहे.

पूर्वी ब्रह्मदेव सृष्टीरचना करत असतांना मधु व कैटभ या पराक्रमी दैत्यांनी ब्रह्मदेवांच्या कार्यात विघ्ने आणून त्यांना भंडावून सोडले.

त्या त्रासाला कंटाळून ब्रह्मदेव विष्णुकडे आले. आणि त्यांनी या दैत्यांचा नाश करावा अशी प्रार्थना केली.

भगवान विष्णू व मधु, कैटभ यांचे युद्ध झाले. पण विष्णुंना काही यश मिळाले नाही.

ते मदतीसाठी शंकराकडे आले. आपल्या गायनाने त्यांनी भगवान्‌ शंकरांना प्रसन्न करून घेतले.

शंकरानी वर मागण्यास सांगितले. तेव्हा विष्णुंनी मधु,कैटभाची सर्व कथा सांगितली.

भगवान शंकर म्हणाले, श्रीविनायकाला प्रसन्न करून घेतले असतेस तर तुला यापूर्वीच जय मिळाला असता.

नंतर विनायकाला प्रसन्न करून घेण्यासाठी भगवान शंकरांनी विष्णुला षडाक्षरी मंत्र दिला.

या मंत्राच्या अनुष्ठानासाठी पवित्र क्षेत्र शोधीत विष्णू एका टेकडीवर आले.

तिथे मंत्राचे अनुष्ठान करून विनायकांना प्रसन्न करून घेतले व इच्छित वर मिळविला.

नंतर या टेकडीवर विष्णुंनी विनायकांचे देवालय बांधले व त्यात गंडकी शिळेची श्रीगजाननांची मूर्ती स्थापन केली. या स्थानावर विष्णुंना सिद्धी प्राप्त झाली म्हणून या क्षेत्राला सिद्धटेक असे म्हणतात.

इथे श्री सिद्धिविनायकांच्या प्रदक्षिणा मार्गावर भगवान विष्णूंचे मंदिरही आहे.

मधु व कौटभ या दैत्यांचा वध करण्यासाठी श्री विष्णूने येथे विनायकाची आराधना केली. विष्णूस येथे सिद्धी प्राप्त झाली म्हणून येथील गणेशास सिद्धीविनायक म्हंटले जाऊ लागले.

अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची असणारी ही एकमेव मूर्ती असल्याने तिचे सोवळे कडक आहे.

गणेशास सकाळी खिचडी, दुपारी महानैवेद्य, संध्याकाळी दुध भात, व रात्री भिजलेल्या डाळीचा नैवेद्य असतो.

येथील दक्षिणवाहिनी असणा-या भीमा नदीला पूर आला तरी परिसरात नदीच्या प्रवाहाचा आवाज होत नाही. या नदीवरील दगडी घाट व मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला.

छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. मात्र, १५ फूट उंचीचे व १० फूट लांबीचे हे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधले.

हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले, तेव्हा फडक्यांनी या मंदिरास २१ प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर २१ दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते.

तिसरा गणपती

पाली गावचा बल्लाळेश्वर किंवा पालीचा बल्लाळ विनायक
बाल बल्लाळाला प्रत्यक्ष दर्शन देणारा विनायक म्हणून बल्लाळेश्वर किंवा बल्लाळ विनायक होय .
रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात आंबा नदीच्या सान्निध्यात स्वयंभु असे बल्लाळेश्वराचे मंदिर आहे.
हे मंदिर पूर्वाभिमुख असून सुर्योदय होताच सूर्याची कोवळी किरणे मूर्तीवर येऊन पडतात.
सध्याच्या या मंदिराचा गाभारा पंधरा फूट उंच आहे .
सभामंडप चाळीस फूट लांब आहे .
एका दगडी सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती स्थित आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची सोंड डावीकडे वळलेली आहे. मूर्तीची पार्श्वभूमी चंदेरी असून त्यावर रिद्धी आणि सिद्धी चामरे धरलेले दिसून येतात.
विनायकाची मूर्ती तीन फूट उंच आहे . सिंहासन दगडी आहे .
सभामंडपात दोन मोठाले हत्ती आहेत ..

मंदिराच्या आवारात मोठी घंटा असून सभामंडपाला आठ खांब आहेत. पुढील गाभा-यात दोन पायात मोदक धरून बल्लाळेश्वराकडे पाहणा-या उंदीराची मूर्ती आहे.

आतील गाभा-याच्या वरील बाजूला घुमट आकार असून त्यावर अष्टकोनी कमळ आहे.
मूर्तीचे डोळे आणि बेंबी हिरेजडीत आहे.

हे मंदिर अशाप्रकारे उभारण्यात आले आहे की हिवाळ्यात दक्षिणायनात सुर्याद्याच्या वेळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. मंदिर हे संपूर्णपणे दगडी असून या दगडांना शिश्याच्या रसाने एकमेकांबरोबर चिटकवलेले आहे.

देवळासमोर दोन उत्तम प्रकारे बांधलेली तळी आहेत . या मंदिराच्या मागे असलेल्या डोंगराच्या आकाराप्रमाणेच ही गणपतीची मूर्ती आहे. जेव्हा या डोंगराच्या फोटोला बघून गणपतीची मूर्ती पाहिल्यावर हे साम्य विशेष करून जाणवते.
चिमाजी अप्पा पेशवे यांनी येथील मंदिराला एक मोठी घंटा दिली आहे व येथील मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला .
अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे.
बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता.विश्वामित्र ऋषींनी भीमराजास, भृगु ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे.
फार प्राचीन काळी, म्हणजे कृतयुगात सिंधू देशातील कोकण पल्लीर नावाच्या गावात (पाली गावात) कल्याण नावाचा एक व्यापारी राहात होता.
त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती होते.
काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला.
त्याचे नाव त्यांनी बल्लाळ ठेवले.
बल्लाळ जसजसा मोठा होऊ लागला, तसतसा त्याचा गणेशमूर्तिपूजनाकडे अधिक ओढा दिसू लागला.
हळूहळू तो गणेशचिंतनात रमू लागला.
त्याच्या मित्रांनाही गणेशभक्तीचे वेड लागले. बल्लाळ आपल्या मित्रांसह रानात जाऊन गणेशमूर्तीचे भजन-पूजन करू लागला.
बल्लाळाच्या संगतीने मुले बिघडली अशी ओरड गावात सुरु झाली. लोक कल्याण शेठ्जीकडे जाऊन 'बल्लाळने आमच्या मुलांना बिघडविले' अशी तक्रार करू लागले.

क्रमश:

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED