Bandini - 17 books and stories free download online pdf in Marathi

बंदिनी.. - 17

....... मी अनय ला मेसेज करून मी निघाल्याचं कळवलं .. अंतर जवळ येत होतं तशी हुरहुर आणखी वाढत होती.....

मन शांत ठेवण्यासाठी मी fm चालू केला आणि कानात earphone 🎧 टाकले.. डोळे मिटून शांत बसून राहिले.. तरीही डोक्यात विचार चालूच होते... कशी असेल आमची पहिली भेट 🤔 .. आता कसा दिसत असेल अनय?? 😃.. फोटोज पाठवले होते एकमेकांना तसे.. पण प्रत्यक्ष आज बघणार होतो... दोन वर्षांनी...! मला बघितल्यावर त्याची reaction काय असेल??.. Huhh... किती वाट बघितली होती मी या क्षणाची... 😒 दोन वर्षे उलटून गेली तरी अनय च्या आठवणी अजूनही मनात तशाच रुंजी घालत होत्या.. जणू काल परवाच भेटलो होतो.. 😊 विचार करता करताच मला हसायला आलं... आणि मग लक्षात आलं... आपलं विश्व किती व्यापून टाकलंय ना अनय ने.... दिवस रात्र आठवून ही त्याच्या आठवणी कधीच संपत नाही.. आणि कधी कंटाळा ही येत नाही.. कशी राहू शकेन मी त्याच्याशिवाय???! 🙁😑

🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵

जेव्हा जेव्हा येतो तुझ्या
देशातून वारा....
अनावर लाटांवर
डोलतो किनारा..

पुन्हा माझ्या वाळूवर
नाव तुझे...
पावलांचे ठसे
भरधाव तुझे...

परतीच्या वाटेलाही
तुझेच वळण..
जिथे जिथे जावे तिथे
तुझी आठवण......!!

🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵

- - - - - - - - - XOX - - - - - - - - -

बस मध्ये बसून अर्धा तास झाला होता.. उत्सुकता शिगेला पोहोचली होती.. कधी एकदा अनय ला भेटतेय असं झालं होतं.. 😮 इतक्यात मोबाईल ची रिंग वाजली.. अनयचाच कॉल होता...

"hello मीरा.. कुठपर्यंत आली आहेस?" अनय विचारत होता..

"आलेच.. फक्त दहा मिनिटे.."

"लवकर ये ना.. एक मिनिट पण वाट बघवत नाहिये आता.. 😣"

"हो रे बाबा.. येतेच आहे.."

"ह्म्म्म.. मी बस स्टँड च्या बाहेर उभा आहे.. Come soon.. बाय"

"हो.. बाय.."

हृदय एवढ्या जोरजोरात धडधडायला लागलं होतं की एक क्षण वाटलं.. छातीचा पिंजरा तोडून बाहेर येईल की काय!!!

अखेर बस स्थानकात पोहोचली.. पाय नुसते जड झाले होते.. जणू सर्व प्राण त्या पायांमध्ये जाऊन गोळा झाले होते .. 😅😅😅 स्वतःला सावरत बस मधून उतरले..बस स्थानकाबाहेर आले.... इकडे तिकडे भिरभिरत माझी नजर अनय ला शोधत होती... इतक्यात रोड च्या पलिकडे एका झाडाखाली कोणीतरी हातातल्या मोबाईल कडे बघत कार ला पाठ टेकून उभा होता.. त्याची मान खाली असल्यामुळे नीट कळत नव्हतं की तो अनयच आहे की दुसरं कोणी.... इतक्यात त्याने मान वर केली... तो 'अनय' च होता!! 😍😍 मी पट्कन जवळच्या झाडामागे लपले.. हळूच मान वाकवून बघितलं.. त्याने बस स्थानकाकडे एक नजर टाकली.. आजूबाजूला बघितलं.. आणि मोबाईल वर आपली बोटे फिरवू लागला.. बहुतेक तो मलाच कॉल करत होता...😄 मी मोबाईल vibration मोड वर केला.. आणि झाडामागून त्याच्याचकडे बघत होते... खूप छान वाटत होतं त्याला माझी अशी वाट पाहताना बघून... 😍 ब्लॅक शर्ट.. स्लीव्ह्ज थोड्या वर fold केलेल्या.. लाईट बिस्किट कलर ची पँट.. डोळ्यांवर गॉगल... भारी दिसत होता एकदम...!!! 😍😘.. वैतागून इकडे तिकडे बघून मी कुठे दिसतेय का बघत होता..आता तो इकडून तिकडे फेर्‍या मारायला लागला.. सारखं बस स्थानकाकडे.. घड्याळाकडे परत मोबाईल कडे त्याची नजर भिरभिरत होती.... त्याची बेचैनी.. अन्‌ त्याचं प्रेमही मला दिसत होतं.. मी जास्त वेळ न घालवता समोर येऊन उभी राहिले.. इतक्यात त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं...मी हसले.. तो बघतच राहिला.. आता आमच्यामध्ये फक्त एका रोड चं अंतर होतं..!😊

मी पाऊल पुढे टाकलं तसा तोच वार्‍याच्या वेगाने माझ्याकडे धावत आला आणि त्याने मला घट्ट मिठी मारली.. काय होतंय हे कळायला मलाही काही सेकंद लागले..मीही त्याला स्वतःच्या मिठीमध्ये सामावून घेतलं..! येणा जाणारे लगेच बघू लागले..

"अनय.. सर्वजण बघतायत.." मी त्याला हळूच म्हणाले.

"बघू दे... " तो मला न सोडताच बोलला...

"अरे बघू दे काय.... वेडा..😄" मी हसतच म्हणाले.

तसं त्याने मिठी सोडून आपल्या दोन्ही हातात माझा चेहरा पकडला आणि माझ्या डोळ्यांमध्ये बघितलं.. एक उसासा टाकत त्याने माझा हात धरला.. आणि म्हणाला,
"चल निघूया.."

मीही शहाण्या बाळासारखी त्याच्या मागे मागे गेले...!

त्याने मला त्या कार मध्ये फ्रंट सीट वर बसवलं.. तो स्वतः ही बसला.. आणि त्याने कार स्टार्ट केली...

"ही तुझी कार आहे?.." मी विचारलं

"नाही.. रस्त्यावर कुणीतरी उभी केली होती.. मला दिसली म्हणून पळवून आणली.." तो गंभीर आव आणत म्हणाला..

तो माझी मस्करी करतोय हे लक्षात यायला मला काही सेकंद लागले..

"अनय.. तू पण ना..." आणि मी रागावल्यासारखं करत त्याला एक चिमटा काढला..

" आह्ह्ह... मीरा... I m driving.. काय करतेस.. 😄😄" तो हसत हसत म्हणाला..

".......... " मी खोटं रागवत काचेतून बाहेर बघितलं..

"बाय द वे.. आज कोणीतरी खूप छान दिसतय.." तो मला मस्का मारायच्या उद्देशाने म्हणाला..

मी हळूच हसत side मिरर मध्ये बघितलं... माझे गाल जास्तच लाल झाल्यासारखे वाटले मला.. 😄😄

" हे काय मीरा.. 😕 बोल ना.. कशी आहेस?? "

" मी छान... तू कसा आहेस☺️" मी त्याला विचारलं..

" माहीत नाही.... But I miss you.." त्याने माझ्याकडे बघत म्हटलं..

मी काहीच न बोलता मान खाली घातली... काही सेकंद अशीच गेली.. मग मीच विचारलं..

"कुठे जातोय आपण?"

"चल तर.. पोहोचू आता दहा मिनिटांत.. " तो म्हणाला..

त्याने गाडी एका शहराबाहेर जाणार्‍या रोड कडे घेतली... दहा मिनिटांतच आम्ही एका पंचतारांकित हॉटेल समोर येऊन पोहोचलो...!!

"वॉव!!! Awesome!!.. काय सुंदर हॉटेल आहे हे.. आपण इथे जातोय??" मी आश्चर्य मिश्रित आनंदाने विचारलं.

" हो.. 😊"

" खरंच अनय? आपण इथे लंच साठी आलोय...?? 😍" मी आणखी उत्सुक होत विचारलं...

"हो मॅडम!!" म्हणत तो कार मधून उतरला आणि माझ्या side चा दरवाजा उघडत म्हणाला..
" चला.. उतरा आता😃 "

मी तर अजूनही भारावल्यागत हॉटेल कडे बघतच होते..याआधी फाईव्ह स्टार हॉटेल बघितलं नव्हतं असं नाही... But this place was something special!! कार मधून खाली उतरले.. अनय ने वॉचमन ला कार पार्क करायला सांगितले..

हॉटेल ची भव्य इमारत दिमाखात मिरवत उभी होती.. हॉटेल च्या entrance ला जणू गवताचे लांबच लांब गालीचे पसरले होते...मधल्या भागात कारंज्यामध्ये पाण्याच्या असंख्य धारा खेळत होत्या!!.. दोन्ही बाजूंना अतिशय सुंदर, विविधरंगी फुलझाडे लावलेली होती.. त्या झाडांची मस्त सावली त्या हिरव्या गालिच्यावर पसरली होती.. त्या गालिच्यावर जेवणाचे काही टेबल मांडले होते.. बरीचशी लोकं त्या टेबलांवर बसून जेवणाचा आस्वाद घेत होते.. जास्त करुन प्रतिष्ठित लोक आणि फॉरेनर्स दिसत होते.. फुलझाडांच्या पलीकडे एक मोठ्ठं स्विमिंग पूल होतं.. खूप शांत वाटत होतं तिथे.. कारण हे ठिकाण शहराच्या बाहेरच्या भागात येत असल्याने जास्त रहदारीचं नव्हतं.. हॉटेल ही गजबजलेलं वाटत नव्हतं.. खूप प्रसन्न वाटत होतं इथे येऊन..

तरीही मनात आलंच.. अनय ने एवढ्या महाग हॉटेल मध्ये कशाला आणायचं मला.. 😕

अनयच्याच आवाजाने मी भानावर आले..

"आता इथेच थांबणार आहेस की आत येणार आहेस 😅"

"अनय आपणही इथेच बाहेर बसून जेवूयात का? किती छान वाटतंय इथे 😊"

अनय हसला आणि म्हणाला..

"तुला हॉटेल आतून कसं आहे ते नाही बघायचंय का? 😁"

"अरे हां... बाहेरून एवढं सुंदर आहे तर आतून किती भारी असेल ना..!!"

"ह्म्म्म चल आता.. "

अनय ने माझा हात त्याच्या हातात अडकवला.. आणि मला आत घेऊन जायला लागला... मला खूप ऑकवर्ड वाटत होतं खरं तर...मनात विचार केला 'अनय ने आधी तरी सांगायचं.. मी जरा चांगले कपडे तरी घालून आले असते.. 🙁'

अनय मला आत घेऊन आला.. आतून तर हॉटेल जबरदस्त होतं... माझे तर डोळेच दिपले बघून... 😍

अनय मला तिथे थांबवून काऊंटर जवळ गेला.. मॅनेजर सोबत काहीतरी बोलून परत आला.. तितक्यात एक वेटर आमच्या जवळ आला आणि त्याने हसून आमचं स्वागत केलं आणि आम्हाला तिथल्याच एका दरवाज्याने आत घेऊन गेला.. लिफ्ट ने आम्ही सेकंड floor वर आलो.. वेटर ने एक दरवाजा उघडला आणि आम्हाला आत घेऊन आला .. आत तर अंधार होता.. स्पष्ट असं काहीच दिसत नव्हतं..आत्ता नक्की दिवस आहे की रात्र तेच कळत नव्हतं...त्या रूम ला खिडकी नव्हती असंच वाटत होतं..😵 मी अनय चा हात घट्ट पकडला..

इतक्यात एकेक करत त्या रूम मधल्या लाईट्स पेटत गेल्या.. आणि तिथे मंद असा प्रकाश पसरला... मला तर क्षणभर काय होतंय तेच कळत नव्हतं.. 🙁 त्या वेटर च्या हातात एक रिमोट होता.. बहुदा त्याचा वापर करूनच त्याने ते लाईट्स लावले होते...तो हसतच बाहेर निघून गेला...

ती एक रूम नाही तर मोठा हॉल च होता..!! 😮 त्याच्या भिंतींवर सुंदर वेली सोडल्या होत्या.. त्यावर अधेमधे छोटी छोटी फुले उमलली होती... मी पुढे जाऊन त्या वेलींना हात लावला.. खऱ्या होत्या त्या... हॉल मध्ये एक मंद असा सुवास पसरला होता.. तो त्या फुलांचा होता की कसल्या फवाऱ्याचा ते माहीत नाही... हॉल मध्ये खाली रेड हार्ट शेप चे balloons सोडले होते.. मध्यभागी एक गोल टेबल होतं आणि दोन chairs होत्या .. टेबल गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलं होतं.. त्यावरच्या फ्लॉवर पाॅट मध्ये red आणि yellow कलर चे roses ठेवले होते.. आणि कसलेतरी boxes दिसत होते.. मला तर सर्व स्वप्नवत वाटत होतं..

मी अनय कडे बघितलं.. तो माझ्याकडे बघून हसत होता..
मी त्याच्याजवळ आले.. त्याच्या डोळ्यांत बघून त्याला विचारलं..

"का केलंस एवढं माझ्यासाठी?एवढं सगळं करायची खरच काही गरज नव्हती.."

"मीरा.. ही आपली पहिलीच भेट आहे.. मला ती स्पेशल बनवायची होती... आणि आपल्या नात्यासारखेच हे moments मला precious बनवायचे होते... तुझ्या आवडीचा विचार केला आणि मी हे ठिकाण choose केलं..कसं वाटलं surprise??? " माझे दोन्ही हात हातात घेत त्याने विचारलं...

" खूप जास्त सुंदर... 😍.. These moments are really precious for me!!.. अगदी आपल्या नात्यासारखेच...! 💕"

है तेरी इनायत तुझिसे मिली है..
होठों पे मेरे हँसी जो खिली है..
उसे मेरा चेहरा छुपा भी न पाये..
तुझे पा के हासिल हुई जो ख़ुशी है...

To be continued...
🙏


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED