प्रेमअर्क Kishor द्वारा कविता मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

प्रेमअर्क

प्रेमअर्क

(कविता संग्रह)

© किशोर टपाल उर्फ (किशोर राजवर्धन)

प्रथम आवृती : 2020

या पुस्तकातील लेखनाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित असून पुस्तकाचे किंवा त्यातील अंशाचे पुनमुद्रण वा नाट्य चित्रपट किंवा इतर रुपांतर करण्यासाठी लेखकाची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कार्यवाही होऊ शकते.


प्रस्तावना

तुझ्या माझ्या प्रेमाचा ‘ प्रेमअर्क ’ ह्या कविता संग्रहातील कविता पुस्तक स्वरुपात प्रकाशित होण्याअगोदर ‘मराठी प्रतिलिपी’ , ‘स्टोरी मिर्रर’ , ‘ Your Quote ’ , ‘ instagram ’ , ‘facebook’ इत्यादी सोशल मिडीयावर प्रकशित झालेला असून सदर कविता संग्रह हा दोनोळी , चारोळी आणि कवितांचा एकत्रित संग्रह आहे. खुप दिवसापासुन प्रकाशित करण्याचा मानस होता. आज तो प्रकाशित करताना मला खुप आनंद होत आहे.

अशा आहे वाचकांना नक्की आवडेल…


तुझं हसणं जणू,

गुलाबाचं फुलणं..


तुझं माझ्या कडे पाहणं,

जणू मनावर पाकळ्यांच ओझ..!


वाट पाहत उभा होतो

गर्दीत तुला शोधत होतो

क्षणभर त्या गर्दीचा काही

अंश पाहुन हसतं होतो

कारण, दररोज मी त्या गर्दीचा

काही अंश बनत होतो


प्रेम करतो हे सांगु शकत नाही

तु समोर आलीसं की, बोलु शकत नाही…


तुला येताना पाहुन वाटलं

तुझ्या सौदर्याचा अर्थ तुला सांगावा..

तु जवळ आलीस अनं

तो सांगायचा राहुन गेला...


तुझ्या रेशमी

केसांशी खेळताना

हे नाते कोणते

हे मला कळेना

ही मैत्री आहे की,

प्रेम हेच मला वळेना,


तुझा हात माझ्या हातात आल्यावर

वाटलं ही वेळ अशीच थांबावी

पण वेळ ही क्षणभुंगार इतकी की,

वाहणा-या पाण्यासारखी न थांबता निघुन गेली….


प्रिती

तो: तुझ्याचसाठी वेचले क्षण मी प्रितीचे

उधळुन दे रंग सारे प्रेमाने भरलेल्या प्रितीचे...

गुंतु दे श्वासात श्वास बहरु दे वृक्ष आपल्या प्रितीचे

दरवळू दे सुगंध तुझ्या माझ्या प्रितीचे....

स्पर्शाने तुझ्या कर क्षण सोन्याने प्रितीचे

हळूवार फुलु दे तुझ्या ओठांतील स्मित प्रितीचे....

विसरुन जगाचे भान जाऊ गावी स्वपनांनच्या

प्रितीचे

रंगुनी रंगात तुझ्या होईल मी प्रितीचा.....

ती: पाहुनी चंद्रकोर प्रितीची

ती म्हणाली तुझ्याच मी प्रितीची....

राहीलास तासं-तास उभा वाट पाहत तुझ्या प्रितीची
क्षमा कर रांजणा चुकी तुझ्या प्रितीची...

दे हातात हात गाणे गाऊ तुझ्या माझ्या प्रितीची

घे मिठीत राजसा स्वर जुळुदे तुझ्या माझ्या प्रितीचे...


तुला पाहुन फुलतो मी

तुझ्याशी बोलुन खुलतो मी

तुझ्या सहवासात बहरतो मी

तरी, तु म्हणतेस राज्या

कल्पना तुझी मी


कृष्णाच्या मनातील राधेच्या प्रेमाच काहुर.................

मी तुझ्या अनं तु माझ्या मनात

कुठे ही शोध नको राधे मी तुझ्या मनात...

तुझी अनं माझी गोकुळाची संगत

यमुना काठी दोघांची गंमत...

तुझं अनं माझं स्मित पाहणं प्रेमात

अनं अवेगान आलिंगन देण प्रेमात...

तुझा अनं माझा गुंततो श्वासात श्वास

तु लाजेन सोडतेस नि:श्वास....

तु अनं मी लीन होतो विश्वात

तु निघताना डोळे भरतात आसवातं....

पुन्हा तु , मी भेटतो काठात

अनं तेच काहुर मनातं..


अंश

मी अंश आहे राधे तुझ्या प्रेमात

तु दंश करतेस नाकारुन त्या प्रेमात.....

मी छेडला स्व:छंद सुर जेव्हां प्रेमात

तु मंत्रमुग्ध होतेसं तेव्हां प्रेमात....

मी हरवून जातो बासरीच्या प्रेमात

तु तुझं विश्व हरवतेसं माझ्या प्रेमात...

मी पाहतो तुला यमुनातिरी माझ्या प्रेमात

तु अबोल स्विकारतेसं प्रेमात......

मी सोडतो वृंदावन तुझ्या प्रेमात

तु डहाळतेस अश्रू प्रेमात.........

मी भेटतो यमुनातिरी प्रेमात

तु येऊन बिलगतेस प्रेमात.......

मी अंश आहे राधे तुझ्या प्रेमात

तु वश आहेस माझ्यां प्रेमात.....


दंग

मी गोपिकत दंग

तु येऊन करतेस त्यांचा भंग...

म्हणतेस कान्हा हा तुझा बाहाणा

मी म्हणतो नाही राधे मी तुझा दिवाणा.....

तुझ्या डोळ्यात तरलतात आसु

मी गहिवरुन करतो हासु.....

तु बिलगतेस हळूवार मिठीत

अनं मी तुझ्या मिठीत......


मी माझाचं उरतं नाही राधे

जेंव्हा तु टाकतेस कटाक्ष कान्हावर....

मी कृष्णखळी देऊन टाकतो पाश तुझ्यावर

तु प्रेमाने बरसतेस माझ्यावर…


पहिल्या पावसाचा गंध

ओल्या मातीचा सुगंध

त्यात तुझा प्रेम स्पर्श

वाटे हवा हवासा....


पावसात भिजताना

एक थेंब येऊन

तुझ्या ओंठावर ठिपला

क्षणभर तो स्वत:चं वाहणं विसरला


तु पावसात भिजताना

पाहुन त्याला ही

गंमत वाटली म्हणूनच

त्याने तुला मिठी मारली....


बरसणारे पावसाचे थेंब

तु ओंजळीत घेतले

तुला पाहुन ते हळूच म्हणाले

उगाच आमचे मरण थांबवले.


केसांची बट सजवते

तुझ्या ओष्ठ शलाकांना

ती सावरुन , मी पाहतो

माझ्या चंद्र शलाकाला..


मला पाहून घुटमळतो

तुझ्या लाजेचा साजं

तु नित्य नवी भासतेसं

मला आजं


तु येतेस अलगद मिठीतं

मी दरवळतो तुझ्या श्वासातं

मी पाहतो प्रतिबंब तुझ्या नेत्रघनातं

तु करतेस तो क्षण सुवर्णातं


तुझ्या डोळ्यात पाहतो

माझ्या स्वप्नांची रास

तुझ्या श्वासाची दरवळ

पुन्हा भेटीची आस..


प्रितीचा हा गारवा

लपंडावाचा खेळ-खेळत असतो

कधी तु तर, कधी मी

ह्यात झुरत असतो.


बिझी..Busy..क्र्झी.. Crazy..

मी पण Busy

तु पण busy

तरीही आपण

दोघे प्रेमात Crazy.....

Work च tension

Carrier च ambition

तरीही आपण दोघे

प्रेमात करु Fashion.....

Boss ची ओरड

Friends ची साथ

तरीही आपण दोघे

Lunch करु साथ....

मग एक दिवस

नविन Try...

Office च्या

Work ला केला Bye....

Busy busy

Crazy crazy

म्हणता म्हणता

आपण दोघे प्रेमात Fly.......


शुन्यातुन सुरु तरीही मी शुन्य

पुढे आलो तर तु शुन्य

मागे राहीलो तर मी शुन्य

व्यवहारी जगताना तुझ्या माझ्या भावना अर्थशुन्य…


शब्दांची ओंजळ भरुन वाहिली मी तुला…

लाजताना , मुरडताना , मागे वळून पाहताना

आठवांच्या मैफिलित प्रत्येक शब्द दरवळून फुलला

पण मी मात्र अजूनही विराना..


राणी

तु प्रेम आहे राणी

कसं सांगू मी तुला

कळतं नाही तुला

म्हणून वळतं नाही मला….

तु म्हणतेसं प्रेम आणि मैत्री

ह्यात अंतर थोड

कळतं नाही तुला

म्हणून वळतं नाही तुला….

तुझ्या हास्याची चंद्रकोर

घाव करते मनातं

कळतं नाही तुला

म्हणून वळतं नाही मला….

पाहतं राहतो तुला

माझ्या प्रेमात रंगताना

कळतं नाही तुला

म्हणून वळतं नाही मला….

तु नसताना तुझ्या आठवणींचा

निशिगंधा दरवळतो मनात

कळतं नाही तुला

म्हणून वळतं नाही मला….

तु एकमेव सखी

जिचा ध्यास आहे मला

कळतं नाही तुला

म्हणून वळतं नाही मला….

मनातलं दु:ख कळू नये तुला

म्ह्णून जीवापाड जपतो तुला

कळतं तुला

म्हणून वळतं मला….

तु प्रेम आहे राणी

कसं सांगू मी तुला

कळतं तुला

म्हणून वळतं मला….


तु आणि मी

जगाच्या नजरेत

तु आणि मी दोस्त होतो..

पण मनातुन आम्ही

एकमेकांच्या जवळ होतो…

प्रेमा सारखं नाजुक असं काही असेल

हे आम्हाला कळलचं नव्हतं..

तसं जाणून घेण्याच

आम्ही काही प्रयास करत नव्हतो…

जेव्हां दुरावलो आम्ही ,

तेव्हां ते उमजलं..

पण करणार काय त्या आधी

आम्ही सारं काही गमावलं….

एकमेकांच्या भेटीसाठी

वाट आम्ही पाहत होतो..

स्व:ताच्या चुकांसाठी

नशीबाला कोसत होतो…

जगाच्या नजरेत

तु आणि मी दोस्त होतो..


फुलातं सुगंध आहे

हे घेतल्यावर कळेलं..

माझं तुझ्या वर प्रेम

हे विचारल्यावर कळेलं...


मनातुन काही शब्द उमलले

ओठांवर येऊन कविता बनले

आणि तेच मी माझ्या वहीत

लिहुन काढले


शब्द

हे शब्द आहे की गंध तुझ्या प्रेमाचे

हे जुळवतात की नाते तुझ्या माझ्या प्रेमाचे....

हे पाहतात की तुला माझ्या प्रेमात

हे वाहतात की अश्रू बनून प्रेमात....

हे होतात की सोबत तुझ्या प्रेमाची

हे देतात की सबब तुझ्या विरहाची...

हे बागडतात की तु असतानां

हे आठवतात की तु नसतानां........

हे जोडतात की अनुबंध नात्याचे

हे मोडतात की ऋणानुबंध नात्यांचे...

हे होतात की पंख तुझ्या माझ्या स्वप्नांचे

हे देतात की आकार तुझ्या माझ्या भविष्याचे......

हे शब्द आहे की गंध तुझ्या प्रेमाचे....


नाही तुझा प्रेम बंध

नाही तुझ्या आठवांचा गंध

मन आज रितं झालं तुझ्यातुन

आणि नव्याने आरंभ पुन्हा माझ्यातुन..


तुझ्या मैत्रीच्या नभांगणात

जुळूनी आज लग्नगाठ

लखलखणा-या तारांगणात

शुक्र चांदणीचा सहवास..


मनातलं चांदन तुझ्या रुपात उतरलं

प्रितीच्या मिलनात नाहुन भिजलं

एक रुप होऊन अंकुर रुजलं

पुन्हा नव्याने प्रेमांकुर फुललं..


नकळतं तुला कळतात

माझ्या मनातलें शब्द….

मी स्तब्ध होऊन पाहतो

तुझ्या ओठांवर खुलणारे अर्थ….


तुझं स्मित हसणं

मागे वळून पाहणं

जसं ओठांवर आलेले शब्द

मी कवितेत शब्दब्ध करणं…


हिरवाशालु,

तुझ्या कांकणांची झंकार…….

बेधुंद वारा , चांदण्यांची रातं

मदहोश होऊ दे तुझ्या जवानीच्या मदीरातं…


परी सारखी तु

आणि तुझं रुप,

तुझ्या केसांच्या जाळ्यांनी

मला ओढुन घे

तुझ्या ओठांचे अमृत

मला पिऊ दे


तुझ्या मिठीची उब श्वासाचा गंध

बहरला चाफा मिलनाचा बंध

इवल्याशा मनाला प्रेमाचा छंद

गुलाबी थंडी्त तु , मी धुंद


कांकणाचं तुटनं.

चाफ्याचं बहरनं

मोहरुन आलेल्या प्रितीचं

एकरुप श्वास होण…


मनाच्या रांजनात

तुझ्या प्रेमाचं पाणी

जपून वापर राणी

नाहीतर राहशील ताहणी..


स्कुटी

बरसणा-या पावसात तु

खुणावतेस मला म्हणतेस,

चल मोकळ्या माळरानात

फिरुन आणते मी तुला…

तुझा कोरारंग, नाविन्याचा स्वर

ऐकून मी होतो तुझ्यावर स्वार

देऊन रेसचा स्टार्ट करतो मोकळे

तुझ्या गतीचे पाश…

तु, मी पाहतो माळरानाकडे

वाट मोकळ्या गर्द झाडांकडे…

तुझ्या गतीच्या वेगासोबत

सुरु होतो आपला प्रवास…

गर्द हिरवा निसर्ग, बेभान वारा

पावसाच्या धारा, वेगवान शहारा..

तु म्हणतेस , जरा जपून राज्या

घे ब्रेकचा सहारा…

घेऊन मोकळा श्वास

आठवून भेटीची आस…

तुझ्या वेगवान स्वारीने मी,

गाठतो माळरानं क्षणार्धात..

फिरवून तुझ्यावर मायेचा हात

मी डोळे भरुन पाहतो

माझ्या प्रेयसीची वाट..


प्रेम म्हणजे

प्रेम म्हणजे नेमक काय असतं

त्याने हसून एकदा तिला विचारलं…

प्रेमामध्ये फुलतात रंगीन फुले

प्रयत्नाने होतात सारे मार्ग खुले..

त्याला नि तिला हवा असतो सहवास

सुखाचा एकांत आणि प्रेमाचा सुहास

प्रेम म्हणजे जीवनभराची साथ

जणु निर्जण वाटेवर आधाराचा हात..

त्याचा हात हातात घेत तिने उत्तर दिलं..

प्रेम करण सर्वांनाच जमतं नाही..

ज्याला ते जमलं त्याला ते मिळत नाही..


सगळेच करतात म्हणुन आपण करायचं नसतं..

आणि जरं केलचं तर पुर्णपणे ते निभावायचं असतं..

प्रेमात हसणं सगळ्यांनाच शक्य नसतं..

कारण प्रत्येकाला ते सुख मिळत नसतं…

सगळीचं मन सगळ्याना कळतं नसतात

म्हणुनच तर काही तरतात , काही फसतात..

तिला मिठीत घेत, त्याने त्याचं मत मांडलं..


प्रितीचा सुर तु

जगण्याचा ध्यास तु

आठवांच्या मैफीलीत विरहाचा छंद तु

माझ्या कवितांच्या शब्दात प्रेमाचा अर्क तु…


धन्यवाद..!