विवस्त्र भाग ३ Mohit Kothmire Mk द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

विवस्त्र भाग ३

शेवटी तो दिवस उजाडला लग्नाचा....
मनाची घालमेल सुरूच होते...आनंद तर होताच होता पण भीती ही तेवढी होत होती...
"आज पासून एक नवीन आयुष्य सर्व काही नवीन.."
पण दुःख एक होत की आता आई बाबा नसणार.."
लग्नाचे विधी सुरू झाले होते मी आपली लाजत बसले होते..."
"आई आणि बाबाच्या डोळ्यांमध्ये एक समाधानाचे अश्रू दिसत होते पण माझ्या समोर ते लपवण्याचा प्रयत्न करत होते..
"एवढी शी होती स्मिता..आज केवढी झालिये कधी कसला हट्ट नाही शब्दा बाहेर नाही..बघता बघता पोर एवढी मोठी होतात की कळतं ही नाही.."अस बोलत बोलत एक एक अश्रूच्या थेंबात समाधान दिसत होते..
लग्नाचे सर्व विधी संपन्न झाले आता शेवटचा माझा निरोप....
मी आणि सुधीर हातात हात धरून चालत मंडपाच्या बाहेर आलो..
मी थेट सुधीर चा हात सोडून आईच्या गळ्यात जाऊन रडू लागले..
पुढे बाबा चे पाया पडायला लागले असता बाबांनी थांबवले व मला मिठी मारली माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी आले नंतर मी गाडीत बसले..
गाडीच्या काचेतून सुध्दा मला तो एक "बाप" दिसत होता...
गाडी निघाली..
आता एक नवीन आयुष्य....
रात्र खूप झाली होती मी गाडी मध्ये अलगद सुधीर च्या खांद्यावर मान टाकली..
"काय ग झोप आली का ?? "
मी त्याच्याकडे हळूच पाहिले व मान हवलत हो असं बोलले..तो अलगद हसला व माझ्या चेहऱ्यावरून हाथ फिरवत हो बोलला...
आणि मी झोपी गेले....
"स्मिता उठ चल घर आले बघ"
मला प्रचंड झोप आलेली होती..मी तशीच उठले व घराच्या दारात जाताच उंबरठयावर धान्य ओलांडून माझ्या घरात प्रवेश केला..
माझं घर..आमचं दोघांचं घर..कारण सासू व सासरे हे तिथे राहत नव्हते.. कारण सुधीर कामानिमित्त एकडे होता..
नंतर मी माझ्या रूममध्ये गेले झोपायला..
सुधीर वेगळ्या रूम मध्ये गेला..सकाळी पूजा होती लवकर उठायचे पण होते...
दुपारपर्यंत सर्व पूजा विधी झाले..
"अहो सुधीर खूप कार्य असतात हो लग्नाचे अगदी अस वाटत आहे की आता मी आजारी पडेल एवढे लोक प्रत्येकाला भेटा पाया पडा कंबर अगदी दुखते आहे..अजून काही बाकी नाही ना.??"
"अग एक कार्यक्रम बाकी आहे ना अजून"सुधीर बोलले..
"कसला कार्यक्रम ??"
"अग घाबरु नकोस त्या कार्यक्रमामध्ये फक्त तू अन् मी आहे अजून कोणी नसेल "
"अहो काही ही तुमच पण " अस बोलून मी लाजत निघाले..
ती रात्र आली...
मी आपली रूम मध्ये होते रूम छान सजवलेली होती..
अगदी गुलाबाची फुले,पाकळ्या,एकंदर वातावरण हे अतिशय प्रसन्न व झाले होते एक शांतता अगदी सुई पडली तरी आवाज येईल एवढी मी आपली घाबरत थोडी लाजत आणि थोडी एक्साईट होऊन बसले होते..
दुधाचा ग्लास टेबल वर होता
"पण मधुचंद्राच्या रात्री दूध का पितात"हा प्रश्न मला पडला होता..
रात्रीचे ११वाजले होते..
मग सुधीर आले..त्यांनी दरवाजा लावला..खिडकी बंद केली..
ते हळू हळू माझ्याकडे यायला लागले तस तस माझी धड धड वाढू लागली..मी आपली चेहऱ्यावर पदर घेऊन बसली होते..अगदी सिनेमा मध्ये दाखवतात ना तसे...
त्यांनी हळूच माझा चेहऱ्यावरून पदर वरती केला माझी नजर खाली कारण त्या क्षणाला मला त्यांच्याकडे बघण्याची हिम्मत होत नव्हती का कोण जाणे पण एक दडपण आलेलं होत..
"स्मिता ऐक माझ्याकडे बघ"सुधीर बोलले.
मी आपली हळूच नजर वर केली जशी नजर वर जात होती तशी धडधड वाढत होती..
"मी तुला ज्या वेळेस पाहिलं ना बघताच तुझ्या प्रेमात पडलो ग?? तुझं रूप मला खूप भावले तुझा स्वभाव सर्व काही अगदी वेडा झाले तुझ्या साठी" सुधीर हे बोलताच मी लाजत गालातल्या गालात अलगद हसले त्या वेळेस सर्व काही थांबले होते वेळ पण..अगदी शांतता..फक्त आम्ही दोघं बाकी काहीच नाही
मग हळूच सुधीर ने मला मिठी मारली मी सुद्धा तुला घट्ट पकडले..
सुधीर ने माझे केस मोकळे सोडले व मानेवरून बाजूला सारत माझ्या मानेला चुंबन केले ते करताच माझ्या शरीरात एक शिरशिरी भरली अगदी एक ऊर्जा निर्माण व्हावं तस काही..मग थेट त्यांनी माझ्या ओठांची चुंबन घेतलं..ह्या वेळेस मी त्यांना मारणार नव्हते कारण हे चुकीचं नव्हतं..
मग आम्ही एकमेकात अगदी विलीन झालो जसे चहामध्ये साखर विरघळते अगदी तसे विलीन झालो..
सुधीर ने माझी साधी काढली तेव्हा मला थोड वेगळं वाटलं..आणि आम्ही आमच्या प्रणयामध्ये अगदी रमून गेलो दोघे ही विवस्त्र....
अगदी सर्व काही एकमेकांना व्यापून दिलं होत..
रात्र केव्हा गेली हे आम्हाला ही कळले नाही..झोप केव्हा आली हे सुद्धा नाही कळले जेव्हा जाग आली तेव्हा सुधीर मला घट्ट पकडून माझ्या कुशीत झोपलेलं होता पहाटेचे ५ वाजले होते..
"अग बाई ५ वाजले" पण सुधीर असे झोपले होते की त्यांना कस उठवले तरी हळूच मी उठले साडी नेसली व निघाले असता सुधीर ने माझा हाथ धरला..
"अहो सोडा तुम्हाला जायचे आहे ना कामावर आवरायचं आहे सोडा आता.."
"अग एवढी पण काय घाई आहे"अस बोलत त्यांनी मला त्यांच्याकडे ओठले..
"मग काय बोलतेय मिसेस. स्मिता सुधीर चांदेकर"
"अहो सोडा ना.."
मी लाजत रूम च्या बाहेर गेले.
"काय सूनबाई झाली का झोप??" सासू बाईंनी विचारले
मी मान खाली घालत अलगद लाजत "हो"
तिथून निघून गेले थेट मग अंघोळीला गेले
अंघोळ वैगरे गेली सर्व आवरून पुन्हा ह्यांना उठवला गेले हे अजून आपले झोपेतच..
"अहो उठा आता तरी बघा ६:३० वाजत आहेत"
असे बोलत ह्यांना कस बस उठवले
"स्मिता अग स्मिता ऐकतेस का"सासूबाईंनी हाक मारली
"हो हो आई आलेच"
"अग मी देवपुजेला जात आहे मंदिरामध्ये "
असे बोलून ते गेले मग ह्यांना अंघोळीला पाठवले..
"अग स्मिता जरा टॉवेल देतेस का बेडरूम मध्ये राहिलं बघ.."
मी टॉवेल घेऊन बाथरूम जवळ गेले असता ह्यांनी मला मधी ओढले.
"अहो काय करताय भिजते आहे मी"अस बोलून मी झिडकारून बाहेर आले.
"शी बाई पुन्हा ओली झाली पुन्हा कपडे बदलावे लागणार.." मी कपडे बदलायला गेले...
मग आम्ही दोघांनी सोबत नाश्ता केला
"अहो आई आल्या नाही अजून केव्हाचा गेल्या आहेत.."
"ओहो..खूप काळजी आतापासून सासूची "
"नाही ओ पण खूप वेळ झाला ना.."
"चल मी निघतो संध्याकाळी येईन तसा तुला फोन करेन आणि हो आई आज निघणार आहे नीट पाठव तिला"सुधीर बोलले
"लगेच चालल्या त्या "
"अग हो काम आहे तिकडे तीच"
"बरं ठीक आहे"
"चल मी निघतो bye"असे बोलून सुधीर गेले..
मी घरात एकटीच होते सर्व काही आवरायचं होत स्वयंपाक करायचा होता..
"स्मिता स्मिता.."
"आई आल्या वाटत"
"बोला आई"
"अग हे घे प्रसाद तू घे आणि त्याला ही ठेव थोडा.आणि हो मी निघते आता.."
"अहो लगेच चालल्या तुम्ही रहा ना काही दिवस "
"नको येऊन पुन्हा मध्ये मध्ये बर मी काही सांगते आहे ते नीट ऐक जरा बस इकडे"मी त्यांच्या शेजारी बसले
"स्मिता..सुधिरची नीट काळजी घे..त्याच्या आवड निवड नीट समजून घे..थोडा चिडतो तो केव्हा तरी...आणि हो तुझी ही काळजी घे बाळा.."अगदी माझी आई बोलावी तस त्यांनी समजवून सांगितले...मी त्यांच्या पाया पडले त्यांचा आशीर्वाद घेतला व त्या निघाल्या..
त्या गेल्यावर मी सुधीर ला फोन केला
"अहो, आई अताच निघाल्या.."
"बरं बर बोलता त्यांनी फोन डायरेक्ट ठेवला"
मला थोड विचित्र वाटलं पण
"मी पण ना कामात असतील हे"
"आता सर्व काम झालेत थोडी झोपावे असे वाटत एकत तर रात्री झोप नाही झाली पुरेशी"
मी सर्व रूम लॉक केले आणि झोपायला गेले
पण माझ्या मनात का कोण जाणे सुधीर न फोन ठेवला असा का हे थोड खटकत होतं असं का काहीच न बोलता ठेवला..
"स्मिता एक काम कर सुधीर ह्यांना एक फोन कर पुन्हा ..पण ते कामात असतील तर??
करूया बघुया तरी
मी पुन्हा फोन केला..
"हॅलो,सुधीर"
"काय काम आहे बोल लवकर"
"अहो असाच केला सहज"
"ठेव आता "
असं बोलून त्यांनी फोन ठेवला..
मला अजुन थोड टेन्शन आल ह्या गोष्टीचं
असे वागत आहे आल्यावर बघुया संध्याकाळी...

क्रमशः
©